परळीचा पुढचा आमदार कोणी | Pankaja Munde कि Dhananjay Munde | Parli Vaijnath | Parali Vidhansabha


मंडळी नुकतच Pankja Munde चेअरमन असलेल्या परळी वैद्यनाथ कारखाण्यावर जप्तीची कारवाई झालेली आहे. पण या कारवाईमुळे मात्र बऱ्याच शंका कुशंका निर्माण झाल्यात. म्हणजे पंकजा मुंडेना कोण जाणून बुजून संपवण्याचा प्रयत्न करतय का ? त्यांना मुद्दामहून साईडलाईन करण्यात येतंय का ? अशा प्रश्नांना राज्यभर उधाण आलंय. त्यात सुद्धा पंकजा मुंडे ह्या भाजप पक्षश्रेष्टींवर नाराज असल्याचं काय लपून राहिलेलं नाहीये.  एकूणच काय सगळ्याचं बाजूनं त्यांची कोंडी झालेली आपल्याला बघायला मिळतेय. या कारणामुळे त्या परळीतुन नाही तर नगरच्या पाथर्डी मधून निवडणूक लढणार असल्याच काही दिवसांपूर्वी बोललं जातं होतं. पण नुकतच त्यांनी त्यांच्या शिवशक्ती यात्रेदरम्यान कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना असं सांगीतलं की आपण पाथर्डीतुन नाही तर परळीतुनचं निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे आता परळीत येत्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा Pankaja Munde विरुद्ध Dhananjay Munde अशी बहीण भावांची कडाक्याची लढत बघायला मिळू शकतैय. त्यानिमित्तानेचं आता परळी मतदारसंघात नेमकी ताकद कोणाची जास्तय ? पंकजा मुंडे की धनंजय मुंडे यांची ? हेचं आपण आजच्या Blog मधून जाणून घेणार आहोत.

(Pankaja Munde vs Dhananjay Munde | Parli Vaijnath | Parali Vidhansabha )

मंडळी परळी हा विधानसभा मतदारसंघ बीड या लोकसभा मतदारसंघात येतो.सुरुवातीला आपण म्हणूनच बीड आणि परळीच्या राजकारणाचा एकूण इतिहास बघुयात. . तर बघा बीड म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतात ते  स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब. मुंडे साहेबांमुळेच या जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व कायम टिकून होतं. पण 2014 साली गोपीनाथ मुंडेंचं अचानक निधन झालं आणि पक्षानं तिथून लोकसभेसाठी प्रीतम मुंडेना संधी दिली. खरंतर धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडेचं राजकीय वारसदार मानलं जायचं. पण 2009 साली गोपीनाथ मुंडे हे लोकसभेवर गेल्यावर त्यावर्षी विधानसभेला पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली. म्हणून मग धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी पक्षान त्यांना विधानपरिषदेवर निवडून आणलं.पण त्यामुळे इथून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सुप्त संघर्षाला सुरवात झाली. त्यामुळेच जानेवारी 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसेच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला. 2013 मध्ये तर धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक थेट राष्ट्रवादीकडूनच लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आणि त्यामध्ये धनंजय मुंडे विजयी झाले.  मुंडेंच्या निधनानंतर मग धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा तीव्र संघर्ष सुरू झाला. पुढे 201४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यामध्ये पंकजांनी 25 हजार 895 मतांनी बाजी मारली. आणि त्या परळीच्या आमदार झाल्या. डिसेंबर 2016 मध्ये परळी नगरपालिकेची निवडणूक झाली. मुंडे कुटुंबीयांसाठी ही नगरपालिका नेहमीच महत्त्वाची ठरलीयं. त्यावेळेस सुद्धा तिथं पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असचं चित्र होतं. तेव्हा धनंजय मुंडेनी 33 पैकी तब्बल 27 उमेदवार निवडून आणत  नगरपालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या निवडणुकीनंतर भावा बहिणीतली ही चुरस आणखीनच वाढली. 2017 च्या सुरुवातीला लगेचच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली तर भाजप इथं दुसऱ्या क्रमांकावर राहिली .

(Pankaja Munde vs Dhananjay Munde | Parli Vaijnath | Parali Vidhansabha )

या जिल्हा परिषद निवडणुकीत परळी तालुक्यात भाजपला मोठा फटका बसला. मे 2017 मध्ये परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते. खरंतर अनेक वर्षं गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात ही बाजार समिती होती. या बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पुन्हा एकदा समोरासमोर उभे होते. दोघांनी आपापल्या दिवंगत वडिलांच्या नावांवर तेंव्हा पॅनल उभ केल होत. त्यावेळी पंकजा मुंडे यांच्या भगिनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी त्यांचा प्रचार केला होता. पण पंकजा मुंडे यांच्या पॅनलला बाजार समिती निवडणूकीच्या पराभवाला पुन्हा एकदा सामोरं जावं लागलं. धनंजय मुंडे यांच्या पॅनलन त्या बाजार समितीवर मोठा विजय मिळवला. मंडळी 2009, 2014  या दोन टर्म पंकजा मुंडेनी त्यांच्या मतदार संघावर वर्चस्व राखलं. पण 2019 ला मात्र धनंजय मुंडेनी 30 हजार 701 इतक्या मोठ्या मताधिकयानं पंकजा मुंडे यांचा पराभव केला. पराभवानंतर त्यांना पक्षान पुन्हा दुसरीकडे कुठेही संधीही दिली नाही. विधानपरिषदेचा त्यांचा चान्स असाच हुकला. त्यांच्याऐवजी गोपीचंद पडळकर हे भाजपकडून आमदार झाले. अर्थात पंकजा मुंडे यांचं राजकीय महत्त्व कमी करण्यासाठी त्यांच्या समर्थकांना विधान परिषद, राज्यसभेवर संधी दिली गेली. यानंतर पंकजा मुंडे सातत्यान महाराष्ट्रातील पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. विशेषतः त्यांचा रोख फडणवीसांवर दिसून यायचा.

(Pankaja Munde vs Dhananjay Munde | Parli Vaijnath | Parali Vidhansabha )


आता राज्यात ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची सत्ता अस्तित्वात आली. धनंजय मुंडे मंत्री झाले. पण मविआ कोसळल्यावर आमदार धनंजय मुंडे यांच हे मंत्रिपद गेल. तेंव्हाच धनंजय मुंडे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर आहेत अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.
धनंजय मुंडे हे बीडचे भाजपचे पुढचे खासदार होतील असं बोललं जाऊ लागलं. पण मध्येच अजित पवार यांनी शरद पवारांनविरोधात बंड करत भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या  बरोबरीबे धनंजय मुंडे यांनी सुद्धा मग कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. आता या घटनेमूळ संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. अजित पवार भाजप सोबत आल्यानं आणि त्यांच्या सोबतीला आमदार धनंजय मुंडे यांनाही मंत्रिपद मिळाल्यान पंकजा मुंडे यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. कारण येणाऱ्या सगळ्या निवडणूका भाजप-एकनाथ शिंदे आणि अजित दादा गट एकत्र लढवणार अस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केलंय. त्यामुळ परळी विधानसभा मतदारसंघ येणाऱ्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहतो की भाजपकडे जातो यावरचं पुढची सर्व गणितं अवलंबून असणारेत. आता परळी विधानसभा मतदार संघाचे चालुचे आमदार धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळ या मतदारसंघात पुन्हा तेच निवडणूक लढवणार असतील तर मग भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे काय होणार ? हा प्रश्न तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना पडला आहे. त्या शरद पवार गटात जातील अशाही आता चर्चा आहेत. आता तस जर झालं तर शरद पवार सिम्पथी कार्ड प्लस पंकजा मुंडे सिम्पथी कार्ड एकत्र आलं तर परळीत पंकजा मुंडेची ताकद नक्कीच वाढेल. पण परळीत शरद पवारांनी अजून एक चेहरा राखीव ठेवलाय त्याबद्दल पुढे बोलूच. पण एकूणच परळीचं राजकारण हे आजवर भावनिक मुद्द्यानवरचं झालं आहे. २००९ आणि 2014 ला गोपीनाथ मुंडेच्या सहानुभूतीवर पंकजा मुंडे निवडून आल्या. तर दुसऱ्या बाजूला 2019 ला सुद्धा धनंजय मुंडे ओबीसी धुर्वीकरणाच्या फॅक्टर वर निवडून आले. धनंजय मुंडे यांच्या पंकजा मुंडेवर आक्षेपार्ह टीका असणाऱ्या कथित व्हिडीओ क्लिपमुळे सुद्धा तेंव्हा वातावरण चांगलंच तापल होतं. यावर बोलताना पंकजा मुंडेना स्टेजवर भोवळ सुद्धा आलेली होती. पण या घटनेला स्मार्टली ट्रीट करत याचा फायदा धनंजय मुंडेनी स्वतःलाच करून घेतला होता.

(Pankaja Munde vs Dhananjay Munde | Parli Vaijnath | Parali Vidhansabha )

त्याचबरोबर सोबतीला त्या निवडणुकीत धनंजय मुंडेना वंजारी मतं आपल्या बाजूने वळवण्यात सुद्धा यश आल होतं आणि ते विजयी झाले होते.  यावर्षी परळी बाजार समितीत 18 जागांपैकी 11 जागेंवर विजय मिळवत पुन्हा एकदा त्यांनी पंकजा विरोधात आपलं वर्चस्व सिद्ध केलंयं. पण मध्येच परळी कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे आणि भगवानगडावर दोघेही भाऊ बहीण राजकीय वैर संपवणार असं म्हंटल्यामुळ ते दोघे एकत्र येणार का अशा चर्चाना उधाण आलं होतं. पण तस झालं तर ते दोघांच्याही राजकीय भविष्यासाठी मारक ठरणारे हे नक्की. पण एकूणच बघायला गेलं तर मध्यंतरीच्या काळात पंकजा मुंडे या बॅकफुटला गेल्या होत्या . त्यांचा लोकसंपर्क सुद्धा कमी झाला आहे असं बोलण्यात येत होतं. पण शिवशक्ती यात्रा आणि देवदर्शन दौरा यामुळे पंकजा मुंडेनी परळीत पुन्हा वातावरण तापवायला सुरूवात केली आहे. त्यातच परळी वैद्यनाथची झालेली त्यांची कारवाई त्यांना लोकांना भावनिक करायला पोषक ठरली तर मग त्यांच्या विरोधकांसाठी हा मोठा सेटबॅक असू शकतो. आता त्यासोबतच अजित दादांच्या बंडाचाही या निवडणुकीवर बराच परिणाम होणारे. कारण जो विजयी त्याची सीट या फॉर्मुल्यान धनंजय मुंडेना जर तिकीट मिळालं तर पंकजा मुंडेना स्वतंत्र लढावं लागेल किंवा मघाशी सांगितल्याप्रमाण त्या शरद पवार गटात जातील. आता दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे अजित दादांसोबत गेल्यामुळे परळीतून राष्ट्रवादीचा एक नवा चेहरा नुकताच समोर आलाय. ज्याबद्दल आपण मघाशी बोलत होतो. म्हणजे बघा शरद पवारांच्या सभेत हजारो कार्यकर्त्यांसह जनक्रांती सेनेच्या बबनराव गिते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आता याचा फटका नक्कीच धनंजय मुंडे यांना बसणार आहे. कारण गीते हेच मुंडेच्या विजयाचे तेव्हाचे किंगमेकर प्लेयर होते. आता पंकजा मुंडेंना ऑप्शन म्हणून शरद पवारांनी हा चेहरा कदाचित राखीव ठेवला असावा. पण शरद पवार यांच्या इशार्‍यावर जर इथून पंकजा मुंडे आणि बबन गीते यांची युनिटी जुळली तर मगधनंजय मुंडेचा इथला कार्यक्रम बिघडणार आहे.‌

(Pankaja Munde vs Dhananjay Munde | Parli Vaijnath | Parali Vidhansabha )


दुसरीकडं परळी वैद्यनाथ कारखाना हातात असणं पंकजा मुंडेसाठी प्लस पॉईंट होता पण त्याच्यावर कारवाई झाल्यानं पंकजा मुंडे बॅकफुटला गेल्यात. आता कारखान्याच्या लाभर्थ्यांचा फायदा पंकजा मुंडे यांना कदाचित झाला असता पण कारखाना बरेच दिवस झालं आर्थिक संकटात आहे. शेतकरी, कामगार, मुकादम यांची बिल थकलेली आहेत. त्यामुळं पंकजा मुंडेंसाठी हा मोठा फटका मानण्यात येतोय.आता ज्याचं ग्राउंडवरचं काम चांगल तो प्लस मध्ये, असा विचार केला तर नक्कीच काही परळीकरांचं मत सध्या धंनजय मुंडे यांच्या बाजूने आहे.‌ पण दुसरीकडे पंकजा मुंडे यांचाही जनसंपर्क तगडा आहे तसेच लोकांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची हातोटीही कमाल आहे.त्यामुळे त्या ही इथून तगड्या प्रतिस्पर्धी आहेत. अर्थात धनंजय मुंडेचं अजित दादा गटात जाणं हे त्यांच्यासाठी इथं तारक ठरणार की मारक हे येणारा काळचं ठरवेलं . पण बबनराव गिते हे मात्र धनंजय मुंडेंसाठी इथून डोकेदुखी ठरणार हे पण तितकंच खरंय. कारण गितेंनी परळीत त्यांच नेतृत्व मजबूत करायला सुरुवात केलीय.   एकूणच वंजारी मतं आणि कोण कोणत्या पक्षातून परळीत निवडणूक लढावणार या गोष्टी इथं की फॅक्टर ठरणारेत .
अखेर पंकजा मुंडे इथून काय भूमिका घेतील. कसं टाईमिंग साधतील. भाजप हायकमांडशी कसं डील करतील. धनंजय मुंडेंना कसं आव्हान देतील यावर बर्‍याच पुढच्या गोष्टी डिपेंड आहेत.देवदर्शन दौर्‍यापासून त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. पण त्यांचं बरीच काळं राजकीय विजनवासात जाणं हे त्यांच्या समर्थकांसाठी मात्र आजही त्रासदायक ठरत आहे. असो पणबाकी तुम्हाला काय वाटतंय ,तुमच्यामते परळी मतदारसंघात कोणाची ताकद जास्तय ?परळीचा पुढचा आमदार कोण? पंकजा मुंडे की धनंजय मुंडे ?तुमचं मत आम्हाला कमेंट करुंन नक्की सांगा…

परळीचा पुढचा आमदार कोणी | Pankaja Munde कि Dhananjay Munde | Parli Vaijnath | Vishaych Bhari


Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ajit pawarbreaking newsdhananjay munde beedjarange patil on devendra Fadnavispankaja mundeparali vidhansabhaParli Vaijnathsharad pawarvishay bharivishaych bharivishaychbhariविषयच भारी
Comments (0)
Add Comment