फक्त या पाच गोष्टी करा अन झटक्यात दाढी वाढवा | Beard Growth Tips for Men | Vishaych Bhari

बिनादाढीचा माणूस म्हणजे बिना आयाळाचा सिंह असतोय  हे आसं वाक्य तुम्ही कुणाच्या ना कुणाच्या तरी तोंडून ऐकलं असेलच. आन ते खरचयं बर का ? कारण दाढीशिवाय पुरुषाला शोभा येत नाय आस अनेकांचं म्हणणंयं. पोरींच्यात बी पोरांची दाढी हाचं कायम चर्चेचा विषय असतोय. दाढीवाला पोरगा आणि त्या पोरांची दाढी हा त्यांच्या attraction चा कायमच पॉईंट असतोय.  त्यामुळंचं आजकाल सरार्स पोरं दाढी वाढवायला लागल्याती. म्हणजे एकूणच सध्याला दाढी वाढवायचा ट्रेन्ड चांगलाच जोमात आलाय. सगळ्यांनीच दाढी वाढावायची धरलीय. मग ते सेलिब्रिटी असो क्रिकेटर असो निदान नायतर माझ्यासारखी कन्टेन्ट क्रियेटर माणसं. कुणीच दाढी वाढवायच्या मोहातून सुटलेला नाय.. पण सगळयांनाचं अशी कोरीव दाढी येत नाय. बऱ्याच भावांना तुटकं तुटक दाढी येती तर काही जणांना दाढीचं येत नाय. आणि ह्यो आता ग्लोबल प्रश्न झालायं. म्हणूनच काय गोष्टी केल्या की चांगली दाढी येते ? ज्यांना दाढी येत नाय त्यांचा नक्की प्रॉब्लेम काय असतो ? खरंच कृत्रिमपणे तुम्हाला बेयर्ड लूक जोपासता येतो का ? सगळंच डिटेलं मध्ये बघुयात…

beard growth,beard meets food,beard styles for men,beard growth oil,beard oil,beard transplant,beard growth tips,beard,beard oil kaise use kare,beardo godfather perfume review,vishaych bhari,vishay bhari,विषयच भारी,विषय भारी,दाढी कशी वाढवावी,दाढी उगवण्यासाठी उपाय,दाढी हेअर स्टाईल,दाढी लवकर येण्यासाठी उपाय,दाढी येण्यासाठी उपाय,दाढ़ी प्रेमी status,दाढी कशी करावी,दाढी काली करने के उपाय,दाढी येण्यासाठी घरगुती उपाय,दाढी कधी करू नये,दाढी साठी घरगुती उपाय

( Beard Growth Tips for Men | Vishaych Bhari )

मंडळी दाढीमुळ पुरुषांचा चेहरा भरीव दिसतो. पण दाढी वाढवण आन दाढीची काळजी घेणं हे खूप कष्टाचं कामयं. म्हणजे माझ्या माहितीतला एक माणूसय त्यो लय भारी म्हणायचा की एकवेळ दोन म्हशी सांभाळणं सोपंय पण दाढी जोपासणं मुलखाचं अवघडंय. पण हे दाढी वाढवण्याचं अवघड वाटणारं काम आपण थोडेसं कष्ट केलं आन प्रॉपर माहिती घेतली की एकदम सोप्प होऊन जातं बऱका . तर बघा बऱ्याच लोकांना असं वाटतं की दाढी लवकर यावी यासाठी आपल्याला रेजर आन ट्रिमर बाजूला ठेऊन खूप दिवस दाढी वाढण्याची वाट पाहावी लागेल. पण वास्तवात तसं काहीच नाही भावांनो आपली दाढी अगदी स्टाइल मध्ये बनावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला थोडं कष्ट करण्याची तयारी ठेवावीच लागेल. म्हणजेच बहुतांश पोरं दाट दाढी येण्यासाठी खूप मेहनत घेतात. जर तुमची दाढी विरळ किंवा तुकड्या-तुकड्यान असेल म्हणजेच पॅची बियर्ड असेल तर हा दोष तुमच्या अनुवांशिकतेचा असतो. माणसाच्या शरीरात केस किंवा दाढीच्या वाढीला अनुवांशिकतेलाचं सगळ्यात पहिलं जबाबदार धरलं जातं. पण ज्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी जन्मापासूनचं जास्त असते अशा पोरांना दाट आन चांगली दाढी येते. पण आता सगळ्याचं लोकांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी ही अशीच जास्त प्रमाणात असू शकत नाय. ज्या लोकांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असते अशा लोकांना दाढी कमी येते. मंडळी दाढीचे केस दाट असण्याचं 85 टक्के प्रमाण हे तुमच्या जीन्सवरच अवलंबून असतं. याचा अर्थ असा की त्या राहिलेल्या 15 टक्क्यांमध्ये आपण आपली दाढी वाढवण्याचा प्रयत्न करु शकतो. पण याचा अर्थ असा होतं नाय की तुम्ही कायच करु शकत नायं. अशा अनेक ट्रिक्स आहेत, ज्याचा वापर करुन तुम्हाला दाढी वाढवता येऊ शकते. त्यातला पहिला आन महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या त्वचेची काळजी घ्या.

( Beard Growth Tips for Men | Vishaych Bhari )

विषय कसायं की तुमची निरोगी त्वचा ही तुमच्या चांगल्या आणि दाट दाढीचा पाया असते. चेहरा साफ केल्यामुळे आणि नियमितपणे त्याला धुतल्यामुळे चेहऱ्यावरच्या स्किनचं ब्लड सर्कयुलेशन वाढतं आणि डेड स्किन निघून जाते. डेड स्किनमुळं  दाढीच्या वाढीवर निगेटिव्ह परिणाम होतो. त्यासोबतच मॉइश्चरायजरसुद्धा वापरा.  चांगला मॉइश्चरायजर तुमच्या त्वचेला फक्त निरोगीच ठेवत नाय तर दाढी वाढवायला सुद्धा मदत करतो. ह्यासोबतच तुमच्या दाढीच्या खालची स्किन सुद्धा ऍक्टिव्ह ठेवण महत्त्वाचयं. यासाठी तुमच्या दाढीचा कंगवा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरु शकतो. केसांच्या चांगल्या आणि परफेक्ट वाढीसाठी केसांमधून रोज कंगवा फिरवत जा. त्याच्यामुळं होतं काय तर केसांच्या खालच्या स्किनमध्ये ब्लड सर्कयुलेशन वेगानं होत. आणि त्यामुळ आवश्यक पोषण द्रव्य दाढीच्या मुळापर्यंत पोहोचायला मदत होते. आणि त्यामुळे केसांची वाढ होण्यास मोठी मदत होते. दुसरा मुद्दा म्हणजे भावांनो व्यायाम सुरु करा. भावांनो दाढीच्या केसांची संख्या वाढवण्यासाठी, ती दाट करण्यासाठी नियमित व्यायाम करणं खूप गरजेचयं आहे. त्यात बी तुम्हाला रनिंग, सायकलिंग, कार्डीयो या व्यायाम प्रकारांचा समावेश करावा लागल. आता हा असा सगळा व्यायाम केल्यामुळ होतं काय तर तुमच्या शरीरातल ब्लड सर्कयुलेशन आणि टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनची लेवल वाढते. आणि टेस्टोस्टेरॉन हे अस हॉर्मोनयं की जे तुमच्या केसांच्या वाढीसाठी अगदी महत्वाचयं. जास्त व्यायाम केल्यामुळ फक्त टेस्टोस्टेरॉनच नाय तर तर डीएचटी (DHT) म्हणजेच डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉनची पातळी सुद्धा वाढते. डीएचटी हा एक शरीरातील असा घटक आहे जो शरीरातील प्रत्येक केसांच्या वाढीवर थेट परिणाम करतो. तिसरा मुद्दाय तुमचा तणाव कमी करा.

beard growth,beard meets food,beard styles for men,beard growth oil,beard oil,beard transplant,beard growth tips,beard,beard oil kaise use kare,beardo godfather perfume review,vishaych bhari,vishay bhari,विषयच भारी,विषय भारी,दाढी कशी वाढवावी,दाढी उगवण्यासाठी उपाय,दाढी हेअर स्टाईल,दाढी लवकर येण्यासाठी उपाय,दाढी येण्यासाठी उपाय,दाढ़ी प्रेमी status,दाढी कशी करावी,दाढी काली करने के उपाय,दाढी येण्यासाठी घरगुती उपाय,दाढी कधी करू नये,दाढी साठी घरगुती उपाय

( Beard Growth Tips for Men | Vishaych Bhari )

तर भावांनो जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याविषयी किंवा इतर गोष्टीविषयी आवश्यकतेपेक्षा जास्त चिंता सुरु करता तेव्हा तुमच्या शरीरातल्या कॉर्टिसॉल या घटकाची मात्रा वाढते. कॉर्टिसॉल काय करतं तर तुमच्या टेस्टोस्टेरॉन हॉरमोनच्या निर्मितीवर डायरेकट निगेटिव्ह परिणाम करत.  तणावामुळे अजून एक गोष्ट होते. तुमच्या रक्तवाहिन्या  संकुचित होतात. त्यामुळे त्याचा परिणाम थेट तुमच्या सुदृढ केसांवर होतो. यानंतर मंडळी चौथा मुद्दाय चांगली झोप घ्या. भावांनो आपल्या शरीरात टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी आपल्या शरीराला चांगल्या झोपेची गरज असते. 8 तासांपर्यंत झोपल्यामुळं शरीरातील टेस्टोस्टेरॉन पुन्हा वाढण्यास मदत मिळते. एवढंच नाय तर तुम्ही पुरेशी झोप घेतली तर तुमचा तणाव सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. पण जर तुम्ही फक्त 5 तासच झोपत असाल तर तुमच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनची निर्मिती 15 टक्क्यांपर्यंत घसरु शकते. जर टेस्टोस्टेरॉनची निर्मिती कमी झाली तर तुम्हाला आयुष्यभर पॅची बियर्ड येतचं राहणार. यानंतर पाचवा मुद्दा..  जो की खूप महत्वाचाय..  तुमचा डाएट सुधारायला हवा भावांनो. जर तुम्ही तुमच्या जेवणात जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश केला तर तुमच्या शरीरातल्या व्हिटामिनची कमतरता दूर होते. भाज्यांमध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठी गरजेचे मिनरल्स आणि व्हिटामिन्स असत्यात. त्यात आपले केसही प्रोटिननंचं बनलेले असतायत. त्यामुळं जितक्या जास्त प्रोटिन रिच अन्नाचा तुम्ही जेवणात समावेश कराल, तितकी दाट दाढी तुम्हाला मिळणारे. जेवणात अंडी , ड्रायफ्रूटस, पालक, सोयाबीन, डाळ, ब्रोकोली अशा प्रोटिनयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे. ह्यासोबतच तुमच्या दाढीचं रुटीन हवं. त्यासाठी बिअर्ड ऑइल, सिरम, शाम्पू वापरू शकता.

( Beard Growth Tips for Men | Vishaych Bhari )

ज्यामुळे तुमच्या दाढीला त्यातून पोषक तत्व मिळतील. भरपूर पाणी सुद्धा तुम्ही प्यायला हवं. जेवढं तुम्ही स्किन आणि शरीराला हायडरेटेड ठेवाल तेवढा फायदा तुम्हाला तुमची दाढी वाढवण्यास होईल. ह्या अश्या काही गोष्टी हायत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमची दाढी वाढण्यास हमखास मदत होईल. पण दाढी येणं हा प्रश्न बऱ्यापैकी तुमच्या अनुवंशीकतेवर अवलंबून आहे. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. ते आपण करूच. पण तुम्हाला दाढी नायचं आली तर लयं आटापिटा करू नका. कारण अशा बी काय पोरी हायत ज्यांना बिनादाढीचीं बी पोरं आवडत्यात. त्यामुळं लय नाराज होण्याची गरज नायं. पण तरी बी बिअर्ड वाला छावा ह्यो जरा उठूनच दिसतो हे आपल्याला मान्यचं करावं लागलं. नाय का? कारण टेस्टेस्टेराॅन लेव्हल इज इक्वल टू फुल बियर्ड इक्वल टू पोरींचं अटेंशन. Attraction Point के पीछे का असली मर्दानी सायंस समझ रहे हो ना?
असो तर आता या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ? तुम्हाला कुठला लूक आवडतूय बियर्डवाला कि क्लिन शेव्हवाला? शिवाय तुम्ही तुमची बिअर्ड वाढवण्यासाठी नेमकं काय करता ? आम्ही सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला कश्या वाटल्या हे सगळंच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा.

फक्त या पाच गोष्टी करा अन झटक्यात दाढी वाढवा | Beard Growth Tips for Men | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *