तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला,
तूने एक बार हसके जो बोला, मन कामातून गेला.
अवधूत गुप्तेनीं लिहलेल्या या ओळी 70 80 दशकातल्या प्रत्येक तरुणाला समर्पकयेत. कारण त्या काळातल्या प्रत्येक पोराला आपली गर्लफ्रेंड ही मधुबाला सारखीचं असावी असच वाटायच आन अगदीच ज्याला जमायचं नाय त्यो प्रत्येक जण आपल्या प्रियसीला मधुबाला मानून स्वतःची लव्ह स्टोरी पुढं न्यायचा. सुंदर, रेखीव चेहऱ्याच्या आणि बोलक्या डोळ्याच्या रुपवान मधुबालाचा तेंव्हाच्या प्रत्येक तरुणाच्या काळजात मुक्काम असायचा. तिला पिक्चरात बघण म्हणजे आहा sss स्वर्गसुखच. असं वाटायचं की तिला देवानं फुरसतीच्या वेळेतच घडवलयं. उगाच पब्लिक तिज्या मागं इतकं खुळं नव्हतं. बॉलीवूड मधल्या सगळ्यात सुंदर हिरोईन्सची लिस्ट काढायची म्हटली तर आजही अगदी टॉपचं नाव येतं ते म्हणजे मधुबालाचं. तिची ऍकटिंग इतकी सहज आणि खरीखुरी असायची की काय बोलूचं नका. तिच्या याचं अभिनयाची भुरळ बॉलिवूड सोडा हॉलीवुडलासुद्धा पडलीवती. हॉलिवूडवाल्यांनी सुदिक मधूबालाला त्यांच्या सिनेमांत घेऊन जायचा प्रयत्न केला होता. पण भारताच्या सौंदर्याची ही खाण त्यांच्या काय अजिबात हाती लागली नाय. सुंदर प्रियसिंच्या रोमँटिक भूमिका साकारणारी आणि लाखो करोडो ना आपल्या प्रेमात पडायला भाग पाडणारी मधुबाला तिच्या खऱ्या आयुष्यात मात्र प्रेमापासुन उपेक्षित राहिली. तिचं सिनेमातला आयुष्य आणि खरं आयुष्य यात जमीन आस्मानचा फरक होता, असं म्हणतात कीं सुंदरतेला एकटेपणाचा शाप असतो, मधूबलाच्या बाबतीत सुद्धा असच काहीस घडलं. बॉलीवूडची रोमांटिक क्वीन खऱ्या आयुष्यात मात्र ट्रॅजेडी क्वीन कशी झाली आणि एकूणच मधूबालाच्या आयुष्याची परवड कशी झाली ? हेच आपण आजच्या Blog च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
(Madhubala Biography)
मेरी आंखोसे मेरे ख्वाब ना छिनिये शहजादे, नही तो मै मर जाउंगी. मधूबालाचा मुघले आजम सिनेमातला हा डायलॉग आजही ऐकला तरी काळजाला चरर्र होत. असं वाटत की ती नियतीलाच सांगतेयकी माझ्या डोळ्यातली स्वप्न हिसकाऊन घेऊ नको म्हणून. कारण मधूबालाच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा असच काहीस झालं होतं. मंडळी मधुबाला म्हणजेच मूळची मुमताज जहान बेगम नहलवी.. काय नशीब असत बघा, मधूबालाचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ चा आणि तुम्हाला तर माहीतचय 14 ला असतो Valentine डे. पण ह्यो प्रेमाचा दिवस मात्र मधुबालाच्या आयुष्यात कधीचं आला नाही. मधूबालाला एकूण 14 भावंड होती त्यातली मुमताज ही पाचवी होती. तिचे वडील एका कारखान्यात नोकरीला होते. तिचं कुटुंब थोडं जुन्या आणि मागासलेल्या विचारांच असल्याकारणानं तिला तिच्या घरी खूप बंधन होती. पण मधुबाला सहा सात वर्षांची असतानाचं अचानक तिच्या वडिलांची नोकरी गेली आणि तिच्या कुटुंबाची परिस्थिती ढासळू लागली. पण एक गोष्टी मात्र मधुबालाकडं खास आणि ती म्हणजे तिचा आवाज. मंडळी ज्या मधुबालाच्या वडिलांना आपल्या मुलीनं नाचगाणं केलेला आवडायचं नाही, त्याच वडिलांनी त्यांच्या मुलीला नाईलाज म्हणून ऑल इंडिया रेडिओमध्ये कामासाठी न्यायला सुरुवात केली. तेंव्हा मधुबालाऑल इंडिया रेडिओवर खुर्शीद अन्वर यांची गाणी म्हणायची. तिचा गोड आवाज आणि अदा पाहून तिथल्याच एका अधिकाऱ्यानं तिच्या वडिलांना म्हणजेच आताऊल्ला खान यांना मधुबालाला मुंबईला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
(Madhubala Biography)
आता मधुबाला ही कुटुंबातली एकमेव कमावती सदस्य झाली होती. पुढं मग मुंबईत आल्यावर मधुबाला वडिलांबरोबर अनेक सिनेमा स्टुडिओमध्ये जाऊ लागली. दिसायला गोरी गोमटी आणि देखणी असल्यामुळे तिला काम न मिळणं शक्यच नव्हत, 1942 मध्ये तिला बसंत या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आता सगळ ठीक होईल, कुटुंब आर्थिक परिस्थितीतुन सावरेल असं वाटत असतानाच एक खूप दुर्दैवी घटना घडली. ती म्हणजे 1944 मध्ये झालेल्या डॉक एक्सप्लोजनमध्ये मधुबालाच्या तीन बहिणी आणि दोन भाऊ मारले गेले. ही घटना खरंतर तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी खूप मोठा आघात होता. या दुःखातून सावरत असतानाचं मधुबाला मात्र वडील नेतील तिकडे जात होती आणि ते म्हणतील तिथं मनापासून काम करत होती. त्यानंतर 1947 मध्ये नीलकमल नावाचा एक सिनेमा आला होता. त्या सिनेमात मधूबालाला राज कपूर समोर कास्ट करण्यात आलं. तेव्हा ती फक्त चौदा वर्षांच्या होती. हा सिनेमा म्हणजे तीन तिच्या मुमताज या नावाने केलेला अखेरचा सिनेमा होता. त्यांतर मात्र ती मधूबाला म्हणूनच वावरू लागली. 1949 मधे आलेला महल सिनेमानं मधूबालाला प्रसिद्धी मिळवून दिली. खरंतर या सिनेमासाठी आधी सुरैया यांना कास्ट करण्यात आलं होतं. पण स्क्रीन टेस्ट वेळी या फिल्मचे डायरेक्टर कमाल अमरोही यांना मधुबाला या रोलसाठी जरा जास्त फिट वाटल्या आणि त्यांनी हा रोल मधुबाला यांना ऑफर केला. मंडळी ही फिल्म त्यांच्या आयुष्यातली हिट फिल्म ठरली..
(Madhubala Biography)
दिग्दर्शक कमाल अमरोही यांचीसुद्धा ही पहिलीच फिल्म होती. असं म्हणतात या सिनेमानंतरचं मधुबाला आणि कमाल अमरोही यांच्यात प्रेम झालं. पण त्यावेळी कमाल अमरोहि यांचं लग्न झालेलं होतं आणि त्यांना एक छोटा मुलगासुद्धा होता. पण असं असून सुद्धा मधुबालाचे वडील आताऊल्ला खान यांना या नात्याविषयी काहीच तक्रार नव्हती. कमाल अमरोही हे मधुबालाशी लग्न करून त्यांना दुसरी बायको बनवायला तयार होते पण ही गोष्ट मधुबाला यांना मात्र मान्य नव्हती. आपल्या पहिल्या बायकोला डिव्होर्स देऊन मग कमाल अमरोहि नी आपल्याशी लग्न करावं अशी मधुबाला यांची इच्छा होती. पण त्यासाठी कमाल अमरोही तयार नव्हते. म्हणूनच या नात्याला तिथंच पूर्णविराम मिळाला. मधुबाला दिसायला एवढी सुंदर होती की तिला भारताची मरलीन मुंड्रो म्हटलं जायचं. हॉलिवूडही तिच्या अभिनयावर आणि सौंदर्यावर फिदा होतं. अगदीचं हॉलिवूडचे डायरेक्टर फ्रॅंक कॅपरा यांनी तिला हॉलीवुड मध्ये काम करायची ऑफर सुद्धा दिली होती. पण ही गोष्ट जुन्या विचारसरणीच्या आताऊल्ला खान यांना पटली नाही आणि म्हणून त्यांनी मधुबालाला ह्या ऑफरला नकार द्यायला सांगितलं. नायतर आज हॉलीवूडमध्येही मधूबालाच नाव आसत. पूर्वीच्या काळात हिरॉईन्सच्या आया हिरॉईन्सच्या कामात ढवळाढवळ करायच्या पण मधूबालाच्या बाबतीत उलट होतं, तिचे सगळे निर्णय हे तीचे वडीलचं घ्यायचे. ती कुणाशी बोलतेय, सेटवर तिच्या कोण जवळ तर येत नाहीये ना, तिने कुठले सिनेमे करायचे, कुणासोबत करायचे, हे सगळ तिचे वडीलच ठरवायचे. त्याकाळात मधुबाला आणि दिलीप कुमार यांची जोडीसुद्धा हीट ठरली होती. तस सगळ्याच हिरॉईन्स दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्यासाठी धडपडायच्या, मधुबालाला ही संधी 1951 मध्ये आलेल्या तराना या पिक्चरमध्ये मिळाली. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्यातली जवळीक वाढू लागली. बरं मधूबाला तरं अशी होती की अगदी कुणीही सहज तिच्या प्रेमात पडेल आणि दिलीप कुमार सुद्धा त्यावेळेसचे स्टार होते, त्यामुळे दोघे एकमेकांकड आकर्षित झाले. मधूबालाने एक चिठ्ठी लिहून गुलाबाच्या फुलासह ती चिठ्ठी दिलीप कुमार यांच्या मेकअप रूम मध्ये पाठवली.
(Madhubala Biography)
त्यात तिने ती दिलीप कुमारवर प्रेम करत असल्याच लिहिल होतं. दिलीप कुमार यांनी सुद्धा मग tichyavया प्रेमाचा स्वीकार केला आणि मग पुढे सात वर्ष त्यांचं अफेअर सुरू होतं. मंडळी त्यांच हे प्रेम प्रकरण त्याकाळी खूप गाजल होतं. सगळ्यांनाच हे दोघ आता लग्न करणार याची खात्री होती. पण मी तुम्हाला मघाशीच सांगितलं मधूबालाच्या आयुष्याची स्टोरी सिनेमापेक्षा खतरनाकयं म्हणून, मंडळी मधुबालाच्या वडिलांचा या प्रेमाला विरोध होता.. त्यांच्याचमुळे हे नातं तुटलं असं बरेच जण सांगतात. दिलीप कुमार आणि मधूबालाच्या वडिलांचे सतत खटके उडायचे मग यातूनच हे नात कायमच तुटलं. तिला हा विरह अजिबात सहन झाला नाही. सात वर्षांच रिलेशन असणाऱ्या मधूबालाला तिच्या वडिलांनमुळे नात तोडावं लागलं. फुल तो मुरझा जाते है, लेकिन कांटे दामन थाम लेते है या तिच्याच डायलॉगसारख तीच आयुष्य झाल होतं. वडील आणि प्रेम यांच्यात तीला काळजावर दगड ठेऊन वडिलांना निवडाव लागल होतं. मंडळी दिलीप कुमार आणि मधुबाला यांचा अफेअर सुरू असतानाही अनेकांना मनातून मधुबाला आवडायची. पण आपला नंबर लागेल याची कुणालाच खात्री नव्हती, त्यातलच एक नाव होतं किशोर कुमार यांचं. किशोर कुमार मधुबाला वर अतिशय फिदा होते. त्यांनी तिला लग्नाची मागणीसुद्धा घातली होती पण त्यावेळी मात्र मधुबाला हे दिलीप कुमार यांच्यासोबत रिलेशन मध्ये होती. त्यामुळे मधूबालाने त्यांना नकार दिला होता. पण दिलीप कुमार यांच्याशी नातं तुटल्यानंतर मधूबालानं किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं. तेंव्हा मधुबालाशी आपलं लग्न होईल हे किशोर कुमारांना अजिबात वाटलं नव्हतं. पण मधुबाला यांच्या निर्णयानं त्यांनी वयाच्या 27 व्या वर्षी किशोर कुमारशी लग्न केलं. मंडळी संगदील या सिनेमात मधुबाला म्हणते कीं जिंदगी और वक्त का दरिया ऐसा है ठाकूर साब, आदमी एक बार उसे लांघ जाये, तो वापस नही आता. दिलीप कुमार आणि मधूबालाच्याबाबतीतसुद्धा हेच झाल. त्यांच ते नात तुटल ते तुटलच. मंडळी मधुबाला यांच्या खाजगी जीवनात जसे चढ-उतार येत होते तसेच चढ उतार त्यांच्या फिल्म करिअरमध्येसुद्धा येत होते.. महल या सिनेमानं त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली असली तरी 1950 ते 1957 हा काळ त्यांच्या करिअरसाठी फार काही खास ठरला नाही.. पण मधुबाला मात्र जिद्दीने आणि चिकाटीनं काम करत राहिल्या.. कदाचित याचंच फळ म्हणून 1958 हे साल त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरलं.. या वर्षात त्यांच्या बऱ्याच फिल्म आल्या. त्यातल्या फागुन, हावडा ब्रिज, कालापाणी, चलती का नाम गाडी या सिनेमांनी त्यांना पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या मार्गावर नेलं.. 1960 साली आलेल्या मुगल ए आजम या सिनेमानं तर बॉक्स ऑफिस वर नुस्ता धुमाकूळचं घातला..
(Madhubala Biography)
बॉक्स ऑफिस वर सगळ्यात जास्त कमाई करणारा सिनेमा म्हणून या सिनेमाची जागा पुढची पंधरा वर्षे तरी दूसरा कुठला सिनेमा घेऊ शकला नाही. त्यानंतर साठच्या दशकात मधुबालानं चित्रपटांमध्ये काम करणं थोडं कमी केलं याचं कारण होतं त्यांच्या जन्मापासून त्यांच्या हृदयाला असलेलं छिद्र म्हणजेच होल. त्यांच्या जन्मापासूनच त्यांना हा दुर्मिळ आजार होता.. पण हे लहानपणी त्यांच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या लक्षात आलं नाय.. नंतर नंतर तर मधुबाला यांची तब्येत आणखीच खालावत गेली.. त्या अशक्त होऊ लागल्या. त्यानंतर बऱ्याच टेस्ट केल्यानंतर त्यांच्या हृदयाला होल असल्याची गोष्ट समोर आली आणि तिच्यावर उपचार सुरू झाले.. लंडनमध्ये त्यांच ऑपरेशनसुद्धा करण्यात आलं. ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा पुन्हा एकदा जोमानं काम करण्याची इच्छा मधुबाला यांनी बोलून दाखवली पण त्यांच्या तब्येतीनं मात्र त्यांना साथ दिली नाही. असच एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्यांना रक्ताची उलटी झाली आणि शूटिंग थांबवावं लागलं. त्यानंतर त्यांच्या तब्येतीला फारशी उभारी मिळाली नाही. त्या जवळपास तब्बल नऊ वर्ष अंथरुणाला खेळून होत्या. असं म्हणतात की त्याकाळी किशोर कुमार यांनीसुद्धा त्यांची नीट काळजी घेतली नाही. एवढंच कायबीटर ते त्यांच्याकडे फिरकायचेसुद्धा नाहीत. मधूबालाचा ड्रायव्हर डॉक्टर आणि नर्स हेच त्यांच्या जवळचं असायचे. मंडळी मुंबईवर राज्य करणारा डॉन हाजी मस्तान यालासुद्धा मधूबाला आवडायची. हाजी मस्तान मधुबालावर जीव ओवाळून टाकायचा. त्यालासुद्धा मधुबालाशी लग्न करायचं होतं. तिच्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होता. मधूबालाला आपल्या मनातली गोष्ट त्यानं सांगायच ठरवल होतं, पण त्याने हे सगळं सांगण्याआधीच मधुबालाची तब्येत अतिशय खालावली. त्या अंथरुणाला खिळून राहिल्या, एकट्या राहू लागल्या.
(Madhubala Biography)
हे विषयच भारी वाचलेस का भावा !
- दादा कोंडके यांचे हे ५ डबल मिनिंग सिनेमे आजही अजरामर आहेत | Dada Kondke Marathi Movie Vishaych Bhari
- लंपट किंवा बाईलवेडा नाय, निळू फुले खऱ्या आयुष्यात लय सच्चा माणूस होता | Nilu Phule Biography |Vishaych Bhari | Nilu Phule
- अशीही बनवाबनवी या सिनेमाच्या या ५ गोष्टी कायम आठवणीत राहतील | Ashi hi Banwa Banwi | Vishaych Bhari| Laxmikant Berde
आपल्या दिल खेचक अदांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी ही सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री वयाच्या 36 व्या वर्षी या जगाचा निरोप घेऊन निघून गेली. 23 फेब्रुवारी 1969 रोजी हृदयविकारामुळे मधुबाला यांचं निधन झालं आणि शेवटी एकदाच तिच्या वाट्याच दु:ख संपल. तिच्या बॉयफ्रेंड सिनेमात तिचंच एक वाक्य आहे, अगर मुझपर मेरे पिताजिके करजो कि मजबुरिया ना होती, तो कभीभी इस स्टेजपर नाचती गाती नही. आणि हे अगदी खर होत. वडिलांच्या करजापाई मधुबाला सिनेमात आली नसती तर ती एक छानस सामान्य आयुष्य जगली आसती, पण ते तिच्या नाशिबातच लिहिलेल नव्हत. असो पण मधुबाला फार लवकर हे जग सोडून गेली असली तरी आजही ती करोडो प्रेक्षकांच्या मनात जीवंत आहे. आजही अनेक लोकांच्या घरात , हॉटेल्समध्ये तिचे पेंटिंग पोस्टर आढळतात. मंडळी मधूबालाच वैयक्तिक आयुष्य कसंही असलं तरी एक अभिनेत्री म्हणून प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात तिनं घर केलं. स्क्रीनवर त्या समृद्ध झाल्या. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत 70 हून अधिक सिनेमांकाम केल. ‘बसंत’, ‘फुलवारी’, ‘नील कमल’, ‘पराई आग’, ‘अमर प्रेम’, ‘महल’, ‘इम्तिहान’, ‘अपराधी’, ‘मधुबाला’, ‘बादल’, ‘गेटवे ऑफ इंडिया’, ‘जाली नोट’, ‘ मुगल ए आजम’, ‘शराबी’ आणि ‘ज्वाला’ यांसारख्या सिनेमांत अभिनय करून त्यांनी आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांना प्रभावित केलं. मंडळी आजही कुणी सुंदर असाव म्हणजे कस असाव अ विचारल तर लोक मधूबाला सारख असावं अस म्हणतात. मुघले आजम मधले कितीतरी सीन आणि त्या सिनेमातले तिचे निस्तेज डोळे हे खरतर तिच्याचं आयुष्यातल्या वेदना सांगून जातात. बाकी त्यांच्या आयुष्याविषयी आणि फिल्म करिअर विषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply Cancel reply