Mahesh Landge यांना बघून काल मनसेच्या Ramesh wanjale यांची आठवण आली l Mahesh Landge vs Abu Azmi

काल अधिवेशनादरम्यान आमदार Mahesh Landge यांनी औरंगजेबाच्या प्रकरणावरून अबु आझमींना चांगलंच धारेवर धरलं. त्यांचा रुद्रावतार बघून काल आख्ख सभागृह शांत झालं होतं. महेश लांडगे यांच्या सभागृहातल्या रिऍक्शनमुळं काल सगळ्यांना पुण्याचे गोल्डन मॅन आणि मनसेचे दिवंगत माजी आमदार Ramesh Wanjale यांची आठवण झाली. कधीकाळी त्यांनी सुद्धा सभागृहात Abu Azmi यांचा माईक खेचून चक्क त्यांच्या कानशिलात लगावली होती. पण नेमकं काय घडलं होतं तेव्हा,चला सगळा किस्सा सविस्तर समजावून घेऊयात…

( Mahesh Landge vs Abu Azmi )

तर 2009 चा काळ. नोव्हेंबर महिन्यात विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू झालं होतं. तत्पूर्वी 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड झाली होती. म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे १३ आमदार निवडून आले होते. खरं तर 2005 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर, राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं आणि शिवसेना-भाजप युतीचं तगडं आव्हान राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर होतं. दरम्यान तेव्हा राज ठाकरेंनी महाराष्ट्रात अनेक सभा गाजवल्या होत्या. जबरदस्त वातावरण निर्मिती केली होती. अन त्याचाच परिणाम म्हणून सगळ्यांना धक्का देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे 13 आमदार विधानसभेवर निवडून आले होते. त्यावेळी मुंबईत शिवसेनेपेक्षा जास्त जागा मनसेच्या आल्या होत्या अन ही मोठी गोष्ट होती. तर त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अशी इच्छा बोलून दाखवली होती की विधानसभेत सर्व आमदारांनी मराठीतूनच शपथ घ्यावी. अन जर कोणी अन्य भाषेत शपथ घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, माझे आमदार जे काय आहे ते बघून घेतील असाही इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. मात्र राज ठाकरे यांच्‍या त्या आवाहनाला धुडकावून लावत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मी हिंदीतूनच शपथ घेणार असं म्हटलं.

तेवढ्यावर गप्प न बसता आबू आझमी यांनी राज ठाकरेंना ‘ विहिरीतील बेडूक ’ म्हणत कधीतरी उघड्यावर या आणि बाहेरचे जग पहा असा टोमणा मारला. ती गोष्ट मनसे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या खूप जिव्हारी लागली होती. तेव्हापासूनचं खरं तर आबू आझमी मनसे नेत्यांच्या रडारवर आले होते. दरम्यान सभासदांच्या आडनावांच्या वर्णक्रमानुसार शपथ घेऊन अधिवेशनाला सुरुवात झाली. आबू आझमी हे शपथ घेणार्‍या सुरुवातीच्या सदस्यांपैकी एक होते आणि त्यांनी हिंदीतून शपथ घ्यायला सुरुवात केली. त्यांनी शपथ घेण्यास सुरुवात करताच मनसेचे सर्व 13 आमदार त्यांच्याकडे धावले. त्यावेळी मनसेच्या आमदारांनी सभागृहात भयंकर गोंधळ घातला. त्यांच्यापैकी पुण्याचे गोल्डनमॅन अशी ओळख असणारे मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी तर चक्क पुढं सरसावून आबू आझमी यांच्या समोर असलेला माईकच हिसकावून घेतला. पैलवानी शरीरयष्टी लाभलेले वांजळे यांनी आपल्या एका हातानच माईकचा पोडियम उचलला. त्यांचा तो रुद्रावतार पाहून तेव्हा आख्ख सभागृह थक्क झालं होतं. दरम्यान शपथ घेऊन आझमी खाली उतरत असताना तेव्हा मनसेमध्ये असणाऱ्या आमदार राम कदम  यांनी चक्क आबू आझमींच्या कानशिलातचं लगावली. रमेश वांजळेनीही अबू आझमींच्या तोंडावर चापट मारली. प्रकरण अधिक गंभीर होऊ नये म्हणून सभागृहातील इतर सदस्यांना त्याप्रसंगी मध्यस्थी करावी लागली.

( Mahesh Landge vs Abu Azmi )

पुढं मनसेच्या राम कदम, रमेश वांजळे, वसंत गीते आणि शिशिर शिंदे यांनी आबू आझमीना धक्काबुक्की केली अन चपला फेकून मारल्या , असे आरोप मागाहून त्यांच्यावर करण्यात आले. मनसेच्या सदस्यांनी मराठी आणि महाराष्ट्राच्या बाजूने घोषणा देत आझमींचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर प्रोटेम स्पीकरने कामकाज पूर्ववत करण्यासाठी सभागृहाचं कामकाज ३० मिनिटांसाठी तहकूब केलं. दरम्यान सगळ्या गडबड गोंधळानंतर संसदीय कामकाज मंत्री असलेल्या हर्षवर्धन पाटलांनी मनसेच्या नेत्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून सभागृहात प्रस्ताव मांडला. त्यानंतर मग मनसेच्या नवनिर्वाचित आमदार राम कदम, पै. रमेश वांजळे, वसंत गीते आणि शिशिर शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. विधिमंडळाच्या इतिहासात शपथ घेताच निलंबन होण्याची ही पहिलीच घटना असावी.

त्या घटनेनंतर तेव्हाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी म्हणाले की, सभागृहातील प्रत्येक निवडून आलेल्या सदस्याला शपथ घेण्याचा किंवा त्याच्या आवडीच्या भाषेत बोलण्याचा अधिकार आहे आणि मनसेची ही कृती दुर्दैवी आणि घटनाबाह्य आहे. राष्ट्रवादीनेही त्या घटनेचा निषेध केला होता. त्यांच्या बाजूने, मनसे प्रवक्ते शिरीष पारकर यांनी कारवाईचा बचाव केला आणि सांगितले की शिवसेनेने देखील एकेकाळी असेच केले होते. पण मनसे आमदारांच्या कृतीचा त्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी निषेध व्यक्त केला होता. अशा घटनांना लगाम घालण्याचं आवाहन नितीश यांनी महाराष्ट्रातील सभापतींना केलं होतं. त्याच्या पुढं जाऊन लालू प्रसाद यादवांनी, देशाचे तुकडे झाले तर त्याला शिवसैनिक आणि मनसे हे जबाबदार असतील असं विधान केलं होतं.पण ते काहीही असलं तरी त्याकाळी त्या कानशिलात मारणाऱ्या घटनेमुळं मनसेचे रमेश वांजळे आणि आबू आझमी महाराष्ट्राच्या गावागावात चर्चेचा विषय झाले होते.

आता आपण काल आबू आझमी आणि महेश लांडगे यांच्यात काय खडाजंगी झाली त्याची थोडक्यात माहीती घेऊ, तर सध्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरूय. दरम्यान विरोधकांनी संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखलेली होती. तशी सुरुवात ही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. पण नेमकं त्याचंवेळी विरोधकांच्या त्या मुद्द्याला कावून्टर चेक देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीही परवा रात्री बैठक घेऊन रणनीती आखल्याची माहिती मिळतेय. अर्थात त्या प्लॅनिंगनंतर भाजप नेत्यांच्या मुख्य टार्गेटवर होते ते आबू आझमी. म्हणूनच तर आबू आझमी यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांचे मुद्दे मांडले. देशातलं वातावरण कसं बिघडलंय, आमच्या समुदायात भीतीचं वातावरणय आशी सुरूवात केली कि लगेच Nitesh Rane बोलायला उभे राहिले आणि त्यांनी औरंगजेब स्टेटस प्रकरणावर आपली आक्रमक भूमिका सभागृहात मांडली.

( Mahesh Landge vs Abu Azmi )

नितेश राणे म्हणाले,

औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नंबरचा शत्रू होता, त्या औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवले गेले. औरंगजेबावर एवढं प्रेम असेल तर स्टेटस ठेवणाऱ्याला पाकिस्तानला पाठवून द्या. आपलं मतं मांडताना नितेश राणे अबु आझमी यांच्याकडे पाहून हातवारे करत होते. त्यामुळं सभागृहातलं वातावरण आणखीनचं तापलं.

पुढं बोलायला उभे राहिले भोसरी मतदार संघांचे आमदार महेश लांडगे. त्यांनी खमक्या आवाजातचं बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले,

” जो औरंगजेबाला मानतो त्याचा शिवाजी महाराजांना मानण्याचा संबंध काय? सभागृहात आलेला प्रत्येक सदस्य हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आहे. जो कुणी मानत नसेल त्यांनी हात वर करावा, आणि जर मानत असेल तर त्याचा इथे औरंगजेबाला मानण्याचा संबंध काय येतो ? ज्यांनी आमच्या राजाला छळलं, आमच्या प्रजेला छळलं त्यांना मानणाऱ्या विकृतींना अध्यक्ष महोदय आपल्याला थांबवावे लागेल. त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार का? असाही प्रश्न महेश लांडगे यांनी उपस्थित केला. “

महेश लांडगे यांच्या भूमिकेनंतर संपूर्ण सभागृहात स्तब्धता होती. काल महेश लांडगे यांच्या त्या भाषणाचे स्टेटस महाराष्ट्रातल्या अनेक जणांनी आपापल्या मोबाईलला ही ठेवले होते. तर एकूण असा सगळा किस्सा काल घडला. पण महेश लांडगे किंवा नितेश राणे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल नेमकं तुमचं मतं काय आहे, त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा लेख आवडला असेल तर व्हिडीओ लाईक आणि शेअर करा.

Mahesh Landge यांना बघून काल मनसेच्या Ramesh wanjale यांची आठवण आली l Mahesh Landge vs Abu Azmi

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

abu azami vs mahesh landgeabu azmi mahesh landgeabu azmi speechabu azmi vs mahesh landgeabu azmi vs nitesh ranebreaking newslatest marathi newsmahesh dada landgemahesh landgemahesh landge dancemahesh landge latest newsmahesh landge livemahesh landge newsmahesh landge on abu azamimahesh landge on abu azmimahesh landge speechmahesh landge speech todaymahesh landge statusmahesh landge vs abu azmimahesh landge vs abu azmi in vidhansabha monsoonmahesh landge vs abu azmi newsnitesh rane vs abu azmivishaych bhariविषयच भारी
Comments (0)
Add Comment