एका रात्रीत बार डान्सरवर 93 लाख उधळणाऱ्या Abdul Karim Telgi ची गोष्ट | Scam 2003 | Real Telgi Story | Vishaych Bhari

शेअर मार्केट एक ऐसा कुंवा है जो देश के हर इन्सान के पैसे की प्यास बुझा सकता है. 2020 साली आलेल्या हंसल मेहता दिग्दर्शित Scam 1992 : The Harshad Mehta Story या वेबसिरीजमधला हा डायलॉग आजतागायत अनेक लोकांसाठी मोटिवेशनल कोट बनून बसलाय. आता सध्या तेच हंसल मेहता त्यांची Scam 2003 : The Telgi Story ही नवी घोटाळ्याची सीरिज लोकांसमोर घेऊन येतायत. अब्दुल करीम तेलगी या माणसानं आठ वर्षे देशाच्या न्यायिक व्यवस्थेला कसा गंडा घातला त्याची ही गोष्ट. सोनी लिव्ह ने नुकताच त्या सिरीजचा टीझर प्रदर्शित केलाय. एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मुलगा फळ विकता विकता जवळपास 30000 करोड रुपयांचा देशातला सगळ्यात मोठा स्कॅम कसा काय करतो. त्या स्कॅममध्ये त्याच्यासोबत नेमके कोणते अधिकारी, नेत्यांची नावं समोर आलेली, जेलमध्ये त्याचा झालेला मृत्यू नैसर्गिक होता की रहस्यमयी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखाद्वारे आपण जाणून घेणारय…

( Abdul Karim Telgi ची गोष्ट | Scam 2003 | Real Telgi Story | Vishaych Bhari )

telgi scam,telgi,telgi scam documentary,telgi story,the real telgi story,real telgi story,telgi interview,telgi scam story,telgi scam 2003,telgi narco test,telgi narco test video,telgi scam trailer,scam 2003 trailer,scam 2003 telgi story,scam 2003,scam 2003 full movie,scam 2003 trailer reaction,scam 2003 reaction,scam 2003 telgi story reaction,scam 2023,scam 2023 trailer,scam 2003 teaser reaction,vishaych bhari,vishaych bhari telgi scam

तर मित्रांनो ही गोष्ट सुरू होते कर्नाटकच्या बेळगावी जिल्ह्याच्या खानापूर या छोट्याश्या गावातून. 1961 साली त्या खानापूरमध्ये अब्दुल करीम तेलगी याचा जन्म झाला. त्याचे वडील इंडियन रेलवेजमध्ये कामाला होते. त्यामुळं घरची परिस्थिती बऱ्यापैकी स्टेबल होती. अगदीच गरीब कुटुंब होतं अशातला काही भाग नव्हता. पण अब्दुल सात वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला अन त्यानंतर जरा परिस्थिती बिघडली. घराचा सगळा लोड अब्दुल आणि त्याच्या भावाच्या खांद्यावर आला. त्यामुळं दोघांनीही रेल्वे स्टेशनवर फळ आणि आणि भाजीपाला विकण्याचं काम करावं लागलं. पण अब्दुल त्याच्या शिक्षणाबाबत खूप सिरीयस होता. परिस्थिती कोणतीही असो शिक्षणात तडजोड करायची नाही असं त्यानं ठरवलेलं.  दरम्यान त्यानं फळाचा धंदा सांभाळत असताना खानापूरच्या सर्वोदय विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केलं. अब्दुल अभ्यासात हुशार होता. पुढं त्यानं बी कॉमची डिग्री घेतली अन तो नोकरीचा विचार करू लागला. मार्क्स आणि स्किल चांगलं असल्यामुळं त्याला अनेक ठिकाणाहून नोकरीच्या ऑफर आल्या. दरम्यान बँगलोरमध्ये एका फर्ममध्ये त्यानं जॉब करायला सुरुवात केली. पण कमी काळात जास्त पैसा कमवायची आस लागल्यामुळं त्याचं त्या कामात जास्त मनं लागलं नाही. त्या काळात त्यानं चार पाच नोकऱ्या बदलून पाहिल्या अन शेवटी काहीच हाती लागत नाही म्हणल्यावर त्यानं मायानगरी मुंबईचा रस्ता धरला. आता पर्यंतचा तेलगीचा स्ट्रगल ऐकून तुम्हाला कदाचित एखाद्याची मोटिवेशनल सक्सेस स्टोरी ऐकल्याचा फील आला असेल. काही जणांना तेलगी हिरो ही वाटला असेल. तर थांबा पुढं तेलगीनं जे काही कांड केलं त्ये ऐकून तुम्ही तुमची मतं बनवा. तर मुंबईत आल्यानंतरही तेलगीच्या डोक्यातून कमी काळात जास्त पैसा कमावण्याचं भूत गेलं नव्हतं. तिथंही त्याने वेगवेगळ्या चार पाच कंपनीत काम केलं पण त्याची सगळी स्वप्न पूर्ण होतील इतका पैसा त्याला कोणत्याही नोकरीतून मिळाला नाही.

( Abdul Karim Telgi ची गोष्ट | Scam 2003 | Real Telgi Story | Vishaych Bhari )

पण एक गोष्ट झाली मुंबईत काम करत असताना त्याला त्याच्या एका मित्राकडून सौदी अरेबियातल्या कामाची माहिती मिळाली. त्याच्या अनेक मित्रांनी सौदीला जाऊन गच्च पैसा छापला होता. पुढं तो मित्राच्या मदतीनं सौदीला पोहोचला. त्यानं सात वर्षे काम केलं आणि खूप पैसा ही कमावला. दरम्यान सौदीत काम करत असताना त्याला एक गोष्ट जाणवली की भारतातून हजारो लोकांना सौदीमध्ये काम करण्याची इच्छाय. पण त्यांना प्रॉपर documents मिळत नसल्यामुळं त्यांना अनेक प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. तेलगीनं त्या प्रॉब्लेममध्ये बिजनेसची संधी ओळखली. तो तातडीनं मुंबईत माघारी आला आणि त्यानं अरेबिया मेट्रो ट्रॅव्हल्स नावाची कंपनी सुरू केली. त्या कंपनीद्वारे तो सौदी, दुबईला जाण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना फेक आयडी, पासपोर्ट, व्हिजा आणि ईमिग्रेशन सर्टिफिकेट काढून द्यायचा. ते काम इतकं चोखपणे करायचा की आजतागायत त्यानं ज्या ज्या लोकांना तशी फेक documnets दिली त्यापैकी एक ही जण कायद्याच्या कचाट्यात सापडलेला नाहीये. 25 हुशार लोकांची टीम बनवून तो ते काम करत होता. त्यावेळी त्यानं काही सरकारी अधिकाऱ्यांशी ही ओळखी वाढवल्या होत्या. दरम्यान 1991 साली पोलिसांना त्याच्या त्या इलीगल बिजनेसची कानकून लागली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून जेलमध्ये टाकलं. साधारणपणे कुणाला जेलमध्ये टाकल्यानंतर त्याचं आयुष्य उध्वस्त होतं असं म्हणतात पण जेलमध्ये गेल्यानंतर अब्दुल करीम तेलगीच्या आयुष्याला वेगळीच दिशा मिळाली. तिथं त्याला रामरतन सोनी नावाचा आणखी एक खतरनाक माणूस भेटला. हा रामरतन सोनी नावाचा माणूस कोलकत्तामध्ये स्टॅम्पपेपरचे झोल करायचा. अब्दुलशी दोस्ती झाल्यावर त्यांच्यात त्याबद्दल खूप डीप चर्चा झाली.  पुढं 1992 साली दोघंही जेलमधून बाहेर आली आणि दोघांनी एकत्रितपणे स्टॅम्पपेपरच्या झोलचा इलीगल धंदा सुरू केला.

( Abdul Karim Telgi ची गोष्ट | Scam 2003 | Real Telgi Story | Vishaych Bhari )

telgi scam,telgi,telgi scam documentary,telgi story,the real telgi story,real telgi story,telgi interview,telgi scam story,telgi scam 2003,telgi narco test,telgi narco test video,telgi scam trailer,scam 2003 trailer,scam 2003 telgi story,scam 2003,scam 2003 full movie,scam 2003 trailer reaction,scam 2003 reaction,scam 2003 telgi story reaction,scam 2023,scam 2023 trailer,scam 2003 teaser reaction,vishaych bhari,vishaych bhari telgi scam

स्टॅम्पपेपर म्हणजे तुम्हाला माहतीचं असेल. कोणत्याही जमिनीचा, प्रॉपर्टीचा, बिजनेसचा, लीगल केसचा किंवा अगदी लग्नाच्या डीलचा कायदेशीर बॉण्ड म्हणजे स्टॅम्प पेपर. तेलगी आणि सोनी तसे खोटे स्टॅम्पपेपर विकून लोकांकडून खूप पैसे घ्यायचे. दरम्यान काही काळ एकत्र बिजनेस केल्यानंतर दोघांमध्ये काही कारणास्तव मोठं भांडण झालं आणि दोघं वेगळी झाली. हा तोच काळ होता जेव्हा times ऑफ इंडियाच्या पत्रकार सुचेता दलाल यांनी हर्षद मेहताच्या शेअर मार्केट स्कॅमचा पर्दाफाश केला होता. दरम्यान रामरतन पासून वेगळा झाला असला तरी तोपर्यंत तेलगीनं इलीगल स्टॅम्पपेपरच्या व्यवसायाचं बिजनेस मॉडेल शिकून घेतलं होतं. त्यातून किती आणि कसा पैसा कमावता येतो हे त्याला परफेक्ट कळलं होतं. त्याला सरकारी यंत्रणेतले लूपहोल्स कळाले होते. पुढं त्यानं स्ट्रॅटेजिकली त्या व्यवसायात उतरायचं ठरवलं. आधी त्यानं काही अधिकाऱ्यांना मर्जीत घेऊन स्टॅम्पपेपरचं कायदेशीर लायसन्स मिळवलं. पुढं त्यानं हैद्राबादच्या Indain Security Printing Press च्या वॉचमनपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ओळख वाढवली. तिथं येणं जाणं वाढवलं. त्याचंकाळात त्याला अशी खबर लागली की प्रिंटिंग प्रेस तिच्या जुन्या मशीनीचा लिलाव करते. त्यानं क्षणाचा ही विलंब न लावता लिलावात सहभाग घेतला आणि सगळ्यात जास्त रुपयांची बोली लावून स्टॅम्प पेपर छपाईची मशीन विकत घेतली. त्यानंतर त्यानं त्याचं सरकारी प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या काही टेक्निशियनना लाखो रुपये देऊन मशीन व्यवस्थित दुरुस्त करून घेतली. त्याचंबरोबर प्रिंटिंग प्रेसमध्ये स्टॅम्प पेपर छपाईसाठी जो कागद आणि शाई वापरण्यात येत होती ती देखील अधिकाऱ्यांना पैसे चारून विकत घेतले. दरम्यान सगळा सेटअप झाल्यावर त्यानं त्याच्याकडच्या मशीनद्वारे डुप्लिकेट स्टॅम्प पेपर छापायला सुरू केले. ते स्टॅम्पपेपर ओरिजिनल स्टॅम्पपेपरशी जुळवून पाहिले. अगदी हुबेहूब आणि परफेक्ट काम झालं होतं. त्यानंतर त्यानं 350 MBA केलेल्या लोकांची सर्च टीम बनवली आणि त्यांना वेगवेगळ्या कंपन्या, कार्यालये, इन्स्टिट्यूशनमध्ये जाऊन क्लायंट गोळा करण्यास सांगितलं.

( Abdul Karim Telgi ची गोष्ट | Scam 2003 | Real Telgi Story | Vishaych Bhari )

पुढच्या पाच वर्षात त्या बेकायदेशीर स्टॅम्पपेपरच्या व्यवसायातून तेलगीनं करोडो रुपयांची संपत्ती जमवली. जवळपास देशातल्या 25 राज्यातील 70 टॉप शहरात त्याच्या बिजनेसची पाळमुळं त्यानं घट्ट केलेली होती. मार्केट रेट पेक्षा खूप कमी दरात त्याची टीम  गरजू लोकांनी स्टॅम्पपेपर उपलब्ध करून द्यायची. पण इतका मोठा कांड करूनही अब्दुल करीम तेलगी सरकारी यंत्रणाच्या निशाण्यावर कसा आला नाही. तर त्याचं उत्तर सोप्पय त्याकाळात त्याच्या कामात काही अडचण येऊ नये म्हणून त्यानं अनेक सरकारी अधिकारी आणि नेत्यांना हाताशी धरलं होतं. त्यांच्या मदतीनं तो नितरासपणे ते त्याचा बिजनेस रन करत होता. जो अधिकारी त्रास देईल असं वाटेल त्याला तो करोडो रुपये देऊन खरेदी करायचा. म्हणून तर त्याच्याविरुद्ध 25 FIR नोंद होऊन सुद्धा तो कुणाच्या हाती सापडत नव्हता. असं म्हणतात की तेलगी अधिकाऱ्यांना तोंड बंद ठेवण्यासाठी लाच नाही, तर चक्क महिन्याची महिन्याला पगार द्यायचा. तो सुद्धा सरकारपेक्षा वीसपट अधिक. म्हणून तर जेव्हा त्याला पकडण्यात आलं होतं तेव्हा त्याच्या स्कॅममध्ये सामील असणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना 9000 पगार असून सुद्धा त्यांच्याकडं 100 ते 200 करोड रुपयांची संपत्ती सापडली होती. जर अधिकाऱ्यांना तो इतका पगार देत असेल तर मग त्याच्याकडं किती पैसा असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. मुंबई crime ब्रांचचे DCP प्रदीप सावंत यांचंही एकदा त्याप्रकरणी नाव समोर आलं होतं. पण नंतर कोर्टाने त्यांची निर्दोष सुटका केली. तेलगीला स्वतःलाच माहीत नव्हतं की त्यानं स्टॅम्पपेपरच्या बिजनेसमधून किती पैसे कमावलेत. त्याची 100 शहरात 100 बँक अकाऊंट्स होती. त्यात करोडो रुपयांची संपत्ती होती. देशातील वेगवेगळ्या शहरात करोडो रुपयांच्या प्रॉपर्ट्या ही होत्या. अनेकजण तर असंही सांगतात शेवटी शेवटी तो त्याचे पैसे चक्क पोत्यात भरून ठेवायला लागला होता. सध्या वेबसिरीजच्या ट्रेलरमध्ये तेलगीनं 30000 कोटींचा घोटाळा केला होता असं दाखवण्यात आलंय पण वेगवेगळ्या यंत्रणानी दिलेल्या रिपोर्ट्सनुसार तो आकडा 10,000 करोड ते एक लाख करोड रुपयांच्या घरातय असं बोललं जातंय. तेलगीचा एक किस्सा त्यावेळी मुंबईत खूप फेमस झाला होता. तो असा की एकदा त्यानं मुंबईतल्या टोपाज बार मध्ये नाचणाऱ्या तरन्नूम खान या बारबालेवर एका रात्रीत चक्क 93 लाख रुपये उधळले होते. तरन्नूम खान त्यावेळी मुंबईतली सर्वात प्रसिद्ध बार डान्सर होती आणि तिच्यासोबत एक रात्र घालवण्यासाठी लोकं लाखो रुपये खर्च करत असायचे. पण तेलगीचा तिच्यावर जीव जडला होता. तेलगीच्या कृपेने त्याकाळात तरन्नूम खान मुंबईतली सर्वात श्रीमंत बार डान्सर बनली होती. त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चानाही मुंबईत त्याकाळी उधाण आलं होतं.

( Abdul Karim Telgi ची गोष्ट | Scam 2003 | Real Telgi Story | Vishaych Bhari )

telgi scam,telgi,telgi scam documentary,telgi story,the real telgi story,real telgi story,telgi interview,telgi scam story,telgi scam 2003,telgi narco test,telgi narco test video,telgi scam trailer,scam 2003 trailer,scam 2003 telgi story,scam 2003,scam 2003 full movie,scam 2003 trailer reaction,scam 2003 reaction,scam 2003 telgi story reaction,scam 2023,scam 2023 trailer,scam 2003 teaser reaction,vishaych bhari,vishaych bhari telgi scam

पण तेलगीनं तिच्याशी लग्न केलं नाही. अशापद्धतीनं तेलगीची पाची बोटं तुपात होती. त्याच्या साम्राज्याला कुणीही धक्का लावू शकत नाही असा तेलगीला गर्व चढला होता. पण 2001 साली नोव्हेंबर महिन्यात एक मोठी गडबड झाली. त्याचं झालं असं, एका रात्री स्टॅम्प पेपरने भरलेला एक ट्रक बँगलोर पोलिसांच्या हाती सापडला. सुरवातीला पोलिसांना वाटलं ते स्टॅम्पपेपर कुठून तरी चोरून आणलेत. पण नंतर तपासा दरम्यान पोलिसांना समजलं की ते स्टॅम्पपेपर चोरीचे नसून खोटे आहेत. मग मात्र पोलिसांची यंत्रणा तातडीनं कामाला लागली. बँगलोर पोलिस त्या प्रकरणाचा शोध घेत घेत त्या इलीगल बिजनेसचा मास्टरमाईन्ड अब्दुल करीम तेलगीपर्यंत पोहोचले. पोलिसांचा तपास चालूय ही गोष्ट सुरुवातीला तेलगीच्या लक्षात आली नव्हती. जर त्याला माहीत असतं तर त्याने त्या पोलिसांनाही खरेदी केलं असतं असं म्हणतात. दरम्यान जेव्हा त्याच्या कानावर इन्वेस्टीगेशनची खबर पडली तेव्हा तो कसाबसा तिथून निसटला आणि काही काळ फरारी झाला. पण तोपर्यंत सरकारनं त्याच्या व्यवसायावर गदा आणली. पुढं एक दिवस पोलिसांना अशी खबर मिळाली की तेलगी अजमेर शरीफच्या दर्ग्यावर डोकं टेकवण्यासाठी येणारय. मग पोलिस त्यानुसार सापळा लावून बसले आणि त्यांनी तेलगीला अटक ही केली. तोपर्यंत तेलगीचा स्कॅम आख्ख्या जगाला कळाला होता. पुढं त्या प्रकरणाची SIT चौकशी झाली. पोलिसांनी तेलगीची नार्को टेस्ट केली. त्या नार्को टेस्टमध्ये तेलगीनं अनेक अधिकारी, मोठंमोठे नेते आणि काही बॉलिवूड कलाकारांची ही नावं घेतली. त्यानंतर पोलिसांनी तेलगीची बँक एकाऊंट्स आणि 36 वेगवेगळ्या शहरातल्या प्रॉपर्ट्या सील केल्या. 2006 साली त्याला कोर्टाने 30 वर्षे जेल आणि 202 करोड रुपयांचा दंड ठोठावला. खरं तर त्यानं आठ वर्षात जे काही कांड केलं होतं त्याच्या तुलनेत ही शिक्षा कमीचं होती. पण त्याची शिक्षा पूर्ण व्हायच्या आधीचं 11 वर्षानंतर म्हणजे 20 ऑक्टोबर 2017 साली तेलगीचा सेम हर्षद मेहता सारखा जेलमध्येचं रहस्यमय पद्धतीनं मृत्यू झाला.

( Abdul Karim Telgi ची गोष्ट | Scam 2003 | Real Telgi Story | Vishaych Bhari )

पोलिसांनी तेलगीच्या मृत्यूचं मल्टीपल ऑर्गन फेलियर हे कारण दिलं. पण नंतर तेलगीच्या वकिलांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांच्यामते तेलगीच्या मृत्यूमागे जेलमधील पोलिसांचा हात होता. कारण त्यावेळी अनेक मोठ्या व्यक्तींची नावं त्यात समोर आली होती. तस पाहिलं तर तेलगी आणि हर्षद मेहताच्या केसमध्ये एक धागा समान होता अन तो म्हणजे दोन्ही स्कॅम उघड झाल्यानंतर त्यात मोठमोठ्या राजकीय नेत्यांची नावं समोर आली होती. त्यामुळं त्या नेत्यांनीचं पोलिसांवर दबाव टाकून त्यांचा मृत्यू घडवून आणला ,असाही आरोप ठेवण्यात आला होता. दरम्यान तेलगीची पत्नी शादीयाने ही त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पण पुढं 2018 पर्यंत तेलगीची केस दाबण्यात आली आणि तेलगीसोबत ज्या सहा लोकांना पकडलं होतं त्यांना ही सोडून देण्यात आलं. पण एक गोष्ट मात्र झाली आजतागायत पोलिसांना तेलगीची खोटे स्टॅम्पपेपर छापण्याची फॅक्टरी आणि त्याचे अरबो रुपये कुठं आहेत त्याची खबर लागली नाही. पुढं कोर्टानं तेलगी स्कॅमला कायदेशीर घोषित करून टाकलं. त्यावेळी देशाच्या न्यायिक व्यवस्थेसमोर दुसरा पर्याय नव्हता असं म्हणतात. कारण ते जर इलीगल ठरवलं असतं तर मागच्या आठ वर्षात तेलगीचे स्टॅम्प पेपर वापरून ज्यांनी ज्यांनी लग्न, बिजनेस, जमीन खरेदी, घर किंवा तत्सम प्रॉपर्टी खरेदी केली ते सगळं इलीगल ठरवावं लागलं असतं. त्याचा देशाच्या न्यायिक व्यवस्थेवर खूप गंभीर परिणाम दिसून आला असता. सध्या तेलगीची मुलगी सना आणि जावई इरफान तालिकोटी यांनी हंसल मेहता यांच्या स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी वेबसिरीजवर स्टे आणण्यासाठी याचिका दाखल केलीये. त्यांच्यामते वेबसिरीज बनवताना त्यांना निर्मात्यांनी विश्वासात घेतलं नव्हतं. पण ते काहीही असलं तरी तेलगीनं देशाची न्यायिक व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था मुळापासून हलवली होती ह्ये नक्की. पण ही तेलगी स्कॅमची खरी स्टोरी ऐकल्यानंतर वेबसिरीज बघताना तुम्हालाही धागेदोरे जोडायला मदत होईल अशी आम्हाला आशाय, म्हणूनच केलेला हा छोटासा प्रयत्न. बाकी तुम्हाला इंडियातल्या या सर्वात मोठ्या स्कॅमची गोष्ट ऐकून नेमकं काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.

Scam 2003 | Real Telgi Story | एका रात्रीत बार डान्सरवर 93 लाख उधळणाऱ्या Abdul Karim Telgi ची गोष्ट

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *