एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे दसरा मेळावा कुणी गाजवला | Dasra Melava 2023 | Vishaych Bhari


मंडळी दसरा हा हिंदू धर्मीयांचा सण. पण आज या सणाला महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र जरा वेगळंचं महत्व प्राप्त झालंय. कारण शिवसेनेच्या दोन्ही गटांचे बहुचर्चित दसरा मेळावे आज पार पडलेत. तसे पक्षफुटीनंतर शिवसेनेचे दोन मेळावे होण्याचे हे दुसरे वर्ष होते.. या दसऱ्या मेळाव्या साठी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या दोन्ही गटांनी चांगलीच कंबर कसली होती. दोन्ही गटांच्या मेळाव्यासाठी १ लाखापेक्षा जास्त शिवसैनिक उपस्थित राहिले होते. दोन्ही गटांनी या निमित्ताने चांगलंच शक्तिप्रदर्शन केलं. ठाकरे गटाने तर या मेळाव्याचे दोन टीझर प्रदर्शित करून शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. एवढंच नाही तर दोन्ही गटांनी मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी सुद्धा केली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्यात आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याचं फैरी झडल्या. पण एकूणच या दोन्ही मेळाव्यातून दोन्ही गटांनी चांगलंच शक्तीप्रदर्शन केलंलं दिसतंय. पण तरीही त्यातून नेमक्या कोणत्या गटाचा दसरा मेळावा गाजला ? नेमकं कोण कुणाला वरचढ ठरलं ? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे हेच आपण आजच्या Blog च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

(Eknath Shinde | Uddhav Thackeray | Dasra Melava 2023 | Vishaych Bhari)

मंडळी आज बसेसच्या बसेस भरून मुंबईत पहाटेपासूनच दाखल झाल्या होत्या. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी तर संभाजीनगरमधून चक्क 200 बसेस आलेल्या होत्या. सकाळपासून शिवाजी पार्क आणि आझाद मैदान या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलीवती. दोन्ही ठिकाणी शिवसैनिकांच्या खाण्यापिण्याची देखील सोय करण्यात आलीवती. मंडळी शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क वर होत असतो. पण यावर्षी मात्र कोण कुठे दसरा मेळावा घेतंय यासाठी चांगलीच चढाओढ झाली. पण शेवटी उद्धव ठाकरेंनी बाजी मारली आणि शिवतीर्थावर आपला मेळावा घेतला. मंडळी शिवाजी पार्कवर आज उद्धव ठाकरे यांची तोफ चांगलीच धडाडली. आजच्या मेळाव्यात नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख गद्दार असा केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, गद्दारांनो  तुमच्यात हिंमत असेल तर न्याय मिळवून द्या, मराठा समाजाला न्याय द्या, मराठा समाजाचा विषय संपवायचा असेल तर त्याला केंद्राशिवाय पर्याय नाही. आम्हाला आशा होती हे लोक करतील. पण ते काहीच करत नाही. भाजप एवढा विघ्नसंतोषी आहे, कोणाचेही लग्न असो, सर्व पुरणपोळी खाणार, अशी यांची अवलाद आहे. तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत अशी शपथ घेतली.  उद्धव ठाकरेंनी मात्र जरांगे पाटलांच तोंड भरून कौतुक केलं आणि ते म्हणाले कीं जरांगे पाटलांना एवढच सांगेन की, पहिले या भाजप सारख्या अवलादीपासून लांब रहा, दुहीचे बीज पेरायची आणि भांडणे लावायची ही भाजपची वृत्ती आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. अपात्रतेच्या निर्णयावर सुद्धा उद्धव ठाकरेंनी पडदा टाकला.

(Eknath Shinde | Uddhav Thackeray | Dasra Melava 2023 | Vishaych Bhari)


राहुल नार्वेकरांचं नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जर मानत नसेल तर देशात राज्यघटना जीवंत राहणार आहे की नाही. ह्यासोबत pm care, खिचडी घोटाळा, गिरणी कामगार, मुंबईची अवस्था , अपात्रतेचा निर्णय आणि गद्दारी या सगळ्याचं मुद्द्यानंवर उद्धव ठाकरे चांगलेच गरजले. त्यांनंतर पुढच्या वर्षी आपलं सरकार आणनारच असं सुद्धा उद्धव ठाकरे ठामपणाने म्हणाले. ठाकरेनव्यतिरिक्त सुशमा अंधारे , संजय राउत, भास्कर जाधव, नितीन बानगुडे पाटील, अंबादास दानवे, किशोरी पेडणेकर या सगळ्यांनी सुद्धा चांगलीच भाषण केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आझाद मैदानावरुन उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या खोक्याला कंटेनर अस उत्तर दिल.  त्याशिवाय 2004 पासून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायच होत. मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी पवारांकड दोन माणसं पाठवली होती, असाही गौप्यस्फ़ोट एकनाथ शिंदे यांनी केला. त्याशिवाय शिवसेना उद्या काँग्रेसमध्ये विलीन झाली तर आश्चर्य वाटायला नको, असही ते म्हणाले. पुढं त्यांनी उद्धव ठाकरेंवर बँकेकडे 50 कोटी रुपये मागितल्याचा सुद्धा आरोप केला. ते म्हणाले निवडणूक आयोगान पक्ष आणि चिन्ह आम्हाला दिल्यानंतर यांनी बँकेकडे 50 कोटी रुपये मागितले. बँकेने त्याला नकार दिला. त्यानंतर निर्लजाप्रमाणे त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले. आमच्यावर 50 खोक्यांचे आरोप करता आणि आमच्याकडेच 50 कोटींची मागणी करता. तुमच प्रेम हे बाळासाहेबांच्या विचारावर नाही तर पैशावर आहे. त्यामुळे मी एका क्षणाचाही विचार न करता त्यांना ते पैसे दिले. त्याचबरोबर कोरोना काळातल्या घोटाळ्यांवर सुद्धा एकनाथ शिंदे यांनी पडदा टाकला.

(Eknath Shinde | Uddhav Thackeray | Dasra Melava 2023 | Vishaych Bhari)


याव्यतिरिक्त त्यांनी वैयक्तिक उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर तसेच इंडिया आलिअन्स वरती सुद्धा टीका केली. एकूणच उद्धव ठाकरे यांच्या वर त्यांच्या सरकारमध्ये केलेल्या सगळ्या भ्रष्टाचाराबाबतीत सुद्धा एकनाथ शिंदे यांनी आरोप केले. पण सगळ्यात गाजली मराठा समाजासाठी त्यांनी घेतलेली शपथ. मी मराठा समाजाचा आहे, आयुष्यभर समाजासाठी राबलोय, मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देणार अस आश्वासनच एकनाथ शिंदे यांनी या मेळाव्यात मराठा बांधवाना दिल. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, तरुणांनी टोकाच पाऊल उचलू नये अस सुद्धा त्यांनी आवाहन केलयं. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतोच असे सांगत त्यांनी राज्यातल्या प्रत्येक समाज घटकाला न्याय देणार असल्याची ग्वाही सुद्धा दिली. एकनाथ शिंदे यांच्या व्यतिरिक्त गुलाबराव पाटील, ज्योती वाघमारे, शहाजीबापू पाटील, रामदास कदम यांनी सुद्धा जोरदार भाषण केली.

(Eknath Shinde | Uddhav Thackeray | Dasra Melava 2023 | Vishaych Bhari)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

पण या सगळ्यात ज्योती वाघमारेंच भाषण विशेष गाजलं. एकूणच दोन्ही बाजूनी बरेच आरोप प्रत्यारोप या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर केलेत. त्यामुळे शिवसेनेचा हा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे यंदा सुद्धा चांगलाच गाजला. खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण उद्धव ठाकरेंवरती बोलणार नसल्याचं सांगितलं होत पण तरीही त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. पण तुम्हाला नेमकं काय वाटतयं. नेमका कोणाचा दसरा मेळावा गाजला, एकनाथ शिंदे कीं उद्धव ठाकरे ? तुम्हाला कोणाचं भाषण आवडलं ? कोणाच्या मेळाव्यात शिवसैनिकांची संख्या अधिक होती,तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Eknath Shinde की Uddhav Thackeray दसरा मेळावा कुणी गाजवला | Dasra Melava 2023 | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

breaking newsdasara melavadasara melava 2023dasara melava 2023 teaser livedasara melava arewadidasara melava azad maidandasara melava savargaondasara melava shinde livedasara melava shivsena 2023dasara melava teaserdasra melava 2023eknath shinde uddhav thackeray bheteknath shinde uddhav thackeray latest newseknath shinde uddhav thackeray liveeknath shinde uddhav thackeray newseknath shinde uddhav thakre bhashanvishay bharivishaych bharivishaychbhariविषयच भारी
Comments (0)
Add Comment