जब जब देशमे खतरा गढा था, तब तब मैदानमे मराठा खडा था. मंडळी मराठी माणसाच्या बाबतीत हे नेहमीच म्हंटल जात, आन ते खर हाय बरका, अशाच एका शूरवीर मराठ्याची आज जयंती. तो मराठावीर म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील. क्रांतिसिंह म्हणल की नाना पाटीलच सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात. Krantisinh Nana Patil म्हणजे, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल एक झुंजार नाव, क्रांतिसिंह नाना पाटील मजी खरतर एक वादळ हुत वादळ, इंग्रज हुडकून कटाळल तरी क्रांतिसिंह नाना पाटील तेंच्या हाताला लागत नव्हत. लढायला तर ती शूर होतच, पण त्यांच भाषण मजी गारूडच, एकदा बोलायला उभ राहील की समोरचा नुसता आवाक हून तेंच्याकड बघत बसायचा, ती म्हणत्याल ती करायचा, उगच नाय तेंनी सातारा, सांगली भागातल्या लोकांमधी स्वातंत्र्याची आग पेटवली. बहुजन समाजात स्वाभिमानाच बी पेरून त्यासनी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घेतल. आपला कारभार आपणच करायचा, ही इंग्रज कशाला पायजेती म्हणत, साताऱ्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. नानांनी देशासाठी काय यातना भोगल्या, ते कसे लढले, त्यांना क्रांतिसिंह ही पदवी कुणी दिली, हे सगळ आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत.
( Krantisinh Nana Patil Mahiti in Marathi | Vishaych Bhari )
कोण पकडील क्रांतिविराला, नाना पाटलाला, आमच्या नेत्याला
पकडील कोण पळत्या वाऱ्याला, धरील कोण जळत्या अग्नीला,
गवसणी कोण घालील आभाळाला.. जी.. जी र जी..
असा पोवाडा ज्च्यायांवर लिहिला गेला ते क्रांतिसिंह नाना पाटील. मंडळी नाना पाटलांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील, वाळवा तालुक्यातील येडमच्छिंद्र या गावी झाला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आस म्हणतात, नांनाच्या बाबतीत मात्र त्यांची दणकट शरीरयष्टीच पाळण्यात दिसली होती, ते लहानपणापासनच दणकट शरीराचे होते. आन कायम तसच राहील. साधी सूती लुंगी, सूती नेहरू शर्ट आयन एकदम दणकट, धिप्पाड शरीरयष्टी, आस त्यांच व्यक्तिमत्व होत. नाना पाटलांना सगळे आण्णा म्हणायचे. नानांवर सुरवातीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता. अंधश्रद्धा आणि जाती व्यवस्था याचा त्यांना प्रचंड राग होता. नाना पाटील भाषणाला उभे राहिले की समोरची माणस बाकी सगळ विसरून जात, नानांच्या भाषणात हरवून जात. शड्डू ठोकूनच ते भाषण करत, त्यांच्या भाषणाला लांब लांबच्या गावातली माणस बैलगाड्या करून येत. गावच्या गाव इंग्रजाणविरुद्ध लढण्यासाठी उभी करायची ताकद त्यांच्या आससल गावराण, रांगड्या भाषेत होती. म्हणून तर ते पुढ जाऊन प्रती सरकारचे प्रमुख नेते झाले. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर पत्री सरकार आईकलय, तर हयो प्रती सरकार या शब्दाचा अपभ्रंश हाय, मजी आपल्या गावच्या भाषेत प्रतीसरकारच पत्री सरकार झाल. आता तुम्ही म्हणाल ही प्रती सरकार काय भानगड आस्ति, तर जेव्हा सत्तेतल सरकार कारभार चालवायला नालायक ठरत, ती जनतेचा विचार करत नसल, तर ती व्यवस्था नाकारून आपली स्वतःची एक नवी व्यवस्था जेव्हा अस्तित्वात आणली जाती, त्याला प्रती सरकार म्हणतात.
( Krantisinh Nana Patil Mahiti in Marathi | Vishaych Bhari )
तर ज्या प्रती सरकारमूळ क्रांतिसिंह नाना पाटील नावाच वादळ घराघरात पोहचल, ते प्रती सरकार स्थापन कस झाल तेची माहिती घेऊया. तर 8 ऑगस्ट 1942 रोजी आजच्या ऑगस्ट क्रांति मैदानावर कॉँग्रेसच अखिल भारतीय अधिवेशन झाल, त्यात करेंगे या मंरेनगे अशी क्रांतिकारकांनी शपथ घेतली, इंग्रजांसाठी चले जाव हा ठराव झाला. पण त्यासाठी नक्की काय करायच कुणीच सांगितल नाही, प्रत्येकाने ते आपापल्या परीने ठरवायच होत. ह्या अधिवेशनात साताऱ्याचा एक वाघही गेला होता, तो म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील. त्यांनी आपल्या गावी जाऊन इंग्रजाणविरुद्ध शांततेत आंदोलन सुरू केल, साताऱ्यात कराड , पाटण त्यानंतर तासगाव तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला, या मोरच्यांची प्रेरणा घेऊन, 9 सप्टेंबर 1942 साली खटाव तालुक्यातल्या वडुज तहसील कचेरिवर मोर्चा निघाला. वडगाव, पुसेसावळी, लाडेगाव, औंध या आजूबाजूच्या गावातून माणस मोरच्यात सहभागी झाली होती, पण इंग्रजांना हे आवडल नाही आणि तिथे भयंकर गोळीबार झाला, अनेक जण शाहिद झाले. सातारा जिल्ह्याचा जालियन बाग झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इस्लामपूरमध्येही मोर्चात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यवीरांना गोळ्या घालण्यात आल्या. शांततेत चाललेल्या मोर्चावर इंग्रजांनी केलेल्या गोळीबारामूळ सातारा, सांगलीतल्या स्वातंत्र्यविरानच रक्त खवाळल, आन त्यांनी इंग्रजाणविरुद्ध शस्त्र हातात घेऊन लढायच ठरवल. नाना पाटील यांनी तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. त्यातनच त्यांनी बॉम्ब बनवल, सरकारी खजिना लुटला.
बँक लुटली, पलिसांच्या बंदुका लांबवल्या, रेल्वे जाळली, धान्याची गोदाम लुटून, ते धान्य गोरगरीबासणी वाटल, जमल तस, जमल तिथ इंग्रजासणी धूळ चारली, सातारा, सांगलीच पाणी पाजल. सातारा, सांगलीत स्वतःच प्रती सरकार स्थापन केल. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणायची, तवा नाना पाटील इंग्रजांच्या तळपायाला पत्रा ठोकत्यात अश्या अफवा पण गावागावात पसरल्या होत्या. नाना पाटील हे या चळवळीचे प्रमुख नेते आहेत, हे कळल्यावर इंग्रज त्यांच्या पाठी लागले होते, पण भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते इंग्रजांच्या हातावर तुरी देत राहिले, इंग्रजांनी अनेक गावात छापे टाकले, साताऱ्यात मिलिटरी आणली तरी नाना काही त्यांच्या हाती लागले नाहीत. लागतील तर कस, कारण गावागावात नाना पाटलांनी जिवाभावाची माणस जोडली होती, ही माणस स्वतःचा जीव धोक्यात घालून नांनाच्या माग उभी राहायची. ते इंग्रजांच्या तावडीत सापडू नयेत म्हणून त्यासणी लपायला जागा द्यायची. त्यांच्या जेवणा खाण्याच बघायची. नानांकड कुठलीच संपत्ति नव्हती, ना हक्काच घर होत, ना घरातली माणस, पण सातारा, सांगलीतली गावच त्यांच घर झाली होती, त्या गावातल्या माणसांसाठी क्रांतिसिंह त्यांच्या घरतल्यासारखच होत.
( Krantisinh Nana Patil Mahiti in Marathi | Vishaych Bhari )
नाना पाटलांवर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते. 26 मे 1966 साली मुंबईच्या शिवाजी मैदानात भरलेल्या सभेत आचार्य अत्रे यांनी क्रांतिवीर नाना पाटील, यांना क्रांतिसिंह ही पदवी बहाल गेली. देशासाठी जिवाच रान करणाऱ्या नानांचा शेवटचा काळ मात्र जीवाला चटका लावणारा होता, 1972 साली नानांच्या पायाला जखम झाली, गँगरिन झाले आणि त्यात त्यांचा पाय कापून टाकावा लागला. ते अंथरूनाला खिळून राहिले, पण त्यांच्या वाळव्यातल्या माणसांनी त्यांची मनापासून सेवा केली. पण काही काळातच त्यांचा मृत्यू झाला. ते अनंतात विलीन झाले. पण खर सांगू का, क्रांतिसिंह नाना पाटलांसारखी माणस कधीच मरत नाहीत. ती लोकांच्या मनात कायम जीवंत राहतात. म्हणून तर आजही सातारा, कराड, सांगली भागात क्रांतिसिंह नाना पाटील अज्ञातवासात असताना, आमच्या घरात लपले होते, आमच्या शेतात राहिले होते, आस लोक अभिमानाने सांगतात. त्यांची आठवण काढतात. अशा या क्रांतिसिंहाला विषयच भारीचा मानाचा मुजरा. तुम्हाला क्रांतिसिंह नाना पाटील यांचा हा प्रवास आवडला का ते आम्हांला कमेंट करून नक्की सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply Cancel reply