२ ठरले, अजून या ३ जागांवर अजितदादांचे फिक्स उमेदवार कोण ? | Loksabha Election 2024 | Ajit Pawar News


मंडळी पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी, आता केवळ एक महिन्यापेक्षाही कमी काळ शिल्लक राहिलेलाय, पण तरीही महायुती असो वा महाविकास आघाडी, दोघांमधल्या जागा वाटपाचा तिढा काय सुटायचं नाव घेईना. त्यातल्या त्यात कालपरवा, अमित शाहंच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीत, जागा वाटपाचा घोळ जवळपास मिटल्याच्या चर्चा आहेत. याआधी भाजपकडून शिंदे गट आणि अजितदादा गटानं दावा केलेल्या बऱ्याचश्या जागांवर उमेदवार देण्याची भूमिका घेण्यात आली होती, पण शाह यांच्या मध्यस्थीनंतर शिंदे गटाला १३ आणि अजितदादा गटाला पाच जागा सोडायला भाजपच्या नेत्यांनी होकार दर्शवलाय असं कळतंय. आता आपण अजितदादा गटाच्या वाट्याला कोणत्या पाच जागा आल्यात आणि तिथ कुणाला उमेदवारी मिळू शकते त्याचा आढावा घेणार आहोत.

ajit pawar,

(Loksabha Election 2024 | Ajit Pawar News)


मंडळी सुरुवातीपासून अजित पवार गट लोकसभेच्या 7 जागांसाठी आग्रही होता. पण आता दिल्लीतल्या बैठकीनंतर ती संख्या पाचवर आली असल्याचं कळतंय. आजच पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीनंतर, अजितदादांनी त्यांचा पहिला उमेदवार अधिकृतपणे जाहीर सुद्धा करून टाकला. रायगड लोकसभेसाठी त्यांनी पुन्हा एकदा सुनील तटकरे, यांनाचं उमेदवारी जाहीर करून टाकली. त्या व्यतिरिक्त अजून बारामती, शिरूर, सातारा, धाराशिव आणि परभणी या जागांवर अजितदादा गटाचा क्लेम कायम असून, यापैकी कोणत्या जागा भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गटाला सोडणार याबद्दल संभ्रम कायम आहे. पण या जागा अजितदादांना मिळाल्याचं, तर तिथ नेमकी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार, ते आता आपण एक एक करून जाणून घेऊ…

(Loksabha Election 2024 | Ajit Pawar News)

तर सर्वात पहिला लोकसभा मतदारसंघ आहे बारामती. तिथ सध्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या विद्यमान खासदार असून, त्यांच्या विरोधात अजितदादा आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणार हे जवळपास कन्फर्मय. तसं पाहिलं तर बारामतीमध्ये अजितदादांचं चांगल वर्चस्वय. त्यांचा जनसंपर्क ही चांगलाय. त्याचा फायदा सुनेत्रा पवार यांना होवू शकतो असं म्हंटलं जातंय. अजित पवार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर पत्नी सुनेत्रा पवार, यांना उमेदवारी देण्याची जोरदार तयारी केलीय. पण महादेव जानकर यांनी महायुतीतचं राहणार असल्याची घोषणा करून, अजितदादांच टेन्शन वाढवल्याची चर्चा आहे. कारण महायुतीमध्ये सध्या सारं काही आलबेल नाही. इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, यांनी आपले राजकीय भविष्य डोळ्यांसमोर ठेवून अजितदादांविरोधात भूमिका घेतलीय, तर शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी दोन्ही पवारांचा पराभव करण्याचा संकल्प केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करून, त्यांनी अपक्ष का होईना बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याचा पवित्रा घेतलाय. हा वाढता विरोध अजितदादाना परवडणारा नाही. त्यात महादेव जानकर यांच्या एन्ट्रीमुळं बारामतीची जागा रासपला सोडून, अजितदादाना परभणीची जागा द्यायची का असाही विचार आता भाजपकडून केला जात असल्याच्या चर्चा आहेत. पण आजच अजितदादानीं काळजी करू नका, बारामतीत तुमच्या मनातला उमेदवार असेल अशी ग्वाही बारामतीकरांना दिलीये. त्यामुळं येत्या काळात बारामतीमध्ये नणंद भावजयीमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळणार हे निश्चितचय.

sunetra pawar, supriya sule,

(Loksabha Election 2024 | Ajit Pawar News)

त्यानंतर दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे सातारा. साताऱ्यात राष्ट्रवादीची ताकद लक्षणीय असल्यानं अजितदादा पहिल्यापासून साताऱ्याच्या जागेसाठी आग्रही आहेत. पण तिथ जागेचा तिढा निर्माण होण्यामागं एक महत्त्वाचं कारण म्हणजे भाजप नेते उदयनराजे भोसले, हे साताऱ्याच्या जागेवर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ते सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. पण त्यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढायची आहे. त्यासाठी ते सलग तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. ते दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांची काल अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. त्या बैठकीत उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटालाही साताऱ्याची जागा हवी आहे. त्यांच्याकडून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील, रामराजे निंबाळकर यांची नावं चर्चेत आहेत. तर ऐनवेळी उदयनराजेंनाही अजितदादा गटाकडून निवडणूक लढवण्यास सांगितलं जाऊ शकतं, अशा चर्चा साताऱ्यात रंगल्यात. पण अजितदादा गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी विरोध दर्शवलाय. इतकंच नाही तर सातारा किंवा मग माढा, दोन्हीपैकी एक असा प्रस्ताव देखील अजितदादा गटानं भाजपपुढं ठेवल्याच्या चर्चा आहेत.

(Loksabha Election 2024 | Ajit Pawar News)


तिसरा लोकसभा मतदारसंघय रायगड. आज अधिकृतपणे अजितदादांनी रायगडची जागा सुनील तटकरेचं लढवतील, यावर शिक्कामोर्तब केलंय. पण त्यामुळं भाजपच्या गोटात नाराजी पसरलीये. रायगड लोकसभा मतदारसंघातून यंदा भाजपला उमेदवारी मिळावी आणि सुनील तटकरे उमेदवार नकोच यासाठी भाजपची जिल्हा कार्यकारीणी आग्रही होती. पक्षानं कोकण संघटक म्हणून कार्यरत असणाऱ्या मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे तशी जाहीर मागणी केली होती. रायगड लोकसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडेही तशी मागणी करण्यात आली होती. रायगडची जागा भाजपला मिळाली नाही, तर वाईट घडेल असा सुचक इशारा रविंद्र चव्हाण यांनी दिला होता. त्यामुळे सहजासहजी रायगडची जागा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडणार का या चर्चांना आता उधाण आलंय. दरम्यान तटकरेंना तिथ ठाकरे गटाच्या अनंत गीते यांच्याशी टफ फाईट करावी लागणार आहे.

sunil tatkare,

(Loksabha Election 2024 | Ajit Pawar News)

पुढं चौथा लोकसभा मतदारसंघय शिरूर. आता नुकतच शिरूरचे माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजितदादा गटात प्रवेश केला आणि प्रवेश केल्या केल्या अजितदादांनी त्यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी जाहीर सुद्धा करून टाकली. त्यामुळं यंदा शिरुरमध्ये शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध अजितदादा गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील, असाच संघर्ष पाहायला मिळणारे. खासदार अमोल कोल्हे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दारुण पराभव केला होता. शिवाजीराव आढळराव पाटील हे भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आहेत. 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. 2004, 2009 आणि 2014 साली त्यांनी शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली. सलग तीन वेळेस त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला. मात्र 2019 मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

(Loksabha Election 2024 | Ajit Pawar News)

पुढं पाचवा लोकसभा मतदारसंघ आहे परभणी. अजित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर, परभणीत धाकधूक वाढलीये. परभणी लोकसभा मतदारसंघासाठी भाजप आणि अजितदादा गटात रस्सीखेच चालू असताना, जानकर यांच्या महायुतीमधील समावेशानं चित्र बदललय. जानकर यांनी परभणी आणि माढा लोकसभा मतदारसंघांतून स्वतंत्रपणे निवडणूक लढवन्याचं घोषित केल्यानंतर, महायुतीच्या नेत्याकडून त्यांची मनधरणी करण्यात आली व जानकर यांच्या पक्षाला एक जागा देण्याचं निश्चित केल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान माढ्याची उमेदवारी आधीच जाहीर केली असल्यानं भाजप जानकराना परभणीची जागा देणार असं बोललं जातंय. पण अजितदादा गटाचे राजेश विटेकर, ज्यांनी विद्यमान खासदार संजय जाधव यांना टफ फाईट दिली होती ते परभणीच्या जागेसाठी आग्रही आहेत. त्यांनी मोर्चेबांधणी आणि प्रचार देखील सुरु केलाय . जिल्ह्यातील जातीय समीकरणे आणि विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याशी लढत असल्यानं, महायुतीकडून उमेदवार देताना या मुद्द्यांचा विचार केला जाणार आहे. भाजपकडूनही तिथ माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत.

jankar,

(Loksabha Election 2024 | Ajit Pawar News)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

जातीचं हे गणित जुळलं तरच Praniti Shinde सोलापूरच्या खासदार होतील ? | Solapur Loksabha Election 2024|Vishaych Bhariहे आहेत शिंदे गटाच्या यादीतले १० फायनल लोकसभेचे उमेदवार ? | Loksabha Election 2024 | Vishaych Bhariवसंत मोरे पुण्याचे पुढचे खासदार होतील | Vasant More Latest News | Vishaych Bhariविखे पाटलांवर भंडारा पण धनगर आरक्षणाचा प्रश्न या नेत्यामुळे सुटू शकलेला नाहीये | Vikhe Patil Bhandara Latest News | Dhangar Reservation

याव्यतिरिक्त धाराशिवच्या जागेसाठी सुद्धा अजितदादांनी आग्रही भूमिका घेतल्याची चर्चाय. पण तीन जागा त्यांना मिळणार की नाही याबद्दल शंका उपस्थित केल्या जातायत. धाराशिवबद्दल बोलायचं झाल्यास सध्या तिथ ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर ह्ये विद्यमान खासदार आहेत. दरम्यान भाजप तिथ त्यांचे कट्टर विरोधी मानले गेलेले, राणा जगजीतसिंग पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल असं बोललं जातय. त्याव्यतिरिक्त बसवराज मंगरुळे, बसवराज पाटील यांचीही नावं भाजपकडून चर्चेत आहेत. पण माढा, सातारा आणि परभणीच्या जागेवर वाटाघाटी करायची वेळ आली तर ऐनवेळी ती जागा अजितदादा गटाला भाजपकडून सोडली जाऊ शकते अशा चर्चा आहेत. मागं जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी धाराशिवच्या जागेवर दावा ठोकला होता. तेव्हा अजितदादानी त्यांना तुम्ही तयारीला लागा असे आदेश दिल्याचे बिराजदार यांनी सांगितलं होतं. सुरेश बिराजदार हे गेल्या 5 वर्षांपासून धाराशीव लोकसभा मतदारसंघात तयारी करत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘दाजी फॉर धाराशिव’ या नावान मतदारसंघात पोस्टर्स झळकावले आहेत. त्यामुळे आता अजित पवार त्यांच्या उमेदवारीबाबत काय निर्णय घेतात याकडं सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तर या जागा येत्या लोकसभा निवडणुकीत अजितदादा गटाला मिळू शकतात अशा चर्चा असून रायगड आणि शिरूरचे जाहीर झालेले दोन उमेदवार सोडून बाकी ठिकाणी अजितदादांनी चे हे संभाव्य उमेदवार असू शकतात असं म्हंटल जातय.पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, यापैकी अजितदादा गटाचे किती उमेदवार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडून येऊ शकतात, भाजप अजितदादांना कोणत्या जागांवर बॅकफूटवर ढकलू शकतं, तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

२ ठरले, अजून या ३ जागांवर अजितदादांचे फिक्स उमेदवार कोण ? | Loksabha Election 2024 | Ajit Pawar News

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *