बाळासाहेबांच्या या कट्टर कार्यकर्त्याची छोटा राजनने हत्या का केली | KT Thapa History | Chhota Rajan

एका अंडरवर्ल्ड डॉनचा हस्तक शाळेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून जातो. आता तुम्ही म्हणालं गुंडाला कार्यक्रमाला बोलावणारी ही असली कसली शाळा. तर ऐका त्या गुंडाच्या पुढाकारानंच ती शाळा उभारलेली होती. ज्यांना त्याच्याबद्दल माहिती नाही ते लोक त्याला गुंडच समजतात. पण तो जिथं वाढला, त्यानं ज्यांच्यासाठी काम केलं, त्या गरीब लोकांसाठी तो रॉबिनहुड होता. फक्त शाळाचं नाय अगदी हॉस्पिटलपासून गरिबांच्या पोरांना नोकरी लावण्यापर्यंत त्यानं अनेक लोकोपयोगी कामं केली म्हणून त्याला लोकांनी नगरसेवक पदावर निवडून दिलं होतं. एका बाजूला त्याचा तो राजकीय प्रवास सुरूच होता पण दुसऱ्या बाजूला गुन्हेगारीच्या भूतकाळानं त्याची पाठ सोडली नव्हती. एकदा असंच कुठल्या तरी शाळेचं उदघाट्न करून माघारी येत असताना छोट्या राजनच्या गुंडानी त्याची हत्या केली अन सबंध भांडुप शहर हळहळलं. त्या डॉनचं नाव होतं के टी थापा. आजपर्यंत तुम्ही खूप कमी वेळा त्याचं नाव ऐकलं असेल पण भांडुपमध्ये के.टी.थापा. याची ओळख ठाण्यातल्या आनंद दिघेसारखी होती. किंगमेकर. आज आपण के टी थापाबद्दलच्या काही खास गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत,

( KT Thapa History | Chhota Rajan)


तर मंडळी खीमबहादूर तुलसिराम थापा उर्फ के.टी.थापा याचा चा जन्म नेपाळममधला. पण त्याचे वडील कामाच्या शोधत मुंबईत आले आणि नंतर त्याचं आख्खं कुटुंबचं भांडुपमधल्या मराठी वस्तीत राहिलं. थापा तिथंच मराठी पोरात वाढला. त्यांच्या जोडीला राहून मराठी बोलू लागला. मराठ्यांचे सण त्याच्या घरात साजरे करू लागला. भांडुपच्या गुरुनानक शाळेत त्याच शिक्षण झालं होतं. थापाची उंची कमी होती पण व्यायामाच्या भयाण आवडीमुळं त्यानं त्याची बॉडी जबराट बनवली होती. के टी थापा कबड्डी सुद्धा टॉप क्लास खेळायचा. कबड्डीत त्याचा हात कोणच धरत नव्हतं. भांडुप मध्ये कुठं ही कबड्डी स्पर्धा असो, तो प्रत्येक टूर्नामेंटमध्ये झाडून भाग घायचा अन एकट्याचं जीवावं समोरच्या टीमची धूळधाण उडवायचा. त्याचा खेळ इतका सुपरक्लास दर्जाचा होता की जर तो आत्ताच्या प्रो कबड्डी लीगमध्ये खेळायला असता तर त्याच्यावर करोडोची बोली लागली असती. खरं तर कबड्डीनंच त्याला पहिल्यांदा ओळख मिळवून दिली होती. पुढं तो एका प्राइवेट बँकेत वॉचमन म्हणून काम करायला लागला होता, त्यानंतर पुढं एका नामांकित फॅक्ट्रित कामाला गेला. तिथं मालक आणि कामगार यांच्यात सतत वाद व्हायचे आणि त्या वादात थापा कामगारांची बाजू घेऊन मालकाला भिडायचा.शिवसेनेच्या संपर्कात आल्यापासून त्याच्यात तो निडरपणा आला होता. तिथूनच थापाचा एक कामगार नेता म्हणून प्रवास सुरु झाला होता. पुढं जाऊन त्याचा तो प्रवास बाळासाहेबांपर्यंत जाऊन पोहचला. बाळासाहेबांना तो भांडुप मधल्या लोकांची काम करेल असा विश्वास वाटल्यानं, त्यांनी के.टी.थापाला नगरसेवक पदाच तिकीट दिलं. बरं एवढंच नाही तर तो भरघोस मतांनी निवडूनही आला. असं म्हणतात की याचं के टी थापाच्या ओळखीमुळं बाळासाहेब ठाकरेंना त्यांची काळजी आणि सेवा करणारा चंपासिंग थापा हा विश्वासू माणूस मिळाला होता.

( KT Thapa History | Chhota Rajan)

दरम्यान नगरसेवक झाल्यावर थापानं भांडुपमध्ये बरीच काम केली. गरिबांच्या पोरांच्या शिक्षणासाठी शाळांना मदत केली, भांडुपमध्ये डोंगराळ भागात बस सेवा सुरू केली, भांडुप मध्ये पहिली मोठी दहीहंडी पण त्यानेचं भरवली होती. तसच कसलंही काम घेऊन कुणी त्याच्या दारात गेलं की तो त्याला कधीच मोकळ्या हातानं परत लावायचा नाही. अडल्या नडलेल्या लोकांसाठी तो जितकं करता येईल तितक करायचा. तो कोणालाही हाक मारताना अरे तुरे करून बोलवायचा नाही. प्रत्येकाला आदरानं बोलवायचा. राजकारणात असतानाच त्याची छोटा राजनसाठी काम करणाऱ्या सुभाष ठाकूरशी ओळख झाली. त्या सुभाष ठाकूरचा उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठा हात होता. त्या सुभाष ठाकूरचा शब्द दाऊद सुद्धा डावलत नसायचा. तो सूभाष ठाकूर सध्या बनारसच्या जेलमध्ये असल्याचं सांगितलं जातं. त्यावेळी छोटा राजन दाऊद एकत्र काम करायचे. अन सुभाष ठाकूरच्या जोडीला राहून थापा सुद्धा त्यांच्यासाठी काम करायचा असं बोललं जात होतं. 70 च्या दशकात त्याचं सुभाष ठाकूरच्या मदतीनं थापानं कांजूर आणि भांडूपमध्ये त्याचा दबदबा बनवला होता. पण काही जणांच्या मते गुंडगिरी करुन, कुणाला मारझोड करून, गरीबाला लुटून त्यानं दहशत निर्माण केली नव्हती. तो सर्वसामान्य माणसांसारखंच राहायचा, गरिबांना विनाकारण त्रास द्यायचा नाही, भांडुपमध्ये होणाऱ्या अनेक कार्यक्रमांना खुल्या दिलानं मदत करायचा त्यामुळं लोकं त्याच्याशी जोडली गेली होती. त्याचा परिणाम म्हणूनचं तो दरवेळी नगरसेवक म्हणून निवडून यायचा. असं म्हणतात की त्यावेळचे कॉँग्रेसचे नेते दिना बामा पाटील आणि शिवसेनेचे के. टी. थापा यांच्यात नेहमी खटके उडायचे.

( KT Thapa History | Chhota Rajan)


पण तरीही भांडुप मधल्या लोकांच थापाच्या कार्यशैलीवर विशेष प्रेम होतं. पण काही स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार नगरसेवक झाल्यावर थापानं मुंलुड, भांडपू, कांजूरमार्ग भागातील दारुचे अड्डे, बिअर बार, 2 नंबरचे धंदे करणाऱ्या अवैध लोकांककडून हप्ते घ्यायला सुरुवात केली होती. आणि त्याचं थेट कनेक्शन होतं हप्ते वसूली करणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी. थापाच्या विरोधकांनी त्याच्या साथीदारांवर छोटा राजनसाठी वसूली करण्याचे आरोप लावले होते. अन खुद्द थापा सुद्धा छोटा राजनशी काम करायचा असं ही बोललं जात होतं. पण पुढं छोटा राजन अन दाऊद यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू झाला. त्या वादानंतर सुभाष ठाकुरनं दाऊदची साथ दिली. त्या ठाकूरचं ऐकून थापा सुद्धा छोटा राजनची साथ सोडून दाऊदकडं गेला असं बोललं जाऊ लागलं. दरम्यान नगरसेवक झाल्यामुळं भांडूप परीसरात थापाचं वर्चस्व वाढलं होतं. तो चेंबुरपासून भांडुप पर्यंत व्यापाऱ्यांकडून ह्फ्ते वसूल करायला लागला होता. त्यामुळं राजनचं मोठं आर्थिक नुकसान व्हायला लागल होतं. दरम्यान थापाच्या मागं बराच जनसंपर्क असल्यामुळं पुढं जाऊन हा आपल्याला वरचढ ठरेल अशी भीती छोटा राजनला वाटायला लागली होती. तेव्हाच त्यानं के टी थापाचा काटा काढायचं ठरवलं होतं. तो विश्वासू माणूस आणि योग्य वेळेची वाट पाहत होता. पुढं थापाचा एक मोठा मासा छोटा राजनच्या गळाला लागला. अवधूत भोंडे. तो जवळपास 20 वर्षे थापासोबत होता. छोटा राजननं त्याला त्याच्या बाजूला वळवलं आणि त्याच्याशी डील करून राजननं थापा कुठे जातो, काय करतो याची सगळी बिनचूक माहिती काढली. सगळी माहिती कन्फर्म केल्यावर छोटा राजननं थापाला मारण्यासाठी सापळा रचला. थापाच्या मृत्यूची घटना सिनेमाच्या स्टोरीसारखी होती. 23 एप्रिल 1992 चा तो दिवस. त्याचं झालं असं, त्या दिवशी के टी थापा एका शाळेत कार्यक्रमाला गेलेला होता. तिथं त्याला काही बायकांनी ओवाळलं. पण ओवाळत असताना ताटातलं निरंजन सतत विझत होतं. ते सतत का विझतंय हे कुणालाचं कळत नव्हतं पण त्यामुळं अनेकांच्या मनात शंकेची पाल चूकचूकत होती. काहीतरी वाईट घडणारयं असं थापाच्या सहकाऱ्यांना प्रत्येकालाच वाटतं होतं. त्यांनी तसं थापाला बोलूनही दाखवलं. पण पुढच्या कार्यक्रमाला उशीर नको म्हणून थापानं विझल्या निरंजनाच्या ताटानेचं ओवाळून घेतलं अन तिथून पुढं मित्रांना भेटायला निघून गेला. दुपारच्या वेळी नेहमीच्या सवयीप्रमाणं त्यानं त्याच्या मित्रांना घेऊन एल, बी. एस मार्गावरचा मंगतराम पेट्रोल पंप जवळ केला.

( KT Thapa History | Chhota Rajan)

कारण तिथल्या हॉटेलमध्ये जेवण करणं थापाला खूप आवडायचं. कुणीही पाहुणे आले की तो तिथं त्यांना जेवायला घेऊन जायचा. हॉटेलमध्ये थापा आणि त्याचे मित्र गप्पा मारत मारत दुपारच जेवण करत बसले होते. तोवर बाहेर छोटा राजनच्या माणसांनी थापाला उडवण्यासाठी फुल्ल टू सापळा लावला होता. राजनची माणसं पेट्रोल पंपावर गाडीत हवा भरण्याच्या बहाण्यानं उभी होती. थापा कधी एकदा बाहेर येतोय याचीचं ते सगळे वाट पाहत होते. थापाला त्याची जराही कुणकुण लागली नव्हती. दरम्यान थापानं जेवण संपवलं, मित्रांसोबत चहा घेतला अन तो हॉटेलमधून बाहेर आला. त्याला बघताच छोटा राजनचे शार्पशूटर अलर्ट झाले. थापाला बाहेर आलेलं पाहून ते गाडीत बसले अन तो पळून जाऊ नये म्हणून गाडी घेऊन त्याच्याजवळ गेले. थापा बेसावध असतानाचं त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आजूबाजूची माणसं भीतीनं पळून गेली. पण गोळ्या लागूनही कणखर शरीरयष्टीचा थापा उठला अन जीव वाचवायला हॉटेलमध्ये पळाला, तिथून मागच्या दरवाजानं बाहेर पडला, हॉटेलला लागूनच असलेल्या बिल्डींगच्या कंपाऊन्डमध्ये गेला. पण तिथून बाहेर पडण्यासाठी जागा नसल्यानं छोटा राजनच्या शूटरनी त्याला गाठला आणि पुन्हा एकदा त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातच के. टी. थापाचा मृत्यू झाला. त्याच्या हत्येसंबंधी पुढं अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर आरोप ठेवण्यात आले मात्र कमी पुराव्याअभावी त्याला सोडण्यात आलं. पण थापाचा मित्र सुभाष सिंग ठाकुर यानं मात्र थापाच्या मर्डरचा बदला घेतला. त्यानं राजनच्या ज्या माणसांनी थापावर गोळ्या झाडल्या होत्या त्या शूटर दिवाकर चुरी, संजय नगर, अमर जुक्कर यांची नेपाळ मध्ये हत्या केली. त्या घटनेचे पुरावे आजतागायत पोलिसांना मिळाले नाहीयेत. मंडळी काही जणांच्या मते के.टी. थापा मनानं चांगला होता. त्यानं ज्या ज्या लोकांना मदत केली होती ती लोकं आजही त्याचे आभार मानतात. जी लोक भांडुप मध्येच वाढली, लहानाची मोठी झाली, ती आजही के.टी.थापाबद्दल, त्याच्या डेरिंग बद्दल, त्याच्या कामाबद्दल भरभरून बोलतात. पण माणूस कितीही चांगला आसला तरी, तो एकदा का चुकीच्या मार्गाला लागला की त्याचा शेवट हा वाईटच होतो.

( KT Thapa History | Chhota Rajan)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !


तेच के.टी.थापाच्या बाबतीतही झाल, भले तो सामान्य माणसाला त्रास देत नव्हता, पण तो वाईट लोकांच्या संपर्कात आला, अंडरवर्ल्ड मधल्या लोकांशी त्याची ओळख झाली नसती तर कदाचित आज के.टी.थापा भांडुपमधला किंगमेकर म्हणून ओळखला गेला असता. आजचा विडिओ बनवण्यामागचे हेच कारण होते, की चांगल्या स्वभावाचा माणूस चुकीच्या सांगतीला गेला तर त्याचे काय होते, त्यामुळे आपण पण आपल्या आजूबाजूची माणस निवडताना नीट विचार केला पाहिजे. बाकी तुम्हाला थापाची ही गोष्ट ऐकून काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

बाळासाहेबांच्या या कट्टर कार्यकर्त्याची छोटा राजनने हत्या का केली | KT Thapa History | Chhota Rajan

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

kt thapakt thapa bhandupkt thapa familykt thapa historykt thapa sonmarathi batmyamarathi latest newsmarathi newsmarathi news livenewsvishay bharivishaych bharivishaychbhariमराठी बातम्यामराठी लेटेस्ट न्यूजविषय भारीविषयच भारी
Comments (0)
Add Comment