जरांगे पाटलांच्या सभांमुळे मराठा समाजाचे हे ५ नेते पडतील | Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhari


मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःला मराठा समाजाचा नेता म्हणून सिद्ध केलं आहे. राज्याच्या विधिमंडळात म्हणजेच विधानसभा आणि विधानपरिषदेत मिळून 60 टक्क्यांहून अधिक मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी असताना आज मनोज जरांगे हे राज्यातील बहुसंख्य मराठा बांधवांना आपले खरे प्रतिनिधी वाटू लागले आहेत. राज्याचे सर्वाधिक मुख्यमंत्री मराठा जातीचे असूनसुद्धा मराठा समाजावर कायम अन्याय झाल्याची भावना आजचे मराठा आंदोलक करतायत. साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ थिंक बँक चॅनेलवरील एका मुलाखतीत म्हणतात,

“मराठ्यांना आरक्षण हवंय ही मागणी अगदी अलीकडे म्हणजे मागील १२-१५ वर्षांत जोर धरू लागली आहे. त्याआधी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत नव्हता असं नाही. मात्र आरक्षण घेणं हे मराठा समाजाला कमीपणाचं वाटायचं. मात्र आरक्षणामुळे ओबीसी आणि इतर समाजाला होत असलेले फायदे पाहून मराठा समाजातील काही लोक जागरूक झाले. शासन व्यवस्थेत ओबीसींचा वाढलेला टक्का पाहून आपण मागे पडतोय अशी भावना मराठा बांधवांमध्ये निर्माण होऊ लागली. हे असंच चालू राहिलं तर आपली पीछेहाट होईल अशी भीतीही मराठ्यांना वाटू लागली. आणि मग त्यातूनच आरक्षणाच्या मागणीने जोर धरला.”

विनोद शिरसाठ

शिरसाठ यांच्या या वक्तव्याचा गांभीर्याने विचार केला तर इतर कुणापेक्षा आपण मागे पडू नये ही भावना आरक्षण मागण्यामध्ये असल्याची दिसून येते. या आरक्षणासाठी आतापर्यंत नारायण राणे, गायकवाड आणि नुकतीच स्थापन करण्यात आलेली निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अधिपत्याखालील समिती या सरकारतर्फे करण्यात आलेल्या हालचाली होत्या. शिंदे समितीचा अहवाल अजून प्रस्तावित आहे. मात्र मागील २ समित्यांनी केलेली आरक्षणाची मागणी पुढे सर्वोच्च न्यायालयात टिकू शकली नाही. अशातच नारायण राणे यांनी 96 कुळी मराठे आणि कुणबी हे वेगळे आहेत असं सांगत मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण नकोय असं भाष्य नुकतंच केलं. एकूणच मराठा आरक्षणाचं घोंगडं भिजत ठेवण्याकडेच सर्व सत्ताधारी मंडळींचा कल दिसून येत आहे. असं असताना सरकारला आरक्षण द्यावच लागेल. आम्ही आधीपासूनच आरक्षणात आहोत असं ठाम मत जरांगे पाटील मागील दोन महिन्यांपासून करत आहेत. राज्यातील कोट्यवधी मराठयांना सोबत घेऊन मराठा आरक्षणाची लढाई तीव्र करणाऱ्या जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका सत्ताधारी पक्षातील मराठा आमदारांना बसू शकतो. आरक्षण देण्यासाठी जरांगेनी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत २ दिवसांत संपत आहे. सरकारने ३० ऑक्टोबरपर्यंत वाढीव मुदत मागितली असली तरी आरक्षणाविषयी खात्रीशीर काही सांगता येईल अशा परिस्थितीत सरकारही दिसत नाही. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं नाही तर त्याचं खापर विद्यमान सरकारवर फुटण्याची शक्यता आहे. असं झालं तर राज्यातील कोणत्या मराठा नेत्यांना याचा फटका बसू शकेल याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा..!

(Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhari)

या यादीत पहिलं नाव आहे ते म्हणजे नितेश राणे यांचं. नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे आपल्या फटकळ बोलण्यासाठी कायम चर्चेत असतात. त्यांच्या आमदारकीची वाटचाल भाजप व्हाया काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष अशी झाली आहे. नारायण राणे यांच्या राजकीय वर्चस्वाचा फायदा घेत ते ठाकरे आणि पवार कुटुंबावर कायम तोंडसुख घेत आलेत. सध्या त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त आहे. भाजपमध्ये गेल्यापासून त्यांच्यातील कट्टर हिंदुत्व जागं झालं आहे. मागील महिन्यात जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला भेट देऊन आल्यानंतर पुण्यातील पुण्येश्वर मंदिर परिसरात त्यांनी प्रक्षोभक विधानं केली होती. सध्या सरकार त्यांच्याच पक्षाचं असल्याने कुणी कारवाई करेल अशी शक्यता कमीच म्हणायची. असो. पण राज्यातील धार्मिक विद्वेषाचं नरेटिव्ह जरांगे यांच्या आंदोलनाने जातीभोवती केंद्रित झालं आहे ही गोष्ट खरी. आता लोक हिंदू – मुस्लिम अशी चर्चा करत नाहीत, ते मराठा-ओबीसी-धनगर-आदिवासी या विषयांवर बोलतात. असो,तर नितेश राणेंचं नाव घ्यायचं कारण म्हणजे त्यांच्या वडिलांनी धुडकावलेली सरसकट कुणबी आरक्षण मिळण्याची मागणी. शिवाय अधूनमधून राणे पिता-पुत्र जरांगे यांना वेगवेगळ्या प्रकारचे सल्लेही देत आहेत. भाजपची आरक्षणविषयक संदिग्ध भूमिका कोकणी जनतेला पटली नाही तर त्याचा फटका नितेश राणे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच बसू शकतो. राणेंप्रमाणेच आता शिंदे गटाचे कोकणचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही जरांगे विरूद्ध भूमिका घेतली आहे. आणि त्यांच्या अभ्यासावरही शंका उपस्थित केली आहे. ठाकरे विरुद्ध राणे हा सामना रंगत असताना मराठा आरक्षणाची ही फोडणी ठाकरेंना इथं फायद्याची ठरू शकते ही अटकळ सध्या त्यामुळे बांधता येते.

(Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhari)


या यादीत दुसरं नाव आहे ते एकनाथ शिंदे यांचे विश्वस्त संदिपान भुमरे यांचं. भूमरे यांना पहिल्याच मंत्रिमंडळात स्थान मिळालं. वेळच्या वेळी ठाकरे कुटुंबावर टीका करायची संधी मिळाली. मात्र तरीही त्यांच्या मंत्रिपदाची कामगिरी म्हणावी तशी खास राहिली नाही. मागे काही महिन्यांपूर्वी शिंदेंच्या जवळच्या ५ मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याच्या बातम्या माध्यमात चालू लागल्यानंतर शिंदेंना महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेता दर्शवणाऱ्या जाहिराती वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर झळकल्या होत्या. या जाहिरातीने शिंदे-फडणवीस यांच्यात सगळं आलबेल आहे ना? याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र त्यानंतर भुमरे आणि इतर मंत्र्यांच्या डच्चूची बातमी मागे पडली. संदीपान भुमरे हे मराठा समाजातून येत असले तरी संभाजीनगर भागात त्यांना भाजप, ठाकरे गट, एमआयएम यांच्या एकत्रित आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. १६ अपात्र आमदारांच्या यादीत भुमरे यांचंही नाव असल्याने भुमरे सध्या अपात्रता, मराठा आरक्षण मुद्दा, लोकांची नाराजी आणि अंतर्गत राजकारण अशा चक्रव्युव्हात अडकल्याचं दिसत आहे.

(Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhari)

या यादीत तिसरं नाव आहे ते साताऱ्याचे पालकमंत्री आणि अजित पवार गट सत्तेत सहभागी होईपर्यंत प्रतीमुख्यमंत्री म्हणून वावरणारे तडफदार नेते शंभूराजे देसाई यांचं. पाटण भागात देसाई विरुद्ध पाटणकर हा संघर्ष फार जुना आहे. विक्रमसिंह पाटणकर यांनी आपली सूत्रं आता सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हवाली केली आहेत. मागील २ टर्म आमदार म्हणून निवडून आलेल्या शंभूराज देसाई यांना राज्य उत्पादन शुल्क, गृहराज्यमंत्रीपद, सातारा आणि ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अशी महत्वाची पदं मागील काही वर्षांत मिळाली आहेत. देसाई तसे फडणवीस आणि शिंदे दोघांच्या जवळचे. मात्र अजित पवारांशी त्यांचं विशेष जमत नाही. आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरलं तर त्याचा काही अंशी फटका शंभूराज देसाई यांना मतदारसंघात बसू शकतो. शिवाय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यांचा हिशोबही त्यांना मतदारसंघातील शिवसैनिकांना द्यावा लागेल.

(Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhari)

शिवसेना शिंदे गटातील १६ अपात्र आमदारांमध्ये असणाऱ्या महेश शिंदे, अनिल बाबर, संजय शिरसाट, दादा भुसे, भरत गोगावले आणि तानाजी सावंत या इतर आमदारांची स्थितीही कमी-अधिक प्रमाणात अशीच आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी मागील वर्षभरात मराठवाडा, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग पिंजून काढत या आमदारांविरोधात जनतेचा रोष वाढवण्याचं काम केलंय. जरांगे पाटील यांच्या सभांमध्ये कुठेच ठाकरे गटावर टिप्पणी ऐकायला मिळाली नाही. त्यामुळे ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेला शिवसैनिक + मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे दुखावलेला मराठा समाज बांधव यांचं एकगठ्ठा मतदान या उमेदवारांविरोधात गेलं तर त्यांना ते अडचणीचं ठरू शकतं. शिवसेनेच्या या उमेदवारांव्यतिरिक्त भाजपचे मराठवाड्यातील आमदार ज्यामध्ये भोकरदनचे संतोष दानवे, निलंग्याचे संभाजी पाटील निलंगेकर, औसा येथील अभिमन्यू पवार, तुळजापूर येथील राणा जगजितसिंह पाटील, नांदेड, नायगावचे राजेश पवार, श्रीगोंद्याचे बबनराव पाचपुते, पाथर्डीच्या मोनिका राजळे, दौंड येथील राहुल कुल या आमदारांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं. जरांगे यांच्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र भागांत झालेल्या सभांचा परिणाम म्हणून या आमदारांचा ठळकपणे उल्लेख करता येतो.

(Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhari)

तर अजित पवार गटातून माजलगाव येथील प्रकाश सोळंके, अहमदपूर येथील बाबासाहेब पाटील, हिंगोलीत राजू नवघरे, माढा येथील बबन शिंदे, करमाळा येथील संजय शिंदे, कोपरगाव येथील आशुतोष काळे, हवेलीतील दिलीप मोहिते या मराठा आमदारांना जरांगे पाटील आणि पर्यायाने मराठा आंदोलकांपासून येत्या निवडणूकीत धोका आहे. मनोज जरांगे यांनी आवाहन केल्यानुसार आपल्या गावात मराठा आमदारांना फिरकू देऊ नका या सुचनेची अंमलबजावणी काही भागातील गावकऱ्यांनी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं सत्ताधारी भाजप – शिंदे गट आणि अजित पवार गट यांना हे प्रकरण हलक्यात घेऊन चालणार नाही. याशिवाय कांग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्या पक्षातील जे मराठा आमदार मतदारसंघात लक्ष देत नाहीत, सामान्य मराठा बांधवांना दुय्यम वागणूक देतात त्यांनाही मतपेटीतून झटका देण्याचं काम आंदोलक करू शकतात. निवडणुकीचं घोडेमैदान लांब असलं तरी मराठा आरक्षणाची ताजी ठिणगी पडून आता २ महिने पूर्ण होतील. त्यामुळं आपापले गड राखण्यासाठी या मराठा आमदारांना प्रयत्नांची शर्थ करावी लागेल एवढं नक्की..

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

(Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhari)


एकूणच सध्याच्या घडीला मनोज जरांगे पाटील हे नाव‌ राज्याच्या राजकारणातील टंपकार्ड सिद्ध होताना दिसतंय.बाकी तुम्हाला काय वाटतंय? मनोज जरांगे पाटलांच्या रूपात प्रस्थापित मराठा नेत्यांना बाजूला सारून नवीन नेतृत्व तयार व्हावं का? या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्याजरांगे पाटलांचा करिश्मा अजून किती काळ टिकेल? ते स्वतः सक्रिय राजकारणात उतरतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

जरांगे पाटलांच्या सभांमुळे मराठा समाजाचे हे ५ नेते पडतील | Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

manoj jarange patilmanoj jarange patil akluj sabhamanoj jarange patil antarwalimanoj jarange patil baramati sabhamanoj jarange patil biographymanoj jarange patil dahiwadi sabhamanoj jarange patil khed sabhamanoj jarange patil live news todaymanoj jarange patil live rajgurunagarmanoj jarange patil live sabha 14 octobermanoj jarange patil live sabha rajgurunagmanoj jarange patil phaltan sabha livemanoj jarange patil speechvishay bharivishaych bharivishaychbhariमनोज जरांगे पाटीलविषय भारीविषयच भारी
Comments (0)
Add Comment