लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू नैसर्गिक की घातपात | Lal Bahadur Shastri Murder Mystery


देशाचा एक असा पंतप्रधान ज्यानं देशात अन्न तुटवडा असताना स्वतःचं मानधन घ्यायला नकार दिला होता. बरं असंही नाही ते स्वतः पंतप्रधान असूनही त्यांना त्यांचा घरखर्च भागवताना नाकी नऊ यायचं. घरखर्च भागायचा नाही म्हणून ते इंग्रजी वर्तमानपत्रात एक कॉलम लिहायचे. त्यातून ते त्यांचा अतिरिक्त खर्च भागवायचे. सरकारी तिजोरीतला एक रुपया सुद्धा अधिकचा ते वापरायचे नाहीत. पंतप्रधान पदी असतानाही त्यांचे पाय जमिनीवरचं होते. ते स्वतः कधीच सरकारी गाडी वापरायचे नाहीत. त्यांच्या मुलाने एकदा सरकारी गाडी वापरली आणि ही बाब त्यांना समजली तस त्यांनी किलोमीटरच्या हिशोबाने पेट्रोलचे पैसे सरकारी तिजोरीत जमा केले होते. बरं एवढंच नाही तर तेंव्हा आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू इथं भीषण रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वेमंत्री म्हणूण नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामाही दिला होता. आणखीचं सांगायचं झालं तर त्यांच्या मुलाचे काही व्यापाऱ्यांसोबत घनिष्ठ संबध होते. वडिलांच्या अधिकार पदाचा गैर वापर करुन त्यान ते काम केल्याचा आरोप सुद्धा त्यांचा मुलगा म्हणजेच हरीवर लगावण्यात आला होता. मात्र हे त्यांच्या कानावर पडताच, त्यांनी आपल्या शासकीय बंगल्यावरुन त्यांच्या मुलाला थेट हाकलून दिल होतं. खरच इतका प्रामाणिक आणि जमिनीवरती पाय असणारा पंतप्रधान परत होणे नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण हे सगळं कोणाबद्दल बोलतोय . हो बरोबर ओळखलं .‌मित्रांनो, आपण बोलतोय भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या बद्दल ,ज्यांना आपण भारतीय हरित क्रांतीचे राजकीय जनक असं सुद्धा म्हणतो. त्यांची आज जयंती. पण त्यांच्या मृत्यूबाबतीत मात्र आजही अनेक शंका कुशंका घेतल्या जातात. त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक होता की घातपात याबाबतीत अजूनही शंका उपस्थित केली जाते. ११ जानेवारी १९६६ रोजी ताशकंद इथं त्यांचा मृत्यू झाला होता . पण इतका काळ लोटल्यानंतर सुद्धा त्यांचा मृत्यू नक्की कसा झाला यावर अनेक तर्क लावले गेले. त्याचं मुख्य कारण म्हणजे मृत्यूनंतर त्यांच पार्थिव जेव्हा भारतात आणल गेल तेव्हा त्यांच्या मृत शरीराची कुठलीही फोरेन्सिक चाचणी करण्यात आली नव्हती. प्रधानमंत्री अचानक परदेशात मरण पावतात आणि त्यांच्या पार्थिवाच साध पोस्टमॉर्टम सुद्धा होऊ नये त्यामुळ कुणाच्याही मनात शंकेची पाल चुकचुकणं साहजिकय. ह्या घटनेवर आधारित अनेक पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेलीयेत. त्यातल्या बऱ्याच पुस्तकात त्यांना विषबाधा करण्यात आली असावी अशी शंका उपस्थित करण्यात आलीय. पार्थिवाचे रशियात काढलेले फोटो, भारतात आणल्यानंतर दिल्लीत काढलेले फोटो आणि रशियाच्या डॉक्टर्सनी त्यांच्या पार्थिवाचे Emblaming चे रिपोर्ट्स वगळता कुठलाही पुरावा आजच्या घडीला उपलब्ध नाही. यामुळेच शास्त्रीजींचा मृत्यू हा नैसर्गिक होता की त्यांची हत्या करण्यात आली होती ? हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो . थांबा, याच प्रश्नाची उकल आपण आजच्या Blog मध्ये करणार आहोत.

(Lal Bahadur Shastri Murder Mystery)

मंडळी लालबहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान. ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ ला त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे जवळपास १८ महिने ते भारताचे पंतप्रधान होते. पण त्यांचा हा छोटासा कार्यकाळ मात्र जबरदस्त राहिलेला होता. शास्त्रीजी स्वातंत्र्याची लढाई लढणारे गांधीवादी नेते होते. पण २७ मे १९६४ ला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजींच निधन झालं. म्हणून मग त्यांच्या मागे शास्त्रीजींच्या स्वछ प्रतिमेमुळे त्यांना पंतप्रधान बनवण्यात आल. निष्कलंक चारित्र्याच्या लाल बहाद्दूर शास्त्रीजींची लोकप्रियता १९६५ मधल्या युद्धात पाकिस्तान वर विजय मिळवल्यामुळे प्रचंड वाढली होती. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं त्यांचं वर्णन पाश्चात्य देशांनी केलं होतं. आता लाल बहाद्दूर शास्त्रीजींचा मृत्यू कसा झाला हे समजून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर त्यांच्या मृत्यूअगोदर काय काय घडलं हे समजून घेणं महत्वाचं आहे. मंडळी १९६२ च्या युद्धात चीनकडून भारताचा पराभव झाला होता. भारताचा काही भाग तेंव्हा चीनन बळकावला होता. त्यामुळे आपल्या देशाची तेंव्हा जगभरात भरपूर मानहानी झाली होती. मग त्याचं पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे तेव्हाचे फिल्ड मार्शल आयुबखान यांनी युद्धाच्या मार्गानं काश्मीर जिंकण्यासाठी १९६५ मध्ये भारताविरुद्ध युद्ध सुरू केलं होतं. अवघ्या आठ दिवसाच्या आत जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरवर पाकिस्तानी लष्कर पाकिस्तानी झेंडा फडकवेल अशी स्वप्नं आयुबखान आणि त्यांचे तेव्हाचे सहकारी परराष्ट्र मंत्री झुल्फीकार अली भुट्टो पाहत होते. प्रत्यक्षात मात्र उलटंच घडलं. शास्त्रीजींनी भारतीय भूमीवर आक्रमण करणार्‍या पाकिस्तानी लष्कराचा मुकाबला तर करावाच, पण पाकिस्तानी भूमीतसुद्धा प्रतिआक्रमण कराव असा आदेश लष्कराला दिला. मग भारतीय लष्करानं अवघ्या २१ दिवसांच्या त्या युद्धात पाकिस्तानी लष्कराचं अक्षरशः कंबरडं मोडल भारतीय सेना लाहोरच्या दिशेनं कूच करायला लागली. तेंव्हा लाहोरच्या वेशीवरच बर्की हे गाव सुद्धा भारतीय लष्करानं काबीज केलं होतं. त्या युद्धात भारतानं पाकिस्तानचा ७५० चौरस मैलाचा प्रदेश जिंकला होता तर पाकिस्ताननं भारताचा २२५ चौ. किलो मीटर प्रदेश सुद्धा मिळवला होता. भारतीय लष्करान हाजीपीर खिंडही जिंकलेली होती. त्या विजयानं शास्त्रीजींच्या खंबीर नेतृत्वाच देशात आणि जगभरात कौतुक झालं. पण, रशियाचे तेव्हाचे अध्यक्ष असलेले अलेक्सी कोसिजीन यांच्या मध्यस्थीन शास्त्रीजी आणि आयुबखान यांची रशियातल्या ताश्कंदमध्ये जानेवारी १९६६ मध्ये चर्चा झाली. रशियाच्या दबावानं शास्त्रीजींनी पाकिस्तानचा जिंकलेला प्रदेश परत द्यायच्या ताशकंद करारावर सह्या केल्या आणि त्याच्या नंन्तर काही दिवसातच रशियात लाल बहाद्दूर शास्त्रीजींचा अत्यन्त गूढ रित्या मृत्यू झाला.

(Lal Bahadur Shastri Murder Mystery)

11 जानेवारीच्या रात्री पंतप्रधानांचे सल्लागार कुलदीप नय्यर यांच्या दरवाजावर कोणीतरी निरोप दिला. तेंव्हाचा प्रसंग सांगताना कुलदीप नय्यर म्हणतात की मी माझ्या खोलीत झोपलो होतो तेव्हा कोणीतरी दरवाजा ठोठावला. गेटवर एक बाई होती. त्या म्हणाल्या, ‘युअर प्राइम मिनिस्टर इज डाइंग. मी शास्त्रीजींच्या खोलीकडे धावत गेलो, तेव्हा तिथ व्हरांड्यात सोव्हिएत युनियन म्हणजेच रशियाचे पंतप्रधान ॲलेक्सी कोसिजिन उभे होते. मला पाहून त्यांनी दोन्ही हात वर केले. आत डॉक्टरांच्या पथकान शास्त्रीजींना घेरलेले होत. नय्यर शास्त्रीजींच्या खोलीत पोहोचले, तोपर्यंत भारताचे दुसरे पंतप्रधान राहिले नाहीत अशी डॉक्टरांनी घोषणा केली होती. नय्यर यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मृतदेह बेडवर होता. चप्पल व्यवस्थित ठेवली होती, पण त्यांचा पाण्याचा थर्मास ड्रेसिंग टेबलवर लोळत होता. हे स्पष्ट होते,की अस्वस्थ शास्त्रींनी पाणी पिण्याचा प्रयत्न केला असावा, पण त्यांना यश आल नाही. मंडळी खरंतर शास्त्रीजींच्या मृत्युच्या आदल्या दिवशी म्हणजेच 10 जानेवारी रोजी दुपारी ताश्कंदमध्ये त्या ताशकंद करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. त्यानंतर सोव्हिएत युनियन म्हणजेच रशियान हॉटेल ताश्कंद इथं एक पार्टी आयोजित केली होती. शास्त्रीजी काही वेळ तिथ थांबले आणि नंतर मग रात्री 10 च्या सुमारास आपल्या तीन सहाय्यकांसोबत त्यांच्या खोलीत आले. शास्त्रीजींच्या त्या खोलीत अयुब खान यांच्या निमंत्रणावर इस्लामाबादला जाव की नाही यावर चर्चा झाली. त्यांनी पाकिस्तानात जाऊ नये, अस त्यांचे सहकारी शर्मा यांनी त्यांना सांगितल. पुढं अयुब खान कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि शास्त्रीजींच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो असं ते म्हणाले. यावर शास्त्रीजी म्हणाले, ‘आता ते काहीही करू शकत नाहीत, आमचा करार झाला आहे आणि तसही अयुब चांगले व्यक्ती आहेत. यानंतर शास्त्रीजींनी रामनाथ यांना जेवण लावायला सांगितल. जेवणात बटाटे, पालक आणि कढी यांचा समावेश होता. तत्कालीन राजदूत टीएन कौल यांच्याकडून हे जेवण बनवून आणलं होत. पूर्वी त्यांच्यासाठी रामनाथ हे स्वयंपाक बनवायचे, पण त्या दिवशी मात्र जॉन मोहम्मद यांनी स्वयंपाक केला होता. दोन महिला जॉनला स्वयंपाकघरात मदत करत होत्या. त्या रशियन इंटेलिजन्समधल्या होत्या आणि रशियामध्ये शास्त्रीजींना देण्यापूर्वी त्यांच जेवण चाखण्याच त्या काम करत होत्या. कुलदीप नय्यर लिहितात की, शास्त्रीजींच पाणी सुद्धा तिथं चाखले जात होत. तेंव्हा शास्त्रीजी जेवण करत असतानाच फोन वाजला. दिल्लीहून वेंकटरामन या त्यांच्या आणखी एक सहाय्यकाचा तो फोन होता. त्यांचे स्वीय सहाय्यक जगन्नाथ सहाय यांनी तो फोन उचलला. तिथून व्यंकटरमण यांनी भारताच्या राजकीय वाटचालीची माहिती दिली. भारतात प्रजा समाजवादी पक्षाचे सुरेंद्र नाथ तिवारी आणि भारतीय जनसंघाचे अटलबिहारी वाजपेयी यांनी  त्यांच्या या निर्णयावर टीका केली आहे असं त्यांनी कळवलं. शास्त्रीजी काळजीत पडले. मग शास्त्रीजींनी काबूलमधली दुसऱ्या दिवशीची वर्तमानपत्र मागवली.

(Lal Bahadur Shastri Murder Mystery)


शास्त्रीजींचा मुलगा अनिल शास्त्री हे सांगतात की, त्या रात्री त्यांनी भारतीय वृत्तपत्र काबूलला मागवली. तोपर्यंत त्यांच्या संभाषणात आणि तब्येतीत कोणतीही तक्रार नव्हती. म्हणजे आपल्या निर्णयाचा देशात काय परिणाम झाला हे त्यांना जाणून घ्यायचे होते. त्या अगोदर दोन दिवस शास्त्रीजी घरी सुद्धा बोलले नव्हते. त्यामुळे त्यांनी घरीही फोन केला. ते त्यांची मुलगी कुसुमचे म्हणण खूप ऐकायचे. सुरुवातीला त्यांच्या जावयाने फोन उचलला. मग त्यांनी त्यांच्या मुलीला फोनवर विचारल तुम्हाला निर्णय कसा वाटला ? त्यावर कुसुम म्हणाली, मला ते आवडल नाही.’ शास्त्रीजी म्हणाले, अम्मांना हा निर्णय कसा वाटला, त्यांच्याशी बोलन करुन दे. ते त्यांची पत्नी ललिता शास्त्री यांना अम्मा म्हणायचे . मुलगी म्हणाली, ‘अम्मा तुमच्यावर रागावली आहे आणि तुमच्याशी बोलायला ती नकार देतेय. पुढं भारतान जिंकलेला भाग तुम्ही पाकिस्तानला का दिला ? असंही ती म्हणाली. जगन्नाथ सहाय यांच्या म्हणण्यानुसार, या फोन कॉलनंतर शास्त्रीजी दु:खी झाले होते. तिकडं रामनाथनं शास्त्रीजींना दूध प्यायला दिल. झोपण्यापूर्वी दूध हे शास्त्रीजींच्या दिनचर्येचा भाग होतं. शास्त्रीजींनी रामनाथला झोपायला सांगितल. रामनाथ यांनी त्यांच्या खोलीत जमिनीवर झोपतो अस सांगितल पण शास्त्रीजींनी त्याला नकार दिला. कुलदीप नय्यर आपल्या पुस्तकात लिहितात की, दुसऱ्या दिवशी ते अफगाणिस्तानला जाणार होते, ज्याची पॅकिंग चालू होती. ताश्कंद वेळेनुसार पहाटे 1.30 वाजता शास्त्रीजी जगन्नाथ सहाय यांच्या खोलीजवळ आले. तिथं ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते. मोठ्या कष्टान ते म्हणाले, “डॉक्टरसाहेब कुठे आहेत? पॅकिंग करत असलेल्या खोलीत शास्त्रीजींचे डॉक्टर आर एन चुग झोपले होते. जगन्नाथ सहाय यांनी घाईघाईने सुरक्षा रक्षकांच्या मदतीन त्यांना पलंगावर झोपवल, प्यायला पाणी दिल आणि म्हणाले, बाबूजी ! तुम्हाला आता बरे वाटेल. शास्त्रीजींनी त्यांच्या हृदयाजवळ हात ठेवला आणि ते नंतर बेशुद्धचं झाले. खासगी डॉक्टर आर.एन.चुघ यांनी त्यांची नाडी तपासली आणि त्यांचा मृत्यू झाल्याच त्यांच्या लक्षात आलं. प्रोटोकॉल म्हणून रशियातल्या डॉक्टरांनासुद्धा तिथं बोलावण्यात आल होत. इंजेक्शन दिल, पण काहीच हालचाल झाली नाही. कुलदीप नय्यर यांनी त्यांच्या पुस्तकात शास्त्रीजींच्या खोलीबद्दल लिहिलयं. त्यांनी त्यांचे स्लीपर नीटनेटकेपणे कार्पेट केलेल्या मजल्यावर न घालता तसेच ठेवले होते.

(Lal Bahadur Shastri Murder Mystery)

ड्रेसिंग टेबलवर थर्मास उलटा पडलेला होता. त्यांनी तो उघडण्याचा प्रयत्न केला असल्याचं दिसत होतं. खोलीत कोणताही अलार्म किंवा बजर नव्हता. जो सहसा चालू असतो. खोलीत तीन फोन होते पण तिन्हीही बेडपासून लांब होते. त्यानंतर असं झाल्यावर थोड्याच वेळात तिरंगा आला आणि शास्त्रीजींच्या मृतदेहावर टाकण्यात आला. त्यानंतर फोटो काढण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी मृतदेह भारतात आणण्यात आला. त्यांचं शरीर निळं पडल्याचा आरोप शास्त्रीजींच्या कुटुंबीयांनी केला. त्या रात्रीच जेवण रामनाथऐवजी टीएन कोलचा स्वयंपाकी जॉन मोहम्मदन शिजवल्याने विषबाधा झाल्याचीही चर्चा झाली. संशयाच्या आधारावर रशियन अधिकाऱ्यांनी जॉन मोहम्मदला पकडलं सुद्धा पण नंतर त्याला सोडून देण्यात आल. विशेष म्हणजे जॉन मोहम्मद याला नंतर राष्ट्रपती भवनात नोकरी मिळाली. शरीराच्या निळसरपणामुळे विषबाधाची बाब बळकट झाली, जी कुलदीप नय्यर यांनी आपल्या पुस्तकात नाकारली आहे. ते लिहितात की त्यांना सांगण्यात आल की त्यांच्या शरीराला खराब होण्यापासून वाचवण्यासाठी रसायने आणि बाम लावले होते ज्यालाच emblaming असं म्हणतात. ज्यामुळे ते निळे झाले. शास्त्रीजींच्या मृत्यूच्या चौकशीचा प्रश्न हा वारंवार निर्माण होत राहिला. तत्कालीन सरकारन त्या शरीराच पोस्टमोर्तम सुद्धा केल नाही. 1977 मध्ये जनता पक्षाच सरकार आल. चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली. जिचं नाव होतं राज नारायण समिती. सुरुवातीला त्यांचे वैयक्तिक डॉक्टर आरएन चुग यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल होत, पण त्यांची कार एका ट्रकला धडकली आणि या अपघातात डॉ. चुघ यांचा मृत्यू झाला. सोबतच त्यांची मुलगी सुद्धा त्या अपघातात आयुष्यभरासाठी अपंग झाली. असाच प्रकार त्यांचे सहाय्यक रामनाथ यांच्यासोबत सुद्धा घडला. रस्ता अपघातात ते ही गंभीर जखमी झाले आणि त्यांची स्मरणशक्ती गेली. त्यामुळ या समितीचा अहवाल सुद्धा रखडला असून, हा अहवाल आजतागायत मांडला गेलेला नाही. 1965 च्या युद्धात भारतान अमेरिकेचा मित्र पाकिस्तानचा पराभव केला होता. दुसरीकडे अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारतान अणुकार्यक्रम थांबवण्यास नकार दिला होता. भारत अण्वस्त्र बनवत होता आणि शास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा 1944 पासून यात गुंतले होते. योगायोगान शास्त्रींच्या मृत्यूच्या अवघ्या 13 दिवसांनी 24 जानेवारीला त्यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. या दोन्ही गोष्टींचे धागेदोरे एका मुलाखतीशी जुळतात. आता CIA ही अमेरिकेची गुप्तचर संस्था आहे. या दोन्ही घटना घडल्या तेव्हा रॉबर्ट क्राऊली हे सीआयएचे संचालक होते. क्राऊली यांनी 1993 मध्ये अमेरिकन पत्रकार ग्रेगरी डग्लस यांना मुलाखत दिली आणि त्यात सांगितल की जानेवारी 1966 मध्ये सीआयएने शास्त्री आणि डॉ. होमी भाभा यांची हत्या केली होती.

(Lal Bahadur Shastri Murder Mystery)


ही मुलाखत त्यांच्या मृत्यूनंतरच प्रकाशित करण्यास क्राऊली यांनी पत्रकाराला सांगितल होत. या मुलाखतीत त्यांनी शास्त्रीजींना मारण्याचे कारणही सांगितलयं. ते म्हणाले की, रशियाच्या हस्तक्षेपामुळे भारताचा आवाका मजबूत होईल, अशी भीती अमेरिकेला वाटत होती. पाकिस्तानला हाताशी धरल्यान अमेरिकेची महासत्ता अशी प्रतिमा खराब होईल, अशीही शक्यता होती त्यामुळे शंकेचा रोख हा CIA आणि रशियाची गुप्तचर यंत्रणा KJB यांच्याकडेच जातं होता.  सरदार वल्लभभाई पटेल यांचे पुत्र डाह्याभाई पटेल यांनी सुद्धा शास्त्रीजींच्या मृत्यूबाबतीत शंका व्यक्त केली होती. एवढंच नाही तर त्यांनी ‘वॉज शास्त्री मर्डर्ड?  या नावानं एक ५० पानी पुस्तिका १९७० मध्ये लिहून प्रकाशित केली होती. राज्यसभेचे अनेक वर्षे खासदार राहिलेले डाह्याभाई यांनी कधी आपण सरदार वल्लभभाई पटेलांचे पुत्र आहोत अशी ओळख सांगितली नव्हती. आजीवन एक सक्षम आणि अभ्यासू खासदार म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्याप्रमाणेच अटलबिहारी वाजपेयीं, मधु लिमये यासारख्या दिग्गजांनी राज्यसभेत चौकशीची मागणी केली होती. लाल बहाद्दूर शास्त्रीजींच्या मृत्युंच्या प्रकरणावर आधारित द ताश्कंद फाईल्स नावाचा सिनेमा सुद्धा २०१९ साली रिलीज झालेला होता. एवढंच नाय तर द काश्मीर फाईल्स फेम विवेक अग्निहोत्री यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलेला होता. आता या मृत्यूबाबतीत संशयाची सुई इंदिरा गांधीकडे सुद्धा वळलेली आपल्याला दिसते. त्यांची पंतप्रधान होण्याची महत्वकांक्षा शास्त्रीनसोबतचे मतभेद, शास्त्रीच्या मृत्युनंतर दिल्लीत त्यांची समाधी बांधण्याला विरोध अशी बरीच कारण देऊन अनेकांकडून भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर सुद्धा संशय घेण्यात आला होता. पण अनेकांना हे आरोप बिनबुडाचे वाटतात.‌ एकूणच शास्त्रीजींच्या मृत्युच्या घटनेवरून संशयाला जागा होती असच आपल्याला आज म्हणावं लागेल. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय लाल बहाद्दूर शास्त्रीजींचा खरच मृत्यू झाला होता की त्यांची हत्या करण्यात आली होती. तसं असेल तर मग तुमच्यालेखी या सगळ्याला जबाबदार नेमकं कोण असावं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू नैसर्गिक की घातपात | Lal Bahadur Shastri Murder Mystery

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

breaking newslal bahadur shastrilal bahadur shastri biographylal bahadur shastri deathlal bahadur shastri death mysterylal bahadur shastri jayantilal bahadur shastri ka jivan parichaylal bahadur shastri mysterylal bahadur shastri photolal bahadur shastri speechlal bahadur shastri statuslal bahadur shastri vivek bindrathe tashkent filesthe tashkent files full moviethe tashkent files full movie in hindithe tashkent files trailervishay bharivishaych bharivishaychbhariविषयच भारी
Comments (0)
Add Comment