२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सगळेच पक्ष आता या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विशेषतः भाजप मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी जोरकसपणे प्रयत्न करताना दिसतंय. पण त्यासाठी भाजप अंतर्गत कशी सूत्रं फिरतायत. भाजपचं मिशन ४५ मिशन इतकं सहज शक्य आहे का? आणि मिशन ४५ चा अशक्यप्राय आकडा शक्य करण्यासाठी भाजपला कुठले पापड बेलावे लागतील,चला या १५ मुद्यांच्या आधारे पाहूयात.
(Loksabha Election | BJP | Fadnavis OBC Andolan)
१) भाजपमधील निष्क्रिय खासदारांना डच्चू देऊन नव्या चेहर्यांना संधी देणे .
तर बघा काही मतदारसंघात पुन्हा निवडून यायचं असेल तर भाजपला anti incumbency चे points कमी करावे लागणारेत . कारण naturaly काही काळ सत्तेत राहिल्यानंतर एखाद्या नेत्यांवर किंवा त्याच्या निष्क्रियतेवर लोकांचा राग असतो. आता हेच ओळखून काही अंतर्गत सर्व्हेनुसार त्यांच्या काही नेत्यांना लोकसभा निवडणुकीत थांबायला सांगणार आहे,असं कळतंय. काही नेत्यांना भाजप आमदारकीला पाठवणार आहे. तर नवीन, फ्रेश आणि ताकदीच्या, चेहर्यांना संबंधित मतदारसंघातून संधी देणार आहे. अर्थात जो कोणी लोकसभेसाठीचं जोरदार काम करेल त्यालाच आमदारकीचं तिकीट अशी भाजपची पुढची statergy आहे. पण आता या ठिकाणी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भाजप असं करून काही नेत्यांचे पंख छाटण्याचाही कार्यक्रम करत आहे. असा पक्षांतर्गत आरोप होतोय.जसं की धुळ्याचे सुभाष भामरे, दिंडोरीच्या भारती पवार, जालन्याचे रावसाहेब दानवे, नागपूरचे नितीन गडकरी यांची तिकीटं या सगळ्यात रद्द केली जाऊ शकतात. तर सध्या आमदार असणारे सूधीर मुनगंटीवार, राहुल नार्वेकर, रवींद्र चव्हाण यांना खासदारकीसाठी प्रमोट केलं जाऊ शकतं.
(Loksabha Election | BJP | Fadnavis OBC Andolan)
२) अजित दादा गटातील बड्या नेत्यांना संधी .
आता भाजप हायकमांडला हे नक्कीच माहिती आहे की महाराष्ट्रात जर मिशन ४५ चं शिवधनुष्य हातात घ्यायचं असेल तर त्यांना फक्त भाजपच्या बेसवर या जागा जिंकता येणार नाहीत. खरंतर महाराष्ट्रात कुठल्याही पक्षाला अशा एकहाती जागा जिंकणं वाटतंय तेवढं सोपं असणार नाही. म्हणून तर भाजपनं शिंदे गट आणि नंतर अजित दादा गटाचा आधार घेतलाय . कारण शिवसेनेचा उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात प्रभाव दिसून येतो. तर अजित दादा गटाचा पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव दिसून येतो. अशावेळी भाजपनं अजित दादा गटातील बड्या नेत्यांना फ्रंटलाईन केलं तरच मिशन ४५ च्या दिशेने त्यांना पाऊलं टाकता येतील हे त्यांना पक्कं माहीतेय. त्यामुळेच कदाचित येत्या लोकसभा निवडणुकीत अजित दादा गटातून बीडमधून धनंजय मुंडे, नाशिक मधून छगन भुजबळ,रायगड मधून सुनील तटकरे अशी नावं उभी राहताना दिसतील. या नेत्यांची त्यांच्यामतदारसंघावरील मजबूत पकड बघता त्यांची जिंकण्याची शक्यता बीजेपीला जास्त वाटत असावी. परिणामी अजित दादा गटातील बड्या नेत्यांना संधी देऊन भाजप जागा वाढवण्याचा हा मास्टरस्ट्रोक मारू शकतं.
(Loksabha Election | BJP | Fadnavis OBC Andolan)
३) शिंदे गटातील नेत्यांना भाजप मधून तिकीट देणे .
आता आपण आधीच्या मुद्यामध्ये जसं म्हणलो की भाजप त्यांच्या उमेदवारांच्या सोबतच अजित दादा गटामागेही ताकद उभी करेल. तसंच शिंदे गटातील नेत्यांमागंही भाजप ताकद उभी करु शकतं. पण कदाचित अपात्रतेच्या आडून भीती दाखवून शिंदे गटातील या नेत्यांना भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी मजबूर केलं जाऊ शकतं. तसेच हे करताना शिंदे गटाच्या अनेक मतदारसंघावरही भाजप दावा करू शकतं. उदाहरणार्थ श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ.
(Loksabha Election | BJP | Fadnavis OBC Andolan)
४) काॅंग्रेस,शरद पवार गटाचे नेते सोबत घेणे.
आता भाजपला मिशन ४५ च्या दिशेने पाऊलं टाकायची असतील तर त्यांना अजून दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत. आणि त्या म्हणजे इतर पक्षातील इनकमिंग वाढवणे. आता या मध्ये भाजप नक्कीच कांग्रेस आणि शरद पवार गटाला टार्गेट करेल. आता अर्थात अजित दादा गटाला सोबत घेऊन भाजपनं राष्ट्रवादीला बरोबर घेतलं आहै. पण आता याबरोबरीनेच भाजपचा डोळा नक्कीच शरद पवार गटावर असणार आहे. कारण अजित दादा सोबत आले तरी शरद पवार यांचा लोकल पातळीवरचा उपद्रव अजिबात टाळता येत नाही . असो तर आता उदाहरणचं घ्यायचं झाल्यास, अधूनमधून जयंत पाटील यांच्या भाजपप्रवेशाची बातमी ब्रेक होत असते. पण अजूनतरी जयंत पाटील यांनी आपली जागा सोडलेली नाहीये. पण जर जयंत पाटील यांना फोडण्यात भाजप यशस्वी झालं तर मग भाजप अजूनच strong होऊ शकतं. मध्यंतरी शरद पवार गटाचा एक आमदार आणि एक खासदार अजित दादा गटात जाण्याची जी बातमी होती तो ही खरंतर याच प्लॅनचा भाग होता. असं म्हणतात. सोबतच पाठीमागे कांग्रेसचे अशोक चव्हाण तसेच अमित देशमुख हे कसे भाजपमध्ये जाऊ शकतात ,ही सुद्धा बातमी पसरली होती. आता हे दोन्ही नेते मराठवाड्यातील तुल्यबळ नेते आहेत. तेच जर भाजपसोबत गेले तर मग भाजप बलशाली तर कांग्रेस आणि पर्यायाने राज्यातील विरोधी पक्ष अधिकच कमकुवत होईल.
(Loksabha Election | BJP | Fadnavis OBC Andolan)
५) ठाकरे गट,शरद पवार गटाशी सेटलमेंट
आता शिंदे गट आणि अजित दादा गट आपल्यासोबत वळवण्यात जरी आता भाजपसक्सेसफुल झालं असलं तरीही भाजपला काही खटकणार्या जागा देखील नक्कीच आहेत. जसं की बारामतीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या तर मग बारामतीत भाजपचं जिंकणं जवळपास मुश्कील आहे. आता यावर भाजपनं एकदा महादेव जानकर तर एकवेळ कांचन कूल यांची चाचपणी कैली पण दोन्ही वेळा त्यांचा प्लॅन फसलाय. बारामतीत धनगर समाजाची मतं पकडण्याचाही भाजपनं प्रयत्न केला पण त्यालाही तितकेसे यश आले नाही. म्हणून तर आता बारामतीत जिंकायचं असेल तर अजित दादा गटाकडून तिथे अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट देण्याचा विचार भाजप करतंय. इतर कोणीही उमेदवार दिला तर अजित दादा सुप्रिया सुळेंच्या बाजूने जातील म्हणून भाजपनं हा डाव साधलाय. पण आता या निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरीही भविष्यात बारामतीत या निवडणुकीमुळे शरद पवार विरुद्ध अजित दादा हा गट पडेल. आणि त्यामुळे भाजपला नंतर बारामतीत शिरकाव करणे सोपं जाईल, खरंतर असाच भाजपचा तिथून डाव असावा असं मानण्यात येतंय.. पण आता या झाल्या काही political गेम्स. पण अगदी इथून ऐनवेळी सुनेत्रा पवार यांनी माघार घेतली तर मग सुप्रिया सुळेंसाठी हा मतदारसंघ मोकळा सोडून इतर मतदारसंघात भाजप त्याबद्दल्यात कुठे निवडून आणला जाऊ शकतो, अशी सेटलमेंट देखील पवार फडणवीस यांच्यात होऊ शकते, असं एक खळबळजनक मतंही काही राजकीय पत्रकारांकडून व्यक्त केलं जातंय. सेम वे ही गोष्ट ठाकरेंबद्दलही होऊ शकते.
(Loksabha Election | BJP | Fadnavis OBC Andolan)
६) काही मतदारसंघात अपक्षांना सपोर्ट करणे अर्थात बंडखोरी.
आता महायुतीच्या जागावाटपात ज्या जागा भाजपला मिळणार नाहीत त्या जागेवर राज्य भाजपनं शिंदे गट किंवा अजित दादा गटाला सपोर्ट करणं मस्ट आहे. पण मग काही जागेवर भाजप टिकवून ठेवण्याच्या हिशोबाने भाजपकाही नेत्यांना अपक्ष उभे रहायला सांगून गुप्तपणे ताकद पुरवू शकते. म्हणजे जर तो संबंधित अजित दादा गट किंवा शिंदे गटाचा नेता तिथून लूज वाटत असेल तर मग भाजप तिथून भाजपपुरस्कृत अपक्षांना ताकद पुरवू शकतं . त्यामुळे कदाचित भाजपची भविष्याची सोय होऊ शकते.
(Loksabha Election | BJP | Fadnavis OBC Andolan)
७) व्होट डिव्हीजनसाठी वंचितचा उपयोग करून घेणे.
२०१९ च्या निवडणूकीत भाजप शिवसेना युतीनं लोकसभेच्या सर्वाधिक ४१ जागा जिंकल्या.पण या जागा जिंकण्यात जसा या पक्षाच्या नेत्यांचा मेजर रोल राहिला तसाच तो वंचित बहुजन आघाडीचाही राहिलाय. कारण या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या किमान ८ उमेदवारांमुळे कांग्रेस राष्ट्रवादीचं नुकसान झालं . आणि ते इतकं जबरी होतं की या सीटाच तिथं पडल्या. अगदी हातकणंगलेत धैर्यशील मानेंविरूद्ध राजु शेट्टी पडले. सांगलीत संजय काका पाटील विरूद्ध विशाल पाटील पडले तसेच अमरावतीत नवनीत राणा विरूद्ध आनंदराव अडसूळ पडले. आता गेल्या काही काळापासून हा वंचितचा मतप्रवाह ठाकरेंच्या बाजूने झुकलेला होता. ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रितपणे तशी आघाडीही केलीय . पण आता वंचितला महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडीत न घेणे यामुळे वंचितनं सध्यातरी वेगळा मार्ग पत्करायचा असं ठरवलं आहे. वंचितनं नुकतंच सर्वच्या सर्व ४८ जागा लढवायच्या असं जाहीर केलंय. आता भाजपसाठी हाच प्लस point आहे. खरंतर वंचित वर भाजपची बी टीम आहे असं allegation अनेकवेळा ठेवलं गेलं पण यातला राजकीय मुद्दा बाजूला काढला तरीपण आपल्या लक्षात येईल की वंचितनं २०१९ ला एकही जागा जिंकली नसली तरीही त्यांना ८ मतदारसंघात मिळालेली मतं ही भाजपच्या विजयाच्या दृष्टीने फायदेशीर ठरलेली आहेत. आणि पडलेले सगळे उमेदवार हे non bjp पक्षाचे आहेत. याचा अर्थ स्पष्टंय की वंचितची ही मतं जर कांग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने वळली असती तर त्यांचं हे नुकसान टळलं असतं. असो, पण आता ती चूक परत टाळायची असेल तर सगळे हेवेदावे विसरून महाविकास आघाडीला वंचितला सोबत घ्यावेच लागेल. पण तसं झालं नाही तर मात्र महाविकास आघाडीला पून्हा जबर फटका बसू शकतो. पण याचा पून्हा मोठा फायदा उचलण्याचा डाव भाजप आखू शकतं.
(Loksabha Election | BJP | Fadnavis OBC Andolan)
८) हिंदूत्व
भाजपला मिशन ४५ राखायचं असेल तर जी भाजपची हिंदूत्वाची लाईन आहे ती त्यांना सतत धगधगती ठेवावी लागणार आहे. मागे केरळ स्टोरी तसेच मध्यंतरी पुण्यातील पुण्यैश्वर वरून झालेलं हिंदुत्वाचं वातावरण तसेच अयोध्या येथील राम मंदिर तसेच काश्मीर मधील ३७० चा निर्णय असे दूरस्थ निर्णयही हिंदुत्वाच्या point of view मध्ये लोकांपुढे मांडावे लागणार आहेत. आता यासोबतीनेच महाराष्ट्रात मिशन ४५ सारखं अवघड काम करायचं असेल तर भाजपला महाराष्ट्राचं जात वास्तव विसरता येणार नाही. म्हणून तर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण अशा मुद्यांनाही भाजपला सोडून चालणार नाही.
(Loksabha Election | BJP | Fadnavis OBC Andolan)
९) मराठा vs धनगर , मराठा vs ओबीसी असं नरेशन तयार करून एकाचवेळी जात आणि धर्म या मुद्यावर निवडणूकांत फ्रंट घेणे .
जसं की आता आपण म्हणालो की महाराष्ट्रात फक्त धर्माच्या आधारावर निवडणूका जि़कणं इतकं सोपं नाही. हेच भाजपनं ओळखून महाराष्ट्रात माधव पॅटर्न राबवला ज्याचा परिणाम म्हणून ते सत्तेवर आले . आता अशावेळी जातवास्तव स्वीकारत जातीचा मुद्दा डाॅमिनेट न होऊ देता धर्माच्या आधारावर politics करण्याचा भाजपचा मनसुबा नक्कीच असेल. पण अशावेळी मराठा vs धनगर हा संघर्ष तीव्र झाला तर एकाबाजूला मराठा तर दुसर्या बाजूला धनगर मतांचीही बेगमी भाजपला करावी लागणार आहे. गोपीचंद पडळकर यांनी मध्यंतरी पवार कुटुंबावर केलेली टीका हा खरंतर भाजपच्याच political अध्यायाचा भाग होता. असं बोललं गेलं. तसेच नुकतंच जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर फडणवीसांनी ओबीसी आरक्षणबाबतीतल्या उपोषणस्थळाला भेट दिली आणि आता तर फडणवीसांच्या हस्तेच उपोषण सुटलं गेलंय . याचा अर्थ मराठा vs ओबीसी हा सुरू झालेला राजकीय खेळ वेगवेगळ्या लेव्हलवर वेगवेगळ्या पद्धतीने जि़कण्यासाठी भाजप पावलं टाकताना दिसतंय. पण शरद पवारांना जातीचं ध्रुवीकरण करू न देता एकाच वेळी मराठा ओबीसी अशी हिंदूत्वाच्या सहाय्याने मोट बांधणं हे येणार्या काळातील भाजप नेत्यांपुढचं मोठं challenge असणार आहे.
(Loksabha Election | BJP | Fadnavis OBC Andolan)
१०) शरद पवार गट आणि ठाकरे गटाला सातत्याने दुसर्या फळीतील नेत्यांकडून निष्प्रभ करत त्यांची जनतेतील सहानुभूती तोडणे.
आता जसं आताच आपण म्हणालो की गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली की हा वाद पुढे पार मराठा vs धनगर विषयापर्यंत गेला. आता यासाठी भाजप नेहमीच दुसर्या फळीतील नेत्यांचा वापर करताना दिसतं . जसं की पडळकर पवारांवर टीका करतात. तर दुसरीकडे नितेश राणे हे सातत्याने ठाकरेंवर टीका करताना दिसतात. असं केल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी जनतेत सहानुभूती आहे ती तुटण्यास मदत होते असा पक्ष नेतृत्वाचा कयास असावा. खरंतर यामुळे जातीय संघर्ष वाढतो, पण दरवेळी दोन जातीत विभाजणी होऊन पवार डॅमेज होतात असं नाहीये तर याचा भाजपलाही बुमरॅंग सहन करावा लागू शकतो, असं अनेक जाणकारांना वाटतंय कारण ठाकरे पवारांबद्दल खालच्या भाषेत बोललेलं सगळ्यांनाच आवडतं असं नाही. यातून पवारांना damage करणारी जातीय विभागणी झाली नाही तर मग लोकांच्या रोषालाच पक्षाला बळी पडावं लागू शकतं.असंही तज्ञांचं मत आहे.
(Loksabha Election | BJP | Fadnavis OBC Andolan)
११) शरद पवारांचं संस्थात्मक आणि सहकारी चळवळीचं राजकारण तोडणे.
खरंतर भाजपला एका गोष्टीला तोडल्याशिवाय त्यांचं मिशन ४५ हे गणित साध्यच करता येणार नाही. ते म्हणजे शरद पवार यांचं संस्थात्मक तसेच सहकारी चळवळीचं राजकारण तोडणे.आता खरंतर पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांची क्रेझ असण्याचं कारण म्हणजे त्यांचं संस्थात्मक राजकारण आणि सहकारी चळवळीचं जाळं. यात आता छत्रपती उदयनराजे भोसले, अगदी अजित दादा गटाच्या माध्यमातून रामराजे नाईक निंबाळकर असे संस्थानिक नेते सोबत घेऊन भाजपनं डाव साधलाय. तरीही कोल्हापूरातून शरद पवार शाहू छत्रपती यांच्यासारखा बडा चेहरा पुढे करणार आहेत . त्यावर भाजपला नक्कीच तोड शोधावा लागणार आहे . कारण या घराण्याशी लोकांच्या भावना जुळल्या आहेत. पण याचबरोबरीने पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी हा वेगवेगळ्या कारखान्यांशी ,पतपेढी, पतसंस्थांशी, बॅंकांशी आर्थिक पद्धतीने जोडला आहे. इथं शरद पवार यांनी स्वतः ला दाता करून लोकांना लाभार्थी करण्याची किमया साधली आहे. खरंतर शरद पवार यांना इथली लोकं यामुळेच मानतात. आता त्यांची ही इमेज तोडायची असेल तर भाजपला मोठं कष्ट करावं लागणार आहे. कारण शरद पवारांनी गेल्या ४० वर्षांत उभं केलेलं इथलं जाळं असं लगेच कुणालाही नष्ट करता येणार नाही. ते तळागाळापर्यंत पोहोचलं आहे. आता ही गोष्ट भाजपला संयमानेच घ्यावी लागेल कारण मागं शरद पवार यांच्या ईडी कारवाईमुळे त्यांचं नुकसान होण्याऐवजी त्यांना आयतं व्हिक्टीम कार्ड मिळून निवडणूकीत मोकळं रान मिळालं होतं. पण आता म्हणूनच मागे अमित शाह यांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर मांड ठोकणयासाठी अनेकदा वेगवेगळे प्रयत्न केलेत . अर्थात ही लढाई ही निश्चितच बौद्धिक क्षमतेवर भाजपचा कस बघणारी ठरणार आहे.
(Loksabha Election | BJP | Fadnavis OBC Andolan)
१२) मुदतपूर्व निवडणुका घेणे तसेच भारत जोडोचं positive वातावरण होऊ न देणे.
मध्यंतरी झालेल्या संसदेच्या अधिवेशनात कदाचित मोदी सरकार लोकसभा बरखास्त करून मुदतपूर्व निवडणुका घेतंय का ,असं वाटलं होतं पण तसं झालं नाही. आता खरंतर अशा बरखास्तीला विशेष अधिवेशनाची गरज नसते,असं म्हणतात. आता म्हणूनच जर भाजपनं मुदतपूर्व निवडणूकीची आयडिया केली तर विरोधकांचा डाव बिघडू शकतो. आता मध्यंतरीच कांग्रेसनं भारत जोडो यात्रा २.० ची घोषणा केली होती. आता पहिल्या भारत जोडो यात्रेच्या यशस्वितेनंतर भाजप नक्कीच असुरक्षित झाली होती . आता भारत जोडो यात्रेचा दुसरा रूट जरी महाराष्ट्रातून जात नसला तरीही भाजपला कांग्रेस बद्दलच्या सहानुभूतीची एक भीती नक्कीच असणार आहे. त्यामुळे भारत जोडीच्या दुसर्या यात्रेला जास्त प्लेयिंग ग्रांऊड मिळून भाजपबद्दल मतं अधिक विरोधी तयार होऊ नयेत म्हणूनही भाजप प्रयत्नशील असेल. आता पहिली भारत जोडो यात्रा ही अराजकीय होती अस़ बोललं गेलं पण भारत जोडो यात्रेचं हे दुसरं पाऊल नक्कीच राजकीय असेल कारण यादरम्यानच्या काळात इंडिया आघाडीची निर्मिती झाली आहे. आता ही इंडिया आघाडी एकत्र आली तर त्याचा फटका बसून नुकसान होऊ नये यासाठी इंडिया आघाडीतील नेत्यांना एकत्रित येऊ न देण्याचाही डाव भाजप नक्कीच आखत असेल.
(Loksabha Election | BJP | Fadnavis OBC Andolan)
१३) बडी पॅकेजेस आणि महिला आरक्षणासारखी घोषणा करून प्रोगेसिव्ह इमेज करणं.
संसदेच्या अधिवेशनात नुकतंच महिला आरक्षणाच्मा संदर्भातलं विधेयक भाजपनं भांडलं. ज्याला दोन्ही सभागृहात जवळपास सर्वपक्षीय मंजुरी मिळाली. आता धार्मिक विद्वेष तसेच महागाई बेरोजगारी अशा मुद्यात भाजपची छबी बिघडली होती ती सुधारायची असेल सोबतच महिलांना भाजप मध्ये प्रतिनिधित्व नाही ही इमेजही सूधरवायची असेल तर महिला आरक्षण विधेयक आणून हे तीनही मुदृदे साधता येतील असं भाजपला वाटलं असेल. जसं की महिला आरक्षण हा प्रोगेसिव्ह मुद्दा आहे. कांग्रेसने आणला असला तरी तो आम्ही सोडवला असं यामुळे म्हणता येऊ शकतं. महिलांना आम्ही नेतृत्व करायची संधी देतो असं म्हणता येऊ शकतं तसेच आता महागाईचा मुद्दा किचन मध्ये सर्वाधिक वावर असल्यामुळे महिलांचाच विषय असतो. त्यात महिला या परसेप्शन क्रिएटर असतात त्यामुळेच महिलांमध्ये छबी सुधारून महिला आरक्षणाचा विषय अस्मितेचा बनवायचा भाजपचा या अधिवेशनातून प्रयत्न राहिलाय. आता या बिलामध्ये अनेक गूंतागुंतीचे clause आहेत तसेच या विधेयकाचं ground पातळीवर perception create करायला भाजप किती यशस्वी होतंय हा सुद्धा शंकेचा विषय आहे.
(Loksabha Election | BJP | Fadnavis OBC Andolan)
१४) समान नागरी कायद्यात विरोधकांना trap करत महागाई बेरोजगारीचा मुद्दा पुढे येऊ न देणं.
असं बोललं जातंय की निवडणुकीच्या तोंडावर भाजप समान नागरी कायद्याचं हत्यार बाहेर काढेल . आता तसं जर झालं तर कांग्रेस यात आपसूकच trap होऊ शकतं. कारण कांग्रेसनं विरोध केला तर भाजप त्यांना मुस्लीम द्वेषृटा आणि स्वतः ला हिंदू त्ववादी ठरवू शकतं. आता एका बाजूला समान नागरी कायद्यानं आरक्षण जाईल असं misconception मेंटेन ठेवत समान नागरी कायदा कसा घटनेतील मुलभूत घटक आहे असं म्हणूनही भाजप वातावरण तापवू शकतं. आता असं uniform civil code वरून लीड घेऊन महागाई बेरोजगारी अशा मुद्यावर कांग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला backfoot वर ढकलण्याचा भाजपचा प्लॅन नक्कीच असणार!
(Loksabha Election | BJP | Fadnavis OBC Andolan)
१५) शरद पवार अजित दादा एकच आहेत असं सातत्याने सांगत शरद पवारांची छबी ब्रेक करणं .
नुकतंच आमदार रवी राणा यांनी स्टेटमेंट केलंय की शरद पवार आणि अजित दादा एकच आहेत. काहीच दिवसात शरद पवार हे तुम्हाला भाजपसोबत दिसतील म्हणून. आता रवी राणा यांच्या या वाक्यातलं politics काय आहे, तर बघा २०१९ ची लोकसभा निवडणूक अमरावतीमधून नवनीत राणा यांनी जिंकली आहे पण त्यामागे राष्ट्रवादीचा त्यांना मिळालेला सपोर्ट कारणीभूत होता. पण त्यानंतर राणा कुटुंबानं भाजपची सोबत घ्यायचं ठरवलं. त्यामुळेच आता उद्या निवडणूकीत राणांना त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीची गरज भासणार हे नक्कीय. आता अजित दादा भाजप सोबत आलेत पण शरद पवार सोबत आले नाहीत . अशावेळी अमरावती मतदारसंघासह महाराष्ट्रातील जनतेला confuse करायचं वक्तव्य या नेत्यांकडून भाजप करवून घेत असेल ,असं बोललं जातंय. अर्थात हे काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्यांचा आधार घेऊन भाजप महाराष्ट्रात मिशन ४५ चा डंका पिटतंय . पण कार्यकर्त्यंना जोश यावा म्हणून जरी भाजपचा हा प्रयत्न असला तरीही इतक्या जागा जि़कणं काही खायचं काम नाही. कारण दुसरीकडून शरद पवार आणि ठाकरे गट तसेच कांग्रेसही इंडिया आघाडी तसेच महाविकास आघाडी च्या माध्यमातून जोरदार पाऊलं उचलताना दिसतंय. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, भाजप खरंच त्यांचं लोकसभेसाठीचे मिशन ४५ पूर्ण करू शकेल? इतकी त्यांची क्षमता आहे ? की मग शरद पवार आणि ठाकरे गटच भाजपच्या मनसुब्यावर पाणी फेरून महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकू शकेल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply Cancel reply