भावांनो सुरु झाला तेव्हापासून सगळ्यांना असच वाटत होतं की भारत vs पाकिस्तान हीच रायव्हलरी फायनलच्या match पर्यंत टिकेल. पण सगळ्यांच्या अपेक्षा आणि पाकिस्तान टीमचा टेरर फाट्यावर मारत यजमान श्रीलंकेची यंग बिग्रेड टीम फायनलमध्ये भारतासमोर पर्यंत येऊन ठेपली. आज म्हणजे १७ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर India vs Sri Lanka हा सामना सुरू झालाय. तसं हेड टू हेड रेकॉर्ड काढलं तर अगदी रामायण काळापासून २०११ च्या वर्ल्डकप पर्यंत भारत श्रीलंकेचं कायमचं दहन करत आलाय. फक्त आशिया कपच्या ओव्हर All आकडेवारीचा विचार केला तरी आजपर्यत आठ वेळा दोन्ही टीम फायनलमध्ये भिडल्यात आणि त्यात पाच वेळा भारत तर तीन वेळा श्रीलंका जिंकलेलीय. मागच्या बारीला सुद्धा आशिया कपमध्ये श्रीलंकेच्या टीमनं भारताच्या तोंडचा घास काढून घेतला आणि पाकिस्तानला हरवत आशिया कपवर स्वतःचं नावं कोरलं. तेव्हापासून India vs Sri Lanka ही नवी रायव्हलरी उदयाला आली असं अनेक fans ना वाटतंय. पण भावांनो इंडिया vs श्रीलंका ह्यो संघर्ष आतापासूनचा नाय. त्याची हिस्ट्री मोठीय. अगदी सनथ जयसूर्यापासून, मुरलीधरन, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, दिलशान, मलिंगा मॅथ्यूज या सगळ्या ताकदीच्या खेळाडूंनी कधीकाळी इंडियाच्या नाकी नऊ आणलेलं. आजच्या लेखात आपण त्याचं रायव्हलरीबद्दल थोडक्यात जाणून घेणारंय…
( India Vs Sri Lanka Asia Cup 2023 Final | Vishaych Bhari )
भावांनो इंडिया आणि श्रीलंकेमध्ये आजपर्यंत एकूण १६६ वनडे match खेळल्या गेल्यात. त्यापैकी ९७ match मध्ये भारतानं श्रीलंकेला पाणी पाजलंय तर ५७ match मध्ये श्रीलंकेनं इंडियाला सपशेल धूळ चारली. बाकी १ match टाय आणि ११ matches अनिर्णीत राहिल्यात. असो, १९९६ सालची ती वर्ल्ड कप विनिंग श्रीलंका टीम आठवा, Bating आणि bowling दोन्ही बाजून कहर करून श्रीलंकेनं जगज्जेत्या ऑस्ट्रलियन टीमचा सुफडा साफ केला होता. त्यावेळी अर्जुना रणतुंगा, सनथ जयसूर्या, मार्वन aattapattu, स्पिनिगचा जादुगर मुथय्या मुरलीधरन, चमिंडा वास सारख्या दिग्गज खेळाडूंनी जीवाचं रान करून श्रीलंकेला world कप जिंकून दिला आणि तिथनं जी लंकेच्या टीमनं कात टाकली ती टाकलीचं. म्हणजे आधी लंकेच्या टीमची मॅच बघायला लय बोरिंग वाटायचं. पण सनथ जयशसूर्यानं लंकेच्या टीममध्ये डेरिंग अन उत्साह भरला. पुढं संगकारा, दिलशान, जयवर्धने, मलिंगा, परेरा, कुलसेकरा, मेंडीस यांनी सुद्धा तीच लीगसी सुरु ठेवली. श्रीलंका आणि भारत यांच्यात कायमच अटीतटीचे आणि श्वास रोखून धरायला लावणारे सामने झालेत. नुसत्या आशिया कपबद्दल बोलायचं झालं तर आजपर्यंत १९८४, १९८८, १९९०, १९९५ आणि २०१० साली भारतानं श्रीलंकेला फायनलमध्ये हरवलं तर १९९७, २००४ आणि २००८ साली श्रीलंकेच्या टीमनं आपला वचपा काढला. आशिया खंडात भारत पाकिस्ताननंतर श्रीलंकाचं सगळ्यात तगडी टीम म्हणून सातत्यानं परफॉर्म करत आलेलीय. २००८ साली पाकिस्तानमध्ये आशिया कपचा फायनल होता. त्या match मध्ये जयसूर्याच्या ११४ बॉल १२५ रन्स या शतकी खेळीपुढं सगळी टीम इंडिया ढेर झाली. नाय म्हणायला सेहवाग आणि धोनीनं खिंड लढवली पण शेवटी रिजल्ट लंकेच्याचं बाजूनं गेला. त्या match मध्ये मुरलीधरनच्या तालमीत तयार झालेला नवखा फिरकीपट्टू अजंता मेंडीसनं त्याच्या फिरकीमध्ये टीम इंडियाला असं गुंडाळलं की काय बोलायलाच नको. भावानं सहा विकेट घेतल्या आणि लंकन टीमसाठी रेकॉर्ड केलं. पण ती हार आपल्या धोनी भाऊंच्या जिव्हारी लागली होती. पुढं मग व्यव्यस्थित प्लानिंग करून २०१० सालच्या आशिया कपमध्ये धोनीनं लंकेचा फडशा पाडला. तेव्हा सुद्धा मन भरलं नाय म्हणून २०११ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये नुवान कुलसेकराच्या बॉलवर हार्ड हिटिंग छक्का टाकून वर्ल्डट्रॉफीवर भारताचं नाव कोरलं. बरं ती गोष्ट श्रीलंका विसरली नाय. त्यांनी २०१४ साली टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताचा बदला घेतलाचं.
( India Vs Sri Lanka Asia Cup 2023 Final | Vishaych Bhari )
तब्बल सहा विकेट्सनं त्यांनी भारताला मात दिली. २०१२ साली एकदा कॉमनवेल्थ बँक ट्राय सिरीज सुरु होती. त्यातल्या ११ व्या match मध्ये इंडिया vs श्रीलंका match चा थरार रंगला होता. दिलशान आणि संगकाराच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेनं पहिली bating करून इंडियाला ३२० रनांच टार्गेट दिलं होतं. ती डू ऑर डाय match होती कारण point वर क़्वलिफ़ाय होण्यासाठी इंडियाला त्ये टार्गेट ४० ओव्हरच्या आत पूर्ण करायचं होतं. जे कि मलिंगासारखा बॉलर असताना पूर्ण होणं अशक्य आहे अशी fans मध्ये चर्चा सुरु होती. कारण तोपर्यंत मलिंगाच्या रानटी यॉर्करचा परफेक्ट तोड शोधायला कुणालाचं जमलं नव्हतं. पण भारताकडं हुकमी एक्का होता, विराट कोहली. भाव मैदानात उतरल्यापासून जी हु म्हणून मलिंगाला रेमटाय लागला की काय बोलायलाच नको. निव्वळ ८६ बॉलात १३३ रन्स ठोकून कोहलीनं मलिंगाची दहशतचं संपवली. कोहलीनं फक्त मनगटाच्या जोरावर फ्लिक शॉट मारून जगभरातल्या batsman ना मलिंगाचा तोड दाखवून दिला. तिथपासून मलिंगाच्या योर्करची भीती कमी झाली. तर एकंदरीत असा भारत vs श्रीलंकेच्या रायव्हलरीचा इतिहास राहिलेलाय आणि सुद्धा पुन्हा त्याचीचं पुनरावृत्ती होण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत. फक्त पावसानं मधी काय कुटाणा नाय केला पाहिजे. आज भारत vs श्रीलंका यांच्यामध्ये नववा आशिया कपचा फायनल होणारे.
( India Vs Sri Lanka Asia Cup 2023 Final | Vishaych Bhari )
तसं पाहिलं तर होम ग्राऊंड म्हणून लंकेचा पारड जरा जडय आणि घरच्या मैदानावर लंकेचा track रेकॉर्ड चांगलय. त्यात श्रीलंकेची सर्वात मोठी ताकद म्हणजे स्पिन बोलिंग. अन त्यांच्याकडे सध्या दुनिथ वेल्लालागे, धनंजय डी सिल्व्हा, दुखापत ग्रस्त तीक्षनाच्या जागी आलेला सहान अराचिगे ह्ये खतरनाक स्पिनर बॉलर्स आहेत. त्ये आपल्या रोहित, कोहली, राहुलच्या दांड्या उडवायला समर्थ आहेत. वेल्लालागेनं तर ते एकदा करून सुद्धा दाखवलंय. त्यामुळं इंडियन खेळाडूंनी त्यांना हलक्यात घेतलं नाय पाहिजे. तसच bating चा विचार केला तर दोन्ही टीमकडे तगडे batsman आहेत. श्रीलंकेचा विचार करता, कुशल मेंडीस, सदिरा, शनाका, असलंका यांचं मोठं आव्हान आपल्या कुलदीप, बुमराह, जडेजा, सिराज, वॉशिंगटन सुंदर या इंडियन बॉलरापुढं असणारय. मागच्या टायमिंगला याचं बॅट्समननी आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या राई राई एवढ्या चिंध्या उडवल्या होत्या. अन यावर्षी ही कुशल बेक्कार फॉर्ममध्येय. कारण त्यानं यंदाच्या आशिया कपमध्ये पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानविरुद्ध अनुक्रमे ९१, ५० आणि ९२ रना ठोकलेल्यायेत. त्यामुळं त्यो लवकर आऊट होणं भारताच्या हिताचं ठरणार असं तज्ञाना वाटतंय. सध्या bating मध्ये जडेजा, हार्दिकचा फॉर्म जरा डलय पण आज त्ये त्यांचा बेस्ट खेळ दाखवतील ह्ये नक्की. बाकी आपला चायनामन बॉलर कुलदीप यादव लंकेचं दहन करण्यात हनुमानासारखी महत्वाची भूमिका बजावणार यात शंका नाही. आता रणांगणात युद्ध तर सुरु झालंय, बाकी कोण कुणाला धोबीपछाड देणार ह्ये match चा रिजल्ट हातात आल्यावर कळेलचं, पण तुम्हाला इंडिया vs श्रीलंके हा रायव्हलरीचा इतिहास कसा वाटला आणि आज आशिया कपच्या टायटलवर कोणती टीम पुन्यांदा आपलं नाव कोरणार त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply Cancel reply