कळव्याच्या रूग्णालयात एकाच दिवशी ५ संशयास्पद मृत्यू नेमकं काय घडलं l Thane Kalwa Hospital News
11 ऑगस्ट रोजी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराअभावी आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं पाच रुग्ण दगावल्याची गंभीर घटना घडलीय. रुग्णांच्या नातेवाईकांनी तर असा ही आरोप केलाय की आधीच जीव गेलेल्या रुग्णांना icu मध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार करतोय असं दाखवून रुग्णालय प्रशासन आमच्याकडून अतिरिक्त पैसे उकळत. खुद्द मुख्यमंत्र्याच्या बालेकिल्ल्यात हा गंभीर प्रकार समोर आल्यामुळं राज्यात एकच खळबळ उडालीय. सध्या हॉस्पिटल प्रशासन तो आरोप फेटाळून लावतय पण घटनेची माहिती मिळताच संबंधित राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा प्रकार घडलाय त्यामुळं तळपायाची आग मस्तकात गेलीय असं आव्हाड यांनी माध्यमाना सांगितलं. नेमकं काय प्रकरण घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात…
( Thane Kalwa Hospital News )

तर आज ठाण्याच्या कळवा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकापाठोपाठ एक पाच रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. पण त्या दुर्दैवी घटनेला पूर्णपणे रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार ते सर्व रुग्ण गंभीर अवस्थेतच रुग्णालयात आले होते. हॉस्पिटलमधील सर्व यंत्रणा आणि डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले होते. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये एका गरोदर महिलेचा ही समावेश होता. या सर्व मृत रुग्णांच्या कुटुंबीयांनी अशी गंभीर चिंता व्यक्त केली की त्यांच्या निधनानंतर सुमारे सहा तासांपर्यंत अतिदक्षता विभागात (ICU) रुग्ण दुर्लक्षित राहिले आणि वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. मयत झालेल्यांच्या नातेवाईकांनी उपचारात निष्काळजीपणाचा आरोप केल्यानंतर हॉस्पिटल परिसरात मोठा आक्रोश आणि गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळं बराच काळ रुग्णालयाच्या परिसरात वातावरण तापलेलं होतं. मात्र रुग्णालय प्रशासनानं रुग्णांच्या नातेवाईकांचे हे सर्व गंभीर आरोप फेटाळून लावले आहेत. उपचार सुरू असतानाच रुग्णांचा मृत्यू झाला. संबंधित रुग्णालयात मर्यादेपेक्षा जास्त रुग्ण आहेत, अशीही माहिती रुग्णालयाचे डीन माळगावकर यांनी दिली.
( Thane Kalwa Hospital News )
डॉ. अनिरुद्ध माळगावकर पुढं म्हणाले की झालेल्या दुर्दैवी मृत्यूंमध्ये हृदयविकाराचा झटका, गंभीर उलट्या, अज्ञात आजार आणि पायात गळू यासारख्या गंभीर स्थितीत असलेल्या व्यक्तींचा समावेश होता. तसंच एका गरोदर महिलेचा ही आकस्मिकरित्या मृत्यू झाला. त्यांच्या वक्तव्यानंतर काही पत्रकारांनी मृत रुग्णांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला तेव्हा नातेवाईकांनी असा दावा केला की, संबंधित रुग्णालय प्रशासन मूलभूत सुविधांसाठी भरमसाट रकमेची मागणी करतय. जसं की मोबाईल चार्जिंगसाठी 100 रुपये, आयसीयू बेडसाठी 200 रुपये आणि ऑक्सिजन बेडसाठी 200 रुपये शुल्क आकारण्यात येतंय असा ही त्यांचा आरोप आहे. एवढंच नाही तर बराच उशीर वॉर्ड बॉय उपलब्ध नसल्याचा ही त्यांनी आरोप केला. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ते रुग्णालय स्वतः ठाणे महापालिकेच्या अंडर असून गेली तीन दशके तिथं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा कारभार सुरूय. दरम्यान त्या दुःखद घटनेची माहिती मिळताच स्थानिक विधानसभा आमदार जितेंद्र आव्हाड तातडीनं रुग्णालयात दाखल झाले. तथापि, सांत्वन देण्याऐवजी, त्यांच्या भेटीमुळे तणाव आणखी वाढला कारण त्यांनी रुग्णालयातील भयानक परिस्थितीबद्दल आक्रमक भूमिका घेतली. हॉस्पिटलच्या डीनवर कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली.
( Thane Kalwa Hospital News )

जितेंद्र आव्हाड म्हणाले,
तळपायाची आग मस्तकात गेलीय, गेली अनेक दिवस झाले ठाण्यातील शिवाजी रुग्णालया बाबतच्या तक्रारी कानावर येत होत्या. आज एका महिलेचा फोन आला की, तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत. परंतु रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीये. काय प्रकार आहे हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालयात गेलो असता रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो. 5 तास आधीच रुग्ण दगावला, तरीही उपचार सुरूच. त्या महिलेचा पती हा जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत होता. तेथे पोहचलो असता संबंधित रुग्णाला ICU मध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याचे समजले. तिकडे गेल्यावर कळाले की त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तरी तेथील डॉक्टर्स आणि प्रशासन त्या रुग्णावर 5 तास उपचार करत होते. थोडक्यात रुग्ण आधीच दगावला होता, परंतु रुग्णालय प्रशासनानं याची काहीही माहिती त्या महिलेला दिली नव्हती. उलट 5 तास त्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे ते सांगत होते. त्याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना जाब विचारला असता त्या प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टर लोकांची बोलती बंद झाली, असाही आरोप आव्हाड यांनी केला. तसंच जितेंद्र आव्हाड पुढं म्हणाले की, मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचं दाखवून त्या रुग्णाच्या पार्थिवाला ICU मध्ये नेण्यात येते. तिथं आधीच गंभीर रुग्ण उपचार घेत असतात. या गंभीर रुग्णांना दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन त्या जिवंत असणाऱ्या रुग्णांचा देखील जीव अजूनच धोक्यात टाकण्यात येतो. आज दिवसभरात या रुग्णालयात 5 रुग्ण दगावले आहेत. त्या रुग्णालयात अक्षरशः गरिबांची फसवणूक आणि लूट सुरू आहे. बिल वाढवून लावली जात आहेत. डॉक्टर वेळेवर कामावर येत नाहीत. इतकंच काय तर मेलेल्या रुग्णांवर देखील उपचार सुरू असल्याचं दाखवून ही मंडळी पैसे कमवत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा प्रकार सुरू आहे. यात काही कारवाई होईल ही आशा नाहीच. पण गोरगरिबांच्या सोबत हा जितेंद्र आव्हाड स्वतः उभा राहील हा शब्द मी देतो.
( Thane Kalwa Hospital News )
सध्या या प्रकरणामुळं राज्यातील निकृष्ट दर्जाच्या आरोग्य सेवेचा चेहरा समोर आला. पण संबंधित प्रकरणावर तुमचं मतं नेमकं काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply