मंडळी काल मनोज जरांगे अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. धनगर समाज आणि मराठा समाज हे दोघे लहान मोठे भाऊ नाही तर एका रक्ता मासांचे आहेत. तुम्हाला घटनेत आरक्षण दिलेलं असताना तुम्हाला आरक्षण कसं मिळत नाही, याचं आश्चर्य वाटतं. तुम्हाला सावध व्हावं लागेल, आता धनगर समाज बांधवांनी पेटून उठायला पाहिज्ये , मराठा बांधव धनगर समाजाच्या मागे उभा राहील असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी अहमदनगरच्या चौन्डी इथल्या धनगर समाजाच्या दसरा मेळाव्यात काल केला . अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं धनगर आरक्षण दसरा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि याठिकाणी मनोज जरांगे पाटील बोलत होते. पण मनोज जरांगे पाटील यांची धनगर समाजाच्या दसरा मेळाव्याला उपस्थिती ही भविष्यात मराठा धनगर समाज एकत्र येण्याची नांदी समजली जातीय आणि तोच आता चर्चेचा विषय झालाय. पण मग जर भविष्यात धनगर-आणि मराठा समाज एकत्र आले तर मग राज्याची राजकीय गणितं बऱ्यापैकी बदलू शकतात. सगळ्यात पहिला मुद्दा तर शरद पवार हे आपला बारामती मतदारसंघ वाचवण्यात यामुळे यशस्वी होतील. . पण मग मराठा धनगर समाज एकत्र आल्यानं भाजपचा बारामतीतला नेमका कोणता प्लॅन फिस्कटू शकतो, हेच आपण आजच्या Blog च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

(Manoj Jarange Patil | Sharad Pawar | Vishaych Bhari)
2019 च्या निवडणुकांमध्ये अमेठीमधली गांधी कुटुंबाची मक्तेदारी राहुल गांधींच्या पराभवाने संपुष्टात आली. जर आम्ही हे अमेठीत करु शकतो तर हे बारामतीमध्येही आम्ही करु शकतो. असं भाजपचे नेते राम शिंदे यांनी केलेलं हे विधान मागं चर्चेत आलं . मंडळी कर्जत जामखेड मतदारसंघांचे भाजपचे माजी आमदार आणि बारामती लोकसभा मतदार संघांचे प्रमुख प्रभारी राम शिंदे यांचं हे काही दिवसांपूर्वीच वक्तव्य. या वक्त्यव्यातुन भाजपचा बारामती मतदार संघ काबीज करण्याचा प्लॅनय हे सपशेल समजून येतय. त्यात निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा आणि अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसादिवशी त्यांचे भावी खासदार असे लागलेले बॅनर यातून मूळ राष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाला सुरुंग लागणार का अशा चर्चाना सध्या उधाणयं. पण मराठा आणि धनगर समाजाच्या एकत्र येण्यानं भाजपचा हा प्लॅन फ्लॉप ठरू शकतो का किंवा या संधीतून शरद पवार आपला बारामती हा मतदारसंघ वाचवू शकतात का ? त्यासाठी आपल्याला थोडं पाठीमागे जावं लागेल. मंडळी सुरुवातीपासूनच बारामती मतदार संघ हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे राहिलेलाय. त्यातल्या त्यात शरद पवारांचा तर हा बालेकिल्लाच समजला जातो. कारण शरद पवार हे सहा वेळा तर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या इथून 3 वेळा खासदार राहिलेल्यात. बारामती काबीज करण्याचा भाजपने सगळ्यात पहिल्यांदा प्रयत्न 2014 च्या मोदी लाटेच्या निवडणुकीत केला. तेंव्हा सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांना उभं करून भाजपने धनगर कार्ड खेळून हा मतदारसंघ काबीज करण्याचा प्रयत्न केला.
(Manoj Jarange Patil | Sharad Pawar | Vishaych Bhari)
सोबतीला नरेंद्र मोदी यांनी बारामतीत सभा घेऊन महादेव जानकरांना ताकद पुरवली. मोदी लाट प्लस धनगर ध्रुवीकरण हा फॅक्टर भाजपला बऱ्यापैकी कामाला आला कारण त्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंचं मताधिक्य 70 हजारांवरच आलं जे कीं पूर्वी ते 3 ते 4 लाखांपर्यंत असायचं. यातूनच भाजपला आपण राष्ट्रवादीचा हा गड काबीज करू शकतो असा confidence खऱतर आला असणार. त्यानंतर 2019 ला सुद्धा भाजपने हा मतदारसंघ जिंकण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्या निवडणूकित भाजपने दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उभं केलं. मंडळी राहुल कुल हे तसे मूळचे राष्ट्रवादीचे पण 2009 च्या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीच्या अंतर्गत बंडखोरीला सामोरं जावं लागलं आणि 2014 ला त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षामधून दौंड विधानसभेची निवडणूक लढवून ते विजयी झाले. त्या निवडणुकीत राहुल कुल यांचा धनगर मतदारांवरचा इन्फलूयेन्स दिसून आला. म्हणूनचं त्याच राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपने पुढच्याच म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संधी दिली आणि पुन्हा एकदा भाजपने मराठा प्लस धनगर कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. त्या निवडणुकीत शरद पवारांना छेद देण्यासाठी भाजपनं बारामतीत अमित शाह यांना पाचारण केलं. पण तरीही सुप्रिया सुळे यांना भाजप नमवू शकलं नाही. सुप्रिया सुळे तेंव्हा दीड लाख मतांनी निवडून आल्या. आता भाजप जिंकण्याच्या जवळ गेला. पण हरवू नाही शकला. आता असा आत्मविश्वास असण्याची शक्यता आहे की दीड लाखांपर्यंत मताधिक्य खाली आणलंयं तर जिंकणंही अशक्य नाही.

(Manoj Jarange Patil | Sharad Pawar | Vishaych Bhari)
आता शरद पवारांना त्यांच्या मतदारसंघात नमवलं तर त्यांची राज्यभरातील हवा रोखता येऊ शकते असं भाजपला वाटत असणार , म्हणून तर त्यांची आणि सुप्रिया सुळेंची त्यांच्या मतदारसंघात नाकाबंदी करण्याचा प्रयत्न आजही केला जातोय.
त्यामागचं कारण असं कीं , बारामती लोकसभा मतदारसंघातले काही विधानसभा मतदारसंघ हे आधीच भाजपच्या ताब्यात आहेत. ज्यामध्ये दौंड, खडकवासला हे मतदारसंघ भाजपकडे आहेत . त्यामध्ये भीमराव तापकीर हे खडकवासला तर राहुल कुल यांचा दौंड मतदारसंघ आहे. पुरंदरचे आमदार काँग्रेसचे संजय जगताप तर भोरचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे संग्राम थोपटे यांच्याकडे आहे. पुरंदरमध्येही तेव्हा शिवसेनेच्या विजय शिवतारेंचा निसटता पराभव झाला होता. इंदापूरमध्येही दत्ता मामा भरणे आमदार असले तरी हर्षवर्धन पाटील हे भाजपसोबत आहेत. त्यामुळे 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात भाजपची पकड आहे. एकूणच या सगळ्याचा विचार करता भाजपने बारामतीत जोरदार कंबर कसलीये असच दिसून आलंय. त्यादृष्टीने भाजपने आता माजी मंत्री आणि कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांना सुद्धा ताकद पुरवलीयं. कारण त्यांचा धनगर मतांवर प्रभाव आहे. आता बारामती लोकसभा मतदारसंघाची त्यांच्यावर जबाबदारी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यासंदर्भातली सगळी जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर होती. निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्याच्या आधी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनीही मागे दोन दिवसांचा बारामती दौरा केला. त्यावेळी त्यांनीही ‘2024 मध्ये बारामतीमध्ये घड्याळ थांबेल’ असं विधान करुन राष्ट्रवादीला इशारा दिला. पण आता ज्याप्रमाणे मनोज जरांगे यांनी काल धनगर समाजाच्या मेळाव्याला हजेरी लावली त्यामुळे मराठा प्लस धनगर ही ताकद जर एकत्र येण्याची शक्यता आहे तर भाजपला हे जड जाऊ शकतं. कारण ह्या मराठा धनगर ताकदीने जर आरक्षणासंदर्भात सरकार विरुद्ध भूमीका घेतली तर त्याचा फायदा थेट शरद पवारांना होणारे. विशेषत: बारामतीत सुप्रिया सुळे यामुळे प्लस चालतील.
(Manoj Jarange Patil | Sharad Pawar | Vishaych Bhari)
आता यासंदर्भात अधिक बोलायचं म्हणजे, मराठा आरक्षणाचा मुद्दा पीक point ला गेल्यावर राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा ही तापला. तेव्हा भाजप कडून गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केली. हळूहळू त्यांच्या टीकेमुळे मराठा आणि धनगर समाजात अंतर पडू लागलं होतं. याचा फायदा भाजपला होणार असं दिसू लागलं होतं. पण आता जरांगे पाटील यांच्या कालच्या कृतीमुळे शिवशाही आणि होळकरशाही एकत्रित रहाण्याचा मेसेज राज्यभर गेलाय. अर्थात याचा अल्टीमेट फायदा शरद पवारांना बारामतीत मराठा आणि धनगर फूट रोखण्यात होऊ शकणार आहे. तसेच यामुळे भाजपच्या मनसुब्यावर पाणी फेरलं जाणार आहे. आत्तापर्यंत या सर्व मराठा आरक्षणाच्या आंदोलनामागे शरद पवार आहेत असं सगळ्यांकडून खूपदा बोललं गेलंय. पण यातला जर तर चा भाग सोडून दिला तर
मराठा प्लस धनगर या समीकरणामुळे भाजपला राज्यभर मोठा सेटबॅक बसू शकतो.
तर शरद पवारांना याचा फायदा होऊ शकतो, एवढं मात्र नक्कीय. भाजपचा बारामतीमधला 2024 चा प्लॅनही यामुळे फिस्कटू शकतो. अर्थात गोपीचंद पडळकर यांच्या धनगर नेतृत्वावरही हा जोरदार प्रहार ठरू शकतो.

(Manoj Jarange Patil | Sharad Pawar | Vishaych Bhari)
आता थोडं एक्स्ट्राचं बोलायचं झाल्यास, बारामतीत भाजप अजित दादा गटाकडून सुनेत्रा पवारांना तिकीट देण्याची शक्यता आहे. कारण जर भाजपने सुप्रिया सुळे विरोधात कोणी धनगर नेता किंवा इतर सीट उभी केली तर अजित पवार सुप्रिया सुळे यांचचं काम करतील,.अशी भाजपला शंका आहे . पण मघाशी म्हंटल्याप्रमाणे जर भाजपने सुनेत्रा पवारांना ताकद दिली तर पवार घराण्यात दुही निर्माण होऊ शकते आणि यातूनच भाजपला बारामती मध्ये भविष्यात घुसण्याची संधी मिळू शकते.. शिवाय अजित दादांनाही सुप्रिया सुळेंविरोधात काम करावंच लागेल. तसेच सुनेत्रा अजित पवारच सध्यातरी सुप्रिया सुळेंना तगड्या प्रतिस्पर्धी आहेत. पण म्हणूनच भाजप मराठा vs धनगर नरेशन तयार करून पवारांच्या बारामतीमधील जातीय गणिताला तडा देतंय. पण आता अप्रत्यक्ष,प्रत्यक्ष कसं का होईना मराठा अधिक धनगर समीकरण जुळलं तर त्याचा बारामतीत शरद पवारांना तसेच सुप्रिया सुळेंना फायदाच होऊ शकतो. पण भाजपला मात्र याचा बारामतीत मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय मराठा धनगर ताकद एकत्र आल्यामुळे बारामती मध्ये भाजप चं गणित फिसकटलंय का ?
जरांगे पाटलांची कालची कृती ही शरद पवारांना बारामतीत फायदेशीर ठरू शकते का ? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
Leave a Reply