आता खरा राडा पालकमंत्री पदाचा | शिंदे, फडणवीस आणि अजित दादा यांचा संघर्ष चव्हाट्यावर | Latest Marathi News

राज्याचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार जवळपास एक महिन्यापूर्वी पार पडला. खरतर त्यावेळी शिंदे गटातले काही नेते मंत्री पदाची आस लावून होते पण सत्तेचा खेळ पलटला आणि त्यांच्या ऐवजी राष्ट्रवादीच्या ९ जणांनी चक्क मंत्रिपदाची शपथ घेतली. झालं ,ज्यांच्या विरोधात इलेक्शन लढवल, तेच नेते सत्तेत सोबत आले. अजित दादा निधी देत नाहीत म्हणून मविआ सोडणाऱ्या नेत्यांनी मुकाटपणे दादांना उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारलं. तेव्हा सहनही होईना आणि सांगताही येईना अशी शिंदे गटाची सध्या गत झालीय .असो . पण आता ट्रिपल इंजिन सरकार म्हणल्यावर धुसफूस ही होणारच. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्ताराला महिना उलटूनही सरकारन पालकमंत्र्यांची नियुक्ती केलेली नाहीये. पण त्यामागं नेमकी काय कारण आहेत आणि जर पालकमंत्री पदाची नियुक्ती झाली तर या ट्रिपल इंजिन सरकारचा खेळ कसा बिघडू शकतो हेच आपण जाणून घेणार आहोत…

तर बघा सरकारनं काल 15 ऑगस्ट दिवशी राज्यभरातील झेंडावंदन साठी मंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. ज्यात छगन भुजबळ यांच्यावर अमरावतीची जबाबदारी आहे तर हसन मुश्रीफ यांच्यावर सोलापूरची. आता खरतर जिल्ह्यातील ऑफिशियल झेंडावंदन हे पालक मंत्र्यांच्या हस्ते होतं. पण सरकारने अजूनही पालकमंत्र्यांची यादी जाहीर न केल्यामुळे आता मात्र विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे . विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबद्दल सरकारवर निशाणा साधलाय. असं कुठल्याच सरकारच्या काळात घडलं नाही असं वडेट्टीवार म्हणाले. पण सरकार पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या न करता अशा पळवाटा का शोधतंय? हेच आपण पुढील सत्तासंघर्षाच्या उदाहरणातून समजावून घेऊयात.

( Maharashtra Politics News | Latest Marathi News )

नंबर एकचा सत्तासंघर्ष आहे, अदिती तटकरे विरुद्ध भरत गोगावले.

तर बघा पहिला मंत्रिमंडळ विस्तार हुकला पण निदान पुढच्यात तरी आपला नंबर लागेल असे भरत गोगवलेणा वाटल असणार . अहो म्हणून तर माझ ज्याकेट शिवून तयार आहे आता मी फक्त राजभवनाथून निमंत्रणाची वाट बघतोय अस भरत गोगावले म्हणाले होते . पण दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचं नशीब फिरलं आणि त्यांच्या ऐवजी चक्क अदिती तटकरे यांनीच मंत्रिपदाची शपथ घेतली . आता ज्या पक्षाच्या विरुद्ध इलेकशन लढून सत्तेत आलो आता त्याच पक्षातील नेते सरकारमध्ये आपल्या आधी मंत्री होत असतील तर मग
खेळ बिघडणारच ना. पण तरीही कुठलाच मार्ग नसल्याने भरत गोगावले यांनी कुठलीच कुरबुर केली नाही .‌पण आदिती तटकरे या पालकमंत्री व्हाव्यात असं रायगडमधील कुठल्याच आमदारांना वाटत नाही असं स्टेटमेंट काही दिवसांपूर्वीच भरत गोगावले यांनी केलं होतं.
म्हणजेच काय तर शिंदे गट आणि अजित दादा गट एकत्र असला तरीही आतून गोष्टी वेगळ्या आहेत . आता त्यामुळेच रायगडच्या राजकारणातील लोकल राजकीय गणितं बिघडू नयेत म्हणून सरकारने काळजी घेतलेली दिसतैय. कारण अदिती तटकरेंना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिलं तर मग भरत गोगावले विरुद्ध अदिती तटकरे म्हणजेच भरत गोगावले विरूद्ध सुनील तटकरे असा संघर्ष उभा राहून राज्यसरकारला आतून तडा जाऊ शकतो. हे राज्यसरकारला पक्कं माहीतेय.

( Maharashtra Politics News | Latest Marathi News )

नंबर दोनचं उदाहरण आहे, छगन भुजबळ विरुद्ध सुहास कांदे किंवा छगन भुजबळ विरूद्ध दादा भुसे हा संघर्ष.

आता एकनाथ शिंदे भाजप सोबत गेले तेव्हा ज्या आमदारांनी एकनाथ शिंदेची साथ दिली तेव्हा त्यातली दोन नावं म्हणजे नाशिकचे सुहास कांदे आणि दादा भुसे. आता दादा भुसे हे आधीच्या विस्तारात मंत्री झाले . त्यानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदावरही त्यांची वर्णी लागली. पण त्यांचं सबंध राजकारण हे छगन भुजबळ यांच्या विरोधात राहीलं आहे. पण आता ज्यांना विरोध केला तेच नेते सत्तेत मांडीला मांडी लावून मंत्री झालेत. आता दादा भुसे यांच्या ऐवजी नाशिकचं पालकमंत्रीपद छगन भुजबळ यांना हवंय अशी चर्चाय. मागं यावरूनच कदाचित पालकमंत्री दादा भुसे यांच्या बैठकीला छगन भुजबळांनी दांडी मारली होती. दादा भुसेंनी सुहास कांदेंना विश्वासात घ्यावं अशी डिप्लोमसीही भुजबळ तिथं वारंवार करत राहिलेत. तेव्हा आता जर भुजबळांना नाशिकचा पालकमंत्री केलं तर मग नाशिकचे राजकारण सांभाळून ठेवणं हे ट्रिपल इंजिन सरकारला निश्चितच जड जाईल. याशिवाय भुजषळांनी कितीही soft corner दाखवला तरीही शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनीही भुजबळांविरोधात मागच्या बऱ्याच काळापासून तीव्र संघर्ष उभा केला आहे, पण तेच जर नाशिकचे पुढचे पालक मंत्री झाले तर मग कांदे वेगळी भूमिका घेऊ शकतील. तिथली स्थानिक समीकरणं नक्कीच सरकार विरोधात जातील.

( Maharashtra Politics News | Latest Marathi News )

नंबर तीन आहे, धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे.

गेल्या पाच वर्षात भाजपनं पंकजा मुंडे यांना साईडलाईन केल्याचंच आपल्याला बघायला मिळालं. पण अशातच स्थानिक पातळीवर ज्या धनंजय मुंडे विरोधात त्यांचं संपूर्ण राजकारण राहीलं आता तेच भाजप सोबत सत्तेत असतील तर मग पंकजा मुंडेचं चीडणं साहजिक आहे, पण याउपर पंकजा मुंडे यांनी संयम दाखवत धनंजय मुंडेचा सत्कार करत मनाचा मोठेपणा दाखवलाय. पण त्या आतून अशांत आहेत हे नक्की. आता अशातच धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर नियुक्त केलं तर मात्र पंकजा मुंडे या राजकारणात अधिक वेगानं सक्रिय होतील,
कदाचित वेगळी भूमिकाही घेतील आणि ते भाजप, अजित दादा गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांना परवडणारं ठरणार नाही.

( Maharashtra Politics News | Latest Marathi News )

चौथं उदाहरण आहे हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीतसिंह घाटगे किंवा हसन मुश्रीफ विरूद्ध धनंजय महाडिक.

गेल्या काही काळात हसन मुश्रीफ यांच्या वर ईडी ची कारवाई झाली. भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करतंय असं म्हणलं जाऊ लागलं . यामध्ये स्थानिक भाजप नेत्यांचाही मुश्रीफांना टार्गेट करण्यात हात आहे अशी चर्चा होऊ लागली. पण आता घोळ असा झालाय की हेच विरोधातले नेते भाजपसोबत सत्तेत बसलेत. पण यामुळे कोल्हापूर आणि विशेषतः कागलच्या राजकारणात वेगाने बदल होऊ लागलाय. तिथं हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळाल्यापासून भाजपचे समरजीतसिंह घाटगे पेटून उठलेत. फक्त समारजीतसिंह नाही तर धनंजय महाडिक ही मुश्रीफांविरोधात उभे ठाकलेत. पण त्यांच्या पक्षाने मात्र मुश्रीफांना मंत्री करून ताकद पुरवली आहे. आता अशातच जर कोल्हापुरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही मुश्रीफांकडे गेली तर मग कोल्हापूरच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होऊन सध्याच्या फडणवीस शिंदे आणि पवार सरकारला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.

( Maharashtra Politics News | Latest Marathi News )

आता ही काही राज्यातील प्रमुख लोकल सत्तासंघर्षाची उदाहरणं आहेत. तेव्हा पालकमंत्री पदाच्या घोषणेनेनंतर तिथल्या जिल्ह्याचे राजकारण बिघडूंन सध्याच्या राज्यसरकारला राजकारणात अधिक मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. त्यामुळेच काही झालं तरी राज्यसरकार पालकमंत्री पदाच्या घोषणा करायला तयार नाहीये. आता कदाचित तरीही जर पालकमंत्री पदाच्या घोषणा झाल्याच तर आज ज्या ध्वजारोहणासाठीच्या निवडी झाल्यात. त्यानुसारच नेत्यांना त्यांच्या स्थानिक गडांपासून लांबच्या एखाद्या जिल्ह्यावर नियुक्ती मिळू शकेल. अर्थात स्थानिक जिल्ह्यात अशी संधी मिळाली तर संघर्ष अटळ आहे,ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पण दुसऱ्या बाजूला आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात ध्वजारोहणाची संधी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीचे काही नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. गेल्या वर्षीही पालकमंत्र्याऐवजी अधिकार्यांकडून ध्वजारोहण झालं होतं. यंदाही तसंच वातावरण पहायला मिळतंय. ज्याचा तोटा हा राज्यसरकारला मोठ्या गंभीर प्रमाणात सोसावा लागू शकेल, पण तुम्हाला काय वाटतंय. पालकमंत्री पदाच्या घोषणेने हे सरकार अडचणीत येऊ शकतं का ? तसेच तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्ही कोणाची निवड कराल ? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…

आता खरा राडा पालकमंत्री पदाचा | शिंदे, फडणवीस आणि अजित दादा यांचा संघर्ष चव्हाट्यावर | marathi news

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ajit pawar latestajit pawar liveajit pawar ncpajit pawar news livebreaking newslatest marathi newslatest marathi news abp mazalatest marathi news in bhandaralatest marathi news livelatest marathi news lokmatlatest marathi news maharashtralatest marathi news maharashtra timeslatest marathi news mumbailatest marathi news paperlatest marathi news punemaharashtra newsmaharashtra news channelmaharashtra news livemaharashtra news marathimaharashtra news naukrimaharashtra news politicsmaharashtra news today in englishmaharashtra news today marathiMaharashtra News TV programmaharashtra news whatsapp group linksharad pawarsharad pawar on ajit pawarvishaych bharivishaychbhariविषयच भारी
Comments (0)
Add Comment