या ७ पुतण्यांनी पण त्यांच्या काकांची परफेक्ट गेम केलीये !

चार दिवसापूर्वी राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि नात्याने त्यांचे काका असणाऱ्या शरद पवारांना चेक अँड मेट केलं. खरं तर 2019 मध्येचं पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून Ajit Pawar आणि Sharad Pawar यांच्यात धुसफूस वाढली होती. तेव्हापासूनच अजित पवार यांच्या भूमिका सातत्याने बंडाच्या दिशेने जाणाऱ्या वाटत होत्या. त्यात पहाटेचा शपथविधी, शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडायची घोषणा केल्यानंतर झालेली तगमग, Supriya Sule यांना पक्षाची कार्यकारी अध्यक्ष केल्यानंतर बोलून दाखवलेली नाराजी आणि आता भाजप शिवसेनेबरं सत्तेत घेतलेली उडी या सगळ्या घटना अजित पवार यांनी मी आता काकांच्या सावलीखाली राहणार नाही याची दिलेली ग्वाही होती. पण महाराष्ट्राच्या राजकारणात काकांच्या विरोधात जाणारे एकमेव अजित पवार आहेत का तर नाही. पवार कुटुंबासारखं आणखी सात कुटुंबातल्या पुतण्यांनी काकांना ओव्हरटेक करून त्यांच्या राजकारणाला सुरुंग लावलेलाय, नेमक्या कोणत्या आहेत त्या काका पुतण्यांच्या जोड्या चला पाहूयात…


तर लिस्टमध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे – राज ठाकरे यांचं.

balsaheb thackeray,
raj thackeray,
balasasaheb thakre,
raj thakre

शिवसेना प्रमुख Balasaheb Thackeray हे महाराष्ट्रातील आजवरचे सर्वात प्रभावी नेते. 1966 साली त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रभर पक्ष वाढवत नेला. कालांतरानं ठाकरे कुटुंबातील राज ठाकरे हे राजकारणात आले आणि शिवसेनेत सक्रिय झाले. Raj Thackeray हे बाळासाहेबांचे बंधू संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे सुपुत्र. बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवत राज ठाकरे राजकारणात आले. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली. विद्यार्थी सेना राज्यभर पसरवण्यात राज यांनी जराही कसर सोडली नाही. आपल्या काकांसारखंच व्यक्तिमत्व, आक्रमक बोलण्याची ठाकरे शैली यामुळं राज ठाकरे हेच पुढं जाऊन बाळ ठाकरेंचे राजकीय वारसदार होतील अशी सर्वाना खात्री होती. मात्र  30 जानेवारी 2003 हा दिवस राज ठाकरेंच्या राजकीय आयुष्याला सुरुंग लावणारा ठरला. त्या दिवशी महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनात राज ठाकरे यांना बाळासाहेबांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करावी लागली. त्यामुळं उद्धव हेच बाळासाहेब ठाकरे आणि पर्यायानं शिवसेनेचे वारसदार राहतील यावर शिक्कामोर्तब झालं. ती घटना म्हणजे राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का होता. पुढं निर्णयप्रक्रियेत सामावून न घेणं, राज ठाकरेंच्या मर्जीतल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना डावललं जाणं यामुळं राज यांची शिवसेनेत घुसमट वाढली. दरम्यान त्यापूर्वी छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांनीही घुसमट आणि इतर काही कारणामुळं सेना सोडलेली होतीच. त्याचीचं पुनरावृत्ती 27 नोव्हेंबर 2005 रोजी झाली. त्यादिवशी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. असं म्हणतात की त्यावेळी बाळासाहेबांनी राज ठाकरेंची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण राज ठाकरे काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यावेळी महाराष्ट्राला ठाकरे कुटुंबातील ‘काका-पुतण्याचा वाद पाहायला मिळाला. पुढं जाऊन राज ठाकरे यांनी आपली स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल सुरू केली आणि ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तिथून पुढचा इतिहास तुम्ही जाणताच, बाळासाहेबांच्या निधनानंतर आजही उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातलं राजकीय वैर मिटलेलं नाही.


दुसरी जोडीय गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे.

मुंडे कुटुंबातला हा काका पुतण्याचा वाद सुद्धा जगजाहीरय. भाजपचे दिवंगत नेते Gopinath Munde आणि त्यांचे मोठे बंधू पंडीतअण्णा मुंडे हे बीडच्या राजकारणात पॉवरफुल होते. त्यापैकी गोपीनाथ मुंडे राज्याच्या राजकारणात छाप पाडून होते तर पंडीतअण्णा मुंडे स्थानिक राजकारण संभाळण्याची जबाबदारी पाड पाडत होते. गोपीनाथ मुंडेंमुळे पंडीतअण्णा मुंडे यांना राजकीय प्रतिष्ठा मिळाली असं जाणकारांचं म्हणणंय. दरम्यान पंडितआण्णाचे सुपुत्र धनंजय मुंडेही सुरवातीला भाजपकडून जिल्हा परिषदेत सदस्य झाले होते. त्यानंतर ते भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष झाले. दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष झाले. 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे जेव्हा राष्ट्रीय राजकारणात गेले, तेव्हा Dhananjay Munde यांना वाटत होते, की त्यांना राज्याच्या राजकारणात काकांची जागा मिळावी. पण, त्याच काळात महिला बचत गट, जलसंधारणाची कामांतून गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे मतदारसंघात सक्रीय झाल्या होत्या. धनंजय मुंडे सक्रीय राजकारणात असूनही ऐनवेळी पंकजा यांचं नाव प्रोजेक्ट केलं जाऊ लागल्यामुळं ते नाराज झाले. त्या दरम्यान त्यांची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपने त्यांना विधान परिषदेवर घेतलं. त्यानंतर 2012 मध्ये नगरपालिका निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी काही भाजप व राष्ट्रवादीकडून समर्थक निवडून आणले. दरम्यान आपल्या राजकीय ताकदीचा अंदाज घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांचा गट करून अजित पवार यांच्या साक्षीने राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हापासून मुंडे कुटुंबातील वादाला सुरवात झाली. असं म्हणतात की शरद पवार गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीमुळं धनंजय मुंडे यांना सोबत घेण्यास राजी नव्हते पण अजित पवार मात्र धनंजय मुंडे यांच्याबद्दल पॉजिटीव्ह होते. कदाचित आज त्याची जाण ठेवूनच धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांना समर्थन दिलेलं दिसतंय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीत अपघाती मृत्यू झाला. अन त्यानंतर धनंजय मुंडे हे सातत्याने पंकजा मुंडे यांच्यासमोर कडवं आव्हान उभं करत आहेत.

तिसऱ्या जोडीचं नावय सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे.

sunil tatkare,
avdhut tatkare,

राष्ट्रवादीचे खासदार Sunil Tatkare आणि माजी आमदार Avdhut Tatkare या काका-पुतण्यांची जोडीत काही वर्षांपूर्वी वाद रंगला होता. अवधूत तटकरे यांच्याकडे सुनील तटकरे यांचा राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जात होतं. मात्र सुनील तटकरे यांचे पुत्र अनिल तटकरे आणि कन्या आदिती तटकरे यांची राजकारणात एन्ट्री झाली. त्यामुळे अवधूत तटकरे यांचं संघटनेतलं महत्वं कमी होऊ लागलं. परिणामी पुढं काका-पुतण्यांमध्ये वाद पेटला. तेव्हा स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यस्थी करत काका पुतण्यांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता मात्र पवारांनाही यात यश आलं नव्हतं. अवधूत तटकरे यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीचा हात सोडत तत्कालिन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर 2 वर्षांनी अवधूत तटकरे यांनी 14 ऑक्टोबर 2022 रोजी भाजपमध्ये प्रवेश केलाय. आता अजूनही तटकरे कुटुंबातील काका पुतण्यामधला वाद ज्वलंत आहे.

चौथ नाव येतं ते म्हणजे अशोक पाटील निलंगेकर आणि संभाजी पाटील निलंगेकर यांचं.

एकेकाळी राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या शिवाजीराव निलंगेकर यांच्या कुटुंबालाही काका-पुतण्याचा वाद सुटला नाही. राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अशोक पाटील निलंगेकरांना उमेदवारी दिली होती. स्थानिक राजकारणावर Ashok Patil Nilangekar चांगले प्रभाव टाकून होते. ते अनेक वर्षं जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले होते. एकदा तर अध्यक्षही होते. त्यावेळी भाजपने डाव खेळला आणि अशोक पाटील यांचे पुतणे Sambhaji Patil Nilangekar यांना निलंगा मतदारसंघात ताकद आणि उमेदवारी दिली. त्याचा परिणाम म्हणजे पुतण्यानं काकांचा 21 हजार मतांनी पराभव केला. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर आणि त्यांचे नातू संभाजी निलंगेकर यांच्यातही थेट दोन वेळा लढत झाली होती. त्यात एक वेळा संभाजी पाटील जिंकलेही होते. तसेच संभाजी यांच्या आई रूपाताई निलंगेकर यादेखील 2004 साली भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. 2014 मध्ये मात्र आपल्या वडिलांच्या जागेवर अशोक पाटील निलंगेकर उभे राहिले. त्यांच्या विरोधात त्यांचे पुतणे संभाजी पाटील निलंगेकर उभे राहिले होते. पुढं संभाजी पाटील निलंगेकर हेच निवडून येऊन लातूरचे पालकमंत्री बनले होते.

पाचव्या जोडीचं नावय अनिल देशमुख आणि आशिष देशमुख.

anil deshmukh,
ashish deshmukh,

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत Anil Deshmukh आणि त्यांचे पुतणे काँग्रेसचे माजी आमदार Ashish Deshmukh यांच्यात ही वादाची ठिणगी पडलेलीय. काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर लगेचच आशिष देशमुख यांनी काका अनिल देशमुख यांच्याविरोधात रणशिंग फुंकलेलं पाहायला मिळालं. नरखेड ही बाजार समिती अनिल देशमुख यांच्या ताब्यातय. पण अनिल देशमुख यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी नरखेड बाजार समितीच्या सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता. तसं पाहिलं तर अनिल देशमुख आणि आशिष देशमुख यांच्यात राजकीय संघर्षाची ही पहिलीच वेळ नव्हती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काटोल मतदारसंघातून आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली होती. तिथं काकांचा मोठ्या फरकानं पराभव करून पुतण्या आमदार झाला होता. मात्र, नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचा परिणाम उलटा झाला आणि २०१९ मध्ये काका अनिल देशमुख पुन्हा निवडणूक जिंकून आमदार झाले. २०१९ ला आशिष देशमुख यांनी काँग्रेस पक्षात असताना थेट देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नागपूरमध्ये निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना हार मिळाली होती. मागच्या काही काळात आशिष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळं त्यांच्यावर काँग्रेसमधून निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर आता जखमी मनानं आशिष देशमुख काकांच्या विरोधात दंड थोपटण्यासाठी भाजपमध्ये गेले आहेत.

पुढची म्हणजे सहावी जोडीय जयदत्त क्षीरसागर – संदीप क्षीरसागर यांची.

बीडचं मोठं राजकीय घराणं म्हणजे क्षीरसागर घराणं. धनंजय मुंडे यांच्यावरच्या नाराजीतून Jaydatt Kshirsagar यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने याच मतदारसंघातून Sandip Kshirsagar यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बीड मतदारसंघातली लढत ही केवळ दोन विरोधी नेत्यांमधली न राहता काका – पुतण्यातली लढत झाली. क्षीरसागर कुटुंबाच्या तीन पिढ्या राजकारणात आहेत. केशरबाई क्षीरसागर या काँग्रेसच्या खासदार होत्या. जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर आणि रवींद्र क्षीरसागर ही त्यांची तीन मुलं आजही राजकारणात आहेत. आईसह तिघाही भावांची कारकीर्द आधी काँग्रेसमध्ये गेली आणि नंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर तिघेही राष्ट्रवादीत दाखल झाले. मात्र राष्ट्रवादीत असतानाच या तिन्ही भावांमध्ये सत्ताकारणावरून वाद पेटले. आता जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर हे शिवसेनेत, तर रवींद्र क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीत आहेत. त्या क्षीरसागर घराण्यातही काका जयदत्त क्षीरसागर विरुध्द संदीप क्षीरसागर हा संघर्ष टोकाला गेलाय. त्यात अद्याप दोन वेळा पुतण्यानेचं काकांना चीतपट केलेलं दिसून आलंय. आता बाकीच्या लढाईचा निकाल येणारा काळच ठरवेल.

सातवी आणि शेवटची काका पुतण्याची जोडी म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांची.

udayanraje bhosale,
abhaysinh raje bhosale,

छत्रपती घराण्यात कधीकाळी काका पुतण्याचा वाद रंगला होता. त्याचं झालं असं खासदार उदयनराजेंचे काका आणि आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांचे वडील अभयसिंहराजे भोसले हे साताऱ्याच्या संपूर्ण राजकारणावर सुरुवातीपासून पकड ठेवून होते. ते काँग्रेसचे मोठे नेते होते. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी संस्थात्मक, रचनात्मक कामाला सुरुवात केली होती. सहकार चळवळीच्या माध्यमातून संघटना उभी केली होती. साखर कारखाना, दोन बँका उभारल्या होत्या. अशापद्धतीनं हळूहळू त्यांनी राजकारणात पाय रोवायला सुरुवात केली होती. राजकीय जाणकारांच्या मते, Abhaysinh Raje Bhosale यांचा तो राजकीय उत्कर्ष Kalpana Raje Bhosale यांना खुपत होता. राजकारणातली सगळी जागा अभयसिंहांनी घेतली तर आपल्या मुलाचं, उदयनराजेंचं भविष्य काय ही चिंता त्यांना सतावत होती. त्याच ईर्ष्येतून त्यांनी 1989 मध्ये निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली होती. त्यानिमित्तानं महाराष्ट्रात हातपाय पसरू पाहणाऱ्या शिवसेनेला साताऱ्याच्या राजघराण्यातून उमेदवार मिळाला होता. कल्पनाराजे शिवसेनेच्या उमेदवार म्हणून साताऱ्यातून अभयसिंहराजे यांच्याविरोधात उभ्या राहिल्या. परंतु अभयसिंह यांच्या नियोजनापुढं त्यांचा निभाव लागला नाही. त्यानंतर 1991 मध्ये सातारा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. त्या निवडणुकीत उदयनराजेंनी काका अभयसिंह राजेंच्या विरोधात स्वत:चं पॅनेल उभं केलं. स्वत: दोन वॉर्डातून उभे राहिलेले उदयनराजे एका वॉर्डातून निवडून आले आणि एकात त्यांचा पराभव झाला. 1996 मध्ये त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष राहून लढवली.

त्या निवडणुकीत Udayanrjae Bhosale उमेदवार असतानाही अभयसिंहराजे यांनी पक्षशिस्त म्हणून काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव भोसले यांचा प्रचार केला. त्यामुळे अभयसिंह राजे आणि उदयनराजे यांच्यात फूट पडली. ती होती वादाची पहिली ठिणगी. 1998 ला लोकसभेची निवडणूक झाली अन त्यात अभयसिंहराजे साताऱ्याचे आमदार असतानाही पुन्हा लोकसभेला उभे राहिले आणि निवडून ही आले. त्यामुळं मग सातारा विधानसभेची जागा मोकळी झाली आणि तिथं पोटनिवडणूक घ्यावी लागली. लोकसभेत गेल्यानंतर सातारा विधानसभेची जागा आपल्याला मिळेल, अशी उदयनराजेंची अपेक्षा होती. परंतु अभयसिंहराजेंनी लोकसभेची उमेदवारी स्वीकारतानाच आपल्या मुलाला म्हणजे शिवेंद्रराजे यांना उमेदवारीची देण्याची घोषणा केली. उमेदवारी शिवेंद्रराजे यांना मिळाली. पण दरम्यान त्याचंकाळात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष होतं. त्यांनी उदयनराजेंना असलेला जनाधार ओळखला आणि भाजपमध्ये येण्यासाठी त्यांचं मन वळवलं. मग उदयनराजे भाजपचे उमेदवार झाले. अभयसिंहराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या रूपानं एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी, असं सत्तेचं केंद्रीकरण दिसू लागलं. त्यातून उदयनराजेंच्या बाजूनं साताऱ्याच्या जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण झाली आणि त्याचा परिणाम म्हणून राजेंनी ती निवडणूक जिंकली. 1999 ला विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी उदयनराजे यांच्यासमोर खुद्द अभयसिंहराजे यांचं आव्हान होतं. मतदानाच्या आदल्या रात्री अभयसिंहराजे गटाचे नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाला. त्यात मुख्य आरोपी म्हणून उदयनराजेंविरुद्ध फिर्याद देण्यात आली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अन त्यांना अटक झाली. ते 22 महिने तुरुंगात राहिले नंतर उदयनराजेंची त्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली.

त्या खून खटल्यात अभयसिंहराजे यांनी आपल्याला गोवलं आणि आपली राजकीय कारकीर्द संपवली, असा आरोप उदयनराजेंनी ठेवला होतं. या प्रकरणानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातला वाद या ना त्या कारणाने कायम धुमसत राहिला. तिथून सातारा नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा सहकारी बँका, शिक्षण संस्था, कारखाना प्रत्येक ठिकाणी उदयनराजे विरुद्ध शिवेंद्रराजे असा सामना लोकांना पाहायला मिळाला. दरम्यान राजघराण्यातला तो टोकाचा संघर्ष उदयनराजेंचे दुसरे काका शिवाजीराजे भोसले यांना पाहवला नाही. म्हणून त्यांनी ll2006 साली  त्यांच्या राजघराण्यातल्या एकीसाठी पुढाकार घेतला. पुढाकार घेऊन सगळं घराणं एक करायचं ठरवलं. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचं मनोमिलन घडवून आणलं. पुढे 10 वर्षं हे मनोमीलन टिकून राहिलं पण 2016 च्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा त्यांच्यातला वाद चव्हाट्यावर आला. तेव्हापासून फिस्कटलं ते फिस्कटलच. आता तर अभयसिंहराजे विरूद्ध उदयनराजे हा काका पुतण्याचा वाद आता उदयनराजे विरूद्ध शिवेंद्रराजे असा चुलत भावांपर्यंत येऊन ठेपलाय. सध्या दोघं एकाच पक्षाचं नेतृत्व करत असले तरीही दोघांमधून विस्तव जात नाही. तर या फेमस काका पुतण्यामध्ये वादाची ठिणगी पडलेलीय. वाद कुटुंबामध्ये असले तरी शेवटी पर्यायाने भरडली जाते ती जनता आणि तळागाळातला कार्यकर्ताचं. नेत्यांना काय कसं ही करून राजकारणात टिकून राहायचंय बस्स.. जनता विकासकामांच्या आशेपायी घुसमटून मेली तरी चालतंय पण पुतण्याची काकाच्या पक्षात घुसमट नाय झाली पायजे. असो या नेत्यांव्यतिरिक्त तुमच्या माहितीतल्या अजून कोणत्या कुटुंबात राजकीय कुरबुरी सुरू असतील तर लवकरात लवकर त्यांना मिटवून घ्या म्हणावं, त्यांची नावं आम्हाला कमेंट करून सांगू नका. अन हो, ह्यो लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.

या ७ पुतण्यांनी पण त्यांच्या काकांशी दुश्मनी घेतलीये | Sharad Pawar | Ajit Pawar | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *