या ५ कारणांमुळे Ajit Pawar हे Sharad Pawar यांना वरचढ ठरलेत | Ajit Pawar Baramati Sabha | Vishaych Bhari

बारामती म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर थेट ज्या माणसाचं नाव उभं राहतं ते नाव अर्थातच शरद पवारांचं. शरद पवारानंतर अजित पवार,सुप्रिया सुळे अशी दुसर्या पिढीतील नेत्यांची नावे समोर येतात. तर तिसर्‍या पिढीतील पावरफुल नेत्यांत रोहित पवारांचं नाव घेतलं जातं. आता हे सगळे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनात आजपर्यंत काम करत आलेत. पण मध्यंतरी अजित दादांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून एक जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली की राष्ट्रवादीत आता नेमकं पावरफुल कोणंय? शरद पवार की अजित दादा ? तसेच बारामती मतदारसंघात नेमकी कोणाची ताकद जास्तंय ? चला याच प्रश्नाचं इन डिटेलमध्ये उत्तर शोधूयात…

ajit pawar
sharad pawar

( Ajit Pawar Baramati Sabha | Vishaych Bhari )

तर लोकसभेचा विचार करता सुप्रिया सुळे या इथून गेल्या तीन टर्म झालं खासदार आहेत.‌आणि अगदी त्याआधीही १९९१ चा काही काळ वगळता तिथपासून २००९ पर्यंत शरद पवार यांनीच बारामतीचा खासदार म्हणून इथली एकहाती सत्ता राखलीय. आता सुप्रिया सुळेंसोबत शरद पवार देखील राज्यसभेचे खासदार आहेत.‌ त्यामुळे पवार घराण्यातील हे दोन्ही बाप आणि लेक खासदार आहेत. त्यामुळे त्याबाबतीत केंद्रात या बाप लेक जोडीचं नक्कीच वजन आहे असं म्हणता येईल. आता जसं आपण आता बघितलं की मोजका काळ वगळता शरद पवार यांनी अजित दादांना कधीच दिल्लीचं दर्शन होऊ दिलं नाही . त्यामुळे अजित दादा यांचं केंद्रात फार वजन आहे असं म्हणता येणार नाही. पण सध्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वगळून थेट अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे दोन केंद्रस्तरावरचे नेते अजित दादांशी डील करत असल्यामुळे अजित दादांचं पहिल्या पेक्षा वजन वाढलंय असंच चित्र सध्यातरी दिसतंय. पण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करता इथून सुप्रिया सुळे यांनी २०१९ ला कांचन कुल तर २०१४ ला महादेव जानकर यांचा मोठ्या मार्जिनने पराभव केला होता.‌ अर्थात या यशात शरद पवार आणि अजित दादा या दोघांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा होता. असो तर आता बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभांचा विचार करता, बारामती,दौंड,भोर, खडकवासला, इंदापूर आणि पुरंदर हे इथले सहा विधानसभा मतदारसंघ आहेत . आता क्रमाने बोलायचं झाल्यास बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे फुल ऑन वन handed player आहेत. सातत्याने ते या मतदारसंघातून निवडून येत आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांनी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांचा तब्बल १,६५,२६५ मतांनी पराभव केला होता. अजित दादांचा इथला जनसंपर्क, प्रशासनावरची पकड , विकासकामं आणि त्यांच्याकडं उपमुख्यमंत्री पदासारखं जोरदार पद असणं, यामुळे बारामती विधानसभैवर निर्विवादपणे अजित दादांनी वन हॅंडेड पकड ठेवली आहे. भाजप कित्येक वेळा हा मतदारसंघ जिंकण्याचा प्रयत्न करत आलाय पण ते कधीच त्यांना शक्य झालेलं नाहीये. पण आता अजित दादा भाजपसोबत गेलेत. अर्थात तरीही शरद पवार इथून अजित दादांविरूद्ध कोणी strong candidate उभा करतील ही ठोस ग्यारंटी दिसत नाही.

( Ajit Pawar Baramati Sabha | Vishaych Bhari )

सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची कालपरवाची राष्ट्रवादीत फूट नसल्याची वक्तव्यं बारामती मतदारसंघ सेंट्रलला ठेवूनच केली गेल्याचं म्हणलं जातंय. मागे रोहित पवार यांनीही वेळोवेळी अजित दादांबद्दल soft भूमिका घेतली होती. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाचा विचार करता इथून अजित दादांच सक्षम नेतृत्व आहे, हे स्पष्ट आहे. अर्थात शरद पवार यांचा त्यांना छुपा पाठिंबा आहे की नाही हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे . दौंड. भाजपचे राहुल कुल इथून आमदार आहेत. त्यांनी २०१९ ला राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांचा अवघ्या ७४६ मतांनी पराभव केला होता. पण आता पुढच्या इलेक्शनमध्ये अजित दादा राहुल कुल यांची साथ देणार की रमेश थोरात यांना पाठिंबा देणार, हा खरा इथला प्रश्न असणार आहे. पण जर अजित दादा राहुल कुल यांच्यासोबत गेले तर रमेश थोरात हे सुप्रिया सुळे गटाकडून पुढची इलेक्शन लढवताना दिसतील. राहुल कुल यांच्यावरील भीमा पाटस कारखान्यावरून झालेला आरोप तसेच मागच्या इलेक्शनमधील अवघं ७४६ मतांचं लीड यामुळे थोरात सुद्धा इथून की factor ठरू शकतील. एकूणच या मतदारसंघात शरद पवार यांची सहानुभूती की अजित दादांची ताकद जिंकेल हा प्रश्न आहे. पण त्यातही अजित दादा भाजपच्या उमेदवाराला ताकद देतील की राष्ट्रवादीच्या हा ही इथे अजून एक संशोधनाचा विषय असणार आहे. इंदापूर विधानसभेचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्तामामा भरणे इथून दोन टर्म झाली ,आमदार आहेत. त्यांनी मागच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा ३११० मतांनी पराभव केला होता. आता दत्तामामा, पवार कुटुंबाच्या जवळचे नेते आहेत. पण त्यांनी अजित दादांना साथ देण्याला पसंती दिलीय.

datta mama bharne
harshvardhan patil

( Ajit Pawar Baramati Sabha | Vishaych Bhari )

पुढच्या इलेक्शनला ही अजित दादा दत्ता मामा मागे उभी राहतील पण त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांची मात्र बेकार अडचण होणारै.कारण हर्षवर्धन पाटील हे कांग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नेते आहेत.‌आता दत्ता मामांना तिकीट मिळालं तर मग हर्षवर्धन पाटील पुन्हाभाजपसोडून कांग्रेसमध्ये येतील का हा ही भविष्यातील वेगळा प्रश्न असणार आहे. तेव्हा या मतदारसंघात आजच्या घडीला जरी दत्तामामा आमदार असले तरीसुद्धा इथून पुढे हर्षवर्धन पाटील यांच्या भूमिकेत बरेच अर्थ दडलेले आहेत. आता अर्थात राष्ट्रवादीत फूट आहे कि नाही या चक्रात कदाचित हर्षवर्धन पाटीलही wait and watch च्या भूमिकेत असतील हे कन्फर्म आहे. भोरचा विचार करता कांग्रेसचे स़ंग्राम थोपटे हे इथून सीटींग आमदार आहेत. त्यांनी मागे शिवसेनेच्या कुलदीप कोंडेंचा जवळपास ९२०६ मतांनी पराभव केला होता.कांग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असल्यामुळे संग्राम थोपटे हे शरद पवारांची साथ देतील अशी चिन्ह आहेत. पण भोरमधील विरोधी गटातील नेत्यांना सोबत घेऊन अजित दादा भोरमध्ये आपली ताकद वाढवू शकतात.ही गोष्ट इथं नोंद घेण्यासारखीय. पुरंदरमध्येही कांग्रेसच्या संजय जगताप यांनीशिवसेनेच्या विजय बापू शिवतारेंचा जवळपास ३१,४०४ मतांनी पराभव केला होता. आता विजय बापू शिवतारे आणि अजित दादा यांच्यात कसा ३६ चा आकडा आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहीतेय.पण उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच विजयबापूंनी अजित दादांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती. कदाचित सत्ताधारी भाजपसोबत आपण असण्याच्या , तसेच जगतापांवर प्रेशर create करण्याच्या हिशोबाने बापूंनी अजित दादांची भेट घेतली असावी असं म्हणलं जातंय. पण अजित दादा विजयबापूंना पुढच्या निवडणुकीत साथ देतील की नाही हा खरा प्रश्न आहे.तिकडे संजय जगताप हे मात्र शरद पवार गटाकडून असल्याचं पहायला मिळतंय.आता सुप्रिया सुळे आणि संजय जगताप यांच्यातील स्नेहभावामुळे तुर्तास तरी शरद पवार गट पुरंदर मध्ये पावरफुल दिसून येतोय. खडकवासला मतदारसंघात मात्र भाजपचे भीमराव तापकीर हे सध्याचे आमदार आहेत. त्यांनी मागे राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांचा २५९५ मतांनी पराभव केला होता. भीमराव तापकीर हे अधूनमधून भाजप अंतर्गत नाराज असल्याचं समोर आलेलं आहे. असो पण मूळ प्रश्न उरतो की अजित दादा भाजपच्या भीमराव तापकीरांना ताकद देणार का?

( Ajit Pawar Baramati Sabha | Vishaych Bhari )

दुसरीकडे सचिन दोडकेंना पुन्हा बांऊस back करायची संधी आहे. पण अजित दादा त्यांना साथ देतील की रूपाली चाकणकर यांना तिथे प्रमोट करतील असा एकंदरीत प्रश्न आहे. कारण अजित दादा गटाकडून रूपाली चाकणकर या खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याचं समजतंय. आता एकूणच लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा विचार करता अजित दादा आणि शरद पवार दोन्हीही बारामतीतून तुल्यबळ नेते आहेत. म्हणूनच इथून पुढे शरद पवार यांचा अनुभव विरूद्ध अजित दादांचा आवाका असा इथं संघर्ष रंगणार आहे. नीट बघितलं तर , बारामती, इंदापूर मधून अजित दादा इथं निर्विवाद प्लसमध्ये दिसतायत. खडकवासला आणि दौंडमध्ये तर भाजपचे आमदार आहेत. पण तिथं अजित दादा कसे पत्ते खोलणार हा पुढचा प्रश्न आहे. तिकडं भोर आणि पुरंदर मध्ये कांग्रेस आमदारांनी मात्र शरद पवार गटाची सोबत केली आहे. एकूणच अजित दादा आणि शरद पवार दोघेही बारामती मतदारसंघात पावरफुल आहेत. बाकी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल की जिल्हा बँक इथं शरद पवार यांच्या मार्गदर्शनात अजित दादांची सत्ता दिसून येते. शरद पवारांच्याबद्दल इथं सहानुभूती आहे पण जिल्ह्यातील सहकार,शिक्षण केंद्रावर अजित दादांची मांड आहे. आता आज अजित दादा पहिल्यांदाच पक्षफूटीनंतर बारामतीत आले आहेत. त्यांचं इथं कार्यकर्त्यानी जंगी स्वागतंही केलं आहे. पण आता राष्ट्रवादीत खरंच फूट आहे का हा मूळ प्रश्न आहे. पण जरी ती सध्या असली तरी येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी compromise level वर गेम खेळली तर अजित दादा आणि शरद पवार या दोन्ही गटाचे उमेदवार secure होऊनराष्ट्रवादीच्या एकूण सीटा वाढू शकतील. शक्य आहे हे दोन्ही गट पुढे एकत्र येऊन सत्तास्थापनाही करू शकतील.‌किंवा जागा वाढली तर त्यांची सत्तेतील बार्गेनिंग value वाढू शकेल. त्यामुळे आता दोन्ही गट वेगळे आहेत असं म्हणलं तरी उद्या हे दोन्ही गट सत्तेसाठी एकत्र आले तरी आश्चर्य वाटायला नको.‌कारण राष्ट्रवादीचं राजकारण हे नेहमीच सत्ताकेंद्री असं राहिलेलं आहे.‌ भाजपनं पाठीमागे बारामती जिंकण्याच्या हेतूने बर्याच केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली इथे दौरे केले आहेत. त्यांना बारामती पासून दूर ठेवण्यासाठीच दोन गट पाडल्याचं दाखवून आतून एकी ठेवायची ही शक्यताही पवारांच्या एकूण राजकारणाचा इतिहास पाहता चुकीची असावी असं वाटत नाहीये.कदाचित सध्याच्या काळात ते खेळत असलेला डाव पवारांचा मास्टर प्लॅन असू शकतो. असं अनेक राजकीय जाणकारांना वाटतंय. असो, तुर्तास तरी बारामती पुरतं बोलायचं झाल्यास, तुमचं मत नेमकं कोणाच्या बाजूने झुकतंय? तुमच्या मते बारामतीत कोणाची ताकद जास्तंय? बारामतीचा खरा किंग कोण? शरद पवार की अजित पवार ? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा..

या ५ कारणांमुळे Ajit Pawar हे Sharad Pawar यांना वरचढ ठरलेत | Ajit Pawar Baramati | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *