वंचित बहुजन आघाडी व जरांगे पाटील यांच्या आघाडीमुळे मविआला फटका बसणार ? | Prakash Ambedkar News|Vanchit Bahujan Aghadi


कधी महाविकास आघाडीतल्या ठाकरे गटासोबत तर कधी काँग्रेससोबत, असा वंचितचा प्रवास आता फायनली मराठा समाजाच्या जरांगे पाटलांसोबत येऊन थांबणार का, अशा चर्चाना उधाण आलंय. कारण जरांगे पाटलांचा आम्हांला पाठिंबा आहे, असा दावा, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. तर एवढ्यावर न थांबता, प्रकाश आंबेडकरांनी वंचित प्लस मराठा, या नव्या समीकरणाच्या दृष्टीनं, 9 ठिकाणी उमेदवार देखील जाहीर करून टाकलेत. काल मविआकडून चर्चेची भूमिका घेण्यात आल्यानंतर, वंचितला पाच जागांची ऑफर देण्यात आली होती पण आंबेडकरांना तो प्रस्ताव मान्य नव्हता. दरम्यान आता वंचितनं जरांगे पाटलांशी चर्चा केल्यानंतर, राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय असं म्हंटलं जात होतं. प्रकाश आंबेडकरांनी हा मास्टरस्ट्रोक मारल्याचंही सांगण्यात येतं होतं आणि त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी या दोन्हींची कोंडी होणारय अशा चर्चा रंगल्यात. पण नुकतच जरांगे पाटलांनी प्रकाश आंबेडकरांचा दावा खोडून काढत मत व्यक्त केलं. जरांगे म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली, पण मी अजून वंचित आघाडीला पाठिंबा दिलेला नाही. ३० मार्चपर्यंत आमचा निर्णय जाहीर करू. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणार नाही. समाजाचं मत विचारात घेऊ, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांचा दावा खोडून काढला. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी, मविआवर प्रेशर क्रियेट करायला ही गुगली टाकलेली का अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात तर काही जणांनी वंचित प्लस मराठा हे समीकरण खरंच जुळलं, तर त्याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो याचे राजकीय अंदाज सुद्धा बांधायला सुरवात केलीये. नेमकं काय घडतंय पडद्यामागं, सध्या कोणत्या 9 जागांवर प्रकाश आंबेडकरांनी उमेदवार दिलेत. मराठा समाज सोबत आला तर जाहीर केलेल्या मतदारसंघातलं राजकारण कसं बदलू शकतं, तिथं महायुतीच्या किंवा मविआच्या उमेदवाराला कसा फटका बसू शकतो त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा

manoj jarange, prakash ambedkar,

(Prakash Ambedkar News | Vishaych Bhari)


मंडळी मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीनं वंचितला दिलेल्या पाच जागांच्या प्रस्तावानंतर आंबेडकरांनी बैठक घेऊन निर्णय घेणार असं सांगितलं होतं. पण त्यानंतर त्यांनी थेट मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तब्बल अर्धा पाऊण तास, दोघात बंद दाराआड चर्चा झाली आणि त्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नव्या आघाडीची घोषणा केली. त्यामुळं आता प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर पडणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोलण्यात येत होतं. प्रकाश आंबेडकर  म्हणाले, “काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्तारानं बोलणं झालं. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील. जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केलीय. त्यांची विनंती आम्ही मान्य केली. मनोज जरांगे पाटील यांचा आम्हाला पाठिंबा मिळणार आहे. त्यांच्यासोबत आमची सामाजिक आघाडी असेल. जरांगे आणि दोघे मिळून लढणार आहोत असं विधान वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं. त्यानंतर त्यांनी थेट 9 जागांवर उमेदवारी सुद्धा जाहीर करून टाकली. पण त्यानंतर लगेचच जरांगे पाटलांनी आमची फक्त बोलणी झालीये, आम्ही अजून वंचितला पाठिंबा दिला नाही, 30 तारखेला काय तो निर्णय जाहीर करू असं वक्तव्य केलंय.

पण तोवर वंचितकडून अकोल्यात प्रकाश आंबेडकर, भंडारा-गोंदियात संजय केवट, गडचिरोलीत हितेश पांडूरंग मडावी, चंद्रपूरमध्ये राजेश बेले, बुलढाण्यात वसंतराव मगर, अमरावतीत प्राजक्ता पिल्लेवान, वर्ध्यात प्रा. राजेंद्र साळुंके, रामटेकमध्ये किशोर गजभिये आणि यवतमाळ-वाशिममध्ये खेमसिंग पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याच कळतंय. त्याचसोबत वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीच्या वतीनं काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा तर सांगलीतून ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा ही निर्णय घेण्यात आलाय. मंडळी प्रकाश आंबडेकर यांची ही भूमिका म्हणजे महाविकास आघाडीसाठी एक मोठा झटका मानला जातोय. कारण वंचितची राज्यामध्ये संघटनात्मक ताकद आहे. त्यांची काही लाख मतं आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर प्रभावी ठरत असल्याच दिसून आलं होतं. 2019 ला वंचितच्या प्रभावाखाली असणाऱ्या जागांवर वोट डिव्हीजन झाल्यामुळं भाजप आणि शिवसेना युतीतल्या उमेदवाराला अप्रत्यक्षपणे फायदा झाला होता.

manoj jarange, prakash ambedkar,

(Prakash Ambedkar News | Vishaych Bhari)


त्यामुळं यंदा वंचितची एकगठ्ठा मतं मिळवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता. कारण लोकसभा निवडणुकीत वंचितच्या मतांचा इम्पॅक्ट लक्षणीय राहिलाय. दरम्यान आता काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला ही मतं मिळणार नाहीत आणि अप्रत्यक्षपणे त्याचा फायदा यंदाही महायुतीलाच होईल असं बोललं जातंय. असो, पण राजकीय विश्लेषकांच्या मते मागच्या वेळी वंचितनं बऱ्याच ठिकाणी वैयक्तिक लढा दिला होता म्हणून त्यांच्या उमेदवारांना फटका बसला होता. पण यंदा जरांगे पाटलांनी वंचितला सपोर्ट दिला तर मराठा समाज, मुस्लिम, जैन मतदारांची बऱ्यापैकी ताकद वंचितला मिळू शकते आणि तसं झालं तर ही परिस्थिती राज्यात वंचितसाठी गेमचेंजर ठरू शकते असं म्हंटलं जातंय. तसं 2019 ला राज्यात वंचितची ताकद कितीय हे सर्वांनी पाहिलंच. पण सध्या जरांगे पाटील सोबत आले तर वंचितची ताकद द्विगुणित होऊ शकते असं बोललं जातंय. कारण राज्यात आरक्षणामुळं मराठा फॅक्टर आता चांगलाचं ऍक्टिव्ह झालाय. दरम्यान जरांगे पाटलांनी पाठींबा दिलाच तर राज्यात वंचित प्लस मराठा तिसरी आघाडी निर्माण होऊ शकते का अशी चर्चा आहे. तसं झालं तर वंचितला जागांसाठी महाविकास आघाडीशी घासाघीस करावी लागणार नाही आणि प्लस आंबेडकरांना वंचित आणि मराठा मतांच्या जोरावर मविआतील घटक पक्षांना कोंडीत पकडता येईल. त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढून राज्याच्या राजकारणात त्यांचा एक प्रॉमिनंट से राहील असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत. पण नेमकं याचं काळात प्रकाश आंबेडकरांकडून जरांगे पाटलांना सोबत घेण्याची रणनीती का आखण्यात येतीये ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. मागच्या काही काळापासून राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून रान पेटवून दिलंय हे तुम्ही पाहिलंय. मराठा आरक्षणप्रश्नी सरकारनं आपली फसवणूक केली, असा आरोप जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा आहे. त्यामुळं बहुतांश मराठा समाज महायुतीच्या सरकारवर नाराज आहे आणि त्यामुळंच जरांगे पाटलांच्या सांगण्यावरून मध्यंतरी येत्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मराठा उमेदवार उभे करण्याची रणनीती आखण्यात आली होती. ती गोष्ट प्रकाश आंबेडकर जाणून होते. म्हणूनचं त्यांनी वेळोवेळी जरांगे पाटलांच्या भूमिकेचं ही समर्थन केलं होतं. अगदी मागं त्यांच्या उपोषण स्थळी जाऊन सुद्धा आंबेडकरांनी जरांगेची भेट घेतली होती. जरांगे पाटलांच्या भूमिकेचं समर्थन केल्यानं आंबेडकरांना थोड्या फार प्रमाणात का होईना मराठा समाजाची सहानुभूती मिळाल्याचं पाहण्यात आलं होतं. तर मागं जरांगे पाटलांनी सक्रिय राजकारणात उतरून निवडणूक लढवावी, अशीही इच्छा प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवली होती. प्रकाश आंबेडकरांना बाबासाहेब आंबेडकरांची लीगसीय त्यामुळे ते दलित आणि वंचितांचा मोठा चेहरा बनलेत. तर छत्रपतींचे विचार मांडत मराठा समाजासाठी संघर्ष करणाऱ्या जरांगे पाटलांच्या मागं आता बऱ्यापैकी मराठा समाज उभाय. त्यामुळं खऱ्या अर्थानं आता शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन लढली तर त्यांच्या विरोधकांना यंदाची निवडणूक जड जाऊ शकते, याची प्रकाश आंबेडकरांना खात्रीय म्हणून त्यांनी जरांगेपुढं सोबत येण्याचा प्रस्ताव ठेवल्याचं म्हंटलं जातंय. मागच्या वेळीही आंबेडकरांनी वंचित प्लस मुस्लिम मतांची मूठ बांधण्यासाठी ओवैसी यांच्या MIM ला सोबत घेतलं होतं. दोघांनी मिळून महाराष्ट्रात सुमारे 14 टक्के मते मिळवली होती. त्याचा सर्वस्वी फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसला होता. पण यावेळी मराठा समाजाचा महायुती सरकारवर असलेल्या रागामुळं वंचित आणि मराठा मतांचा फटका महायुतीच्या ही उमेदवाराला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. आता आपण ज्या 9 जागांवर वंचितनं उमेदवार जाहीर केलेत त्यापैकी बऱ्याच ठिकाणी म्हणजे अगदी सांगायचं झालंच तर अकोल्यात दोन नंबरचा आणि अमरावती, यवतमाळ वाशीम, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, सांगली या मतदारसंघात वंचितचे उमेदवार गेल्या निवडणुकीत तिसऱ्या नंबरला राहिले होते. जर त्या उमेदवारांना महायुती आणि महाविकास आघाडीवर नाराज असणाऱ्या मराठा मतदारांची साथ मिळाली तर निवडणूकांच्या निकालाचं चित्र पालटू शकतं असा विश्वास राजकीय जाणकार व्यक्त करतायत. पण जरांगे पाटलांच्या भूमिकेवर आता वंचितची पुढची राजकीय वाटचाल अवलंबून असणारय. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, जरांगे प्लस प्रकाश आंबेडकर यांची मिळून वंचित प्लस मराठा ही तिसरी आघाडी अस्तित्वात आली तर त्याचा नेमका फायदा आणि तोटा कुणाला होणार महायुती की महाविकास आघाडी? जरांगे वंचितसोबत जातील का ? मराठा वंचित युतीमध्ये खरंच राज्याचं राजकारण 360 डिग्रीत चेंज करण्याची ताकद आहे का ? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा.

(Prakash Ambedkar News | Vishaych Bhari)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

२ ठरले, अजून या ३ जागांवर अजितदादांचे फिक्स उमेदवार कोण ? | Loksabha Election 2024 | Ajit Pawar Newsहे आहेत शिंदे गटाच्या यादीतले १० फायनल लोकसभेचे उमेदवार ? | Loksabha Election 2024 | Vishaych Bhariसुजय विखे पाटीलच नगर दक्षिणचे पुढील खासदार होतील ? ७ कारणे | Loksabha Election 2024 | Vishaych Bhariरणजीतसिंह नाईक निंबाळकर माढ्याचे पर्मनंट खासदार ? | Madha Loksabha Election 2024 | Vishaych Bhari

Vanchit Bahujan Aghadi व Jarange Patil यांच्या आघाडीमुळे मविआला फटका बसणार ? | Prakash Ambedkar News

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *