या ३ कारणांमुळे नरेंद्र मोदी शरद पवारांना आपला राजकीय गुरू म्हणतात | Narendra Modi Sharad Pawar Friendship

आज तब्बल आठ वर्षांनंतर नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे पुण्यात एकाच मंचावर दिसले. आता हे झालं सार्वजनिक ठिकाणी. पण महिन्यातून तीन ते चार वेळा मोदी पवारांच्या संपर्कात असतातच. असं मी नाही पाठीमागे मोदी जेव्हा बारामतीत आले होते तेव्हा म्हणाले होते. वर ते हे सुद्धा म्हणाले कि पवार साहेब हे माझे राजकीय गुरू आहेत म्हणून. पण अशी नेमकी काय कारणं आहेत. असं काय नेमकं नरेंद्र मोदी शरद पवारांकडून शिकले असावेत जे ते शरद पवार यांना आपला गुरू म्हणतात बरं. चला सगळंच समजावून घेऊयात….

तर मोदींनी शरद पवार यांना गुरू मानण्याचं सगळ्यात पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे शरद पवार यांचं कृषी खात्यातलं काम :

आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल कि Sharad Pawar हे महाराष्ट्राचे एकूण चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्याचबरोबर ते देशाचे संरक्षणमंत्री तसेच कृषीमंत्रीही राहिलेले आहेत. खासकरून कृषीखातं हे शरद पवार यांच्या आवडीचं खातं राहिलं आहे. शरद पवार हे कृषीमंत्री असताना नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. अगदी त्यावेळी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी नरेंद्र मोदींनी मागे शरद पवार यांना गुजरातला बोलावलं होतं. त्यावेळी मोदी शरद पवार यांना ऐकून प्रचंड प्रभावित झाले होते. त्यानंतर मोदी आणि पवार हे कायम अधूनमधून संपर्कात होते असं बोललं जातं. पण २०१४ नंतर तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. आणि मग राधा मोहन सिंग, नरेंद्र सिंह तोमर वगैरे बर्याच मंडळींनी देशाचं कृषीखातं सांभाळलंय. पण यावेळी अगदी पक्षाच्या पलीकडे जाऊन नरेंद्र मोदींनी शरद पवार यांची मदत घेतली. म्हणजे कृषीखात्यातील काही ध्येयंधोरणं असतील किंवा मग काही कृषीविषयक विधेयकं असतील मोदींनी बऱ्याच वेळा शरद पवार यांचं मार्गदर्शन घेतलेलं बघायला मिळालंय. खासकरून साखरेविषयीचं धोरण बनवताना शरद पवार यांचं मार्गदर्शन आताच्या केंद्र सरकारला उपयुक्त ठरलं असावं,असं बोललं जातंय. कारण ऊस कारखानदारी, साखरेचं मूल्यनिर्धारण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर शरद पवार यांच्या इतका अभ्यास असणारा दूसरा नेता देशात नाही. अगदी ४ वर्षांपूर्वी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये Narendra Modi, अमित शाह यांच्यासोबत शरद पवार यांनाही शुगर फॅक्टरीच्या बैठकीला बोलवले होते. पण त्यावेळी शिवसेना आणि भाजप मध्ये सत्तेवरून negotiation सूरू होतं. त्यामुळे ही बैठक राजकीय असल्याचा आरोप तेव्हाही कांग्रेसने केला होता.

( Narendra Modi Sharad Pawar Friendship )

दुसरी गोष्ट म्हणजे पवारांनी मोदींना महाराष्ट्रात राजकीय स्थिरता दिली.

नरेंद्र मोदी यांनी २०१४ ला भाजपला एकहाती विजय मिळवून दिला पण तरीही महाराष्ट्रात मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. २०१९ लाही तसंच घडलं उलटपक्षी या निवडणुकीत आधीपेक्षाही भाजपच्या जागा घटल्या. आता २०१५ च्या टर्मचा विचार करता भाजपने १२२ तर शिवसेनेनं ६३ जागा जिंकल्या होत्या. पण दोन्ही पक्ष सेपरेट लढले होते. परिणामी निवडणूकीनंतर दोन्ही पक्षांनी युती केली पण युतीनंतर दोन्ही पक्षात बर्याच कुरबुरी झाल्या. त्यावेळेस भाजप सत्तेवर टिकू शकली होती ती एका अदृश्य शक्तीच्या आधारावर. अर्थात त्यावेळी भाजपला बाहेरून पाठिंबा देणारा पक्ष राष्ट्रवादीचं होता म्हणून तर भाजपनं पाच वर्षे सत्तेत व्यवस्थित काढली. आता २०१९ चा पहाटेचा फसलेला शपथविधीचा प्रयोग सोडला तर आजही भाजपला सपोर्ट करणारा एक हात राष्ट्रवादीचाच आहे हे विसरून चालणार नाही.
त्यामुळे या देवाणघेवाणीची जाण असल्यामुळे मोदी पवारांना गुरू मानत असावेत.

नंबर तीन म्हणजे राजकारण सेंट्रलाईज ठेवणे

आता उमेदवाराचा आकडा म्हणाल तर शरद पवार यांच्याकडे आता जवळपास १८ ते १९ आमदार आहेत तर खासदार आहेत फक्त ४ ते ५ . आता या हिशोबाने शरद पवार यांची राजकीय ताकद तुम्हाला निश्चितच कमकुवत वाटेल पण तरीही शरद पवार हे कायम महाराष्ट्राच्या राजकारणात सेंट्रलला असतात. अर्थात त्यांची प्रदीर्घ कारकीर्द, जिद्दी स्वभाव, राजकीय अभ्यास, जनसंपर्क आणि एखाद्यावर प्रहार करायची शक्ती अफाट असल्यानेच भलेभले नेते त्यांच्यापुढे मांजर होतात.‌ आता मोदींच्या राजकारणात पवारांच्या काही कूटनीतींचा समावेश होतो. म्हणजे शरद पवारांनी जर ठरवलं तर ते एखाद्याचा खेळ बिघडू शकतात. हीच नीती मोदींमध्येही बघायला मिळते. म्हणजेच सोबतच्या कुठल्याही डोईजड नेत्यांना समकक्ष होऊ न देता संपूर्ण राजकारण सेल्फ सेंट्रीक ठेवण्याचं कसब शरद पवार यांच्याकडे आहे. सेम वे मोदीही पवारांची हीच गोष्ट फाॅलो करताना दिसतात.‌ म्हणजे अजित पवार भाजपमध्ये जाण्याची वेळ आली तेव्हा शरद पवारांनी राजीनामास्त्र बाहेर काढून राष्ट्रवादीत आपला खुंटा बळकट केला. तर अगदी आजही त्यांनी राष्ट्रवादीत अजित दादा नाही तर आपणच सुपेरियर आहोत हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. मोदींंच्या राजकारणातंही हेच साम्य दिसून येतं. म्हणजे त्यांच्या समकक्ष असणार्या लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, अटलबिहारी वाजपेयी या नेत्यांना कधीच त्यांनी फ्रंटलाईन होऊ दिलं नाही. अगदी नितीन गडकरी असतील किंवा मग सुषमा स्वराज या दोन्हीही तुल्यबळ मंत्र्यांनाही त्यांनी कधीच फार एक्सपोजर दिले नाही. म्हणजे सुषमा स्वराज विदेश मंत्री असूनही मोदीच त्याकाळी आणि अगदी आजही बऱ्यापैकी विदेश दौरे करतात.

( Narendra Modi Sharad Pawar Friendship )

असो, एकंदरीत काय तर शरद पवार यांच्या सेल्फ सेंट्रीक राजकारणाला मोदींनीही अंगीकारलं आहे. फरक इतकाच कि मोदींचं राजकारण हे अधिक मीडियाकेंद्रित राहिलं तर पवारांचं अधिक सत्ताकेंद्रित. फडणवीसांनीही २०१७ नंतर बर्याचदा मोदी पवारांना फाॅलो करायचा प्रयत्न केलेला दिसतो. यातूनच एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना त्यांनी साईडलाईन केल्याचं दिसून येतं. आता शरद पवार यांनीही अशी sideline game बऱ्याचदा केली. नाही असं नाही, पण फरक इतकाच कि शरद पवारांनी कधीच त्यांच्या कृतीमुळे राजकीय वैर ओढवून घेतलं नाही उलट नेहमीच काळानुरूप संबंधित नेत्यांसोबत राजकीय समझोते केले. पण फडणवीसांनी मात्र यातून अनेकांची राजकीय दुश्मनी ओढवून घेतली. असो, तर ही काही मुख्य कारणं आहेत. ज्यामुळे मोदी पवारांना खूप मानतात. आता अर्थातच कोणालाही राजकीय गुरू म्हणवताना त्यामागे बरेच राजकीय संदर्भही असतात.

म्हणून तर २०१७ साली मोदींच्या कार्यकाळात शरद पवार यांना पद्मविभूषण सारखा मोठा नागरी पुरस्कार मिळतो. त्याअगोदर सोनिया गांधी आणि गांधी कुटुंबावरील वैयक्तिक टीकेनंतरही शरद पवारांनी आपण मोदींवर कारवाई करणार नाही आहोत, असं घूमजाव युपीए सरकारच्या काळात घेतलं होतं. अर्थात सोनिया गांधी यांना विरोध हा पवार आणि मोदींमधील समान दुवा आहे. मोदी तो आज करतात. शरद पवार तो १९९९ ला करायचे, एवढाच काय तो फरक. पण ज्यावेळी शरद पवार हे सोनिया गांधी यांच्या विरोधात होते तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातमध्ये active होते‌ . त्यामुळे हाच त्यांच्या राजकीय मैत्रीतला कदाचित मुख्य धागा असावा. त्यांच्यामध्ये अजून एक समान मित्र म्हणता येईल असं नाव म्हणजे उद्योगपती गौतम अदानी यांचं. असो,तर शरद पवार यांच्या पुलोदच्या सरप्राईजिंग प्रयोगाची पार्श्वभूमी, एकूण त्यांची सत्तेसाठीची भूक, जिद्द आणि मुत्सद्दीपणा मोदींनीही हेरला असावा म्हणून तर २०१५ आणि आताही भाजप सरकार महाराष्ट्रात स्थिरपणे टिकून आहे.‌ बदल्यात पवारांनीही ईडी सीबीआयच्या भल्यामोठ्या वादळातंही कधीच आपली ‘राजकीय जागा’ सोडलेली आपल्याला दिसली नाहीये. पण मोदी आणि शरद पवार यांचे भविष्यातील प्रयोग काय असतील? या नव्या समीकरणांमुळं कांग्रेस, ठाकरे गट आणि शिंदे गट उतरणीला लागेल का ? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.

( Narendra Modi Sharad Pawar Friendship )

या ३ कारणांमुळे नरेंद्र मोदी शरद पवारांना आपला राजकीय गुरू म्हणतात | Narendra Modi Sharad Pawar Friendship

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

breaking newsnarendra modi convoy in punenarendra modi dehu pune speechnarendra modi livenarendra modi live bhashannarendra modi live newsnarendra modi live programnarendra modi live punenarendra modi live speechnarendra modi live todaynarendra modi on sharad pawarnarendra modi punenarendra modi pune entrynarendra modi pune metronarendra modi pune visitnarendra modi tilak purskarpm modi punepm modi pune entrypm modi pune metrosharad pawarSharad pawar narendra modi punevishaych bhariनरेंद्र मोदी लाइवविषयच भारी
Comments (0)
Add Comment