साल 1973. यादोंकी बारात नावाचा सिनेमा आला होता. त्या सिनेमांतलं चुरा लिया हैं तुमने जो दिल को ह्ये गाणं बेक्कार हिट झालं होतं. अन त्याचं एक महत्वाचं कारण होतं गाण्यात दिसणारी हिरोईन. तिचं नाव झीनत अमान. उंचपुरी भरलेली आखीव रेखीव देहयष्टी, सुंदर शब्दा फिका पडावा असा तेजस्वी चेहरा, नाजूक हरिणीसारखे प्रचंड बोलके आणि मादक डोळे, लहान मुलांसारखा वागण्या बोलण्यातला लहरीपणा, टॉप क्लास अदाकरी ह्ये सगळंच झीनतमध्ये ओतप्रोत भरलेलं होतं. त्यामुळं झीनत त्याकाळी भारतातल्या वयात आलेल्या प्रत्येक तरुण पोराची पहिली क्रश होती. तिनं खरोखर सगळ्यांचा चुरा लिया हैं तुमने जो दिल को असं म्हणायला भाग पडलेलं. पुढं 1978 साली राज कपूरनं तिला सत्यम शिवम सुंदरम या सिनेमात पारदर्शी कपड्यात दाखवलं आणि पोरांच्या काळजाचं अक्षरशः पाणी पाणी झालं. शंकराच्या मंदिरात पारदर्शी कपड्यात वावरणाऱ्या रूपाचं कॅरॅक्टर झीनतनं कायमस्वरूपी अजरामर केलं. तिच्यावर चित्रित झालेलं सत्यम शिवम सुंदरम ह्ये गाणं आज सुद्धा इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधलं एक मास्टरपीस सॉंग मानलं जातं. जवळपास 1970 पासून 1985 पर्यंत झीनतनं एकहाती बॉलिवूडवर राज्य केलं. त्यावेळी ती हिंदीतली सर्वात जास्त मानधन घेणारी नटी होती. पण एकीकडं रोज यशाची नवी पायरी चढत असताना मात्र दुसरीकडं झीनतच्या वैयक्तिक आयुष्यात भली मोठी वादळं येत होती. तिच्या लग्नाच्या काँट्रोव्हर्सीपासून तर ती पारचं खचली. तिच्या पहिल्या नवऱ्यानं म्हणे तिला लोकांसमोर लाथाबुक्क्यांनी तुडवलेलं. पण त्यातनं सावरून ही बॉलिवूडपासून लांब राहत आज 73 वर्षाची झीनत तिच्या लाखों करोडो फॅन्सच्या मनावर राज्य करतेय, आजच्या या Blog मध्ये आपण झीनत अमानच्या त्याचं धगधगत्या आयुष्याची गोष्ट सांगणारंय,
(Zeenat Aman Biography)
मंडळी 60 च्या दशकात मधुबालामुळं पहिल्यांदा बॉलिवडला ग्लॅमर प्राप्त झालं. तिला समोर पाहिलेली लोकं सांगतात मधुबाला सारखं नैसर्गिक सौंदर्य पुन्हा कधीचं बॉलिवूडला मिळालं नाही. तिच्या आधी आणि तिच्या नंतर पुन्हा कधीच दुसरी मधुबाला बॉलिवूडला मिळाली नाही. पण तिच्याचं पाऊलावर पाऊल ठेवून सत्तरच्या दशकात आणखी एक रुपवान अभिनेत्री तिला अपेक्षित नसताना बॉलिवूडमध्ये आली. तिनं बॉलिवडूच्या जुन्या नायिकांचं रुपडं बदलून मॉडर्न नायिकेचं नवं स्वरुप इंडस्ट्रिला दाखवलं. ती बिंदास होती. शॉर्ट आणि बोल्ड कपडे घालायची. देव आनंद सारख्या सुपरस्टार माणसापासून तिनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. ती होती झिनत अमान. खरोखर कश्मीर कली म्हणावं असं सौंदर्य घेऊन झीनत चंदेरी दुनियेत अवतरली होती. मंडळी झीनतचा जन्म 19 नोव्हेंबर 1951 रोजी मुंबई इथं झाला. तिची आई वर्धिनी सिंधीया ही ब्राह्मण कुटुंबातील होती तर वडील अमानुल्ला खान हे भोपाळच्या राजघराण्याशी संबंधित व्यक्ती होते. पण अमानुल्ला खान यांची दुसरी खास ओळख म्हणजे त्यांनी त्यावेळच्या मुघल-ए-आझम, पाकीजा या सारख्या सुपरहिट चित्रपटांच्या पटकथा लिहिण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याकाळी ते अमान या नावानं स्वतःला introduce करायचे. ते नाव झीनतला खूप attract करायचं. झीनतच्या जन्मानंतर दोन वर्षांनी तिची आई आणि वडील सेपरेट झाले. झीनतच्या आईनं पुढं एका हेन्झ नावाच्या जर्मन माणसाशी लग्न केलं. तो काळ झीनतसाठी खूप अवघड काळ होता. त्यावेळी झीनतला पाचगणीच्या एका शाळेत शिकायला ठेवण्यात आलं होतं. झीनत त्या शाळेतली सर्वात हुशार मुलगी होती. ती खूप अभ्यासू होती. थोड्याचं काळात ती शिक्षकांची शाळेतली सर्वात आवडती विद्यार्थिनी ठरली. पुढं 13 वर्षाची असताना तिच्या वडिलांचं दुर्दैवी निधन झालं. दरम्यान आपल्या आईपेक्षा वडिलांशी तिचं जास्त सौख्य असल्यामुळं तिनं आपल्या वडिलांचं नाव तिच्या नावासमोर लावलं. पुढं झीनतला शिक्षणादरम्यान तिच्या अभ्यासाचं फळ मिळालं. तिला southern कॅलिफोर्निया इथं पुढील शिक्षणाची स्कॉलरशिप मिळाली. झीनतनं त्या संधीचं सोनं केलं. ती तिच्या आईसोबत परदेशी गेली अन तिनं लॉस एंजेलिस इथल्या दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिनं पुन्हा एकदा भारताकडं आपला मोर्चा वळवला. तिनं पुढं वेगवेगळ्या कंपनी, फर्ममध्ये जॉब करायला सुरुवात केली. त्याचं काळात तिचा मॉडलिंगमध्ये ही इंटरेस्ट वाढला अन तिनं मॉडेलिंग क्षेत्रात तिचं नशीब आजमवलं. जन्मजात अफाट सौंदर्याची देणगी मिळाल्यामुळं 19 व्या झीनत अमान फेमिना मिस इंडियाची रनरप राहिली. तर पुढं जाऊन तिनं मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल या स्पर्धेच्या मुख्य किताबवर स्वतःचं नाव कोरलं. ते विजेतेपद पटकवणारी झीनत अमान पहिली दक्षिण आशियाई महिला ठरली. त्यानंतर झीनत देश-विदेशातील अनेक प्रतिष्ठित मासिकांच्या फ्रंट पेजवर झळकली अन तिनं बॉलिवूडचं लक्ष आपल्याकडं खेचून घेतलं. तेव्हा प्रत्येक सिने निर्मात्याला असं वाटत होतं की झीनतनं त्याच्या सिनेमात काम करावं.
(Zeenat Aman Biography)
तिची डिमांड वाढत होती. पण त्या काळात ही झीनतच्या डोक्यात जगभरातल्या वेगवेगळ्या भाषा शिकून जॉब करण्याची इच्छा होती. पण 1971 साली हलचल चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते ओ पी राल्हान यांनी झीनतला सिनेमांत काम करण्याची प्रचंड गळ घातली. तेव्हा कुठं तरी झीनतनं त्यांचं म्हणणं ऐकलं अन ती सिनेमात काम करायला तयार झाली. सिनेमाची कथा विनोदी अन चांगली होती पण सिनेमांची कास्ट चुकली अन सिनेमा बेक्कार आपटला. पदार्पणातच झीनतचे एकामागोमाग एक तीन चित्रपट दणकून अपटले. त्यामुळं दुःखी झालेल्या झीनतनं कायमचा बॉलिवूडला निरोप द्यायचा ठरवलं. ती भारतातलं काम सोडून पुन्हा जर्मनीत राहायला जाणार होती तेवढ्यात अभिनेते देवानंद यांनी झिनतला रोखलं. त्यांनी हरे रामा हरे कृष्णा हा चित्रपट प्रदर्शीत होईपर्यंत थांब अशी विनंती झिनतला केली. तो चित्रपट प्रदर्शीत झाल्यानंत तुला परदेशात जाण्याची गरज पडणार नाही असं ही देवानंद म्हणाले अन देव साहेबांची ती वाक्य तंतोतंत खरी ठरली. हरे रामा हरे कृष्णा चित्रपटात देवानंदच्या बहिणीची भूमीका साकारणाऱ्या झिनतवर चित्रित झालेलं दम मारो दम हे गाणं खूप गाजलं अन गाण्यानं पब्लिकच्या मनाला भुरळ घातली. तोचं चित्रपट झिनतच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर झीनतनं आयुष्यात कधीचं मागं वळून पाहिल नाही. 1973 साली आलेल्या यादों की बारात सिनेमासाठी झिनतला सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. यानंतर झीनतनं, हिरा पन्ना, धुंद अजनबी, रोटी कपडा और मकान, प्रेम शस्त्र, चोरी मेरा काम, इश्क इश्क इश्क, वॉरंट, धरम वीर, सत्यम शिवम सुंदरम, हम किसीसे कम नहीं, अब्दुल्लाह, आशिक हूँ बहारोंका, रोटी, छैला बाबू, शालिमार, कूरबानी, डॉन, द ग्रेट gambler, दोस्ताना, लावारीस, अलीबाबा और चालीस चोर, इन्साफ का तराजू, राम बलराम, क्रोधी, डाकू हसीना, डार्लिंग डार्लिंग, पप्पी, टक्कर, हमसे हैं जमाना, बॉम्बे 405 miles, दौलत, तीसरी आँख अशा एकूण एक सुपर हिट सिनेमात काम केलं. तिची सगळ्यात जास्त जोडी जमली ती देव आनंद, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत. पण झीनतनं त्याकाळी धर्मेंद्र, विनोद खन्ना, फिरोझ खान, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर अशा जवळपास प्रत्येक टॉपच्या अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. झीनत त्याकाळी संबंध भारताची क्रश झाली होती.
(Zeenat Aman Biography)
देव आनंद तर झीनतच्या प्रेमात आकंठ बुडालेला होता अन हे स्वतः त्यानं त्याच्या ऑटोबायोग्राफीमध्ये लिहिलेलंये. त्याचं झीनतवर एकतर्फी प्रेम होतं पण जिवंत असेपर्यंत ते त्यानं कधीचं कुणाजवळ बोलून दाखवलं नाही. हे जेव्हा झीनत अमानला कळलं तेव्हा तिनं एका मुलाखतीत देव आनंद यांची माफी मागितली की सॉरी देवसाहब मी कधी तुमचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न ही केला नाही. असो, दरम्यानच्या काळात म्हणजे 1973 साली तिच्यासारखी सेम दिसणारी परवीन बाबी हिंदी सिनेमात आली अन त्या दोघींना लोकं जुळ्या बहिणी समजू लागले. शरीरयष्टीपासून दोघींच्या चेहरेपटीत इतकं जबरदस्त साम्य होतं की कोण परवीन बाबी अन कोण झीनत अमान याचा लोकांना अंदाजचं येत नव्हता. आज सुद्धा दोघींमधला फरक कित्येकांना कळत नाही. त्या दोघींनी अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावून टाकलं. असो, झीनत अमान सर्वात जास्त चर्चेत आली ती 1978 साली आलेल्या सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटापासून. त्या सिनेमात तिनं शशी कपूरसमोर चक्क पारदर्शक कपडे घालून बोल्डनेसच्या सगळ्या व्याख्या बदलून टाकल्या. त्या सिनेमामुळं बॉलिवूडच्या नायिकांमध्ये हॉट अन बोल्ड सीन द्यायचं डेरिंग आलं. पुढं जाऊन तेच काम मंदाकिनीनं राम तेरी गंगा मैली मध्ये केलं. त्यावेळी झीनतच्या अभिनयाचं सर्व स्तरातून कौतुक होत असलं तरी पवित्र मंदिरात तिनं तसं आक्षेपार्ह दृश्य दिलं म्हणून तिच्यावर बरीच टीका ही करण्यात आली. पण ती डगमगली नाही. त्या चित्रपटासाठी तिला फ्लिम फेअर पुरस्काराचं नॉमीनेशन मिळालं. दरम्यान प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर असताना तिनं अभिनेता संजय खान सोबत लग्न केलं. संजय खान तोच ज्याच्यासोबत तिनं अब्दुल्लाह सिनेमात स्क्रीन शेअर केली होती. त्या सिनेमातलं मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं दोघांवर चित्रित झालेलं मैने पूछा चांद से हे गाणं आज सुद्धा एकतर्फी प्रेम करणाऱ्या आशिक पोरांचं सर्वात आवडतं गाणंय. पण संजय खानसोबत लग्न करण्याचा निर्णय झीनतच्या चांगलाचं अंगलट आला. संजय खानला पहिल्या लग्नापासून तीन मुलं आहेत हे माहीत असूनही झीनत संजयया प्रेमात आकंठ बुडाली होती. पुढं त्यांच प्रेमप्रकरण लग्नापर्यंत येऊन ठेपलं. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत झिनतनं संजय खान सोबत निकाह उरकून टाकला. पुढं एक दिवस बेक्कार मॅटर झाला. अब्दुला चित्रपटाचं शुटींग पूर्ण झाल्यानंतर झीनत बीआर चोप्राच्या आगामी सिनेमाच्या शूटसाठी लोणावळ्याला गेली. त्यावेळी अब्दुल्ला चित्रपटातील 2 मिनिटांचा सीन पुन्हा रिशूट करण्यासाठी संजय खाननं तिला मुंबईत परत येण्यास सांगितलं.
(Zeenat Aman Biography)
मात्र आगोदरचं तिनं दुसऱ्या चित्रपटासाठी डेट दिली असल्यामुळं तिनं पहिल्यांदा नकार दिला. पण संजय खानवरील प्रेमामुळं ती पुन्हा मुंबईत परत आली. संजय खानच्या घरी गेल्यावर झिनतला कळलं की तो ताज हॉटेलमध्ये पार्टी करतोय. तिनं मग आल्या पाऊली थेट ताज हॉटेल गाठलं. पण तिथं तिच्यासोबत खूप वाईट घटना घडली. झीनतला समोर पाहून संजय खानचा पारा चढला अन त्यानं रागात झीनतला एका रूममध्ये नेऊन लाथाबुक्यांनी तुडवलं. त्यावेळी तिथं संजय खानची पहिली पत्नी जरीन देखील उपस्थित होती. तिनं झिनतला आणखी मारण्यासाठी नवऱ्याला उकसवलं असं नंतर उपस्थितांनी सांगितलं होतं. झीनतच्या हमसून हमसून रडण्याचा आवाज तेव्हा अनेकांनी ऐकला होता. त्या मारहाणीत झिनतच्या एका डोळ्याला आणि मेंदूला जबर मार बसला होता. त्या क्रूर अमानुष मारहाणीनंतर झीनत बरेच दिवस अंथरुणाला खिळून होती. संपूर्ण बॉलिवूडमध्ये त्या मारहाणीची चर्चा झाली होती. पण त्यावेळी झीनतनं संजय खान विरुद्ध पोलीस तक्रार केली नाही. ती आतून खूप तुटली होती. त्यानंतर तिनं संजय खान सोबतचे सगळे संबंधं कायमचे संपवले. पुढं झीनतचं नाव जोडलं गेलं ते पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान याच्यासोबत. पण पुढं झीनतनेचं आमच्यात तसं काही नव्हतं असं एका intrview मध्ये स्पष्ट केलं. पुढं 1985 साली झीनतनं तिच्या आयुष्याच्या दुसऱ्या इंनिंगला सुरुवात केली. 1985 मध्ये करिअरच्या टॉपवर असताना तिनं मजहर खान नावाच्या स्ट्रगलिंग ऍक्टरसोबत लग्न केलं. सुरुवातीचा काळ थोडा बरा गेला पण नंतर दोघांच्यात खटके उडू लागले. पण आई होण्याची आशा मनात ठेवून झीनतनं मजहर सोबतचा संसार टिकवला. त्या दोघांना दोन मुलं झाली. त्यांची नावं झहान आणि अजान अशी ठेवण्यात आली. त्यांचा एक मुलगा फिल्म डायरेक्टर तर दुसरा म्युजिक कंपोजर आहे. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर झीनत मजहरला डिव्होर्स देणार होती. पण त्याचंकाळात मजहर खान अंथरुणाला खिळला. किडणीच्या आजारानं त्याला ग्रासलं आणि त्यातचं त्याचा मृत्यू झाला. आपण मजहरला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले पण शेवटी देवाच्या मनात होतं तेच झालं हे सांगताना एकदा झीनत खूप रडली होती. पण तरीही 1998 साली पतीच्या निधनानंतर तिच्या सासू आणि नणंदेनं झीनतला पतीचं अंत्य दर्शनही घेऊ दिलं नव्हतं.
(Zeenat Aman Biography)
त्यानंतर मात्र झीनत पुन्हा कुठल्या नात्यात अडकली नाही. 2018 साली सर्फरास नामक एका उद्योगपतीवर तिनं फसवणूक आणि बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी सध्या कोर्टात केस सुरुय. पुढं झीनत फिल्मी दुनियेपासून लांब राहत फक्त वाटणीला येतील तेवढे छोटे मोठे रोल करत स्वतःचं मन रमवत राहिली. अलीकडच्या काळात तिनं पानिपत, रईस यांसारख्या काही सिनेमात काम केलं. काही स्टेज शो, वेबसिरिज केल्या पण प्रेक्षकांना आता ती मादक डोळ्यांची झीनत तिच्यात दिसत नव्हती. ती अयशस्वी म्हणवली गेली. 2008 साली झीनत यांना झी चॅनेलनं लाइफ टाईम अवॉर्डनं गौरवलं होतं. 2010 साली सिनेजगतातील तिच्या योगदानासाठी तिला आयफा पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर 2016 साली फिल्मफेअर टाईम लेस ग्लॅमरस अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलं. आता नुकतीचं 71 वर्षाच्या झीनतनं सोशल मीडियावर थाटात एंट्री केलीये. सध्या तिला सोशल मीडियावर खूप मजा येतीये अन त्यातचं ती स्वतःला रमवून घेतीये. पण काहीही असो, तिच्यावर चित्रित झालेली ओह मेरी मेहबुबा, दो लफझो की हैं दिल की कहानी, लैला ओ लैला, आप जैसा कोई मेरे जिंदगी में आये, खायके पान बनारसवाला, फुलोंका तारोंका सबका केहना हैं, दम मारो दम, भीगी भीगी रातो में अशी ढिगानं गाणी तिच्या सुंदरतेची अन सुपरक्लास कलेची ओळख सांगायला पुरेशी आहेत. पण तुम्हाला झीनतचा कोणता सिनेमा अन गाणं सगळ्यात जास्त आवडतं त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply