पुतण्या गेला तरी हे निष्ठावान कार्यकर्ते अजून शरद पवारांच्याचं बाजूने !

काल दुपारी अजित पवारांनी राजभवनात जाऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातावर जाऊन जी टाळी दिली त्याचा खणखणाट आजून सगळ्या महाराष्ट्राच्या कानात घुमतोय. शरद पवारच आमचे नेते आहेत आणि मी कधीचं मूळ राष्ट्रवादी सोडून जाणार नाही, आता काय तुला हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का असं पत्रकाराला झापणारे अजित पवार आपल्या काकांच्या विश्वासाला असा तडा लावतील हे कुनाच्याचं ध्यानीमनी नव्हतं. पण आता झालंय, ते सुद्धा काकांच्या डोळ्यादेखत.

काल उभ्या महाराष्ट्रानं अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा आणि त्यांच्यासोबत गेलेल्या इतर नेत्यांच्या मंत्रीपदाचा शपथविधी सोहळा डोळे फासून पाहिला. अगदी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीपराव वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांसारखे शरद पवारांचे सावली बनून राहणारे नेते सुद्धा अजित पवारांसोबत गेले. ज्याची कुणीच अपेक्षा केली नव्हती. असो पण पुतण्या आणि दोस्तांनी काकांचा विश्वासघात केला असला तरी आजही राष्ट्रवादीचे असे काही नेते आहेत जे अजूनही शरद पवार यांच्यासोबत आपली निष्ठा राखून आहेत. थोरल्या पवारांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे आहेत. नेमके कोण आहेत ते नेते तेच आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणारंय…

सुप्रिया सुळे

तर मंडळी थोरल्या पवारांसोबत राहिलेल्या निष्ठावान नेत्यांपैकी पहिलं नाव येत ते म्हणजे अफकोर्स पवारांच्या कन्या आणि नामांकित खासदार सुप्रिया सुळे यांचं. अडचणीच्या काळात आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेली दिसतीये. त्याचंबरोबर आपण दादांच्या भुमिकेबद्दल नाराज नाही असंही सुप्रिया सुळे यांनी काल माध्यमांना सांगितलंय. सुळे यांनी घेतलेली ही समजूतदारपणाची भूमिका बघता पुढील काळात ताई आपल्या दादांचं मन वळवण्याचा ही प्रयत्न करताना दिसल्या तर नवल वाटायला नको.

जयंत पाटील

पुढचं मोठं नावय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. मागच्या काही दिवसापूर्वी जेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यात अश्रू आलेला नेता म्हणजे जयंत पाटील. जयंत पाटील यांना खऱ्या अर्थानं शरद पवार साहेबांची सावली मानलं जातं. दिवंगत नेते आर आर आबा यांच्यानंतर सातारा सांगली आणि कोल्हापूर भागात जयंत पाटील यांनीचं राष्ट्रवादीला तळागाळात पोहोचवण्याचं शिवधनुष्य पेललं. त्यामुळं शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली होती. जयंत पाटील वेळोवेळी त्यांच्या बोलण्यातून थोरल्या पवार साहेबांशी असलेली निष्ठा दाखवून देतात.

शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये सगळ्यात मुत्सद्दी नेता म्हणून त्यांची ओळखय. त्यामुळं येत्या काळात सोडून गेलेल्या आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात जयंत पाटील मागेपुढे पाहणार नाहीत हे नक्की. त्यासाठी आता शपथ घेतलेल्या नऊ आमदारांची आमदारकी रद्द करा अशी मागणीही त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केलीये.

जितेन्द्र आव्हाड

तिसरं महत्वाचं नाव म्हणजे मुंब्रा विधानसभेचे आमदार जिंतेन्द्र आव्हाड. आपल्या सडेतोड भाषणशैलीमुळं विरोधकांना शिंगावर घेणारे जिंतेन्द्र आव्हाड यांनी एकदा आपल्या भाषणात बोलताना शरद पवारांनी मला राजकारणात आणलं, निदान गिरणी कामगाराच्या मुलाला कोण नेता करतो, त्यामुळं शरद पवार माझ्यासाठी विठ्ठल आहेत असं म्हणत शरद पवारांची मर्जी संपादन केली होती. तसं पाहिलं तर जितेंद्र आव्हाड हे अजित पवार यांच्याही तितकेच जवळचे मानले जातात मात्र अडचणीच्या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या बाजूने राहणं पसंत केलंय. आव्हाडांची हीच निष्ठा त्यांच्या कामी आली कारण कालच्या प्रकरणानंतर शरद पवार यांनी त्यांना तातडीने विरोधीपक्षनेते पदी बसवण्याचा निर्णय घेतला. तसचं पक्षाच्या नवीन प्रतोद म्हणून ही त्यांचीचं निवड केलीये.

काल जेव्हा रागावलेल्या कार्यकर्त्यांनी फुटलेल्या आमदारांच्या फोटोना काळ फासण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी हातानं काळ पुसलं आणि राष्ट्रवादीच्या खऱ्या निष्ठावान विचारधारेचा विचार कार्यकर्त्यांना पटवून दिला.

रोहित पवार

चौथ नाव ऐकून तुम्हांला कदाचित आश्चर्य वाटणार नाही. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपले पक्षाध्यक्ष आणि नात्याने आजोबा असणाऱ्या शरद पवार यांच्यासोबत राहण पसंत केलंय. खर तर आता जनमाणसात रोहित पवार यांना शरद पवारांची छबी म्हणून ओळखलं जातय. अगमतदारसंघात विकासकामाचे निर्णय घेण्यापर्यत रोहित पवार आपल्या आजोबांना फॉलो करताना दिसतात. वेळोवेळी जाऊन त्यांच मार्गदर्शन घेतात. त्यामुळं यावेळी ही त्यांनी राष्ट्रवादीच्या मूळ विचारधारेसोबत म्हणजे शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय. एवढचं काय कालपासून त्ये प्रत्येकक्षणी शरद पवार यांच्यासोबतचं असलेले पाहायला मिळतायत.

आजही शरद पवार आपले गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर दर्शनासाठी गेलेले असताना रोहित पवार हे आपल्या आजोबासोबतचं खांद्याला खांदा लावून फिरताना दिसले.

श्रीनिवास पाटील

पाचवं महत्वाचं नाव म्हणजे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील. यार, सखा, दोस्त, मित्र असं शरद पवार आणि श्रीनिवास पाटील याचं नातं. अगदी रक्ताचे नसले तरी मैत्रीने भाऊ झालेले खासदार श्रीनिवास पाटील यांनी ये दोस्ती हम नहीं तोडेंगे म्हणत आपल्या दोस्तासोबत राहून लढण पसंत केलंय. तुम्हांला माहिती असेल २०१९ साली जेव्हा उदयराजेंनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक जिंकून सुद्धा बीजेपीत प्रवेश केला होता. तेव्हा पोटनिवडणुकी दरम्यान उदयनराजेसमोर लढण्यास कुणीच तयार होत नव्हतं.

पण फक्त शरद पवार यांच्या शब्दाखातर मागची पुढची पर्वा न करता श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादीकडं विजयश्री खेचून आणलं होती. त्यामुळं या पडत्या काळात देखील श्रीनिवास पाटील आपल्या दोस्ताच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहतील यात वाद नाही.

अनिल देशमुख

पुढचं महत्वाच नाव म्हणजे अनिल देशमुख. प्रसंगी अगदी जेलमध्ये जाऊन शिक्षा भोगली पण तगडी ऑफर मिळून सुद्धा सुटकेसाठी पक्षाशी गद्दारी केली नाही असा दावा करणाऱ्या अनिल देशमुखांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची साथ देणं पसंत केलंय. मी जर ऑफर स्वीकारली असती तर महाविकास आघाडीचं सरकार मागेच पडलं असतं असंही अनिल देशमुख एकदा म्हणाले होते. अनिल देशमुख शरद पवार यांच्या सर्वात निष्ठावान कार्यकर्त्यापैकी एक मानले जातात कारण २०१९ मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांनी मनमानी केली तर त्यांना शह देता यावा म्हणून शरद पवार यांनी आपल्या मर्जीतल्या अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद दिलं होतं. यावरून अनिल देशमुख आणि शरद पवार यांचे लागेबंधे कसे आहेत याचा अंदाज तुम्हांला येईल.

राजेश टोपे

पुढचं महत्वाचं नाव म्हणजे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे. जालनाच्या घनसावंगी विधानसभेवर निवडून आलेले राजेश टोपे मराठवाड्यातला राष्ट्रवादीचा सर्वात प्रभावी चेहरा म्हणून मागच्या काही काळापासून नावारूपाला आलेलेयेत. कोरोनाकाळात त्यांनी महाराष्ट्रात घेतलेले निर्णय आणि कामाप्रती दाखवलेली तत्परता कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळं राजेश टोपे शरद पवार यांच्या मर्जीतले नेते बनले होते अन आजही अवघड काळात त्यांनी ते दाखवून दिलं. त्यांच्यानंतर काही खास नावं घ्यायची झाल्यास, बीडचे संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब पाटील, सुनील भुसारा, कोरेगावचे शशिकांत शिंदे, सोनिया दुहन, अंकुशराव काकडे, फौजिया खान या नेत्यानीही आपण अद्याप शरद पवार यांच्यासोबतचं आहोत असल्याचं स्पष्ट केलंय.

पण गेलेल्या नेत्यामध्ये अमोल कोल्हे, अमोल मिटकरी यांच्यासह टोटल ४२ आमदारांचा अजित पवारांना पाठींबा असल्याचं बोललं जातंय. पण स्वतः शरद पवार यांच्या भाषेत या राजकीय बंडाची उकल करायची झाल्यास थोरले पवार म्हणतात,

हे राजकीय बंड माझ्यासाठी नवीन नाही, १९८० साली माझे ५८ आमदार निवडून आले होते. मी त्या ५८ जणांचा विरोधीपक्षनेता झालो होतो. पण नंतर त्यापैकी ५ उरले आणि बाकीच्यांनी पक्ष सोडला. मग मी त्या पाच जणांना घेऊन पुन्हा एकदा पक्ष बांधायला सुरुवात केली. त्यांनतर निवडणूक झाली आणि माझ्या आमदारांची संख्या ६१ वर गेली. आम्हांला सोडून गेलेल्यापैकी चार पाच मोठे नेते सोडले तर कुणीच निवडून आलं नाही. त्यामुळं मला आता सोडून गेलेल्या आमदारांची चिंता वाटते, ते पुन्हा निवडून येतील का नाही याची शंका वाटते. कारण मी आता पुन्हा एकदा १९८० सारखं चित्र महाराष्ट्रात कसं उभं करता येईल याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेणारय.

शरद पवार याचं ह्ये कालच विधान आणि आता त्यांनी सातारा भागात काढलेला शक्ती प्रदर्शनाचा ताफा, मागच्या वर्षी पावसात उभं राहून केलेलं भाषण, महाराष्ट्राच्या तरुणांना घातलेली भावनिक साद आणि शरद पवार यांचा निर्धार या सगळ्या गोष्टी आता येत्या काळात महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने सोडून गेलेल्या नेत्यांच्या राजकारणाची दिशा ठरवणार हे नक्की. बाकी पडत्या काळात थोरल्या पवार यांच्याशी निष्ठा ठेवलेल्या नेत्याबद्दल तुमची मतं नेमकी काय आहेत त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.

अजित पवार बंडाचं संपूर्ण विश्लेषण इथे पाहा

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

abp majha liveabp maza liveabp maza marathi liveajit pawarajit pawar deputy cmajit pawar in bjpajit pawar latestajit pawar latest newsajit pawar latest speechajit pawar liveajit pawar live newsajit pawar ncpajit pawar newsajit pawar news liveajit pawar oathajit pawar speechajit pawar speech liveajit pawar today newsajit pawar today speechdcm ajit pawardeputy chief minister ajit pawardeputy cm ajit pawarlatest news ajit pawarlive marathi newsmaharashtra political crisismaharashtra politics crisismarathi newsncpsharad pawarsharad pawar on ajit pawarअजित पवारअजित पवार उपमुख्यमंत्रीअजित पवार शपथआदिती तटकरेआदित्य ठाकरेदिलीप वळसे पाटीलमहाराष्ट्र राजकारण घडामोडी लाईव्हमहाराष्ट्राचे राजकारणराष्ट्रवादीराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादीचे विभाजनशरद पवारशिंदे फडणवीस सरकारशिंदे सरकारसुप्रिया सुळे पत्रकार परिषद
Comments (0)
Add Comment