कोकणवासियांना मुंबई ते कोकण ये जा करण्यासाठी एकमेव आशेचा किरण म्हणजे मुंबई गोवा महामार्ग, पण गेल्या कित्येक वर्षापासून तो महामार्ग कोकणवासियां साठी डोकेदुखी बनून राहिलाय. तब्बल चारवेळा भूमिपूजन करून सुद्धा रस्त्याचं काम अद्याप पूर्णत्वास गेलं नाही अन जेवढा रस्ता बनवला गेलाय त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय. त्यामुळं रस्त्याला जागोजागी मोठंमोठाल्या खड्ड्याचं गँगरीन झालेलं दिसतंय. त्या खड्ड्यात गाड्या आपटून आजवर कित्येक लोकांच्या गाड्यांचे टायर फुटले, किती accident झाले याचा हिशोब नाही. मागं फेमस युट्युब vlogger जीवन कदम त्या महामार्गावरून प्रवास करत असताना त्यांची गाडी खड्ड्यात आपटली. जाग्यावर गाडीचा टायर फुटला आणि रिम बेंड झाली. त्यानंतर त्यांनी व्हिडीओ करून प्रशासनावर ताशेरे ओढले. पुढं तोव्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनी त्याप्रकरणी परखड भूमिका घेतली. मनसेच्या प्रत्येक सोशल मीडिया एकाऊंट्सवर तो व्हिडीओ फिरवला गेला. पुढं राज ठाकरे, अमित ठाकरे यांनी त्या ज्वलंत प्रश्नाकडं सरकार आणि प्रशासनाचं लक्ष वळवण्यासाठी आंदोलनाचा पर्याय निवडला. पण यावेळी त्यांनी मनसेस्टाईल खळखट्याक आंदोलनाचा मार्ग न निवडता चक्क मुंबई गोवा महामार्गावर जागर पदयात्रा काढली. मनसेचं हे बदललेलं रूप लोकांना आवडलं आणि हजारोंच्या संख्येनं लोक त्या पदयात्रेत सामील झालेले पाहायला मिळाले. पण अमित ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मनसेनं यावेळी खळखट्याक न करता जागर यात्रेचा मार्ग का निवडला आणि आणि त्याद्वारे खरंच मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न निकालात निघेल का तेच आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणारय…
( MNS Jagar Yatra News | Raj Thackeray Speech | Vishaych Bhari )
( MNS Jagar Yatra News | Raj Thackeray Speech | Vishaych Bhari )
मिळालेल्या माहितीनुसार, सलग दहा वर्ष त्या मुंबई गोवा महामार्गाचं काम चालूय. तिथं काम करणाऱ्या अनेकांनी काम सोडून दिलं, अनेकजण हे जग सोडून गेले. पण रस्ता झाला नाही. चार वेळा भूमिपूजन झालेला जगाच्या पाठीवर हा पहिलाच प्रोजेक्ट असावा कदाचित. मनसे नेत्या शर्मिला ठाकरे म्हणाल्या की सरकारनं त्या प्रोजेक्टसाठी जितका पैसा खर्च केलाय, तेवढ्या पैश्यात निदान 4 ते 5 चंद्रयान मोहिमा पार पडल्या असत्या. असो, प्रश्न असाय की त्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळं प्रवाशांना सही सलामत घरी पोहचता येईना. गाडीचे टायर फुटणे, टायरची रिम बेंड होणे असले भयानक प्रकार तिथं घडतायत. इतकी वाईट अवस्थाय रस्त्याची. मागच्या महिन्यात सार्वजानिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली होती. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की डिसेंबर महिन्या पर्यंत त्या माहामार्गाचं बांधकाम पूर्ण होईल. पण त्यावर लोकांनी आता कोणत्या वर्षीचा डिसेंबर महिना असा प्रतिसवाल त्यांना केलाय. कारण 2011 साली नारळ फोडून त्या महामार्गाच पहिल्या टप्प्यातल काम सुरू झालं होत. खरं तर 2 ते 3 वर्षाच्या काळात त्या महामार्गाचं बांधकाम पूर्ण व्हायला पाहिजे होतं. पण यंत्रणा जणू गोगलगायच्या स्पीडनं रस्त्याच काम पूर्ण करत होती. म्हणजे एका संस्थेच्या रिपोर्टनुसार 84 किलोमीटर रस्ता बांधायला सरकारला तब्बल 10 वर्ष लागली होती. म्हणजे एका वर्षाला जवळपास 10 किलोमीटरचा रस्ता. पुढं जवळपास 100 किलोमीटरचं काम झाल्यावर लक्षात आलं की त्या भागातलं वातावरण डांबरीकरणासाठी पूरक नाहीये. त्यामुळं डांबरीकरण तिथं तग धरू शकणार नाही. याचा अर्थ असा की काम सुरू करण्याआधी संबंधित अधिकाऱ्यांनी तिथं कसलाही अभ्यास किंवा पूर्वतयारी केली नव्हती. त्यानंतर मग शासनानं असं ठरवलं की तो संपूर्ण रस्ता सिमेंटचा करायचा. म्हणजे पुन्हा सरकारी तिजोरीवर बोजा.
( MNS Jagar Yatra News | Raj Thackeray Speech | Vishaych Bhari )
शासनाच्या त्या भूमिकेनंतर लोकांच्यात रोषाची भावना होती. सततची वाहतूक कोंडी, अपघात आणि रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेले होते अन नेमकी तीच नस पकडून राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मनसे ऍक्टिव्ह झाली. राज ठाकरेंनी कोकण दौऱ्यावर असताना आपल्या भाषणात सरकारची कान उघडणी केली तर अमित ठाकरेंनी आज मुंबई गोवा महामार्गावर मनसेची जागर यात्रा काढली. त्यासंबंधी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, गेल्या 12 वर्षापासून भूसंपादनाबाबत झालेली दिरंगाई, कर्नाळा अभयारण्यातून महामार्गासाठी लागणाऱ्या परवानग्या, कोकणातल्या पर्यावरणाचा अपुरा अभ्यास, वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सना दिलेल कॉंट्रॅक्ट, त्यांच्यात नसलेलं कॉऑर्डिनेशन, ठेकेदारांच्या मतभेदामुळं सुरू असलेली कोर्ट कचेरीची प्रकरण अन त्यामुळं सतत कामाला मिळणारी स्थगिती अशा काही कारणामुळं रस्त्याच्या बांधकामाला गती मिळत नाहीये. मागच्या काही काळात राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी ताकदीनं बाजू लावून धरली पण सरकारची निष्क्रिय भूमिका तरीही कायम राहिली. त्यामुळं आता कोकणवासीय आणि एकूणच नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडं सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी अमित ठाकरेंनी कंबर कसलेली दिसतीये. पण यावेळी मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलन नाही तर जागर यात्रा करून लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची भूमिका त्यांनी घेतलीये. तब्बल १५ हजार कोटी रुपये खर्च करूनही अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आता मनसे आक्रमक झालीये.
( MNS Jagar Yatra News | Raj Thackeray Speech | Vishaych Bhari )
त्या महामार्गाचं काम वेगाने पूर्ण करावं, यासाठी अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पळस्पे येथून या यात्रेला सुरुवात केली गेली. हा जागर यात्रेचा पहिला टप्पा होता. त्यांच्याबरोबरचं मनसेच्या इतर आठ नेत्यांची रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून ही पदयात्रा गेली अन त्या पदयात्रेचा समारोप कोलाडमध्ये झाला. कोलाडमध्ये जागर यात्रेच्या संगमस्थळी राज ठाकरेंनी भाषण केलं. त्या पदयात्रेच्या निमित्तानं मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. मोठ्या संख्येने कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. त्या यात्रेचा दुसरा टप्पा हा भरणी नाका ते राजापूर असणारय आणि तिसऱ्या टप्प्यात राजापूर ते बांदापर्यंत गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिलीय. मनसेचे नेते आमदार राजू पाटील म्हणाले ही एकमेव शांततेत यात्रा असणारय. जर कामाला सुरुवात झाली नाही तर पुढं मनसे स्टाईलनं काय ते बघून घेऊ. त्या जागर यात्रेदरम्यान राज ठाकरेंनी ही भाषण केलं. ते म्हणाले, आधी हात जोडून जावा, नाही ऐकलं तर मग हात सोडून जावा. राज ठाकरेंनी कोकणवासियांना सुखरुप गणपतीला कोकणात जाता यावं यासाठी गणपती बसायच्या आत रस्त्याचं काम पूर्ण करण्याचा प्रशासनाला अल्टीमेटम दिलाय. नाहीतर मनसे स्टाईल आंदोलन करू असंही म्हणलंय. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासह वसंत मोरे, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांसारखे मनसेचे बडे नेतेही त्या जागर यात्रेला हजर राहिले होते. आता किमान त्या जागर यात्रेमुळे तरी झोपलेल्या सरकारला खरच जाग येईल अशी कोकणवासियांना आशा आहे. पण मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याच्या दिरंगाईबद्दल राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनी घेतलेल्या नव्या भूमिकेबद्दल तुमची मतं नेमकी काय आहेत ते आम्हाला नक्की कळवा. तसंच खळ्ळखट्याक की जागर यात्रा मनसेचं कुठलं रूप तुम्हाला आपलसं वाटलं हे देखील नक्की सांगा…
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply Cancel reply