जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 13 वा दिवस, बिना अन्नपाण्याचा माणूस किती दिवस जगू शकतो | Manoj Jarange Patil Latest News | Maratha Arakshan Andolan News Today

मंडळी अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आजचा १३ वा दिवसय. सरकारचे अनेक नेते , मंत्री आले पण तरीही मनोज जरांगे पाटील काय मागे हटायला तयार नाहीयेत. त्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मराठा आरक्षणाबाबतीत एक महत्वपूर्ण आदेश काढला. पण या आदेशाची प्रत आमच्यापर्यंत पोहचली नाही. त्या आदेशातले काही मुद्दे आम्हाला मिडीया कडूनच समजले. मराठा समाजातल्या ज्या लोकांकडे कुणबी असल्याची नोंद आहे त्यांना आजपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पण सरसकटच मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे अशी रोखठोक भूमिका मनोज जरांगे यांनी घ्येतली आणि ह्याच कारणामुळे जरांगे पाटलांनी आपल उपोषण तसंच पुढ चालू ठेवलंय. काहीही झाल तरीही मागे हटायचं नाही अशीच भूमिका त्यांनी आता घ्येतलीय. त्यामुळ आता सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात निर्णय घ्यायला अजून किती दिवस लावणार ? आणि जरांगे पाटलांच उपोषण अजून किती दिवस चालणार ? याचीच मराठा आंदोलनकर्त्यांना चिंता लागून राहिलेली आहे. दोन दिवसापूर्वी तर उपोषणामुळे जरांगे पाटलांची तब्येत सुद्धा बिघडली होती. आता जरीही डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावेलेली असली तरीही सगळ्यांना जरांगे पाटील यांची काळजी लागून राहिली आहे. पण मंडळी माणूस हा असा बिना अन्न पाण्याशिवाय किती दिवस राहू शकतो ? तुम्ही जर न खाता पिता राहत असाल किंवा तुम्ही उपोषणाला बसला असाल तर तुमच्या शरीरात दर दिवसाला नेमका काय बदल होत असतोय ? हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

( Manoj Jarange Patil Latest News | Maratha Arakshan Andolan News Today )

मंडळी आपल्या तीन मूलभूत गरजांपैकी दोन महत्वाच्या गरजा असतात आणि त्या म्हणजे अन्न आणि पाणी. आता माणूस त्याची रोजची कामं नेहमी प्रमाणे पार पाडण्यासाठी जेवण करतो म्हणजे त्याला ते करावच लागत. नायतर त्याला त्याची रोजची काम करण्यासाठी जी उर्जा हवी असते ती मिळत नाही. आता ती उर्जा माणसाला त्याच्या जेवणातून कशी मिळते तर ती मिळते कॅलरीजच्या स्वरूपात. म्हणजे जेव्हा माणसाच्या शरीराला त्याची नेहमीची कामं पार पाडण्यासाठी पुरेशा कॅलरीज मिळत नाहीत, तेव्हा साहजिकच याचे त्याच्या शरीरावर वाईट परिणाम दिसू लागतात. जेव्हा आपल्या शरीराराला आवश्यक असणार्या कॅलरीज दीर्घकाळासाठी शरीराला पुरवल्या जात नाहीत तेव्हा एनर्जीसाठी शरीर तुमच्या स्नायूंची शक्ती खर्ची करण्यास सुरुवात करतं आणि तरीही आपण लक्ष नाही दिलं तर यातून तुमच्यावर मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. पण तुम्ही अन्नाशिवाय किती काळ जगू शकता हे सांगणारा काही ठोस फॉर्म्युला अजून तरी उपलब्ध झालेला नाहीये. तस तर बघा अन्न आणि पाणी नसल्यामुळ, शरीर जास्तीत जास्त एक आठवडा तग धरू शकत अस एका अभ्यासात समोर आलय. पण जर तुम्ही जेवण टाळत असाल पण पाणी मात्र वेळच्या वेळी मुबलक प्रमाणात पित असाल तर मात्र तुम्ही साधारण २ ते ३ महिने जगू शकता अशा आश्चर्यकारक घटना अभ्यासातून समोर आल्यात .पण तुम्ही फक्त पाणी पीत असाल तर हा काळ काही जणांसाठी २ते ३ आठवडेही असू शकतो. तर अन्न आणि पाणी दोन्हीही घेणं बंद केलं तर तुमचा जिवंत रहायचा कालावधी अगदी एक दोन आठवडेच असू शकतो. याबद्दल पुढे आपण अधिक डिटेल मध्ये बोलूच.

( Manoj Jarange Patil Latest News | Maratha Arakshan Andolan News Today )

आता बिना पाण्याशिवाय माणूस किती काळ जगू शकतो यावर परिणाम करणारा किंवा हा काळ किती असतो हे ठरवणारा एक घटक मात्र खूप महत्वाचाय आणि तो म्हणजे तुमचा BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स. तर बघा वजन कमी असण किंवा बॉडी मास इंडेक्स म्हणजेच BMI १८.५ पेक्षा कमी असण हे कुपोषित असल्याच लक्षण मानलं जात आणि ह्या BMI पेक्षा जर तुमचा BMI कमी असेल आणि त्यात सुद्धा जर तुम्ही अन्न पाणी सोडत असाल तर रोगप्रतिकारक शक्ती कमी होण, पचन संस्थेत बिघाड होण आणि कॅन्सर सारख्या रोगांचे धोके यामुळे १०० टक्के वाढतात. पण मंडळी अन्न आणि पाण्याशिवाय दिवस काढण तस तर आपल्यापैकी अनेकांना अशक्यच वाटतं. कधी कधी तर दिवसभराचा उपवास करण किंवा अगदी तासभरात आलेला ताण सुद्धा आपल्यापैकी अनेकांची चिडचिड वाढवू शकतो. पण मंडळी अस उपाशी राहून सुद्धा आपण फ्रेश राहण्याचं कारण म्हणजे आपल्या शरीरातलं ग्लुकोज. आता ते कशामुळ तर आपल्या शरीरात आपण जे अन्न खातो त्याच विघटन होऊन त्याचं ग्लुकोज मध्ये रुपांतर होत. ग्लुकोज काय करत तर ते आपल्या शरीराला ऊर्जा पुरवत. मग जेंव्हा तुम्ही खरोखर जेवणाचा त्याग कराल आणि त्यानंतर त्याचे २४ तास पूर्ण होतील तिथूनच तुमच्या शरीरातलं ग्लुकोजच प्रमाण कमी होईल. तुमच शरीर तुमच्या लीव्हर आणि मसलमधून ग्लायकोजेनच ग्लुकोजमध्ये रूपांतर करू लागेल आणि जर दुसऱ्या दिवशी सुद्धा तसच तुम्ही जर जेवण घेतलं नाय तर तुमच्या शरीरातल्या ग्लुकोज आणि ग्लायकोजेनच प्रमाण अजूनच कमी होइल. मग आपल शरीर आपल्या मसलच्या टिश्यू मधून अजूनच एनर्जी घ्यायला सुरुवात करेल आणि तिथूनच आपल्या मांसपेशींचा ऱ्हास व्हायला सुरुवात होईल.

( Manoj Jarange Patil Latest News | Maratha Arakshan Andolan News Today )

पण मुळातच आपलं शरीर हे आपल्या मांसपेशींचा ऱ्हास होऊ नये असंच डिझाईन केल गेलेलं असत त्यामुळ अस उपाशी राहून आपण थोडक्यात आपल्या शरीराला धोक्याचच आमंत्रण देत असतो. याउलट जर एखाद्याच शरीर चरबीयुक्त असेल तर त्याच शरीर हे उपाशी राहिल्यावर ऊर्जेसाठी केटोन्स तयार करण्यासाठी चरबीचा साठा वापरू लागत आणि ही प्रक्रिया केटोसिस म्हणून ओळखली जाते. पहिल्या पाच दिवसात अन्नाशिवाय तुमच रोज १ ते २ किलो वजन कमी होऊ लागत. आता त्यात पण अजून एक विशेष सांगायचं म्हणजे तुमच्याकडे जितक जास्त फॅट उपलब्ध असेल तितका जास्त काळ तुम्ही अन्नाशिवाय जगू शकता. कारण शरीराला लागणारी एनर्जी शरीर सगळ्यात पहिल्यांदा चरबिमधून घेत असत. मात्र एकदा का चरबीचे साठे पूर्णपणे वापरले गेले की मग, शरीर पुन्हा एकदा एनर्जी साठी मसलकडे परत येत, कारण अशावेळेस तुमच्या शरीरात उरलेला तो एकमेव इंधन स्त्रोत असतो. ब्रिटीश मेडिकल जर्नल ट्रस्टेड सोर्स मधल्या एका अभ्यासात अस म्हटल आहे की जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या शरीराच्या वजनाच्या १८% वजन अचानक कमी करते तेव्हा त्याच्या शरीराची एकूण कार्यक्षमता सुद्धा तितक्याच प्रमाणात कमी होत असते. मंडळी अशीही काही लोकांची उदाहरण आहेत कि थोड थोड पाणी घेतल्यान ते काही आठवडे किंवा कित्येक महिने अन्नाशिवाय जगले आहेत. जर आपण जेवण सोडलं असेल आणि आपण पाणी घेत असू तर पाण्याच्या सेवनान आपल्या जगण्याचा कालावधी वाढतो. कारण शरीरात कॅलरीजची जागा पाणी घेत असत. १९९७ मधल्या एका अभ्यासात अस समजल होत की, एखाद्या व्यक्तीला जास्त काळ अन्न त्याग करून जिवंत राहण्यासाठी दिवसाला साधारण किमान १.५ लिटर पाणी पिण आवश्यक आहे. त्या अभ्यासात लेखकान पाण्यात दिवसभरात अर्धा चमचे मीठ घालण्याचा सल्ला सुद्धा दिला होता. आता सुद्धा मनोज जरांगे यांना सलाईन मधून पाणी आणि ग्लुकोज द्यायचं सुरुय. पण जर तुम्ही पाणीच सोडल तर मात्र गोष्टी नक्कीच अवघड होणार ह्ये नक्की. कारण पाणी तुमच्या रक्तातले आणी शरीरातले toxins बाहेर टाकायचं काम करत असतात.

आता मानवी शरीरात सरासरी 60 ते 70 टक्के पाणी असतं आणि हे प्रामुख्यान आपल्या वयावर अवलंबून असत. लघवी, घाम, विष्ठा आणि श्वास याद्वारे पाणी आपल्या शरीरातून बाहेर जातं. त्यामुळे पिऊन किंवा खाऊन आपल्याला नवीन पाणी सतत शरीरात घ्यावं लागतं. जर हे केलं नाही, तर आपलं शरीर शुष्क म्हणजेच कोरड पडत. त्याची पहिली पायरी असते तहान. शरीराचं 2 टक्के वजन कमी झाल्यावर तहान लागते. तहान लागल्यावर आपलं शरीर उर्वरित सर्व ओलावा पकडून ठेवतं,” असं गॅस्ट्रोइन्टेस्टायनल शस्त्रक्रियेचे प्राध्यापक दिलीप लोबो सांगतात.

( Manoj Jarange Patil Latest News | Maratha Arakshan Andolan News Today )

पाणी न पिल्यान आपल मूत्रपिंडं मूत्राशयाकडे कमी पाणी पाठवत, त्यामुळे लघवी गडद होते. घाम कमी बाहेर पडल्यामुळे शरीराचं तापमान सुद्धा वाढतं. रक्त अधिक घट्ट आणि संथ होतं आणि मग ऑक्सिजनची पातळी टिकवण्यासाठी हृदयाच्या ठोक्यांचा दर वाढतो. मंडळी पाणी न पिल्यान शरीरातली उष्णता वाढते. आपल शरीर किती उष्णता सहन करेल याची सुद्धा एक कमाल मर्यादा असते. शरीरात त्यापेक्षा जर जास्त उष्णता झाली तर ताण येतो आणि मृत्यू होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर पाणी न पिल्यान आपल्या मूत्रपिंडावर सुद्धा ताण येतो. त्यामुळे बरेच धोके संभवतात. माणूस जीवानिशी सुद्धा जाऊ शकतो. तर बघा एकूण असा सगळा विषय आहे. पण ह्यातून बिना अन्न पाण्याचा माणूस किती दिवस राहू शकतो अस काही फिक्स आपण सांगू शकत नाही. वेगवेगळे घटक यासाठी आपल्याला विचारात घ्यावे लागतील.आता मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मराठा आंदोलकांना काळजी वाटत आहे. कारण आज पासून त्यांनी पाणी न पिण्याचा आणि सलाईन लावणार नसल्याचा निर्णयही घेतला आहे. त्यांनी हे उपोषण लवकरात लवकर संपवावं आणि त्यासाठी सरकारनेही लवकरात लवकर मराठा आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घ्यावी हीच सर्वसामान्य मराठा समाज बांधवाची मात्र आता अपेक्षा असेल. असो, तूर्तास ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.‌ जरांगे पाटील यांनी त्या़चं उपोषण आता थांबवावं का ? हे ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
जर हे माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा…

Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाचा १३ वा दिवस, अन्नपाण्याशिवाय माणूस किती दिवस जिवंत राहू शकतो

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ajit pawar latestajit pawar liveajit pawar news livebreaking newsjalna mahanagar palikajalna manoj jarangejalna maratha aarakshan livejalna maratha aarakshan newsjalna maratha andolanjalna maratha andolan livejalna maratha andolan live lathi chargejalna maratha andolan videomanoj jarange livemanoj jarange news livemanoj jarange news todaymanoj jarange patil jalnamanoj jarange patil livemanoj jarange patil newsmanoj jarange speechmanoj jarange taltest newssharad pawarsharad pawar on ajit pawarvishay bharivishaych bhariविषय भारीविषयच भारी
Comments (0)
Add Comment