हरिद्वार कावड यात्रा काय असते, त्यांत यावर्षी सगळ्या लोकांनी का भाग घेतला ? | Haridwar Kawad Yatra 2023

मंडळी मागच्या काही दिवसापूर्वी आपली पंढरपूरची आषाढी वारी संपन्न झाली. देहू आळंदी पासून पंढरपूरपर्यंत चालताना लाखोंच्या संख्येनं लोक त्या वारीत सहभागी होतात. वारी म्हणजे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचा कळसय. त्यामुळं महाराष्ट्रात त्याची खूप चर्चा होते. पण सध्या दुसऱ्या एका मोठ्या यात्रेची देशात खूप चर्चा होतेय अन ती म्हणजे हरिद्वारची कावड यात्रा. आता ती कावड यात्रा म्हणजे नेमकं काय, ती कशी साजरी होते आणि सध्या लाखोंच्या संख्येनं लोकं त्या कावड यात्रेत का सहभागी होतायत तेच आपण आजच्या या लेखातून जाणून घेणारय…

( Haridwar Kawad Yatra 2023 )

तर आता सुरुवातीला आपण कावड यात्रा म्हणजे नेमकं काय आणि तिचं स्वरूप कसं असतं ते पाहूयात, मंडळी या कावड यात्रेला उत्तर भारतात कंवर यात्रा म्हणून ही ओळखलं जातं. त्या यात्रेचा उगम हिंदू पुराणकथा आणि धर्मग्रंथांमध्ये आहे असं अभ्यासकांच म्हणणंय. आता आपण सुरूवातीला या कावड यात्रेच स्वरूप जाणून घेऊ, तर या कावड यात्रेदरम्यान, भगव्या पोशाखात भारतातील विविध भागांतील भक्त हरिद्वार, गोमुख आणि गंगोत्री येथून गंगेचे पाणी गोळा करण्यासाठी पायी चालत जातात, जे नंतर भगवान शंकरांना  अर्पण केलं जातं. सजवलेल्या बांबूच्या काठीवर टांगलेली पाण्याने भरलेली दोन मातीची भांडी ते भक्तगण घेऊन जातात. कावडी खांद्यावर बांबूची काठी ठेवतात. भक्तांच्या मते, भांडी जमिनीवर ठेवता येत नाहीत किंवा कोणत्याही परिस्थितीत जमिनीला स्पर्श करू शकत नाहीत कारण धुळीमुळे पाणी अशुद्ध होऊ शकतं. त्या यात्रेची तारीख दरवर्षी वेगवेगळी असते. यंदा त्या यात्रेची सुरुवात 4 जुलैपासून सुरू झाली होती. पाण्याची कावड वाहणारे भाविक खांद्यावर भार वाहताना खडबडीत रस्त्यावर कडक उन्हात अनेक किलोमीटरचं अंतर अनवाणी पायाने पूर्ण करतात.

आपल्या वारीत जसं उन्हात चालणाऱ्या वारकऱ्यांना आजबाजूच्या गावातली लोकं खाण्यापिण्याच्या वस्तूंची सेवा देतात अगदी सेम तसचं कावड यात्रेच्या मार्गावर चालणाऱ्या भाविकांना ही लोकं सढळहाताने मदत करतात. भाविकांच्या विसाव्यासाठी छावण्या ही उभारल्या जातात. त्यांची बांबूची काडी आणि मडके व्यवस्थित टांगली जातात. त्या छावण्यांमध्ये भाविकांना मोफत जेवण, पाणी आणि वैद्यकीय मदत दिली जाते. या कावड यात्रेचे एकूण चार प्रकार असतात. त्यातला पाहिला यात्रेचा प्रकार आहे दांडी कांवड़ यात्रा. ही सगळ्यात अवघड यात्रा मानली जाते. या यात्रेत सहभागी होणारे भक्त चक्क जमिनीवर लोटांगण घालत पाणी आणतात. त्या प्रवासात भक्तांना खूप त्रास सहन करावा लागतो पण तरीही भक्त मोठ्या भक्तीभावाने ती यात्रा पूर्ण करतात. दुसरा प्रकार असतो खडी कावड यात्रा. त्या कावड यात्रेत न थांबता चालावं लागतं. कावड कसलीच जमिनीवर ठेवायची नसते. त्यामध्ये कावंड्यांना मदत करण्यासाठी दोन-तीन लोक अधिकचे सोबत चालत असतात. एकजण थकला की दुसरा ती कावड वाहून नेतो. पुढच्या म्हणजे तिसऱ्या प्रकाराला म्हणतात डाक कावड यात्रा. त्या यात्रेत अनेकजण मिळून डाक कावडीत पाणी आणतात. त्या प्रवासात ही सातत्याने पाणी वाहून न्यावं लागतं. पूर्ण जल अर्पण केल्यावरच ते भक्तगण थांबतात.

( Haridwar Kawad Yatra 2023 )

आता राहिला चौथा आणि सर्वात शेवटचा प्रकार. तिला सामान्य कावड यात्रा म्हणतात. सामान्य कावड यात्रेत कावडी हवे तेव्हा विश्रांती घेऊ शकतात. विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा प्रवास सुरू करू शकतात. यामध्ये कावड घेण्यासाठी लाखो लोक हरिद्वारला येतात. आजकाल तर लोकं कार आणि बाईकवरही पाणी भरायला जातात. हे लोकही पाणी भरून भगवान शंकरांना अभिषेक घालतात. बरं प्रकार तर पाहिले. पण या कावड यात्रेचे काही कठोर नियम सुद्धा आहेत. जसं की कावड यात्रेत कोणत्याही प्रकारचा नशा केलेला चालत नाही. मांसाहार, दारू आणि उत्तेजित करणारे अन्नपदार्थ सुद्धा या यात्रेत पूर्णपणे वर्ज्य करायचे असतात. संपूर्ण कावड यात्रा पायी आणि शक्य असल्यास अनवाणी करावी अशीही एक भोलेनाथांच्या भक्तांची मान्यता आहे. तर एकूण असं सगळं कावड यात्रेचं स्वरूप असतंय. कावड यात्रेदरम्यान, भगव्या पोशाखातले भारतातील विविध भागांतले भक्त हरिद्वार, गोमुख आणि गंगोत्री येथून गंगेचं पाणी गोळा करण्यासाठी पायी चालत जातात. दरवर्षी सुमारे 15-20 लाख भाविक ही वार्षिक हिंदू तीर्थयात्रा करत असतात. आधी फक्त उत्तर भारतातले लोकं त्या कावड यात्रेत सामील व्हायचे. पण आता अगदी केरळपासून महाराष्ट्रापर्यतचे दक्षिणेकडचे लोक सुद्धा त्या कावड यात्रेत सहभागी व्हायला लागलेत. कावड यात्रा परिपूर्ण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि भगवान शंकराच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची एकूण धारणाय. यावर्षी ४ जुलैला सुरू झालेली ही कावड यात्रा 15 जुलैपर्यंत चालली.

ही यात्रा भक्त आणि भगवान शिवयांच्यातील श्रद्धा, भक्ती या अतूट बंधनाचं प्रतीक मानली जाते. यावर्षी ही कावड यात्रा व्यवस्थितरित्या आणि शांततेत पार पाडण्यासाठी विविध राज्यांची सरकारे एकत्रितपणे काम करत आहेत. उत्तराखंड सरकारने यात्रेच्या संपूर्ण कालावधीत अवजड वाहनांना हरिद्वारमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. कंवर यात्रेच्या मार्गावर मांस आणि दारूची दुकाने बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय. पोलिसांनी पाळत ठेवण्याच्या प्रक्रियेसाठी ड्रोनचा वापर केला. अनपेक्षित घटना टाळण्यासाठी नोएडा पोलिसांनी काही भागात बॅरिकेड्स लावले होते. रहदारी टाळण्यासाठी प्रवाशांना पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी भाविकांसाठी निश्चित मार्ग जाहीर केलाय. प्रवासाचा मार्ग गाझीपूर सीमेपासून सुरू होईल आणि लोनी, साहिबाबादसह मेरठ शहरातील अनेक भागांमधून जाते. उत्तराखंड सरकारने त्या यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी 10,000 सुरक्षा कर्मचारी तैनात केले होते . कावड यात्रेच्या संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. यात्रेच निरीक्षण प्रभावीपणे सुनिश्चित करण्यासाठी, पश्चिम उत्तर प्रदेशची पाच झोनमध्ये विभागणी करण्यात आली. पहिल्या झोनमध्ये मेरठ, हापूर, बुलंदशहर आणि बागपत यांचा समावेश होतो. तर दुसऱ्या झोनमध्ये गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगरचा समावेश होतो. तिसर्याऱ झोनमध्ये सहारनपूर विभागाचा समावेश आहे, तर बरेलीला चौथा झोन आणि आग्रा पाचवा झोन म्हणून नियुक्त केलाय.

( Haridwar Kawad Yatra 2023 )

असं म्हणतात की समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शंकरांनी देव आणि दानव यांच्यातील युद्ध टाळण्यासाठी जेव्हा विष प्राशन केलं तेव्हा त्यांचा कंठ निळा पडला. त्यामुळंचं भगवान शंकरांना नीलकंठ नावं पडलं ह्ये आपण जाणतोच. पण त्यावेळी श्री शंकरांवर झालेला विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व देवानी शंकरांना गंगेच्या पाण्याचा अभिषेक घातला. अन त्याचं घटनेला स्मरून पुढं ही कावड यात्रा सुरु झाली. पण कावड यात्रेची ही एकच मान्यता नाही. अशा आणखी चार मान्यता आहेत. त्या आपण थोडक्यात जाणून घेवू, त्यापैकी एक मान्यता म्हणजे भगवान परशुरामानी सगळ्यात पहिल्यांदा ही कावड यात्रा सुरु केली. काही जणांच्या म्हणण्यानुसार परशुराम गढ़मुक्तेश्वर धामवरून गंगाजल घेऊन आले आणि त्यांनी यूपीच्या बागपतजवळ वसलेल्या महादेव मंदिरात येवून श्री शंकरांना त्याचा अभिषेक घातला. त्यावेळी श्रावण महिना सुरु होता मग तेव्हापासून प्रत्येकवर्षी श्रावण महिन्यात ही कावड यात्रा सुरु झाली. आज सुद्धा लाखों भक्त गढ़मुक्तेश्वर धामवरून कावडीत गंगाजल भरून आणतात आणि महादेवाना अभिषेक घालतात. महादेवाना गंगेच्या पाण्याचा अभिषेक घालून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण हाच मुख्य कावड यात्रेचा हेतू असतो. यात्रेची दुसरी मान्यता आनंद रामायणात मिळते. त्यांत असा उल्लेख केलाय की भगवान श्रीराम कावड वाहायचे आणि त्यांनी बिहारच्या सुल्तानगंज भागातून गंगाजल आणून बैद्यनाथ ज्योतिर्लिंगाना श्रावण महिन्यात अभिषेक घातला होता. तीच परंपरा पुढ चालत राहिली आणि कावड यात्रा संपन्न केली जावू लागली.

आता तिसरी मान्यता पाहू. प्राचीन ग्रंथात लिहिल्यानुसार श्रीराम नाही तर चक्क रावण आधी कावडीन पाणी वाहायच काम करायचा. समुद्र मंथनावेळी जेव्हा भगवान शंकरांनी हलाहल विष प्राशन केलं तेव्हा त्यांना काही नकारात्मक शक्तींनी गाठलं. मग पुढ रावणाने श्री शंकरांना त्या नकारात्मक शक्तीपासून मुक्ती देण्यासाठी कावडीने गंगेचं पाणी आणून भगवान शंकरांना अभिषेक घातला. त्यामुळं श्री शंकरांची नकारात्मक शक्तीपासून मुक्ती झाली आणि तेव्हापासून ही कावड़ यात्रेची परंपरा सुरु झाली. यापुढं सांगितली जाणारी चौथी मान्यता अशी की, त्रेतायुगात श्रवण कुमार उर्फ श्रावणबाळ यांनी ही कावड यात्रा सुरु केली. श्रावणबाळ यांनी त्यांच्या आंधळ्या मातापित्यांना कावडीत बसवून त्यांची हरिद्वारमध्ये गंगास्नान करण्याची इच्छा पूर्ण केली. त्यानंतर माघारी येताना त्यांनी आपल्यासोबत गंगाजल ही आणलं. त्या घटनेनंतर दरवर्षी ही कावड़ यात्रा सुरूच राहिली. तर एकूण अशा हरिद्वारच्या कावड यात्रेबद्दल लोकांच्यात मान्यता आहेत. पण मान्यता अनेक असल्या तरी लोकांच्या मनात फक्त भोलेनाथाना भेटण्याचीचं इच्छा असते हे मात्र नक्की. जशी आपल्या वारकऱ्यांना आपल्या विठ्ठलभेटीची आस असते अगदी तशी. हिमांशू त्यागी नावाचा या पोरानं भारत हिंदूराष्ट्र व्हावा म्हणून १४ जूनला ही कावड यात्रा सुरू केली होती. एकूण १५० किलो वजन खांद्यावर घेऊन तो टोटल २०० किलोमीटर अंतर पार करून आला आणि १५ जुलैला हरिद्वारमध्ये जल अभिषेक केला

( Haridwar Kawad Yatra 2023 )

त्याच्यासारखाच अजून एकाने योगी आदित्यनाथ हे युपीच्या सीएम पदावर कायम रहावेत आणि पुढं जाऊन देशाचे पंतप्रधानही व्हावेत म्हणून कावड यात्रा केली. काही जण तर अनवाणीच ही यात्रा करतायत. खरंतर या कावड यात्रेचे काही कठोर नियम सुद्धा आहेत. जसं की कावड यात्रेत कोणत्याही प्रकारचा नशा केलेला चालत नाही. मांसाहार, दारू आणि उत्तेजित करणारे अन्नपदार्थ सुद्धा या यात्रेत पूर्णपणे वर्ज्य करायचे असतात. पण तरीही यंदा काही अतिउत्साही तरुणांनी त्या कावड यात्रेत नशा करून गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली. सध्या त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामुळे प्रामाणिक भावनेने कावड यात्रेत सहभागी झालेले लोक अशा विकृत तरूणांवर भडकले आहेत.
या कावड यात्रेत देशभरातून आलेल्या बहुजन समाजाच्या तरूणांची संख्या सर्वाधिक बघायला मिळतेय. यावरून एका पत्रकाराने कावड यात्रेवर टीका केली होती. पण तरीही कावड यात्रा कशी महान परंपरा आहे हे ही तितक्याच ताकदीने तरूण सोशल मीडियावर सांगताना दिसतायत.असो, पण जर तुमच्यापैकी कुणी त्या कावड यात्रेबद्दल ऐकलं असेल किंवा तुम्हाला स्वतः ला या यात्रेचा अनुभव असल्यास , ही यात्रा नेमकी लोकांनी का करायला हवी, तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा लेख आवडला असेल तर व्हिडीओ लाईक आणि शेअर करा.


हा पोरगा हिंदू राष्ट्रासाठी १५० किलोची कावड घेऊन २०० कि.मी चालतोय | Haridwar Kawad Yatra 2023

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

breaking newsdaak kawaddak kawadharidwarharidwar kawadharidwar kawad yatraharidwar kawad yatra 2023haridwar kawad yatra liveharidwar sawan kawad yatra 2023haridwar shortsjhula kawadkawadkawad yatrakawad yatra 2022kawad yatra 2023kawad yatra 2023 djkawad yatra 2023 haridwarkawad yatra 2023 livekawad yatra 2023 updatekawad yatra haridwarkawad yatra haridwar 2023kawad yatra livekawad yatra songkawad yatra statussawan kawad yatra 2023vishaych bhariविषयच भारी
Comments (0)
Add Comment