Kirit Somaiya यांच्या viral video मागचं सत्य नेमकं काय | Kirit Somaiya Latest News | Vishaych Bhari

विरोधकांच्या मागे हात धुवून  ईडी, सीबीआय चौकश्या लावणारे भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा एक खळबळजनक व्हिडीओ लोकशाही वृत्तवाहिनीनं नुकताच प्रदर्शित केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीये. त्या व्हिडीओमध्ये किरीट सोमय्या हे बेडरूममध्ये उघड्या अंगाने, आक्षेपार्ह स्थितीत वावरताना दिसत आहेत. दरम्यान किरीट सोमय्या यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा तो व्हिडीओ नेमका आहे कशाचा, त्यामागचं सत्य नेमकं काय, त्याबद्दल कुणी काय प्रतिक्रिया दिल्यात आणि अर्थात तो व्हिडीओ नेमका व्हायरल कूणी केला. तेच आपण जाणून घेणारय..

Kitit Somaiya Viral Video | Kirit Somaiya MMS | Kirit Somaiya Leaked Video

मंडळी तीन चार तासापूर्वी व्हायरल झालेला त्या व्हिडीओमुळं आता संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण पेटलेलं दिसतंय. त्या व्हिडीओत नेमकं आहे काय तर ऐका, लोकशाही वृत्तवाहिनीच्या हाती लागलेल्या त्या व्हिडीओमध्ये किरीट सोमय्या आक्षेपार्ह अवस्थेमध्ये झोपून कुणाशी तरी व्हिडीओ चॅट करतायत असं आढळून आलंय. पण त्यामध्ये ते नेमकं काय बोलतायत याबद्दल गुप्तता ठेवण्यात आलीये. . दरम्यान त्यांचे समर्थक तो व्हिडीओ खोटा असल्याचा किंवा मॉर्फीग असल्याचा दावा करतायत. पण आता त्याबद्दलची अधिक माहीती पोलीस तपासातच समोर येईल असा पवित्रा विरोधकांनी घेतलेला दिसतोय. त्या आक्षेपार्ह व्हिडीओबद्दल आता राजकीय वर्तुळातूनही अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलीये.

सगळ्यात पहिली प्रतिक्रिया दिली त्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी.

किरीट सोमय्यांच्या व्हिडीओमुळे मला धक्का बसला आहे. दुसऱ्यांवर चिखल आणि शिंतोंडे उडविणारे सोमय्या स्वतः चिखलामध्ये लोळत आहेत. त्यांचे अनैतिक व्यवहार आणि संबंध बाहेर असतीर तर दुसऱ्यावर बोलण्याचा त्यांना काय अधिकार आहे. केवळ विरोधकांवर चिखलफेक करायची. तुमच्या पक्षात आले तर भ्रष्ट्राचाराचे मुद्दे गाडून टाकायचे हे प्रकार किरीट सोमय्यांनी केले आहेत आणि अशाप्रकारे महिलांसोबत ते अश्लील प्रकार करत असतील तर त्यांना दुसऱ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. या माणसांचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे, असंही विद्या चव्हाण म्हणाल्या.पुढं त्यांनी सोमय्यावर आणखी ताशेरे ओढले, प्रत्येक वेळेस कोणतेही गंभीर प्रकरण अंगलट आले तर बायकोला पुढे करण्याचे काम सोमय्या करतात आणि स्वतः भ्रष्टाचारात कुठेही नाही असं दाखवतात. स्वतः असले प्रकार करत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई गृहमंत्र्यांनी केली पाहिजे. या व्हिडीओची चौकशी झालीच पाहिजे. तसेच, याबद्दल आम्ही सोमय्यांविरोधात महिला आंदोलनही करु. अशाप्रकारे घाणेरडे प्रकार करणाऱ्या माणसाला राजकारणात राहण्याचा अधिकार नाही. भाजपने सोमय्यांची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे, अशीही संतापजनक प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी नोंदवली.

Kitit Somaiya Viral Video | Kirit Somaiya MMS | Kirit Somaiya Leaked Video

त्याच्यानंतर रुपाली ठोंबरे-पाटील म्हणाल्या की,

हा व्हिडीओ खरं की खोटं तपासून कारवाई होणे गरजंचं आहे. लोकप्रतिनिधीचा अशा पध्दतीने व्हिडीओ येणं हे अत्यंत गंभीर आणि खेदजनक आहे. किरीट सोमय्या प्रसिध्द व्यक्ती आहेत. त्यांनी अनेक भ्रष्ट्राचार काढले आहेत. अशा पध्दतीचे व्हिडीओ येत असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पहिजे असं माझं मतय. त्या व्हिडीओची शहनिशा करुन कारवाई होणं गरजेचे आहे.

Kitit Somaiya Viral Video | Kirit Somaiya MMS | Kirit Somaiya Leaked Video

दरम्यान काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले,

किरीट सोमय्या यांच्याकडे राजकारणात गलिच्छ प्रवृत्ती म्हणून आम्ही पाहतो. सर्वांवर आरोप करतात, दुसऱ्यांची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न करतात, चारित्र्यहनन करत असतात. सुपारी घेतल्याप्रमाणे त्यांचे वर्तन असावं का अशी शंका येते. पण त्यांच्याकडूनच अशा पध्दतीचं वर्तन झालंय हे अधिक निंदनीय आहे. ही एक विकृत प्रवृत्ती आहे. हिसाब देना पडेगा, चारित्र्यशुध्द व्यक्तिमत्व आहे की नाही हे जनता ऑडिट करेलचं.

Kitit Somaiya Viral Video | Kirit Somaiya MMS | Kirit Somaiya Leaked Video

पुढं काँग्रेसच्याचं मोठ्या नेत्या यशोमती ठाकूर यांनीही तीव्र शब्दात आपलं मतं मांडलं.

नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची हिम्मत दाखवावी. अनेकांचं सार्वजनिक आयुष्य खोट्या-नाट्या आरोपांनी पणाला लावणाऱ्या सोमय्यांनी स्वतःच या प्रकाराबद्दल खुलासा करण्याची गरज आहे. बेंबीच्या देठापासून बेटी बचाओ, बेटी पढाओ म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या अशा कृत्यामुळं बेटी को भाजपा से बचाओ असं दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आलीय.


पुढं काँग्रेस नेते अतुल लोंढे म्हणाले की,

सार्वजनिक जीवनात असणाऱ्या लोकांचे व्हिडिओ आक्षेपार्ह असेल तर त्याची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे. विशेष करून किरीट सोमय्या हे भाजपचे बडे नेते आहेत. अशा व्यक्तीचा व्हिडिओ जर समोर आला असेल तर समाजात ही बाब मोठी धक्कादायक आहे. जी व्यक्ती कायम लोकांची पोलखोल करत असते. भ्रष्टाचार विरोधीपणाचा आव आणून लढत असते.त्यामुळे यातील सत्यता काय आहे हे तपासणे गरजेचे आहे.

दरम्यान महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या तृप्ती देसाई यांनी ही याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या

मी व्हिडिओ बघितला नाही, पण तो व्हिडीओ आक्षेपार्ह असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी.

आता खरं तर याप्रकरणी नेमकं काय सत्य दडलंय त्याचा तपास पोलीस घेतीलच. पण सगळ्यांना घाम फोडणारे किरीट सोमय्या यामुळं भलतेच अडचणीत सापडलेत हे नक्की. आणि आता या व्हिडीओ प्रकरणामुळे त्यांना घामटा फुटणार हे ही निश्चितय..विरोधकांचा त्यांच्यावरील रोष बघता हे व्हायरल व्हिडीओ प्रकरण त्यांना खूप जड जाणार हेच याठिकाणी दिसतंय. उद्या अधिवेशनात हा मुद्दा तापणार हे ही निश्चितय.
पण तुमचं याबद्दल नेमकं काय मतंय त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. किरीट सोमय्यांचा हा आक्षेपार्ह अवस्थेतला व्हिडीओ नेमका कोणी माध्यमांना पुरवला असेल? याबद्दल तुमचा अंदाजही आम्हाला कमेंट करून सांगा.

Kitit Somaiya Viral Video | Kirit Somaiya MMS | Kirit Somaiya Leaked Video

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

alleged viral video of former bjp mp kirit somaiyakirit somaiyakirit somaiya bjpkirit somaiya hatoda videokirit somaiya hatoda viral videokirit somaiya mmskirit somaiya mms videokirit somaiya uncut viral videokirit somaiya videokirit somaiya video viralkirit somaiya viral videokirit somiyakirit somiya obscene videomarathi batmya videomarathi news videosomaiya videosomaiya viral videotv9 marathi live videoviral video bjpvishaych bhari chandan sheti
Comments (0)
Add Comment