अजित दादांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात राजकारणात एकच खळबळ उडालीये. विशेषत: शिंदे गटाला यामुळे एक मोठा सेटबॅक बसल्याचं बोललं जातंय. म्हणजे मंत्रीमंडळ विस्तारासाठी शिंदे गटातील नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते पण आयत्या वेळेस राष्ट्रवादीचेच नेते शपथा घेऊन मोकळे झालेत. आता म्हणूनच एकनाथ शिंदेचं यामुळे मोठं डॅमेज झालेलं बघायला मिळतंय. त्यामुळेच मंत्रीपदासाठी उत्सुक असलेले संजय शिरसाट असतील, शिंदे गटासोबत असलेले बच्चू कडू असतील किंवा मग अगदी मंत्रीपदावर असलेले शंभूराजे देसाई. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह शिंदे गटातील बहुतांश नेते नाराज असल्याचं बघायला मिळतंय. काल शंभुराजे देसाईंनी तर मीडीयाला दिलेल्या बाईटमध्ये ठाकरेंनी साद दिली तर आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊ असं बोलून गेले आहेत.पण ते असं का म्हणाले असावे ? सध्याच्या सत्तानाट्याचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो आणि खरंच शिंदे गटाचे नेते पुन्हा ठाकरेंकडे परतू शकतात का ? हेच आपण आज या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत….
मध्यंतरी आलेल्या काही सर्व्हेनंतर भाजपला येत्या लोकसभा निवडणुकीत मोठा दणका बसेल असं बोललं गेलं. तसेच एकनाथ शिंदे गटाचे नेते सोबत असण्याचंही मोठं नुकसान बीजेपीला सहन करावं लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. कदाचित म्हणूनच भाजप आणि पर्यायाने मोदींना जर सिक्युर करायचं असेल तर एक मोठा राजकीय गट भाजपसोबत असणं मस्ट झालं होतं. आणि म्हणूनच राष्ट्रवादी अंतर्गत असलेल्या दुफळीचा फायदा उचलत भाजपने अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलं आहे. आता भाजप त्यांना पुढं शिंदेंना बाजूला सारून मुख्यमंत्रीही करू शकेल अशी ही चर्चा आहे. आता त्यामुळेच शिंदे गटच धोक्यात आहे का? शिंद गटाचं राजकीय भवितव्य धोक्यात आलंय का? हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. अर्थात यामुळेच शिंदे गट विरूद्ध भाजप आणि शिंदे गट विरूद्ध अजित दादा गट या नव्या संघर्षाला आता पुन्हा नव्याने सुरूवात होणार आहे. अर्थात या संघर्षाची बीजं ही फार जुनी आहेत. म्हणजे राष्ट्रवादीचे नेते म्हणजेच सर्वार्थाने अजित पवार
निधी देत नाहीत म्हणून मविआतून बाहेर पडलेले नेत्यांना आता परत अजित दादांनाच निधी मागावा लागणार आहे. यानिमित्ताने जरा आपण राष्ट्रवादी विरूद्ध शिंदे गट या रायव्हलरीची जुनी पानं चाळून बघू.
तर बघा , नंबर एक वर आहेत शिवसेना आमदार तानाजी सावंत.
आता तानाजी सावंत महाविकास आघाडीसोबत होते खरे पण त्यांचं लोकल लेव्हलच पॉलिटिक्स नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात राहिलं होतं .मागं सोलापुरातल्या हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या एका सभेत तानाजी सावन्त यांनी निधी वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांविरुद्ध अनेक गंभीर आरोपदेखील केले होते.सत्तेत शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसणारे हे नेते शिवसेनेवरच पलटवार करतं असल्याचे ते या सभेत म्हणाले होते .. तसेच “आमच्या नादी लागू नका तुम्ही 100 मारले पण आमचा एक दणका बसला तर तुम्हाला आईच दूध आठवेल असंही ते तेव्हा राष्ट्रवादिच्या एका नेत्याला ऊद्देशून म्हणाले होते. मागील अडीच वर्षात केवळ अपमानच होतं असेल तर विचार करायला हवा.राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्यही कोट्यावधी रुपये आणतो आणि आम्हांला काय, आम्ही शिवभोजन थाळी 10 रुपयाला विकायची अन मग त्या बिलासाठी तीन तीन महिने ताटकळत बसायचं हे नाय चालणार,असंही तानाजी सावन्त त्या सभेत गरजले होते पुढे ते असंही म्हणाले कि आम्ही फक्त आदेशाची वाट बघतोय.. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही सहन करणार, रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही वाट पाहू. पण आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. जोपर्यंत साहेबांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही शांत आहोत.आता यातले साहेब कोण ? एकनाथ शिंदे कि उद्धव ठाकरे ? याचं उत्तर एक वर्षांपूर्वीच त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळालेलं असेल. बरं तानाजी सावंत एवढ्यावरच थांबले नाहीत,पुढे धाराशिवमधल्या भूम येथे एका कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना ते म्हणाले कि केंद्र सरकारच्या मदतीशिवाय राज्य सरकारच पानही हलणार नाय. मराठवाड्यात फडणवीस सरकारच्या काळात मीं जलसंधारण मंत्री असताना केलेल्या एका 25 हजार कोटीची वाटर ग्रीड योजना राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याने स्थगित केलीय. पण पाण्याबाबतीत मराठवाड्यावर अन्याय झाला तर मीं गप्प बसणार नाही. त्यावेळी मग मीं पक्ष आणि कुणाचीही काळजी करणार नाही. या वर्षाच्या जानेवारी महिन्यातच मग तानाजी सावंत भाजप मध्ये जाणार या चर्चाना उधाण आलं होतं. पण मी शिवसेना सोडणार नाही असं तानाजी सावंत म्हणाले होते. पण असं असलं तरीही धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध बंडखोरी करत तानाजी सावंत यांनी भाजप शिवसेनेची युती घडवून आणली आणि त्यांचा पुतण्या धनंजय सावंत याला उपाध्यक्ष केलं होतं. खरंतर तानाजी सावंत हे फडणवीस सरकारच्या काळात जलसंधारण मंत्री होते.. पण त्यांना या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं नव्हतं म्हणून ते नाराज होते. राष्ट्रवादीच्या ईशाऱ्यावरच आपल्याला शिवसेना पक्षश्रेष्ठी कडून मंत्रिपदपासून दूर ठेवलं जातंय.असा त्यांचा अंदाज होता. त्यामुळेच मग त्यांनी एकनाथ शिंदे ना खुलेपणाने समर्थन दिल्याचे आपल्याला पाहायला मिळालं. पण आता तानाजी सावंत मंत्री झाले खरे पण त्यांचा प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी पक्षच आता पुन्हा फिरून नव्याने त्यांच्या सोबत सत्तेत बसलाय. त्यामुळे नजीकच्या काळात हा एक नवीन संघर्ष उभा राहू शकतो.
नंबर दोनवर आहेत , शंभूराजे देसाई.
शंभूराजे देसाई हे तसें कट्टर शिवसैनिक मानले जातात. पण स्थानिक राजकारणात त्यांचं नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत वाजलं आहे. दीड एक वर्षापूर्वी झालेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इलेक्शन मध्ये ही शंभूराजे देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस्स पक्षाने महाविकास आघाडी धर्म पाळला नाही. आणि मतदानात शिवसेनेच्या मतदारांना डावलले असं म्हणलं होतं.तेव्हा आता इथून पुढे शिवसेना जिल्ह्याच्या राजकारणात स्वतंत्र लढेल अशी भूमिका ही त्यांनी जाहीर केली होती. या इलेक्शन मध्ये शंभुराजे देसाई यांचा त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या सत्यजितसिंह पाटणकर यांनी अवघ्या 14 मतांनी पराभव केला होता. हा पराभव शंभूराजेच्या प्रचंड जिव्हारी लागला होता.जाणकरांच्या मते तेव्हापासून महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं त्यांचं मत प्रबळ होत गेलं.आणि मग एकनाथ शिंदेना साथ देत ते पुढे शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. पण आता ज्यांना जिल्ह्याच्या राजकारणात विरोध आहे तेच लोक सत्तेत सहसोबती झाल्याने शंभूराजे नाराज आहेत. त्यामुळेच काल ठाकरेंनी साद दिली तर आपण त्यांना प्रतिसाद देऊ असं त्यांनी म्हणलंय. अर्थात भाजपच्या प्रेशरला रिप्रेशर क्रियेट करण्यासाठीचं शंभूराजेंनी त्यादिवशी तसं स्टेटमेंट केलंय.
कोरेगावचे आमदार महेश शिंदे
साताऱ्यातील कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांच्या बद्दल बोलायचं झाल्यास ते सुद्धा २०१९ च्या विधान सभा निवडणुकीपूर्वी भाजप मध्ये होते, पण ऐन विधानसभेच्या तोंडावर त्यांनी तिकीट मिळवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती होती. महेश शिंदेनी या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. पण हेच शशिकांत शिंदे पुढे विधानपरिषदेतून आमदार झाले.आणि त्यामुळे आपलें विरोधकच सत्तेचे वाटेकरी असल्याचा राग त्यांच्या मनात होता. मतदारसंघातील सोसायट्याच्या निवडणूकापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत या दोन नेत्यातला संघर्ष मतदारसंघात उघडपणे बघायला मिळत होता. त्यामुळे महेश शिंदे यांची महाविकास आघाडीत घुसमट झाल्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दर्शवला असावा असा अंदाज आहे.शिवाय जरी ते शिवसेनेत असले तरी ते राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिलेले आहेत. आणि संघाशी असलेल्या जवळच्या संबंधामूळेच भाजप हा महेश शिंदेसाठी जवळ चा पक्ष राहिला आहे. शशिकांत शिंदे, अजित पवार आणि शरद पवार हे त्यांच्या नेहमीच रडारवरचे नेते राहिलेले आहेत. पैकी शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांची साथ द्यायचं ठरवलं असलं तरी अजित पवार हेच सत्तेत सहभागी झाल्यामुळे महेश शिंदे नाराज होणं साहजिक असणार आहे.
सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार
सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना मविआ सरकारमध्ये राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तो विषय असा झाला कि महाविकास आघाडीच्या मंत्री मंडळाच्या विस्तारावेळी अब्दुल सत्तार यांना ज्या कॅबिनेट मंत्रिपदाची आशा होती ते खातं संदीपान भुमरे यांना देण्यात आलं आणि अब्दुल सत्तार यांची केवळ राज्यमंत्रीपदावर बोळवन करण्यात आली. पुढं मग याचं रागातून त्यांनी प्रत्यक्षात खातेवाटप होण्याआधीचं आपल्या राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून त्यांच्या मनात ठाकरेंच्या निर्णयाबाबत खदखद होती. खरं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार यांनी जेव्हा काँग्रेस पक्ष सोडून आपली स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्यांची पहिली पसंती ही भाजपाचं होती . आणि म्हणूनचं ते त्यासंबंधी त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी घेत आहेत अशा चर्चाना त्याकाळी उधाण आलंवतं. पण त्यावेळी सिल्लोड मधलं स्थानिक राजकारण आणि भाजप शिवसेनेची युती पाहता फडणवीसांनीचं त्यांना शिवसेनेत जायचा सल्ला दिला होता असं काही जानकरांचं म्हणणं आहे. म्हणजे खरं तर तेव्हापासून चं अब्दुल सत्तार हे भाजपच्या संपर्कात होते. काही जण तर असं ही म्हणतात की फडणवीसांनी त्यांना असाही शब्द दिला होता की जर यावेळी राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार आलं तर अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाईल म्हणून बहुतेक या सगळ्या मुळेच अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे ना समर्थन देण्याचा निर्णय घेतला असावा. आता या गणितानुसार ते मंत्री झालेही पण राष्ट्रवादी आणि त्यांच्यात मधल्या काळात बर्याच वेळा वाजलं पण आता तेच नेते सत्तारांची सहसोबत करणार म्हणल्यावर कार्यक्रम ग़डणार हे फिक्स आहे.
यांनतर आहेत खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर.
अनिल बाबर यांच्या नाराजीचं कारण देखील स्पष्ट आहे. ते शिवसेनेचे जुने आणि निष्ठावंत नेते असून सुद्धा 2019 च्या मंत्रीमंडळ विस्तारावेळी त्यांना मंत्रीपदापासून मुद्दाम लांब ठेवण्यात आलं होतं . याचाच राग त्यांच्या मनात होता. पण अडीच वर्षाच्या काळात त्यांनी त्याची कुठेही वाच्यता केली नाही. पण एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे पहिल्यापासूनचं चांगले लागेबंधे असल्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक शिंदे यांच्या पाठीशी उभं रहायचं ठरवलं . मविआ सरकार टिकवायचं असेल तर आमचही ऐका असा निर्वांनीचा इशारा त्यांनी दिला होता.. पण त्यांचं कोणीच ऐकलं नाही. पण आता अनिल बाबर यांच्यासाठी पुन्हा मागचे दिवस फिरून आले आहेत.
सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
एकनाथ शिंदे सोबत दिसणारे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे सुद्धा खरंतर पहिल्यापासून एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.त्यामुळे त्यांचं एकनाथ शिंदे सोबत जाणं हे साहजिक असलं तरी त्यांच्या बंडखोरीला तेवढंच कारण होतं असं नाही. कारण काही जाणकारांच्या मते शहाजी बापूंनीही बऱ्याचदा महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढलेले होते. त्यांच्या मते हे महाविकास आघाडीचं सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या तुलनेत शिवसेनेच्या आमदारांना फार कमी निधी उपलब्ध करून देतं होतं. तसंच या सरकारमधले वरिष्ठ नेते आणि मंत्री जाणूनबुजून त्यांच्या मागण्यांची दखल घेत नव्हते. तसंच आणखी एक ठोस कारण म्हणजे शहाजी बापूंनी हजार वेळा विरोध करूनही उजनी धरणातलं पाणी इंदापूर आणि बारामती ला वळवण्याची परवानगी महाविकास आघाडी सरकारने दिली होती . परिणामी महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळं सांगोला तालुक्यातील स्थानिक लोकांच्या रागाला शहाजी बापुना तोंड द्यावं लागलं होतं . स्थानिक मतदारसंघातील सगळी घुसमटचं त्यांच्या बंडाला खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरलेली होती.पण आता ज्या अजित पवारांना टार्गेट केलं त्याच अजित पवारांपुढे बापुंना निधीसाठी हात पसरावा लागणार आहे.
तर मंडळी, असा सगळा हा विषय आहे त्यामुळे येत्या काळात अजित दादा गट विरूद्ध शिंदे गट हा संघर्ष आपल्याला मोठ्या प्रमाणावर बघायला मिळेल. काहींच्या मते शिंदे गटातील नेत्यांना मंत्रीपदापासून वंचित ठेवत आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपने शिंदे गटावर दबाव आणला आहे. आता अर्थात भाजप ऐन लोकसभेच्या तोंडावर वजाबाकीचं राजकारण करणार नाही. म्हणूनच ते कदाचित शिंदे गटातील काही हुकमी नेत्यांना भविष्यात भाजपमध्ये घेईल. पण उरलेल्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशीच झालीय. म्हणून तर भाजप वर
रिव्हर्स प्रेशर टाकायच्या हिशोबानेच शंभूराजेंनी आम्ही ठाकरेंकडे जाऊ असं म्हणलंय. आता शिंदे गटातील नेते खरंच असं करतील? कि हे फक्त बोलण्यापुरतं आहे? शिंदे गटातील नेते भाजपमध्ये जाऊ शकतील कि मग त्यांचा राजकीय आत्मघात ठरलेलाय. तुमच्या लेखी एकनाथ शिंदे आणि एकूण शिंदे गटाचं भविष्यात अस्तित्व काय असेल, तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply Cancel reply