महाराष्ट्राचा पाब्लो एस्कोबार म्हणजे ड्रगमाफिया Lalit Patil | Lalit Patil News | Vishaych Bhari


सध्याचा घडीला मराठा आरक्षणानंतरचा महाराष्ट्रातला सगळ्यात हॉट मुद्दा म्हणजे ड्रग्ज माफिया ललित पाटील. काहीजण त्याला महाराष्ट्राचा ड्रग लॉर्ड म्हणत्यात तर काही जण त्याची तुलना थेट पाबलो एस्कोबारशी करत्यात. त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं तरीही अजून ललित पाटील प्रकरणाची चर्चा काही थांबलेली नाहीये. कारण ललित पाटील प्रकरणात रोज नवनवीन गौप्यस्फोट होतायत. ललित पाटीलवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरूय. आजच्या या Blog मध्ये आपण ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय त्याची सविस्तर माहिती घेणारे,

(Lalit Patil | Lalit Patil News | Vishaych Bhari)

तर मंडळी या प्रकरणाला सुरुवात झाली 2020 साली. कारण २०२० मध्येचं ललित पाटील पोलिसांच्या रडारवर आला होता. कारण तेव्हा पोलिसांनी पिंपरी चिंचवडमध्ये चालणारं ड्रग्जचं जे रॅकेट उद्ध्वस्त केलं होतं त्यात प्रामुख्यानं त्याचं नाव समोर आलं होतं. तेव्हाचं त्याला पहिल्यांदा अटकही झाली होती. हा ललित पाटील मूळचा नाशिकचा. आई-वडील, भाऊ, पत्नी आणि दोन मुलं असं त्याचं कुटुंब आहे. ललित पाटीलची पहिली पत्नी त्याला सोडून गेली. त्यानंतर ललित पाटीलनं दुसरं लग्न केलं. अपघातात त्याच्या दुसऱ्या पत्नीचं निधन झालं. ललित पाटीलचा एक मुलगा आठवीत तर एक मुलगी नववीत शिकते. स्वतः ललित पाटीलचं शिक्षण बारावीपर्यंत झालेलंय. ललितचा भाऊ भूषण पाटीलचंही लग्न झालेलंय. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार त्याचे वडील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. हा ललित पाटील सुरुवातीला वाईन कंपनीत कामाला होता. त्यानंतर ललित पाटीलनं तीन ते चार वर्षे बोकड विक्रीचा व्यवसाय केला. पुढं काही काळ टेलिफोन एक्स्चेंजमध्ये काम केलं. दरम्यानच्या काळात त्याची अरविंद लोहारे आणि राकेश खानिवडेकर या दोन माणसांशी ओळख झाली. ते दोघंजण छोटा राजनसाठी काम करायचे अशी माहिती समोर आली होती. त्यामुळं समीर वानखेडे त्यांच्या मागावर होते. २०२० मध्ये समीर वानखेडेंनी पालघरमधल्या त्यांच्या ड्रग्ज रॅकेटवर छापा मारला होता. त्यावेळी अरविंद लोहारे आणि राकेश खानिवडेकर या दोघांना अटक करण्यात आली होती. पण त्यावेळी त्यांना जामीन मिळावा म्हणून ललित पाटीलनं त्यांना मदत केली होती. नंतर पुढं चाकण पोलिसांनी अरविंद लोहारे आणि राकेश खानिवडेकर या दोघांना अटक केली. त्या दोघांच्या चौकशीतही ललित पाटीलचं नाव समोर आलं होतं. तेव्हा पोलिसांना पहिल्यांदा अशी माहिती मिळाली की ललित पाटील हा छोटा राजनच्या गँगशी संबंधित माणूसय. त्यानंतर १० डिसेंबर २०२० रोजी ललित पाटीलला ड्रग्ज तस्करी प्रकरणात पिंपरी पोलिसांनी चाकणमधून अटक केली. पुढं जेलमध्ये त्याची छोटा राजनच्या गुंडाशी जास्त ओळख वाढली अन त्यानंतर त्यांच्यात एक गुप्त ट्रेनिंग कँप झाला. त्यात कुठलं ड्रग्ज कसं ओळखायचं, त्याची तस्करी कशी करायची याचं ट्रेनिंग त्याला देण्यात आलं. मेफाड्राईन ड्रग कसं ओळखायचं हे देखील तो त्याचं ट्रेनिंगमध्ये शिकला. Mephedrone ला म्यांऊ म्यांऊ असंही म्हणतात.

(Lalit Patil | Lalit Patil News | Vishaych Bhari)

पुढं मग जानेवारी २०२१ रोजी ललित पाटीलची येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यानंतर काही महिन्यांनी त्यानं तब्येतीचं कारण पुढं केलं आणि त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. अन तिथून सुरू झाला त्याचा खरा खेळ. ससून हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार होणं अपेक्षित होतं, पण झालं भलतंच. एका प्रसिद्ध मीडिया रिपोर्टनुसार ललित नित्यनेमानं त्याच्या दोन गर्लफ्रेन्ड्सना भेटण्यासाठी ससूनमधून बाहेर पडायचा. त्यांच्यासोबत अय्याशी करायचा, त्यांच्यावर पैसे खर्च करायचा. त्यापैकी एकीच नाव प्रज्ञा कांबळे जी पेशानं वकीलय तर दुसरी मुलगी अर्चना निकम. अशा दोन मैत्रिणींसोबत ललित रासलीला रचत होता. ड्रग्ज विक्रीतून मिळणारे पैसे त्यांच्यावर खर्च करत होता. ते अंमली पदार्थ पोहोचवण्यासाठी त्यानं 19 वर्षीय रऊफ रहिम शेख आणि मंडल नावाच्या दोन व्यक्तींन हाताशी धरलं होतं. सप्टेंबर २०२३ रोजी ससून रुग्णालयाच्या गेटवर २ कोटींचं ड्रग्ज जप्त झालं तेव्हा 1 ऑक्टोबर रोजी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ललित पाटीलचं नाव समोर आलं होतं. तो प्रकार उघड झाल्यानंतर ललित पाटील, राऊफ आणि मंडल विरोधात पुण्यातल्या बंड गार्डन पोलिस स्टेशनमध्ये कलम 306/2023 आणि एनडीपीस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 1 तारखेला गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 तारखेला शस्त्रक्रिया करायची असल्यामुळं ललित पाटील ससून हॉस्पिटलमध्येचं मुक्कामी होता. शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी एक्स रे काढण्यासाठी त्याला 1 पोलिस हवालदार ससून रुग्णालयाच्या ग्राऊंड फ्लोअरवर घेऊन आला आणि त्यावेळी पोलिसाच्या हाताला झटका देऊन ललित पाटील तिथून फरार झाला. ससूनमधून बाहेर येत त्यानं रिक्षा पकडली अन तो पळून गेला ह्ये त्याला आणलेल्या पोलिसानं जबाबात म्हटलंय. २ ऑक्टोबर २०२३ रोजी हा सगळा प्रकार घडला.

(Lalit Patil | Lalit Patil News | Vishaych Bhari)


ससून रुग्णालयातून निसटल्यानंतर ललित नाशिकला जाऊन आधी त्याच्या गर्लफ्रेंडला भेटला आणि त्यानंतर गुजरातला पसार झाला. त्यानंतर तो सतत त्या दोघींच्या संपर्कात होता आणि त्या दोघी त्याला पळून जाण्यासाठी मदत करत होत्या हे वास्तव पुढं समोर आलं. कारण तिथून त्यानं एका महिलेकडून पंचवीस लाख रुपये घेवून गेल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी त्यावेळी दिली होती. पुढं मग पुणे पोलिसांनी त्या दोघीनांही अटक केली. चौकशी दरम्यान कळलं की ललित पाटील आणि त्याची टोळी कुठल्या गुन्ह्यात पकडली गेली तर त्यांना जामिनावर बाहेर काढण्याची जबाबदारी वकील प्रज्ञा कांबळेवर होती. एवढच नाही तर मीडिया रिपोर्ट्सनुसार अनेकदा येरवडा कारागृहातील कर्मचाऱ्यांना गळाला लावून त्यांच्या मोबइलवरून दोघांचं बोलणं ही व्हायचं आणि ते ड्रग रॅकेटची पुढची दिशा ठरवायचे. त्यामुळं आता अटकेत असताना सुद्धा ललित पाटीलकडं एक दीड लाखाचे आयफोन आले कुठून ? मोबाईल वापरण्याची परवानगी त्याला का आणि कुणी दिली ? पोलिसांच्या नाकाखाली त्याच्या रासलीला सुरू होत्या, तेव्हा त्याला कुणी का अडवलं नाही? फाईव्ह स्टार हॉटेल, मॉलमध्ये तो शॉपिंग करताना पोलीस प्रशासन कुठं होतं ? ललितच्या डोक्यावर कुण्या बड्या माणसाचा हात आहे का ? अशा अनेक प्रश्नांना वाचा फुटलीये. महाराष्ट्र त्याच्या उत्तराची वाट पाहतोय. कारण ललित पाटील प्रकरणामुळं महाराष्ट्रातील तुरुंगाचं वास्तव समोर आलेलंय. असो, दरम्यान पळून गेलेल्या ललित पाटीलला शोधण्यासाठी ३ ऑक्टोबर २०२३ रोजी पुणे पोलिसांनी १० पथकं तयार केली. तसंच साकीनाका पोलिसांना सुद्धा ललित पाटील पाहिजे होता. त्यामुळे उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक चिमटे, निरीक्षक योगेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे, उपनिरीक्षक पंकज परदेशी, राजेंद्र नागरे या अधिकाऱ्यांनी पथके तयार करून ललित पाटीलचा शोध सुरू केला होता. त्या पथकानं ६ ऑक्टोबर २०२३ रोजी ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटी चालवत असलेल्या नाशिकच्या ड्रग्ज कारखान्यावर कारवाई करून 300 कोटींचे ड्रग्ज जप्त केले. त्यानंतर १० ऑक्टोबर २०२३ रोजी ललित पाटीलचा भाऊ भूषण आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. पुढं १६ ऑक्टोबर रोजी ललितचा भाऊ भूषण आणि अभिषेक बलकवडे या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दुसरीकडं ललितचा शोध चालू असताना पोलिसांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतली. त्यावेळी पोलिसांनी ललित सापडला तर त्याचा एन्काउंटर करू असं घरच्यांना सांगितलं. त्यावेळी ललितच्या आईनं हात जोडून पोलिसांना विनंती केली होती की त्याचा एन्काउंटर करू नका. आमच्यावर आधीच मोठा आघात झालाय. आम्हाला आणखी त्रास होईल, असं काही करू नका. आमचं काही बरंवाईट झाल्यास आमची नातवंडं पोरकी होतील. दरम्यान पोलीस त्याच्या मागावर होतेच पण तोवर ललित पाटील हा महाराष्ट्रातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला होता.

(Lalit Patil | Lalit Patil News | Vishaych Bhari)

नाशिकमध्ये त्याचे राजकारण्यांशी असलेले लागेबंधे यामुळं ललित पाटीलचं गूढ आणखी वाढलं होतं. त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडू लागल्या. ललित पाटील फरार झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांनी त्या प्रकरणी काही धक्कादायक खुलासे केले. त्ये म्हणाले विद्यमान सरकारच्या नाकाखाली महाराष्ट्रातील हॉस्पिटलमधून ड्रग्जमाफिया त्यांचा ड्रग व्यवसाय करत आहेत आणि प्रशासनाला त्याची कानोकान खबर नाहीये. त्यांच्यानंतर एका कार्यक्रमादरम्यान बोलताना नाना पटोले असं म्हणाले की, ललित पाटील कसा बेपत्ता झाला आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न कोणी केला याची माहिती आमच्याकडे आहे. ती योग्य वेळी जाहीर करू. तसंच ते पुढं म्हणाले, महाराष्ट्र एक सुसंस्कृत आणि प्रगत राज्य असून महाराष्ट्राच्या नावलौकिकाला काळिमा फासण्याचे काम भाजप सरकार करत आहे. राज्यात मागील काही दिवसांत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. एवढा मोठा ड्रग्जचा धंदा राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही. ड्रग्जच्या काळय़ा धंद्यातील ललित पाटील हा एक प्यादं असून त्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण, त्याचा शोध लागला पाहिजे. त्यांच्यानंतर त्या प्रकरणी ससूनमध्ये भेट द्यायला गेलेले काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांनी सदर प्रकरणात सत्ताधारी नेत्यांचा वरदहस्त असल्याचा दावा केला. 10 ऑक्टोबरला माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर थेट शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांचंच नाव घेतलं. सुषमा अंधारे म्हणाल्या की आरोग्य आणि गृह खातं कशातच गंभीर नाही हे दिसतंय. ससूनमध्ये दाखल झालेल्या ललित पाटील संबंधात नाना पटोले यांनी नाशिकमध्ये काही मुद्दे मांडले ते विचार करण्यासारखे आहेत. ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी कोणत्या आमदारांनी फोन केले ते तपासणे आवश्यक आहे.

(Lalit Patil | Lalit Patil News | Vishaych Bhari)


ते फोन कॅाल दादा भुसेंचे होते का, दादा भुसेंचे कॉल रेकॅार्ड का चेक केलं जात नाही. पुढं 13 ऑक्टोबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंधारे आणि रविंद्र धंगेकर यांनी त्या प्रकरणात अजून दोन मंत्री, काही आमदार आणि भाजपच्या लोकांचा समावेश असल्याचं म्हटलं. त्या सगळ्यांच्या दुबईमध्ये पार्ट्या झाल्याचाही त्यांनी दावा केला. तसंच त्याप्रकरणी संबंधितांची नार्को टेस्ट करण्याचीही मागणी त्यांनी केली. ललित पाटीलवर गिरिश महाजन यांचाही वरदहस्त असू शकतो असा दावा त्याचंवेळी अंधारेनी केला. अंधारेंच्या आरोपाला प्रत्युतर देताना गिरीश महाजन म्हणाले की, काही लोकांच्या डोक्याचा इलाज करावा लागेल. पुढं सुषमा अंधारे यांनी त्याप्रकरणी शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला. अंधारे म्हणाल्या, एकट्या ललित पाटीलनं हे करणं शक्य आहे का ? एकटं ससून रुग्णालयाचं प्रशासन हे करू शकत नाही. पोलिसही अशी रिस्क घेणार नाहीत. त्यामुळं याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करून मंत्र्यांसह सहभागी असणाऱ्या सगळ्यांचीच नार्को टेस्ट करावी अशी माझी मागणी आहे. दरम्यान सेना-काँग्रेसकडून सातत्यानं आरोपांच्या फैरी झडत असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्या संपूर्ण प्रकरणी पोलिस अधिकारी, ससून हॉस्पिटलचे डीन आणि अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. पण त्यावर त्यांनी उघडपणे भाष्य करणं टाळलं. तर आमदार रोहित पवार यांनी हे प्रकरण मोठं असल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली. ससूनमधून पळाल्यानंतर ललित पाटीलला पकडण्यात आलं होतं. मात्र एका नेत्याचा फोन आल्याने त्याला सोडून देण्यात आले असा दावा रोहित पवार यांनी केला आणि राज्यात खळबळ माजली. त्या सगळ्या आरोपाच्या बातम्या समोर येत असतानाचं १८ ऑक्टोबर २०२३ रोजी ललित पाटीलला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केल्याची बातमी समोर आली. त्याचं झालं असं पुण्यातून सटकल्यांतर ललितनं नाशिकचं चाळीसगाव गाठलं. चाळीसगावात काही दिवस मुक्काम केल्यानंतर तिथून त्याच्यासोबत काही रक्कम घेऊन तो धुळे आणि पुढं गुजरातच्या सुरत मध्ये गेला. सुरतमध्ये तीन दिवस थांबल्यावर तो सोलापूर, विजापूर असा मुक्काम हलवत बँगलोरला गेला. दरम्यान बँगलोर जवळच्या चन्नासेंद्रममधल्या एका हॉटेलात ललित थांबला असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली.

(Lalit Patil | Lalit Patil News | Vishaych Bhari)

त्यानंतर लगेचच पोलिसांनी त्यांच्या नेटवर्कचा वापर करून हॉटेलात धडक दिली अन ललितच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान रेंटवर कार घेऊन ललित रस्त्यामार्गानं चाळीसगाव, धुळे, सुरत, सोलापूर, विजापूर आणि बँगलोरला गेला, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. तो पुढं श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता अशीही माहिती समोर आली. ललितला अटक करून अंधेरी न्यायालयात हजर केलं गेलं. त्यावेळी ऍड. अमित मिश्रा ललित पाटीलकडून बाजू मांडण्यासाठी न्यायालयात हजर होते. त्यांनी ललितच्या जिवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचं सांगितलं. तसंच ललितवरील आरोप फेटाळत त्यांनी जामिनाची ही मागणी केली. पण तेव्हा ड्रग्ज प्रकरणात आमचा तपास सुरू आहे, अटकेतील आरोपींनी ललितचं नाव घेतलंय, आमच्याकडे सबळ पुरावे आहेत असं नमूद करत पोलिसांनी त्याच्यासाठी कोठडीची मागणी केली. त्यानंतर मग न्यायालयानं त्याला सोमवारपर्यंत म्हणजे 23 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानुसार आता ललित आमच्या हाती लागला असून त्याची कसून चौकशी केली जाईल. त्याचे साथीदार कोण कोण आहेत, त्याचे कोणाशी लागेबंधे आहेत याची संपूर्ण माहिती घेतली जाईल असं मुंबईचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान दुसरीकडं ललितच्या अटकेनंतर त्याच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान त्यानं मी पळालो नाही मला पळवलं गेलं आणि लवकरच यामागे कोणाकोणाचा हात आहे ते मी सांगेन असं खळबळजनक वक्तव्य केलं. त्यानंतर मग पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांची झोड उठली. सगळ्यात पहिल्यांदा तर सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ससूनमधून पळून जाऊन ललित पाटील काही दिवस नाशिकमध्ये होता. मोठी रक्कम आणि दागिने घेऊन तो नाशिकमध्ये कसा राहिला याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना द्यावी लागेल. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ड्रग फ्री महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन ड्रग्जची साखळी तोडली पाहिजे असं आम्ही क्राईम कंट्रोल कॅान्फरन्समध्ये यंत्रणांना सांगितलं होतं. याचं दरम्यान मुंबई पोलिसांना नाशिकमधल्या कारखान्याची माहिती मिळाली. त्याच्यावर त्यांनी धाड टाकली. वेगवेगळ्या ठिकाणी अशाप्रकारे जे काम करतात त्यांच्यावर धाडी टाकलेल्या आहेत. आता ललित पाटील हातामध्ये आलेला आहे. निश्चितपणे त्यातून एक मोठं नेक्सस बाहेर येईल. काही गोष्टी ज्या मला ब्रिफ झाल्या त्या लगेच तुम्हांला सांगू शकत नाही. योग्य वेळी सांगेन. पण मोठा नेक्सस बाहेर येईल. अनेक बोलणाऱ्यांची तोंडे बंद हतील.

(Lalit Patil | Lalit Patil News | Vishaych Bhari)


कोणालाही सोडणार नाही. सर्व दोषींवर कारवाई करू. दरम्यान त्यांच्यानंतर अंधारे, पटोले आणि धंगेकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सत्ताधारी मंत्र्यांनी मात्र त्यांच्यावरचे सगळे आरोप फेटाळले आहेत. त्या आरोपांविषयी आणि ललित पाटीलनं केलेल्या दाव्याविषयी बोलताना मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की मला अंधारे यांचं वक्तव्य ऐकून हसू आलं. एकदा दादा भुसेंचं नाव घेतलं. मग आणखी कोणाचं. आता एक्साईज मंत्री देसाईंचं नाव घेतलं. मी कायदेशीर सल्ला घेणार आहे. माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना आमदारकी किंवा खासदारकी मिळावी म्हणून त्या अशी वक्तव्यं करत आहेत. पण या प्रकरणात माझा काही संबंध असेल तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन. तर दादा भुसे म्हणाले की सुषमा अंधारेंनी मागणी केलेल्या चौकशीला सामोरे जायची आपली तयारी आहे. नार्को टेस्ट करा. असल्या आरोपांना मी भीक घालत नाही. चौकशीमध्ये काय ते समोर येईलच. असल्या कोणत्याही प्रकरणात संबंध आला तर राजकारण सोडण्याची माझी तयारी आहे. अंधारेंची आणि त्यांचा बोलविता धनी कोण आहे त्याचीही नार्को टेस्ट केली गेली पाहिजे. दरम्यान या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच ललित पाटीलचा दादा भुसे आणि हेमंत गोडसे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतला शिवसेनेत प्रवेश करतानाचा एक फोटो देखील व्हायरल झालाय. त्यात ललित पाटीलला उद्धव ठाकरे शिवबंधन बांधत असल्याचं दिसतंय. मुंबई पोलिसांनी मात्र त्या प्रकरणारत काही राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे पुरावे सापडले नाहीत असं म्हटलेलंय. त्यामुळं आता ललित पाटील प्रकरणी होणाऱ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांची चौकशी केली जाणार का हा सवाल लोकांकडून उपस्थित केला जातोय. एकीकडं हे राजकारण रंगलेलं असतानाचं दुसरीकडं ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीये. ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला आरोपी आणि छोटा राजनचा साथीदार अरविंद लोहारे यानंच ललित पाटीलला कारागृहात मॅफेडरॉन बनवण्याच्या कंपनीचं सेटअप करायची माहिती दिली होती हे स्पष्ट झालंय. लोहारे हा एमएससी केमिस्ट्री झालेलाय. त्यानं आतापर्यंत 10 केमिकल कंपन्यांमध्ये काम केलंय. महाडला पण त्यानं स्वत:ची कंपनी स्थापन केली होती. या तिघांची पोलिसांना समोर समोर चौकशी करायची आहे, अशी माहिती आता पुणे पोलिसांनी न्यायालयात दिलीय.

(Lalit Patil | Lalit Patil News | Vishaych Bhari)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

आतापर्यंत ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणी एवढी अपडेट समोर आलीये. यापुढं अजून काही काळबेरं बाहेर पडतंय का याचा तपास आता पोलीस घेत आहेत. जर सत्ताधारी किंवा विरोधकांच्या आरोपांमध्ये काही तथ्य आढळलं तर येत्या निवडणकीत ह्ये ललित पाटील प्रकरण सगळ्यांना जड जाणार ह्ये नक्की. बरं आता नुकतच संभाजीनगर मध्ये 250 कोटींचं ड्रग जप्त केलंय, पालघर मध्ये छापे टाकून ड्रगच्या व्यवहाराची जागा उध्वस्त करण्यात आलीये अशा बातम्या समोर येतायत. गुजरातमध्ये दर दोन दिवसाला हजारो कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केल्याच्या बातम्या येतात. सध्या या बातम्या पाहता निव्वळ नफेखोरीसाठी उडता पंजाब सारखा pattern राबवून महाराष्ट्रातील तरूणांना व्यसनाधीन करून त्यांची आयुष्य उध्वस्त करण्याचा डाव कोण आखतंय याचीही चौकशी होणं गरजेचंय. बाकी तुम्हाला काय वाटतंय, ललितवर राजकीय कोणाचा वरदहस्त असू शकतो, त्यानं कुणाच्या साथीनं एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी केली असेल, त्याला हॉस्पिटलमध्ये कोण मदत करत होतं, ललितच्या मागं महाराष्ट्र नासवणारा मास्टरमाईन्ड कोण असू शकतो, तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा,

महाराष्ट्राचा पाब्लो एस्कोबार म्हणजे ड्रगमाफिया Lalit Patil | Lalit Patil News | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

lalit patillalit patil bolbhidulalit patil caselalit patil girlfriendlalit patil live newslalit patil mother and fatherlalit patil nashiklalit patil newslalit patil news todaylalit patil prakaranlalit patil udhav thakrelalit patil viral videovishay bharivishaych bharivishaychbhariललित पाटीलललित पाटील अटकललित पाटील न्यूजललित पाटील प्रकरणविषय भारीविषयच भारी
Comments (0)
Add Comment