मित्रांनो आम्ही आमच्या विषयच भारी या वेबपोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला बैलगाडा, कुस्ती, शेती, राजकारण अशा वेगवेगळ्या विषयांची माहिती देतं असतो. आज सुद्धा आम्ही तुम्हांला शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळवून देणाऱ्या चंदन शेतीबद्दल माहिती सांगणारय. तुम्ही जर योग्य नियोजन करून आपल्या शेतात चंदनाची लागवड केली तर तुम्ही हजार नाय, लाख नाय तर चक्क कोटीत पैसे कमवू शकता. आता तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल हे कस शक्यय, तर त्यासाठी तुम्हाला ह्यो लेख पूर्ण वाचावा लागेल….
मंडळी तुमच्यापैकी बऱ्याचं जणांनी आधी सुद्धा चंदन शेतीबद्दल ( Sandalwood Farming ) ऐकलं असेलचं. पण ती शेती नेमकी कशी करायची, किती क्षेत्रात करायची, रोप कुठून आणायची, त्यांची लागवड कशी आणि कुठल्या काळात करायची, यासाठी सरकार अनुदान देतं का, यातून फायदा होतो का, आणि होत असेल तर तो कसा आणि किती या सगळ्या प्रश्नांची माहिती तुम्हाला या लेखामधून मिळणारय. मंडळी चंदनाच्या झाडांची किंमत खूप महाग असते हे आपल्या सगळ्यांना माहितीचये. कारण त्याचा वापर होमहवन आणि पूजापाठ यांसारख्या धार्मिक कार्यामध्ये जास्त केला जातो. तसंच चंदनापासून औषधे, सुगंधी तेल, सुगंधी वस्तू बनवण्यात येत असल्यामुळंही चंदनाला खूप मागणी असते. त्यामुळं चंदनाची शेती करून आपले शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा कमावू शकतात हे ही तितकंच खरंय. खरं तर आपल्या देशात फारच कमी ठिकाणी ही चंदन शेती ( Chandan Sheti ) केली जाते. महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्येचं या चंदन शेतीचा प्रयोग शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केलेला आहे. मंडळी तुमच्या शेतातलं चंदनाचं एक झाडं तुम्हाला तब्बल पाच लाख रुपये एवढी मोठी किंमत मिळवून देऊ शकते हे माहीत असूनही बरेच शेतकरी चंदनाची शेती करण्याचं टाळतात. कारण त्यांच्याकडे त्याबद्दलचं योग्य मार्गदर्शन नसतं आणि तेचं मार्गदर्शन तुम्हाला या लेखामधून मिळणारय. चला तर मग सुरुवातीला आपण ही चंदनाची रोपं तुम्हाला कुठे मिळतात त्याची माहिती घेऊ.
( Chandan Sheti Kashi Karavi – चंदन शेती कशी करावी – How to do Sandalwood Farming in india )
मंडळी ही चंदनाची रोपे आधी कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात आणली जायची. कारण तिकडचं चंदनाचं सगळ्यात जास्त उत्पादन व्हायचं. पण सध्या ती रोपं महाराष्ट्रात देखील उपलब्धयत. एवढंच नाही तर आजकाल वेगवेगळ्या प्रकारच्या चंदनाच्या जातीदेखील बाजारात तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये पांढर चंदन, लाल चंदन, अभय चंदन, आनंददायी चंदन यांसारख्या काही महत्वाच्या बियाणांचा समावेश होतो. आपल्याकडे प्रामुख्यानं पांढऱ्या चंदनाची लागवड केली जाते. कारण आपल्या शेतातली माती पांढऱ्या चंदनासाठी पोषक असते. त्या पांढऱ्या चंदनाची रोपं तुम्हाला तुमच्या जवळच्या रोपवाटिकेमध्ये मिळू शकतात. किंवा तिथं नाही मिळाली तर भारत सरकारच्या वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये हमखास मिळतात. ही रोपं खूप महाग असतात. म्हणजे त्याच्या एका रोपाची किंमत जवळपास पाचशे ते सहाशे रुपये एवढी असते. आता आपण चंदनाच्या रोपांची लागवड नेमकी कशी करायची त्याची माहिती घेऊ. मंडळी तुम्ही जून, जुलै ऑगस्ट या पावसाळी हंगामात चंदनाची लागवड करु शकता. पावसाळ्यात चंदनाची लागवड करण फायदेशीर असतं. कारण पावसाळ्यातलं वातावरण चंदनाच्या वाढीसाठी पोषक असतं. लागवडीसाठी तुम्हाला 16 बाय 12 या तंत्राचा वापर करायचाय. 16 बाय 12 हे अनुक्रमे दोन ओळीमधील आणि दोन रोपांमधील अंतराचं प्रमाण आहे. म्हणजे काय तर काय तर चंदनाची लागवड करताना तुम्हाला दोन ओळीमधील अंतर 16 फूट आणि दोन रोपांमधील अंतर हे 12 फूट राखायचं आहे. अशा हिशोबाने आपण जर लागवड केली तर एका एकरात साधारण साडेतीनशे ते पावनेचारशे रोप बसतात. लागवडीसाठी आपण 6 – 7 महिन्याची निरोगी रोपे घायची आहेत.
( Chandan Sheti Kashi Karavi – चंदन शेती कशी करावी – How to do Sandalwood Farming in india )
मंडळी चंदन शेती हा खरं तर मिश्र शेतीचा प्रकारय. त्यामुळ आपल्याला चंदनाबरोबरचं यजमान वृक्षाची देखील लागवड करायची असते. आता यजमान वृक्ष कोणती, तर साग, सारदा, लिंब, पळस, सुरु, डाळिंब, रामफळ, निलगिरी यापैकी कोणत्याही एका झाडाची लागवड तुम्हाला चंदनाजवळ करायची आहे.. कारण चदनाचं झाड कधी एकटं येत नाही. त्याला यजमान वृक्षाची गरज लागते..म्हणजेच काय तर चंदनाच्या झाडांची मुळ ही यजमान वृक्षाच्या मुळानवर जगतात. एकदा का ही यजमान झाड व्यवस्थित वाढली की ती कापून टाकली तरी चालतात. कारण पुढे त्यांच्या मुळावरचं चंदनाची झाड व्यवस्थित जगतात. तर अशाप्रकारे तुम्ही चंदनाची लागवड करू शकता. आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की चंदनाच्या शेतीला सरकारची काही अनुदान वगैरे असतं का ? तर मंडळी त्याचं उत्तरय हो. चंदन शेतीला सरकारचं अनुदान असतं आणि ते सुद्धा 100 टक्के. फक्त त्यासाठी तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यावर चंदन शेतीची नोंद करून घ्यावी लागते. सरकारच्या चंदन कन्या नावाच्या योजने अंतर्गत तुम्हाला अनुदान दिलं जातं. आता तुम्ही म्हणाल हे सगळं खरंय पण चंदन शेतीतून नेमकं उत्पादन किती आणि कसं मिळत ?
( Chandan Sheti Kashi Karavi – चंदन शेती कशी करावी – How to do Sandalwood Farming in india )
तर ऐका, मंडळी चंदन शेतीतून उत्पादन मिळण्यासाठी तुम्हाला खूप दिवसांची म्हणजे जवळपास 15 वर्षांची वाट पाहावी लागते. इतर पिकांसारखं तुम्हाला वर्षाच्या वर्षांला यातून उत्त्पन्न मिळत नाही. पण जेव्हा हे उत्पन्न मिळतं तेव्हा मात्र ते भरमसाट मिळत. कारण साधारण एक किलो चंदनाचा बाजारभाव आजच्या घडीला जवळपास 12 ते 15 हजार इतकाय. 15 वर्षानंतर आपल्याला एका झाडातून किमान 10 ते 15 किलो गाभा मिळतो. म्हणजे प्रति झाड 15 किलो गाभा असा हिशोब केला तर तुमच्या 250 झाडामधून तुम्हाला तब्बल 5 कोटी 52 लाखांच उत्पन्न मिळत.. अन ते ही फक्त एका एकरात. कदाचित आकडा ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण सध्या देशात असे बरेच शेतकरी आहेत ज्यांनी चंदनाची शेती करून करोडो रुपये कमावलेलेयेत. अगदीचं नावं सांगायचं झालं तर अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेर गावचे राजेंद्र गाडेकर आणि साहिल गाडेकर यांनी आपल्या 27 एकरातत चंदनाची लागवड करून तब्बल 100 कोटींच्या वर उत्पन्न घेतलेलंय. तुम्हीही हे साध्य करू शकता पण त्यासाठी तुम्हाला तज्ञांचं मार्गदर्शन घेणं अत्यंत गरजेचंय आणि मार्गदर्शनासोबतचं तुमच्यात पेशन्स असणं सुद्धा आवश्यकय. मंडळी इथं अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चंदनाची शेती कुणीही करु शकतं पण त्याची निर्यात मात्र वैयक्तिकरित्या शेतकऱ्याला करता येत नाही. फक्त सरकारच तुमच्या चंदनाची निर्यात करु शकतं आणि त्यासाठी वनविभागासारख्या काही सरकारी यंत्रणा काम करत असतात. म्हणजे एकदा का तुमची चंदनाची झाडं तयार झाली की त्याची माहिती तुम्हाला वनविभागाला द्यावी लागते. त्यानंतरच मग निर्यातीची प्रक्रिया पार पडते. तर अशी होती चंदन शेतीबद्दलची संपूर्ण माहिती. याबद्दल तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा. जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद..!!!
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply Cancel reply