भारतीयांच्या कर्तृत्वात मानाचा तुरा रोवला गेला. चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ म्हणजे पृथ्वीवरून जी चंद्राची दुसरी बाजू आपल्याला कधीच दिसत नाही त्या जागेवर 70 अक्षांशावर व्यवस्थितरित्या लँड झालंय. 14 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून चंद्रयान-3 ने यशस्वी उड्डाण केलेलं होतं. त्यानंतर आज म्हणजे तब्बल 40 दिवसांनी 23 ऑगस्टच्या संध्याकाळी 6 च्या दरम्यान चंद्रयान – 3 चं लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलंय. पण चंद्रयान 3 चंद्रावर उतरण्याच्या काळातली शेवटची पंधरा मिनिट अत्यंत महत्वाची होती. त्यावेळी सगळ्यांच्या छातीची धडधड वाढलेली. पण ती का आणि चंद्रयान 3 चंद्रावर लँड पाठवून इसरोनं नेमकं काय साध्य केलंय त्ये सगळं सोप्या भाषेत समजून घेऊयात…
( Narendra Modi On Chandrayaan 3 update )
इस्रोच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रयान 3 ला शेवटच्या 15 मिनिटांत सुरक्षित सॉफ्ट लँडिंग करावं लागणार होतं. 2019 मध्ये जेव्हा चंद्रयान -2 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं तेव्हा त्यात ऑर्बीटर, लँडर आणि रोव्हर अशा तीन मॉड्युल्सचा समावेश होता. प्रक्षेपण झाल्यानंतर चंद्रयान 2 यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत पोहोचलं खरं पण चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किमी उंचीवर असताना त्यात किरकोळ तांत्रिक बिघाड झाला आणि चंद्रयान 2 चं लँडर मॉड्युल क्रॅश झालं. त्यानंतर गेले चार वर्षे झालं चंद्रयान 2 चं ऑर्बीटर मॉड्युल चंद्राच्या कक्षेत फिरतय. त्यामुळं यावेळी शेवटच्या 15 मिनिटात चंद्रयान 3 सोबत तशी काही दुर्घटना होणार नाही यासाठी इसरोच्या शास्त्रज्ञानी सावधगिरी बाळगली होती. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले की, आम्ही चंद्रयान -3 च्या लँडर मॉड्यूलसोबत तसे अपघात टाळण्यासाठी सर्व व्यवस्था केली होती. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरही शास्त्रज्ञांनी ठोस काम केलं होतं. मित्रांनो खरं तर चंद्रावर उतरणं हे पृथ्वीवर उतरण्याएवढं सोप्प नाहीये. कारण चंद्रावर पृथ्वीसारखं वायूमंडळ म्हणजेच वातावरण नाही आणि दोन्ही ठिकाणच्या गुरुत्वाकर्षणामध्ये खूप मोठा फरकय. चंद्रावर पॅराशूटच्या मदतीनंच संपूर्ण लँडर मॉड्युलचं चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग कराव लागत. न्यूटनने सांगितलेल्या गतीचा तिसरा नियम वापरून ह्ये अवघड काम साध्य करावं लागतं. त्यामध्ये एक महत्वाची समस्या शास्त्रज्ञांना फेस करावी लागली. ते म्हणजे उड्डाण केल्यापासून त्याचा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रवास सुरू होईपर्यंत, शास्त्रज्ञांनी चंद्रयान-3 ची दिशा आणि वेग पृथ्वीवरून नियंत्रित केला आणि त्याचे बूस्टर ही प्रज्वलित केले होते. पण चंद्रावर लँडिंग करताना लँडर मॉड्युलचं नियंत्रण शास्त्रज्ञाना करता येतं नाही. यानाला स्वयंचलितपणे लँडिंग करावं लागणार होतं. अन म्हणूनचं त्यासंबंधी सगळं प्रोग्रामिंग करून सुद्धा इसरो चिंतेत होती.
( Narendra Modi On Chandrayaan 3 update )
खरं तर त्यासाठीचं चंद्रयान -3 च्या लँडरमध्ये रॉकेट बसवण्यात आले होते. शेवटी त्यांना प्रज्वलित करण्यात आलं आणि स्वयंचलित पद्धतीनं लँडर मॉड्युल चंद्राच्या पृष्ठभागावर अतिशय मंद गतीनं सॉफ्ट लँड झालं. खरं तर चंद्रयान-2 मध्येही अशीच व्यवस्था करण्यात आली होती. मात्र शेवटच्या क्षणी तांत्रिक बिघाड झाल्यानं त्याचं क्रॅश लँडिंग झालं. आपण यानाचं लँडिंग का कंट्रोल करू शकत नाही असं विचारल्यावर इसरोच्या अध्यक्षानी सांगितलं की कोणत्याही यानाचं लँडर मॉड्युल लंबवर्तुळाकार कक्षेत चंद्राभोवती फिरतं. ते लँडिंग करताना त्याचा वेग खूप जास्त असतो. म्हणजे ताशी 100 किलोमीटर अन तेवढ्या वेगानं खाली कोसळणाऱ्या लँडरला नियंत्रित करण्यासाठी जवळपास अडीच सेकंदाचा वेळ लागतो जो की पृथ्वीवरून नियंत्रित करणं अवघड कामय. म्हणूनच लँडरमध्ये ऑटोमॅटिक लँडिंग प्रणाली बसवलेली असते. एकूण 8 टप्प्यांमध्ये ही लँडिंग प्रक्रिया यशस्वी करण्यात आली. त्यामध्ये पहिला टप्पा होता चंद्रयान-3 नं चंद्राच्या पृष्ठभागावर झेप घेण्यासाठी बूस्टर फायर करून 100 किलोमीटर उंचीवर परिभ्रमण करणं. कारण तिथून ते वेगानं चंद्राच्या पृष्ठभागावर येतं. तशाप्रकारे, लँडर मॉड्यूल लँडिंग करताना चंद्राच्या पृष्ठभागाच्या 90 अंशांच्या कोनात असण्याची आवश्यकता होती. जर नसतं झालं. तर चंद्रयान 3 उलटे पडण्याचा धोका होता. अन जर तसं घडलं असतं तर लँडर मधून रोव्हर बाहेर पडण्याची शक्यता खुंटली असती. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर, लँडर मॉड्यूल पृथ्वीला सिग्नल पाठवला. थोड्या वेळानं त्यात बसवलेला रॅम्प उघडला आणि रोव्हर मॉड्युल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. आता तिथून काही छायाचित्रे घेऊन ते रोव्हर मॉड्युल बेंगळुरूच्या इंडियन डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल.
इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ म्हणाले की, ” चंद्रयान-3 लँडरचे दोन इंजिन निकामी झाले होते पण तरीही लँडर मॉड्युलच्या सॉफ्ट लँडिंगसाठी सर्व आवश्यक व्यवस्था त्यात करण्यात आल्या होत्या.
( Narendra Modi On Chandrayaan 3 update )
आता आपण त्या चंद्रयान 3 चंद्रावर पाठवण्याचा नेमका उद्देश काय आहे त्याचा आपल्या देशाला नेमका काय फायदा होणारय त्ये आपण जाणून घेऊ. मित्रांनो 22 ऑक्टोबर 2008 रोजी जेव्हा इसरोनं त्यांचं पहिलं चंद्रयान मिशन लॉन्च केलं तेव्हा एका हेडलाईननं सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं अन ते म्हणजे चंद्रयान 1 ने चंद्रावर पाणी शोधल्याचा केलेला दावा. त्या दाव्यानंतर अमेरिका, रशिया, जर्मनी, चीन, जपान, दक्षिण कोरिया यां देशातल्या सगळे वैज्ञानिक आश्चर्यचकित झाले. जो तो चंद्रावर जाऊन चंद्राच्या पृष्ठभागाच्या आत नेमकं काय दडलंय यची माहिती मिळवण्यासाठी कामाला लागला. रशियानं तर त्यांची लुना यान मोहीमचं सुरू केली. सगळ्यांचा एकच उद्देश होता चंद्रमोहीम राबवून आपली तंत्रज्ञानातली ताकद जगाला दाखवून द्यायची. खरं तर इसरोने चंद्रयान 2 सुद्धा त्याचं उद्देशानं चंद्रावर धाडलं. होतं. पण दुर्दैवानं त्यात आपल्याला यश मिळालं नाही. आजही आपल्या वैज्ञानिकांना वाटतं की चंद्राचा जो भाग कधीच पृथ्वी वासियांच्या दृष्टीक्षेपात येत नाही त्या लूनर साउथ पोलमध्ये पाणी किंवा इतर खनिज पदार्थ असण्याची संभाव्यता आहे.
( Narendra Modi On Chandrayaan 3 update )
चंद्रयान 3 च्या लँडर मॉड्युलमधून जे रोव्हर म्हणजेचं एकप्रकारचा छोटा रोबोट बाहेर पडणारय. तो रोबोट चंद्राच्या पृष्ठभागावर ख़निज पदार्थ किंवा पाण्याचा शोध घेणारय. चंद्रयान 3 मिशन भविष्याच्या दृष्टीनं आखण्यात आलेलं मिशनय. त्याद्वारे कलेक्ट केलेल्या माहितीचा जे लोकं भविष्यात चंद्रावर वसाहत करतील तेव्हा त्यांना खूप उपयोग होणारय. चंद्रयान-3 चा आणखी एका महत्वाचा उद्देश म्हणजे चंद्रयान-2 च्या ऑर्बीटर मॉड्युलशी कनेक्ट होऊन त्याच्यातील टेक्निकल प्रॉब्लेम्स दुरुस्त करणे. खरं तर त्यामुळंच आपल्या शास्त्रज्ञानी या वेळेस चंद्रयान 3 मध्ये ऑर्बीटर मॉड्युल न बसवता फक्त लँडर आणि रोव्हर मॉड्युल चंद्राच्या कक्षेत पाठवलंय. चंद्रयान 3 मिशनचा तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे आपल्या पृथ्वीसारख्या इतर हॅबिटेबल प्लॅनेटचा शोध घेणं. हॅबिटेबल प्लॅनेट म्हणजे राहण्यायोग्य ग्रह. त्यासाठी चंद्रयान-3 मध्ये एसएचएपीई नावाचं म्हणजे स्पेक्ट्रो पोलरोमेट्री ऑफ़ हैबिटेबल प्लेनेटरी अर्थ नावाचं एक पॉवरफुल्ल उपकरण बसवलंय. चंद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत फिरत राहण्याबरोबरच तशा ग्रहांचा शोध घेण्यात मदत करेल. तसंच त्यासंबंधी सगळे फोटोग्राफ्स पाठवत राहील. तसं पाहिलं तर चंद्रयान 3 हे भारताचं आजपर्यंतचं सर्वात व्हिजनरी मिशन होतं. चंद्रयान 2 च्या अपयशानंतर तर याचं महत्व खूपच वाढलेलं. जर या मिशनचा उद्देश सफल झाला तर भारत येत्या काळात तंत्रज्ञान क्षेत्रातला सर्वात तगडा प्लेयर म्हणून जगासमोर येईल. कारण आपल्या इसरोकडं एक गोष्ट लय खासय अन ती म्हणजे सगळ्या दुनियेपेक्षा कमी खर्चात कोणतंही अंतराळ मिशन पूर्णत्वास नेणं. ज्याचा येत्या काळात सगळं जग आदर्श घेणार ह्ये नक्की. बाकी इंडियाच्या या अभूतपूर्व यशाबद्दल तुमचं म्हणणं नेमकं काय त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply Cancel reply