गोपीचंद पडळकर वादग्रस्त की झुंजार नेतृत्व | Gopichand Padalkar On Sharad Pawar Supriya Sule Ajit Pawar

मंडळी भाजपचे विधानपरिषदचे आमदार Gopichand Padalkar आणि पवार कुटुंबीय हा वाद काय आता महाराष्ट्राला नवीन राहिलेलेला नाहीये. पडळकर आणि पवारांच्यात असणारी धुसपूस आपण सगळेचं जाणतो. काल सुद्धा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून माध्यमांशी बोलताना पडळकरांची जीभ घसरली. त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी विशेषतःAjit Dada यांच्या समर्थकांकडून रोष व्यक्त केला जातोय. काय काय ठिकाणी तर डुकराच्या गळ्यात पडळकरांचा फोटो घालून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय. पुण्यात तर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून पडळकर सापडतील त्या ठिकाणी त्यांना चोप देऊ अशीच भूमिका घेण्यात आलीय. पण पडळकरांची अशी वादग्रस्त वक्तव्य करायची ही काय पहिलीच वेळ नाहीये याआधीही त्यांनी बर्याच वेळा पवार कुटुंबावर निशाना साधलाय. पण आजAjit Dada ,Padalkar ज्या पक्षात आमदार आहेत त्या भाजप सोबतच सत्तेत आहेत तरीही पडळकर पुन्हा पुन्हा पवारविरोधाचीच लाईन का ओढ्तायत ? त्यांच्या या अशा रोखठोक भूमिकांमुळे आणि वाद्ग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना वादग्रस्त म्हणायचं कि झुंजार नेतृत्व म्हणायचं हा प्रश्न अनेक लोकांच्या मनात निर्माण झालाय ? आजच्या या Bolg मधून याच प्रश्नाच उत्तर शोधणार आहोत.

(Gopichand Padalkar On Sharad Pawar Supriya Sule Ajit Pawar)

मंडळी काही दिवसापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून धनगर समाजाच्या अनेक प्रश्नांबद्दल काही मागण्या केल्या होत्या. याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, तुम्ही अजित पवारांना पत्र का पाठवलं नाही ? त्यावर पडळकर म्हणाले की, ‘अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. एवढच नाय तर पडळकरांनी सुप्रिया सुळे यांना सुद्धा लबाड लांडग्याची लेक, असं म्हटल. पडळकरांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही पडळकरांवर त्याच भाषेत टीका केली. मिटकरींनी पडळकरांना डुकराची उपमा दिली .‌ ते म्हणाले सन्मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी स्वतःला समाजाचा नेता म्हणून घेणाऱ्या व घरात आणि समाजात कवडीची किंमत नसलेल्या गोप्याला आवर घाला. उपमुख्यमंत्री अजितदादांबद्दल बोलताना तो त्याच्या लायकीच्या बाहेर बोलला आहे. याला आवर न घातल्यास आम्हाला आवरण कठीण होईल. दरम्यान काल सकाळी पुन्हा एकदा पडळकरांनी अजित पवारांना आपण सिरीयस घेत नसल्याचं म्हटलंय. आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवार माझ्या पाठीशी उभे राहिले किंवा नाही राहिले तरी मला त्याचा जास्त फरक पडत नाही. मी अजित पवारांना सिरीयस घेत नाही, मानतच नाही तर सिरीयस घ्यायचा विषयच नाही, असे पडळकर म्हटले. माझ्या समाजाचा विषय आला तर मी समाजाच्या बाजुन ठामपणे उभा आहे. अजित पवारांबद्दल बोलायचा किंवा त्यांच्यावर टीका करायचा विषय नव्हता.

(Gopichand Padalkar On Sharad Pawar Supriya Sule Ajit Pawar)

पण तुमच्यासारख्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही अजित पवारांना पत्र दिलं नाही का, म्हणून ते उत्तर दिलं. कारण, त्यांना पत्र देऊन काही उपयोगच नाही, असे पडळकर म्हणाले. पण मंडळी पडळकर यांनी पवार कुटुंबीय आणि एकूणच राष्ट्रवादीवर याआधीही बर्याच वेळा अशी जहरी वक्तव्य केलेलीयेत. एकदा पवारांवर बोलताना पडळकर म्हणाले होते कि शरद पवार हे साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. त्यासोबतच सोलापुरात सुद्धा एकदा  पत्रकार परिषदेत बोलताना पडळकर यांनी शरद पवारांनी दिल्लीत घेतलेल्या बैठकीवरून टीका केली होती. मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा. रात गेली, हिशोबात पोरगं नाही नशिबात अशी त्यांची परिस्थिती आहे,” अशा शब्दांत गोपीचंद पडळकरांनी तेंव्हा पवारांवर हल्लाबोल केला होता. जेजुरी इथ सुद्धा शरद पवारांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण होताना पडळकर म्हणाले होते कि “शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत”मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल होत. तेंव्हा सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांच्या त्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. जितेंद्र आव्हाड हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदू देवदेवता यांच्या विषयी आक्षेपार्ह विधानं करत आहेत. कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून हे सगळं बोलत असतील. महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर, हे जितेंद्र आव्हाड जितुद्दीन झाले असते.

(Gopichand Padalkar On Sharad Pawar Supriya Sule Ajit Pawar)


शरद पवार हे शमशोद्दीन झाले असते, अजित पवार हे अजरूद्दीन झाले असते आणि Rohit Pawar हे रजाक झाले असते’, अशी जोरदार टीका तेंव्हा गोपीचंद पडळकर यांनी केली होती. एकदा तर पडळकरांनी शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत असच म्हंटल होतं.
पण यातून पडळकरांचा पवारांना इतका विरोध का ? हा प्रश्न नक्कीच उभा राहतो. पण त्यासाठी आपल्याला पडळकरांचा थोडक्यात राजकीय प्रवास बघावा लागेल. मंडळी सांगली जिल्ह्यातील आटपाटी तालुक्यातील पडळकरवाडी हे त्यांचं मूळ गाव. तस तर त्यांच गाव हे दुष्काळी पट्ट्यात मोडत. मंडळी तसं तर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच गोपीचंद पडळकर यांचं नाव सर्वात आधी महाराष्ट्राला परिचित झालं. फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले महादेव जानकर यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी जानकर यांच्यासोबत मिळून धनगर आरक्षणाच्या आंदोलनाला बळ दिलं. या माध्यमातून आपल्या वेगळ्या स्टाईलमुळे पडळकर यांनी हळूहळू राजकारणात जम बसवला. खासकरून त्यांच्या भाषणाची चर्चा सगळीकडे होऊ लागली. त्यामुळेच पुढे ते धनगर समाजाच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखले जाऊ लागले. तेंव्हा एकच छंद, गोपीचंद अशा घोषणा गाजू लागल्या. पडळकरांच शिक्षण 12 वी पर्यंत झालेलं असल तरी पडळकरांना राजकारणाव्यतिरिक्त सिनेमाची आवडय. ऐन 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या  तोंडावरच त्यांनी धुमस नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यात त्यांनी सिनेमाचं लेखन आणि अभिनय सुद्धा केलेला होता. पडळकरांनी त्यांच्या एकूण राजकीय प्रवासात आजवर तीन वेळा पक्ष बद्लेलाय. मघाशी सांगितल्याप्रमाण सुरुवातीला म्हणजेच 2009 ते 2013 दरम्यान पडळकर महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षामध्ये होते. त्यानंतर 2013 ते 2018 दरम्यान ते भाजपमध्येच राहिले. पण २०१८ च्या जुलै महिन्यात त्यांनी वंचित मध्ये प्रवेश केला होता. पण 2019 च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तेंव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला होता. तस तर तेव्हापर्यंत भाजपने कोणत्याही जागेसाठी कुठल्याच उमेदवाराचं नाव अधिकृतरित्या जाहीर केलेलं नव्हतं. पण फडणवीस यांनी पडळकर यांच्या प्रवेशावेळीच ते बारामतीमधून लढतील, अशी घोषणा केली होती. ” आपल्या सर्वांचे लाडके गोपीचंद पडळकर पुन्हा घराकडे परत आले आहेत. ते वंचितमध्ये गेल्यानंतर दुःख झालं होतं. कोणतीही मागणी न करता फक्त धनगर सामाजासाठी त्यांनी व्रत स्वीकारलं होत. गोपीचंद हे ढाण्या वाघ आहेत. ढाण्या वाघाने जंगलाच्या राजासारखं राहायचं असतं. माझी इच्छा अशी आहे की गोपीचंद पडळकर यांनी बारामतीची सीट लढली पाहिजे,” अशा शब्दात फडणवीसांनी त्यावेळी पडळकरांवर स्तुतीसुमन उधळली होती आणि त्यानंतरच पडळकर फडणवीसांचे विश्वासू आणि मर्जीतले नेते बनले.

(Gopichand Padalkar On Sharad Pawar Supriya Sule Ajit Pawar)

मंडळी पडळकरांनी आतापर्यंत चार वेळा निवडणुका लढवल्या आहेत. पण या चारही निवडणुकांमध्ये त्यांना पराभावालाच सामोरं जावं लागलं आहे. 2019 च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पडळकर बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या विरुद्ध लढले होते. पण अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात पडळकर यांचं काहीच चाललं नाही. त्यांच्यावर या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली होती. नंतर लगेचच 2019 एप्रिल-मे दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत पडळकर सांगलीतून उभे राहिले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवत इथं वातावरण निर्मिती केली होती. पण इथंही त्यांना भाजपच्या संजय पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पण त्या निवडणुकीत एक गोष्ट मात्र झाली. तेंव्हा वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही उमेदवारांमध्ये सर्वाधिक मतं मिळवण्याची नोंद पडळकर यांच्या नावावर झाली. याशिवाय सांगायचं म्हटलं तर 2014 आणि 2009 मध्येही पडळकर सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघातून रिंगणात उतरले होते. यात 2014 मध्ये शिवसेनेचे अनिल बाबर यांच्याकडून तर 2009 ला काँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांनी पडळकरांना मात दिली होती. पण पराभूत होऊनसुद्धा पडळकर यांच्या लोकप्रियतेमध्ये थोडी सुद्धा कमी झाली नाही. कारण पडळकर कायमच प्रस्थापित नेत्यांविरोधात लढत राहिले. त्यामुळे त्यांचा राजकीय आलेख सुद्धा चढताच राहिल्याचं दिसून आल. त्याच दरम्यान मघाशीच सांगितल्याप्रमाण ते फडणवीस यांच्या मर्जीतले नेते बनले. इतके कि भाजपच्या पंकजा मुंडे यांना साईडलाईन करत त्यांना विधान परिषदेच तिकीट देण्यात आलं आणि पडळकर विधानपरिषदेत आमदार बनले. कारण भाजपकडे तसाही धनगर चेहरा राहिला नव्हता. मागे काही काळ प्रकाश शेडगे होते पण ते बाजूला झाले. राम शिंदे होते पण तेही कर्जत मधून पराभूत झाले. काही राजकीय तज्ञांच्या मते तर

(Gopichand Padalkar On Sharad Pawar Supriya Sule Ajit Pawar)


जुन्या फळीतल्या नेत्यांना बाजूला करत नवीन नेत्यांना संधी देत नेतृत्व हाती ठेवण्याचा हा फडणवीस यांचा प्रयत्न असू शकतो असं म्हणण्यात येताय. पडळकरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुळातच आजपर्यंत पडळकरांच राजकारण हे पवारविरोध याच लाइनवरती राहिलेलय आणि या सगळ्याला फडणवीस यांचा इंफ्लुयेन्स आहे अस मानण्यात येत. पडळकर फडणवीसांच्या मर्जितले असणं हे त्याचं महत्वाचं कारणय. दुसर म्हणजे राष्ट्रवादीवर थेट टीका न करता बॅकफूटला राहून त्यांच्या B टीमला पवार विरोधात उभं करण्याचाही फडणवीस यांचा प्लॅन असू शकतो. कारण मागेही फडणवीसांच्या नव्या फळीतल्या नेत्यांमधल्या राम सातपुते यांनी विधानसभेत शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला होता. पण अजित पवार आज भाजप सोबत सत्तेत आहे मग त्यांना का टार्गेट केलं जातंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं उत्तर म्हणजे  राजकारणात पवार कुटुंब कितीही विस्कळीत झालं असलं तरी पवारांच्या धक्कातंत्राचा आजवर कुणालाच अंदाज आला नाहीये.म्हणून तर अजित दादांवर कन्ट्रोल राहावा, भविष्यातली त्यांची जागावाटपातील बार्गेनिंग पावर मर्यादित राहावी यासाठी फडणवीस हे स्वतः मागे राहून त्यांची B टीम पुढे करत असावेत अस बोललं जातंय. त्याचबरोबरं पुढे जाऊन अजित पवार वरचढ ठरू नयेत, अजित दादा उपमुख्यमंत्री असले तरीही आपल्या नेतृत्वाला धक्का लागू नये म्हणूनच कदाचित फडणवीस यांचाच दादांना डॅमेज करायचा हा प्लॅन असू शकतो. अशी ही शंका काही राजकीय जाणकारानाकडून व्यक्त होतेय. पण पडळकरांच  हे वक्तव्य त्यांना भोवणार का ? त्यांच्या या वक्तव्यमागे खरंच फडणवीसांचा हात असू शकतो का ? गोपीचंद पडळकर तुमच्या लेखी वादग्रस्त की झुंजार नेतृत्व आहे? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ajit pawar latestajit pawar liveajit pawar news livebjp aamdaar mahesh landgebreaking newsgopichand padalkarOBC Arakshanpankaja mundesharad pawarsharad pawar on ajit pawarvishay bharivishaych bharivishaychbhariविषयच भारी
Comments (0)
Add Comment