या ५ लोकसभेच्या जागांसाठी एकनाथ शिंदे आजंही भाजप सोबत भांडतायत | Loksabha Election 2024 latest News| Eknath Shinde


लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील जागावाटपाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. एकीकडे भाजपाने आपल्या जवळपास २३ उमेदवारांची नावं जाहीर करत मित्रपक्षांवर कुरघोडी केली आहे. तर आज शिवसेना ठाकरे गटानेही आपल्या १६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी यादी कधी जाहीर होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र शिंदे गटाकडे असलेल्या काही जागांवर भाजपा आणि अजित पवार गटाकडून दावा ठोकण्यात आल्याने शिंदेगटाची कोंडी झाली आहे. महायुतीच्या जागावाटपामध्ये अजूनही अशा काही जागा आहेत ज्या आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुंबईपासून दिल्लीपर्यंत संघर्ष करावा लागत आहे. या जागा पुढीलप्रमाणे आहेत.

eknath shinde,

(Loksabha Election 2024 latest News| Eknath Shinde)

शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात बंडाचा झेंडा फडकावून वेगळा गट स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे भाजपाने तेव्हा जोरदार स्वागत केले होते. तसेच त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदही सोपवले होते. याचदरम्यान, शिवसेनेतील १३ खासदारही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे गटात होते. भाजपासोबत गेल्यास पुढच्या निवडणुकीत विजय मिळवणं सोपं जाईल, असा हिशोब त्यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात आता पुन्हा खासदारकी सोडा निवडणुकीचं तिकीट मिळवणंही शिंदे गटातील खासदारांसाठी कठीण होऊन बसलं आहे. तसेच आपल्या एकेका मतदारसंघासाठी आणि उमेदवारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संघर्ष करावा लागत आहे. मात्र भाजपाकडून त्यांच्यावर तडजोडींसाठी दबाव आणला जात आहे.

(Loksabha Election 2024 latest News| Eknath Shinde)

लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंना जागा आपल्याकडे राखण्यासाठी भाजपाशी संघर्ष करावा लागत आहे त्यापैकी पहिला मतदारसंघ म्हणजे नाशिक. महायुतीच्या जागावाटपामध्ये नाशिकचा मतदारसंघ सर्वात कळीचा मतदारसंघ ठरला आहे. हेमंत गोडसे हे येथील विद्यमान खासदार आहेत. गोडसे यांना २०१४ आणि २०१९ मध्ये गोडसे यांनी या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलेला आहे. २०१४ मध्ये तर त्यांनी छगन भुजबळ यांना पराभवाचे पाणी पाजले होते. मात्र सद्यस्थितीत या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचा एकही विद्यमान आमदार नाही आहे. येथे भाजपाचे ३ आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत आणि काँग्रेसचा एक आमदार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे यावा अशी आग्रही मागणी भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून केली जात आहे. तर अजित पवार गटही या जागेसाठी आग्रही आहे. 
भाजपाला साताऱ्याची जागा सोडण्याच्या बदल्यात अजित पवार गटाला नाशिकची जागा हवी आहे. छगन भुजबळ नाशिक लोकसभा लढवतील असे संकेत अजितदादाकडून दिले जात आहेत. काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये जाऊन हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र महायुतीमधील इतर पक्षांनी त्याला विरोध केला होता. तेथील वातावरण गोडसे यांच्याविरोधात असल्याचाही दावा केला जातोय. त्यामुळं नाशिकची जागा आता आपल्याकडे खेचून आणताना एकनाथ शिंदे यांची कसोटी लागणार आहे.

shrikant shinde,

(Loksabha Election 2024 latest News| Eknath Shinde)

सध्याच्या जागावाटपामध्ये महायुतीत कळीचा ठरलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे मावळ. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असा विस्तार असलेल्या या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत. श्रीरंग बारणे यांनी २०१९ च्या निवडणुकीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा तब्बल २ लाख १५ हजार मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघातही शिवसेना शिंदे गटाचे संख्याबळ कमी आहे. येथे भाजपाचे स्वत:चे २ आणि समर्थक अपक्ष १ असे मिळून ३ आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे २ आमदार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचा या मतदारसंघात केवळ एकच आमदार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेण्यासाठी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आग्रही आहेत. तर येथे श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी अजित पवार गटाच्या नेत्यांकडून केली जात आहे. या मतदारसंघात अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र ती चर्चा आता काहीशी मागे पडलीय. मात्र भाजपनेही मावळवर दावा केलाय. तिन्ही वेळेस युतीमध्ये भाजपला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही. यावेळी भाजपला संधी मिळावी. उमेदवार कमळाच्या चिन्हावर असावा, अशी भाजपची मागणी आहे. मावळचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दंड थोपटले असून, त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. भेगडे यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत खासदार बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला असतानाच आता पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचेही नाव पुढे आले आहे. त्यामुळे मावळमध्येही श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी मिळवून देताना एकनाथ शिंदे यांना ताकद लावावी लागणार आहे.

(Loksabha Election 2024 latest News| Eknath Shinde)


भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात रस्सीखेच असलेला तिसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे ठाणे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभा याच लोकसभा मतदारसंघात आहे. मात्र येथील विद्यमान खासदार राजन विचारे हे ठाकरे गटात असून, उद्धव ठाकरे यांनी त्यांनाच येथून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. मात्र महायुतीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. येथील सहा आमदारांपैकी चार आमदार हे भाजपाचे आहेत. तर दोन आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. या मतदारसंघात येणाऱ्या नवी मुंबई आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रांमध्ये भाजपाचे वर्चस्व आहे. तर ठाणे मनपा क्षेत्रातही भाजपाचा लक्षणीय जनाधार आहे. त्यामुळे भाजपा कुठल्याही परिस्थितीत हा मतदारसंघ शिंदे गटाला देणार नाही, अशी चिन्हे आहेत. भाजपाकडून या मतदारसंघासाठी ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच विनय सहस्रबुद्धे यांच्या नावाचीही येथून चाचपणी झाली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना या मतदारसंघावर पाणी सोडावे लागेल, अशी शक्यता आहे.भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात मतभेद असलेला चौथा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ. येथे शिवसेना शिंदे गटाचे गजानन किर्तिकर हे विद्यमान खासदार आहेत. मात्र आता या मतदारसंघातून ठाकरे गटानं अमोल किर्तिकर यांना उमेदवारी दिल्यानं गजानन किर्तिकर हे येथून निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. तसेच सद्यस्थितीत येथे ठाकरे गटाला आव्हान देईल अशा उमेदवाराची शिवसेना शिंदे गटाकडे वानवा आहे. त्यामुळे हा मतदारसंघही भाजपाकडून आपल्याकडे खेडून घेतला जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात भाजपाकडून अमित साटम यांचं नाव चर्चेत होतं. या मतदारसंघात भाजपाचे ३ तर शिंदे गटाचा एक आणि ठाकरे गटाचे २ आमदार आहेत. या भागात ठाकरे गटाचा प्रभाव बऱ्यापैकी आहे. त्यामुळे येथे उद्धव ठाकरेंच वर्चस्व मोडीत काढायचे असल्यास महायुतीला तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे.

amol kirtikar,

(Loksabha Election 2024 latest News| Eknath Shinde)

भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वाद असलेला आणखी एक मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ. येथे सध्या शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत हे खासदार आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. तर भाजपाने येथून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव जवळपास निश्चित केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाजपा हा मतदारसंघही शिवसेना शिंदे गटाला सोडण्याची शक्यता कमी आहे. येथील बलाबल पाहिल्यास या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी प्रत्येकी दोन ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे आमदार आहेत. तर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा प्रत्येकी एक आमदार आहे. त्यामुळे येथील उमेदवारीवरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये अखेरपर्यंत खेचाखेची होण्याची शक्यता आहे. तर या सहा लोकसभा मतदारसंघांशिवाय आणखी कोणकोणत्या ठिकाणी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये मतभेद असू शकतात,  आणि त्याचा महाविकास आघाडीच्या कामगिरीवर काय परिणाम होऊ शकतो, या संघर्षाचा महायुतीला तोटा होईल का, तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा.

(Loksabha Election 2024 latest News| Eknath Shinde)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

वंचित बहुजन आघाडी व जरांगे पाटील यांच्या आघाडीमुळे मविआला फटका बसणार ? | Prakash Ambedkar News|Vanchit Bahujan Aghadiउद्धव ठाकरे यांनी उमेदवार फायनल केले पण आता भांडणे वाढतील |Uddhav Thackeray | Loksabha Election 2024 Newsजातीचं हे गणित जुळलं तरच Praniti Shinde सोलापूरच्या खासदार होतील ? | Solapur Loksabha Election 2024|Vishaych Bhariतुकाराम महाराजांचा खरंच खून झाला होता का | Sant Tukaram Beej | Sant Tukaram Maharaj Death | Vishaych Bhari

या ५ लोकसभेच्या जागांसाठी Eknath Shinde आजंही BJP सोबत भांडतायत | Loksabha Election 2024 latest News

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *