बारामतीच्या शक्तिप्रदर्शनातून अजित पवार यांनी या तीन चाली खेळल्यात | Ajit Pawar Baramati Sabha | Vishaych Bhari

जवळपास दोन महिन्यांच्या अंतरानंतर अजित दादांनी आज बारामतीला भेट दिली.‌आणि ती ही अशी तशी नाही तर वाजत गाजत. हार फुलांच्या वृष्टीसह दादांच्या कार्यकर्त्यानी त्यांचं बारामतीत जोरदार स्वागत केलं. एका बहाद्दराने तर क्रेनला लटकून अजित दादा़ंना हवेतूनच हार घालायची हौस पूर्ण करून घेतली. पण अजित दादांनी नेमकं हे शक्ती प्रदर्शन का केलं ? या शक्तिप्रदर्शनातून त्यांनी नेमक्या कुठल्या चाली खेळल्यात. चला सगळंच सविस्तरपणे समजावून घेऊयात.

१) राष्ट्रवादीत अजित दादाच सबकुछ‌ आहेत, हे दाखवून देणं.

( Ajit Pawar Baramati Sabha | Vishaych Bhari )

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या झंझावाती सभा राज्यभर पार पडतायत. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापासून सुरू झालेल्या शरद पवारांच्या सिंपथी गेमनं येवला, बीड आणि कोल्हापूरमध्येही जोरदार गर्दी जमवली. त्यामुळे अजित दादा उपमुख्यमंत्री होऊनही शरद पवार हेच राष्ट्रवादीत सेंट्रल point ला आले. आता हे narration खोडून काढायचं असेल तर फक्त शरद पवार यांच्या मागोमाग त्या त्या जागेवर सभा घेतल्या असत्या तर अजित दादांची राजकीय फरफट झाली असती. म्हणून तर अजित दादांनी शक्तिप्रदर्शनाला बारामती हे होम ग्रांऊड निवडलं आणि दाखवून दिलं की आता इथूनपुढे राष्ट्रवादीत सबकुछ अजित दादा असतील म्हणून. आज जमलेली गर्दी हेच सांगत होती. दुसरं म्हणजे शरद पवारांच्या सभेपाठोपाठ उत्तर सभा घेण्याचं अजित दादांनी प्रकर्षानं टाळलं. उलट बारामती हा फ्रेश आणि स्वतः चा गडच शक्तिप्रदर्शनासाठी निवडला. आता कदाचित अजित दादांच्या सभेला होऊ शकणारी संभाव्य गर्दी बघता काल शरद पवार, सुप्रिया सुळेंनी म्हणूनतर मुद्दामहून राष्ट्रवादीत फूट नाही. अजित दादा हे आमचेच नेते आहेत. असं म्हणलंय. अजित दादांना या शक्तिप्रदर्शनाचं कंप्लीट मायलेज उचलू द्यायचं नाही हा त्यामागचा प्रमुख उद्देश असावा. नंबर दोनचा फायदा म्हणजे,

२) बारामतीत अजित दादा गटात इनकमिंग वाढेल.

( Ajit Pawar Baramati Sabha | Vishaych Bhari )

आज बारामतीत अजित दादांच्या स्वागतासाठीची गर्दी बघता येत्या काळात शरद पवार गटात जाणारी कार्यकर्त्यांची पाऊलं कदाचित अजित दादा गटाकडे वळतील. शिवाय बारामती लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजप मधूनही अजित दादा गटात उद्याच्या काळात पक्षप्रवेश होऊ शकतील. बारामतीतील ग्रामपंचायत पातळीपासून ते अगदी राज्यभरातील लोकांपर्यंत आजची गर्दी हा एकप्रकारे मेसेज होता. आता आगामी काळात राज्यात महानगरपालिका, पंचायत समिती, तसेच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यादृष्टीने आजचं अजित दादांचं पाऊल‌ म्हणूनच अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे.‌ तिसरा मुद्दा म्हणजे,

३) महायुतीतला मेन चेहरा तसेच भावी मुख्यमंत्री.- अजित दादा.

( Ajit Pawar Baramati Sabha | Vishaych Bhari )

अजित दादांनी आजच्या शक्तिप्रदर्शनातून जसा शरद पवार गटाला इशारा दिला त्याचबरोबर हा ईशारा त्यांनी महायुतीतील फडणवीस, शिंदे या नेत्यांना ही दिलाय. कांद्याच्या प्रश्नावर फडणवीसांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेच्याआधी लीड घेऊन थेट जपानमधून निर्णय घेतला. एकनाथ शिंदेही बर्‍याचदा फडणवीसांना cross करतात. पण या सगळ्यात अजित दादांनीही स्वतः च्या मतदारसंघात आपली ताकद किती आहे हे अप्रत्यक्षपणे दाखवून भलेही आपण उप मुख्यमंत्री असू पण महायुतीतील सर्वाधिक जनमत असलेला नेता आपणच आहोत हे दाखवून दिलंय. या शक्तिप्रदर्शनातून अजित दादांनी भाजप पक्षश्रेष्ठींना आपण शिंदे गटापेक्षा भाजपच्या जास्त उपयोगाचे आहोत हे सुद्धा दाखवून दिलंय. एकूणच कार्यकर्त्यांच्या खुल्या मनातील आणि अजित दादांच्या सुप्त भावनेतील भावी मुख्यमंत्री बनण्याच्या दिशेतून अजित दादांनी उचललेलं हे पाऊल त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या दृष्टीने आज अतिशय महत्वाचं असं ठरलं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय आजच्या या शक्ती प्रदर्शनातून अजित दादांनी अजून काय कमवलंय ? तुमच्यालेखी बारामतीचा पावरफुल नेता कोण अजित दादा की शरद पवार ? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.

Baramati च्या शक्तिप्रदर्शनातून Ajit Pawar यांनी ही गेम फिरवलीये | Ajit Pawar Baramati Sabha

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ajit pawar baramatiajit pawar baramati sabhaajit pawar baramati todayajit pawar comedy speechajit pawar interviewajit pawar latestajit pawar latest newsajit pawar latest speechajit pawar liveajit pawar ncpajit pawar newsajit pawar news liveajit pawar pimpri chinchwad bhashanajit pawar speechajit pawar today speechbreaking newssharad pawarsharad pawar entrysharad pawar latest speechsharad pawar news today livesharad pawar on ajit pawarsharad pawar speech kolhapurvishay bharivishaych bharivishaychbhariविषय भारीविषयच भारी
Comments (0)
Add Comment