कैलास मंदिराची ही चमत्कारिक रहस्ये तुम्ही कधीच ऐकली नसतील | Kailas Mandir Mystery | Vishaych Bhari

मंडळी श्रावणीस सोमवार सुरु झालेत. चार्तुमासातला श्रावण महिना हा खरंतर शंकर महादेवांसाठी पवित्र मानला जातो आणि म्हणूनच आज आपण महाराष्ट्रातल्या एका अशा महादेवाच्या  मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत जे मंदिर आज अनेक रहस्यांनी भरलेलय. मंडळी अजिंठा वेरूळ लेण्यामधल्या कैलास मंदिराबाबतल्या अनेक प्रश्नाची उत्तर अजूनही मिळालेली नाहीयेत.. वेरूळचं कैलास लेणं हे संपूर्ण जगाला पडलेलं एक कोडंय. कारण हे मंदिर फक्त एका दगडामध्ये बनवलेलय. आधी कळस मग पाया ‘ अशा चक्क उलट्या क्रमाने या मंदिराची निर्मिती केली गेलीय. भारतातील सगळ्या लेण्या या एकतर खालून वर नाही तर डोंगरफोडून समोरून आत अशा कोरलेल्या आहेत. पण हे जगातलं असं एकमेव मंदिर आहे जे वरून खाली बनवलं गेलंय. चला तर मग आजच्या व्हिडीओमध्ये याच कैलास मंदिरा बाबतीतच्या काही इंटरेस्टिंग फॅक्टस जाणून घेऊयात.

( Kailas Mandir Mystery | Vishaych Bhari )

मंडळी एकसलग खडकातून कोरण्यात आलेलं हे लेणं इ. स. 757 मध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण प्रथम याच्या राजवटीत कोरण्यात आलं… इतिहास संशोधक डॉ. दुलारी कुरेशी सांगतात की ” कैलास मंदिर निर्माण करताना एका मोठ्या खडकांना तीन भागांमध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आलंय.. या खोदकामात जवळपास 20 हजार टनापेक्षा जास्त दगड फोडून वेगळा करण्यात आला.. लेण्यांच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे.. या शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे. या महामंडपात अनेक मोठमोठे, सुंदर कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. तर मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूस भगवान शिवाचं तांडव नृत्य करणारं शिल्प कोरण्यात आलंय.. तसंच मंदिराच्या शिखरावर पाच सिंह कोरण्यात आलेत.. या संपूर्ण मंदिराची बांधणी एखाद्या रथाप्रमाणे असून हे मंदिर व्याळ आणि हत्ती यांसाख्या प्राण्यांनी डोक्यावर उचललेलं आहे. मंडळी संशोधकांनी जेंव्हा ह्या मंदिराचा अभ्यास केला तेंव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हे मंदिर सुरुवातीच्या काळात व्हाईट प्लास्टरने झाकल होतं त्यामुळं वरून दिसताना ते अगदी सेम कैलास पर्वतासारखंचं दिसायचं म्हणून त्या मंदिराच नाव कैलास मंदिर असं पडलंय. काही संशोधकांच्या मते हे मंदिर 6000 वर्षांपूर्वीचंय तर काही जणांच्या मते हे 1200 वर्षांपूर्वीच आहे.. एक आक्खा दगड कापून हे मंदिर तयार केल्यामुळे ह्या मंदिराच्या एकूण वयाचा अंदाज बांधन कठीणय.. मंडळी खरंतर अजिंठा वेरूळ लेण्यामधली सगळी मंदिर ही समोरून दगडं कापून बनवण्यात आलीयेत. पण हे एकच कैलास मंदिर असं वरून खाली दगडं फोडून का बनवन्यात आलय ह्या प्रश्नाच उत्तरसुद्धा संशोधकांना मिळालेलं नाहीये.

( Kailas Mandir Mystery | Vishaych Bhari )

डोंगर फोडून जेव्हा कैलास मंदिर बनवण्यात आलं, तेव्हा जवळपास 20 हजार टन खडक फोडून बाहेर काढण्यात आला होता. 7000 लोकांनी 150 वर्ष सलग काम केलं तरचं हा इतका खडक वेगळा होऊ शकतो.. पण हे फक्त दगडं वेगळे करण्याबाबतीत झालं.. त्या दगडांवरती करण्यात येणाऱ्या शिल्पकारीला किती वेळ लागला असेल याचा विचार तर आपण केलाच नाही.. इतक्या मोठ्या प्रमाणात दगड फोडूनही कैलास मंदिराच्या आसपासच्या परिसरात कुठेही या दगडाचे अंश दिसत नाहीत. त्यामुळ एवढ्या मोठ्या खडकांचं नेमकं काय झालं, याबद्दल माहिती देताना डॉ. दुलारी कुरेशी सांगतात की, “आपण पाहिलं तर कैलास मंदिराच्या जवळपास अनेक मंदिरं आहेत.. तसंच मराठवाड्यातही अनेक मंदिरं आहेत, जी चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात बांधण्यात आलेली आहेत. या मंदिरांच बांधकाम कैलास मंदिर ज्या खडकामध्ये आहे त्याच खडकांत आहेत.. मात्र त्या मंदिरांच्या जवळपास कुठेही उत्खनन केलेलं नाही अथवा डोंगरही नाहीत. त्यामुळे कैलास मंदिराच्या निर्मितीमधून निघालेला खडक या मंदिराच्या निर्माणात वापरला असावा अशी शक्यता आहे. मात्र हे ठाम पणे सांगता येत नाही.” मंडळी कैलास मंदिराबाबात अनेक गोष्टी बोलल्या जातात. जसं की मंदिराच्या चारही बाजूस गुहेसारख्या किंवा भुयारासारख्या काही जागा आहेत.. ज्या अतिशय खोलवर गेलेल्या आहेत.. काही परदेशी संशोधकांच्या मते या मंदिराच्या जमीनीखाली एक पुरातन शहर असण्याची शक्यताय.. तर काही परदेशी संशोधक तर हे मंदिर परग्रहवासीयांनी उभारल्याचं सांगतात.

( Kailas Mandir Mystery | Vishaych Bhari )

याबद्दल डॉ. दुलारी यांना विचारल असता त्या म्हणाल्या की, “मला नाही वाटत असं काही असेल. पावसाचं पाणी मंदिर परिसरात थांबू नये म्हणून त्याला ड्रेनेज सिस्टिम बनवण्यात आलेली आहे. त्यामुळ या भागात कितीही पाऊस पडला तरी या मंदिरात पाणी थांबत नाही. ते सर्व पाणी या नाल्यांमधून जमिनीच्या आत निघून जातं. अजून एक गोष्ट आहे की, काही विदेशी संशोधकांना वाटतं की, इतकं सुंदर, इतकी अद्भूत वास्तू निर्मिती भारतीय कसे करू शकतात. त्यामुळ ते हे चमत्काराने अथवा परग्रहवासीयांनी बनवलं आहे अस सांगतात. मुळात त्या काळात म्हणजे इ.स. 600-800 या काळात भारतीयांकडे जे तंत्र होते, जे विज्ञान अवगत होतं, ते आजच्या काळापेक्षा फार पुढचं होतं. त्यामुळ हिडन सिटी अथवा एलियन हे काहीही नाहीये. हे आपल्या लोकांनी बांधलेलं आहे. मंडळी औरंगजेब आणि कैलास मंदिर यांच्याबद्दल एक किस्सा सुद्धा इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात  सांगितलं जातो.  तो म्हणजे, औरंगजेबाने हिंदूंची अनेक मंदिरं नष्ट केली. मात्र ते जेव्हा कैलास मंदिर नष्ट करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या 1000 सैनिकांनी 3 वर्षांपर्यंत मंदिर तोडण्याचे प्रयत्न केले मात्र ते या कामात यशस्वी होऊ शकले नाहीत. या बद्दल सांगताना डॉ. कुरेशी म्हणतात, “जेव्हा तुम्ही औरंगजेबचा इतिहास वाचता. तेव्हा कळतं की, औरंगजेब इ.स. १६३६ ते इ.स. १६४४ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्यास होता आणि त्यानंतर पुढे सुद्धा बराच काळ तो संभाजीनगरला होता. तेव्हा तो वेरूळला नेहमी जायचा. जेव्हा त्यानं पहिल्यांदा कैलास मंदिर पाहिलं, तेव्हा तो म्हणाला ‘अशी वास्तू मी जगात कुठेही पाहिली नाही. हे कदाचित एखाद्या ‘जीन’नेच बनवलं असावं, मनुष्य एवढं सुंदर बांधूच शकत नाही. याचं वर्णन करायला माझी लेखणीही असमर्थ आहे.’ हे त्याचे त्यावेळचे उद्गार होते असं तात्कालिक लोकांनी लिहून ठेवलेल्या माहितीत सापडतं. त्यानंतर औरंगजेब कित्येकवेळा आपल्या आमिर-उमराव यांच्यासोबत, त्यांच्या कुटुंबीयांसोबत इथं यायचा.. औरंगजेबाबद्दल अनेक अफवा आहेत की त्यानं कैलास मंदिराची नासधूस केली वगैरे, मात्र ते सत्य नाही.

( Kailas Mandir Mystery | Vishaych Bhari )

औरंगजेबाने जी काही मंदिरं उद्ध्वस्त केली, त्याची यादी उपलब्ध आहे. त्या यादीत वेरूळच्या कैलास मंदिराचा कुठेचं उल्लेख नाही,” असंही डॉ. दुलारी आवर्जून सांगतात. मात्र असं असलं तरी हिंदू मंदिरांबद्दल औरंगजेबचं वर्तन हे परस्पर विसंगत आणि विरोधी असल्याची नोंद इतिहासात असल्याचं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सांगतात. ते म्हणाले, “औरंगजेबाच्या मनावर जेव्हा जिहाद स्वार होता त्यावेळेस त्याने काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडल्याचे पुरावे इतिहासात नोंद आहेत. औरंगजेब त्याकाळी स्वतःला पीर समजायचा. स्वतःला जिंदा पीर म्हणवून घ्यायचा. ज्या वेळी औरंगजेबाने मराठाविरोधी लष्करी मोहीम सुरू केली, तेव्हा मराठ्यांच्या किल्ल्यांवरची मंदिरं पाडायला सुरुवात केली. विशेष म्हणजे या कामासाठी त्यानं विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक सुद्धा केली होती. मराठ्यांच्या ताब्यातील गड जिंकल्यानंतर तिथली दगडी बांधकामं असलेली मंदिर पाडण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर देण्यात आली होती. अशा प्रकारे औरंगजेबाने मंदिरं पाडण्याबाबत दिलेल्या आदेशांची इतिहासात नोंद आहे. तर दुसऱ्या बाजूला काही मंदिरांना औरंगजेबानं इनाम देण्याचे देखील पुरावे इतिहासात उपलब्ध आहेत,असं काही इतिहास संशोधकांचं मत आहे. ज्या बहादूरगडावर छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढण्याचे क्रूर आदेश दिले होते त्या ठिकाणी औरंगजेबाचा मुक्काम होता. त्या मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या भिंतीला लागून असलेलं विष्णू मंदिर आजही सुस्थितीत आहे. नैसर्गिकरित्या या मंदिराची अवस्था खराब झाली असली तरी ज्या ठिकाणी संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार करण्यात आले, त्या ठिकाणच्या मंदिराला हातही लावण्यात आला नव्हता हा विरोधाभास म्हणावा लागेल,” असं इंद्रजीत सावंत यांनी सांगितलं. तर कोल्हापूर मधील अंबाबाई मंदिरात खजिना असल्याची माहिती औरंगजेबाला झाली होती.

( Kailas Mandir Mystery | Vishaych Bhari )

मात्र हे मंदिर आजही सुस्थितीत आहे, असंही सावंत सांगतात. मंडळी कैलास मंदिर बांधायला 200 वर्ष लागली असतील असा काहींचा बेसिक अंदाजय.. आणि ते बांधकाम जवळपास 7 8 पिढ्यानी केलं असाव अशी सुद्धा शक्यताय. कैलास मंदिराच्या आसपास जवळपास 34 मंदिर आहेत.. पण जर आकाशातून बघितलं तर फक्त हे एकच मंदिर आपल्याला दिसत. बाकीची 34 मंदिर दिसत नाहीत. त्याचबरोबर काही संशोधकांच्या मते आकाशातून बघताना ह्या मंदिरावर X सारखं निशाण दिसत. आता ते का याबद्दल सुद्धा गुढताचंय. मंडळी युनिस्कोच्या  जागतिक वारसास्थळामध्ये 1993 ला या मंदिराचा समावेश झालाय.. बाकी एवढं महाकाय मंदिर चालू काळात बांधायचं म्हणलं तर अजिबात सोप्पी गोष्ट नाय. अशी वास्तू बांधायची म्हणली तर हजारो इंजिनियर, हायफाय टेक्नॉलॉजीचीं गरज भासेल. पण तरीसुद्धा ते शक्य होणार नाही. आता हे नेमकं तत्कालीन तंत्रज्ञानाचं यश म्हणावं कि लोकमान्यतेनूसार कुठल्या दैवी शक्तीनं हे काम पूर्णत्वास गेलं असावं हा एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळं यां मंदिराबाबतची गूढ रहस्यं लवकर उलगडावीत हीच सगळ्यांची इच्छा असेल बाकी तुम्हाला कैलास मंदिराबाबतची  ही रहस्यमय माहिती ऐकून काय वाटल त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.

कैलास मंदिराची ही चमत्कारिक रहस्ये तुम्ही आधी ऐकली नसतील | Kailas Mandir Mystery | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

breaking newsKailasa Temple Hindu temple Ellorakailash temple built bykailash temple distancekailash temple historykailash temple imageskailash temple in ellora is executed fromkailash temple is situated inkailash temple kaha haikailash temple shivlingkailash temple timingsmaharashtraVerulvishaych bharivishaychbhariकैलास किसनराव गोरंट्याल महाराष्ट्र विधानसभा के सदस्यकैलास जीवनकैलास पर्वत कहा हैकैलास पर्वत चीन में पर्वतकैलास पर्वत मराठी माहितीकैलास मंदिरकैलास मंदिर मराठी माहितीकैलास मानस सरोवर यात्राकैलास राणा शिव चंद्र मोळीकैलास राणा शिव चंद्रमौळीविषयच भारी
Comments (0)
Add Comment