लग्न का लावून देत नाही म्हणून पोरानं बापाच्या डोक्यात घातली फरशी | उपचारादरम्यान बापाचा मृत्यू | Pandharpur Crime News | Angry Youth Hit His Father On Head

मंडळी पंढरपूर म्हणलं की सर्वात पहिल्यांदा आपल्याला आठवत कमरेवर हात ठेवून विटेवरी उभा राहिलेली नवचैतन्याची जननी, मायेचा सागर विठू माऊली. एरवी पंढरपूरात विठू नामाच्या गजराशिवाय काहीच ऐकू येत नाही पण परवा एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण पंढरपूर हादरलं विठ्ठलाच्या नामघोषात बुडालेल्या त्या पुण्यभूमीला गालबोट लागणारी एक दुर्दैवी घटना तिथं घडली. माझं लग्न का लावून देत नाही म्हणून एका मुलानं आपल्या बापाच्या डोक्यात फरशी घातली अन पुढं उपचारादरम्यान त्या बापाचा दुर्दैवी अंत झाला. नेमकं काय घडलं त्ये सविस्तर जाणून घेऊयात…

( Pandharpur Crime News | Angry Youth Hit His Father On Head )

पंढरपूरमधलं भगवान नगर गाव. तिथं हुकूम माणिक कदम नावाचे 58 वर्षीय व्यक्ती राहत होते. ते पायानं अपंग असल्याचं स्थानिक पत्रकारांकडून समजतंय. त्यांचा 28 वर्षाचा मुलगा गोपिचंद उर्फ जितू हुकुम कदम हा मागच्या काही काळापासून त्यांच्याकडं माझं लग्न लावून द्या अशी सातत्यानं मागणी करत होता. वास्तविक पाहता कदम कुटुंब अत्यंत गरीब असून त्यांचा मोठा मुलगा कुटुंबाच्या पालनपोषणासाठी एका कापड दुकानात काम करतोय. तर त्यांची पत्नी इतरांच्या घरी धुणंभांड्याची कामं करते. मात्र धाकटा मुलगा म्हणजे आरोपी गोपीचंद हा मागच्या काही काळापासून बेरोजगार होता. त्याचं शिक्षण देखील न व्यवस्थित पूर्ण न झाल्यानं त्यानं काही दिवसांपूर्वी एक वेल्डिंगचं दुकान सुरू केलेलं होतं. मात्र त्या ही ठिकाणी तो जबाबदारीनं काम करत नसल्यानं त्याच्या घरचे लोक हैराण झाले होते. हुकूम कदम अपंग असल्यामुळं त्यांना स्वतःला कामं करताना अडचणी यायच्या. त्यामुळं घरी पैसापाण्याची तंगी होती. मात्र आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव नसलेला गोपीचंद उर्फ जितू आपल्या अपंग वडिलांच्या मागं सातत्यानं लग्नाचा तकादा लावत होता. मात्र वडिलांनी त्याची बेजबाबदार वृत्ती पाहून त्याला विरोध केला. तेव्हा संतापलेल्या गोपीचंदनं रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास वडील हुकुम कदम यांना ” तू माझं लग्न करत नाही, तुला आता ठेवत नाही “असं म्हणून शिवागाळ केली. पुढं आणखी वादावादी झाली अन गोपीचंद कदम यानं घरासमोर पडलेल्या लाकडाच्या तुकड्यानं वडिलांना मारहाण केली. त्यानंतर बाजूचा फरशीचा तुकडा उचलला आणि वडिलांच्या डोक्यात घातला. त्या मारहाणीत हुकुम कदम गंभीररित्या जखमी झाले. परिसरात कालवा झाल्यानंतर हुकूम कदम यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

( Pandharpur Crime News | Angry Youth Hit His Father On Head )

मात्र तोपर्यंत त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले पण उपचारादरम्यान हुकूम कदम यांचा मृत्यू झाला. ती घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढं पंढरपूर पोलिसांनी त्या प्रकरणात मुलाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ ह्ये त्या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. आपलं लग्न जमवत नसल्यानं एका मुलानं स्वतःच्या जन्मदात्या पित्याच्या डोक्यात फरशी घालून त्यांची हत्या करावी यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं. पंढरपूराला जो अध्यात्मिक वारसा लाभलाय त्याला गालबोट लावणाऱ्या या घटनेमुळं संपूर्ण शहर आणि पर्यायानं सोलापूर जिल्ह्यात खळबळ माजलेली आहे. खरं तर अशा घटना आता लोकांना नव्या राहिलेल्या नाहीयेत. दररोज अशी एकतरी घटना कानावर  येतेच. गुन्हेगारीला ग्लामर आल्यासारखं पोरं कोणताही मागचा पुढचा विचार न करता गुन्हे करायला लागलीयेत, किंवा गुन्ह्यात सामील व्हायला लागलीयेत. पुण्यात तर कोयत्याचा धाक दिवसेंदिवस वाढतच चाल्लाय. अन राज्याचं गृहखातं अजूनही डोळ्यावर पट्टी बांधून बसलंय. सध्या दुनियेतली वाढती हिंसा बघून आता असंच वाटायला लागलंय की लवकरच या जगातली माणसं संपतील अन जगात उरतील फक्त रक्तानं माखलेले कोयते, दगड, कपडे आणि पीडीत लोकांचा मुका आक्रोश. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना पाहून तर मन पुरतं सुन्न झालंय. मागच्या काही दिवसापूर्वी कल्याणमध्ये एक तर्फी प्रेमातून एका तरुणानं 12 वर्षीय मुलीची हत्या केली. सायन स्टेशनवर गर्दीत बायकोला धक्का लागला म्हणून एका व्यक्तीनं तरुणाला झापड मारली. त्या झापडीनंतर तरुणाचा तोल गेला आणि तो रेल्वे रुळावर पडला.

( Pandharpur Crime News | Angry Youth Hit His Father On Head )

त्यानंतर लगेचच तिथं रेल्वे आली आणि तो तरुण रेल्वेखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. पुण्यात मागची दुश्मनी डोक्यात ठेवून एका टोळक्यानं मंगला टॉकीज परिसरात सिनेमा पाहायला आलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला करायचा प्रयत्न केला. मुंबईत रिलेशनशिपमध्ये असताना सेक्सला नकार दिला म्हणून 18 वर्षीय मैत्रिणीचं भिंतीवर डोकं आपटलं आणि नंतर उशीनं तोंड दाबून हत्येचा प्रयत्न केला, पुण्यातल्या सोसायटीत एका व्यक्तीनं कुणाच्या तरी बायकोबद्दल 160 लोकांना अश्लील मेल पाठवले, इंदोरमध्ये एक फॅमिली त्यांच्या कुत्र्याला घेऊन बाहेर फिरायला आली होती. तेव्हा त्यांच्या कुत्र्याची एका सोसायटीतल्या दुसऱ्या कुत्र्यासोबत भांडणे झाली. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज सहन झाला नाही म्हणून एका सुरक्षा रक्षकानं गोळीबार करून दोन जणांची हत्या केली. अन बीडमध्ये वडील सतत आईच्या कॅरेक्टर वर शंका घेतायत म्हणून पोरानच वडिलांना संपवलं. वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, निकृष्ट दर्जाची शिक्षण व्यवस्था, योग्य वयात लग्न न जमणे, त्यातून येणारा ताण आणि नैराश्य यामुळं अन महत्वाचं म्हणजे गुन्हेगारीला आलेलं ग्लामर यामुळं देशाच्या समाज व्यवस्थेचं स्वास्थ्य बेक्कार बिघडलेलंय. अन आता राज्याच्या गृहखात्यानं, पोलीस खात्यानं त्या राज्याच्या बिघडलेल्या सामाजिक स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचंय. बाकी तुमचं या संबंधित प्रकरणाबद्दल नेमकं काय म्हणणंय त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

breaking newspandharpur batmyapandharpur crime newsPandharpur Crime News | Angry Youth Hit His Father On Headpandharpur crime news todaypandharpur hatyapandharpur lagnpandharpur lagn crimepandharur crimesolapur crimesolapur crime newssolapur pandharpur crime newsvishaych bhariपंढरपूर खूनपंढरपूर बातम्यापंढरपूर हत्याविषयच भारी
Comments (0)
Add Comment