इस्रायल vs पॅलेस्टिनी कट्टरवादी संघटना हमास च्या संघर्षामुळं जगावर तिसऱ्या महायुद्धाचं संकट | Israel vs Hamas War 2023 News

मंडळी काल परवापासून इस्रायल देश हा आतंकवादी हल्ल्यामुळं धुमसतोय. आतापर्यत तुमच्यापैकी अनेकांच्या कानावर त्या बातम्या आल्याचं असतील. इस्रायलवर पॅलेस्टिनी कट्टरवादी संघटना हमासनं रॉकेट हल्ला केला अन त्यात शेकडो लोक मृत्युमुखी पडले तर हजारो लोक जखमी झाले. जवळपास ५००० रॉकेट्स हमासनं इस्रायलवर डागली होती. तसच हल्ल्यानंतर हमास संघटनेचे अनेक सशस्त्र कट्टरवादी इस्रायलमध्ये घुसले होते. त्यांच्याकडून इस्रायलमधल्या सामान्य नागरिकांवर गोळीबार करण्यात येत होता तर अनेकांना बंदीही बनवण्यात आल्याचं समजतय. जवळपास 22 ठिकाणाहून तशा चकमकीच्या न्यूज आलेल्या आहेत. त्यामुळं सध्या इस्रायलची परिस्थिती अतिशय वाईट असून तिथल्या नागरिकांनी आपली राहती घरं सोडून सरकारी छावण्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय. हमासनंतर लेबनाॅनमधील दहशतवादी संघटनेनं ही इस्रायलवर हल्ला चढवलाय. हमास आणि लेबनाॅनमधील दोन्ही संघटनेना इराणचा पाठींबा असल्याचं दिसून आलंय आता इस्रायलवरील हल्ल्याबाबत अमेरिका आणि भारतानं निषेध व्यक्त केलाय. दरम्यान इस्रायलची परिस्थिती ही अतिशय गंभीर असून इस्रायलला स्टेट ऑफ वॉर म्हणजे युद्धाचा प्रदेश म्हणून घोषित करण्यात आल्याचं समजतय. अन आता त्यामुळं जगभरात इस्रायलवरचा हल्ला म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात तर नाय ना अशीही शंका उपस्थित केली जातीये. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलच्या सैन्यानं सुद्धा प्रतिहल्ला करून हमास या आतंकवादी संघटनेला चोख प्रत्युत्तर दिल्याच समजतंय. एवढंच नाही तर इस्रायली सैन्यानं हमास संघटनेच्या चीफचं घर बॉम्बनं उडवलंय. आता आज इस्रायल आणि पॅलेस्टिनींमधील त्या संघर्षाबद्द्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर UNSC म्हणजेचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलवण्यात आलीये. असो, पण आजच्या Blog मध्ये आपण इस्रायल आणि पॅलेस्टाइन संघर्ष नेमका इतका का पेटलाय, आतापर्यंत इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये काय काय घडलंय, क्षेपणास्त्र डागल्यानंणर तिथं actual ground परिस्थिती काय आहे? त्याबद्दल कोणत्या देशानं काय भूमिका काय घेतलीये, त्यांच्यातील संघर्षाचा जागतिक स्तरावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो ,भारतावर काय परिणाम होऊ शकतो, हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात,

Israel vs Hamas War

(Israel vs Hamas War 2023 News | israel vs hamas war reason)

सुरुवातीला आपण इस्रायल – पॅलेस्टाइन संघर्षाच्या इतिहासाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ, तर मंडळी १९४७ साली जसं इंग्रजांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य दिलं अन जाताना भारत आणि पाकिस्तान असे दोन देश करून त्यांच्यातला संघर्ष तेवत ठेवला अगदी तसचं काहीसं ब्रिटिशांनी इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्याबाबतीत ही केलंय. म्हणजे 1948 च्या मे महिन्यात पॅलेस्टाइन प्रदेशातनं ब्रिटननं माघार घेतली. पण ब्रिटन गेल्यानंतर स्वतःचा स्वतंत्र देश बनवण्यासाठी अनेक वर्षं संघर्ष करणाऱ्या स्थानिक अरब आणि ज्यू लोकांमध्ये अंतर्गत युद्ध पेटलं. त्यांच्यासमोर मुख्य प्रश्न हाच होता की, आता ती जमीन नेमकी कोणाच्या हातात जाणार. तत्कालीन अरब लोक त्या प्रदेशावर त्यांचा दावा सांगत होते तर ज्यू लोक त्या जमिनीवर आमचा हक्क आहे म्हणून आग्रही भूमिका मांडत होते. खरं तर तिथ ज्यू लोकांच्या तुलनेत अरब लोकांची संख्या जास्त होती. त्यामुळं त्यांच्यातला संघर्ष बऱ्यापैकी एकांगी होता अन त्यात अरब लोक जिंकणार ह्ये जवळपास फिक्स होतं. पण ज्यू लोक सुद्धा त्यांच्या स्वातंत्र्याबद्दल प्रचंड आक्रमक होते. त्यांच्या लोकांनी गेली अनेक वर्षे स्वतंत्र इस्रायलचं स्वप्न पाहिलं होतं. झालं, त्या वादातून अरब आणि ज्यू लोकांमध्ये मोठा संघर्ष झाला अन 14 मे 1948 रोजी इस्रायलनं आपला स्वातंत्र्य दिन घोषित केला. 2000 वर्षांत पहिल्यांदा पूर्णपणे फक्त ज्यूंचा देश तिथं अस्तित्वात आला. ते सुद्धा मुस्लीमबहुल प्रदेशाच्या अगदी मधोमध. जो देश नंतर जगातला आधुनिक शेतीतंत्राचा जनक म्हणून जगभरात नावारूपाला आला. पुढं जाऊन इस्रायलनं जेरुसलेमचा पूर्व भाग 1967 साली आपल्या ताब्यात घेतला आणि तेव्हापासून त्ये संपूर्ण शहर इस्रायलच्या मालकीचं असल्याचा त्यांचा दावा आहे. त्या जेरूसलेमला ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू असे तिन्ही धर्माचे अनुयायी आपलं पवित्र स्थळ मानतात. पण तिथल्या मुस्लीम बहुल देशांना तो दावा मान्य नाही. कारण तिथली अल अक्सा मशीद ही त्यांच्यासाठी खूप पवित्र आहे. अन म्हणून वेस्ट बँक, गाझा पट्टी आणि गोलन हाइट्स यांसारख्या मुख्य भागांसारखंचं पूर्व जेरुसलेम शहरावर ही पॅलेस्टाईन त्यांचा दावा करतं. मात्र इस्रायल जेरुसलेमवरील त्यांचा दावा सोडायला तयार नाही. गाझा पट्टी सध्या हमासच्या ताब्यातय. 2005 साली इस्राईलनं गाझा पट्टीवरुन त्यांचं सैन्य मागं घेतलं होतं. मात्र पुढं 2007 मध्ये त्या भागावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले गेले.

(Israel vs Hamas War 2023 News | israel vs hamas war reason)


तेव्हापासून वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमध्ये स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्य स्थापन करावं अशी पॅलेस्टाईनची मागणीय जी की इस्रायलला मान्य नाही. अन त्या वादामुळेचं गेल्या ७५ वर्षापासून इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात सातत्यानं संघर्ष होत असतो. जसा काश्मीर वरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सातत्यानं संघर्ष होत असतो अगदी तसाचं. दरम्यान आता जो हमास या आतंकवादी संघटनेनं इस्रायलवर हल्ला केलाय त्याची मात्र वेगळीचं तीन कारणं हमासकडून सांगण्यात येतायत. त्यांच्या म्हणण्यानुसार, मागच्या काही काळात अल अक्सा मशिदीवर जी की मक्कामदिना नंतर मुस्लीम समाजासाठी सर्वात पवित्र स्थानय, त्यावर इस्रायलकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे इस्रायली पोलीस वारंवार त्या मशिदीत घुसून धुडघूस घालतात आणि पॅलेस्टिनी महिलांवर ही त्यांचे हल्ले सुरु असतात. तर तिसरं कारण असं की गाझा, वेस्ट बँक भागात इस्रायल सातत्यानं अतिक्रमण करतय अन त्याचा बदला घेण्यासाठीचं त्यांनी इस्रायलवर हल्ला केला असं ही हमासकडून सांगण्यात येतय. आता ही हमास संघटना नेमकी आहे तर ऐका, अनेक देश हमासला पॅलेस्टाईन दहशतवादी संघटना म्हणून ओळखतात. तर ती संघटना स्वतःला पॅलेस्टाईन इस्लामिक चळवळ मानते. त्या संघटनेचाच राजकीय पक्ष पॅलेस्टाईनमध्ये सध्या सक्रिय आहे. गाझा पट्टीत जवळपास दोन दशलक्षांहून अधिक पॅलेस्टाईन नागरिक राहतात. इस्त्राईल विरोधात लढण्यासाठी त्यांचे सशस्त्र दल आहे आणि त्यालाच हमास म्हणतात. हमास ही पॅलेस्टाईनच्या कट्टरतावादी संघटनांपैकी सर्वांत मोठी संघटना आहे. इस्लामिक रेजिस्टंस मूव्हमेंट या संघटनेच्या अरबी नावाच्या आद्याक्षरांना जोडून ‘हमास’ हे नाव ठेवण्यात आलं आहे. 1987 साली वेस्ट बँक आणि गाझा पट्टीत इस्रायलने केलेल्या कब्जाचा विरोध सुरू झाल्यावर पॅलेस्टाईनने पहिला विद्रोह केला. तिथूनच हमासची सुरुवात झाली. इस्रायलला धुळीस मिळवण्यास कटीबद्ध असल्याचं या संघटनेच्या चार्टरमध्ये लिहिलं आहे. हमासची सुरुवात झाली त्यावेळी त्या संघटनेची दोन उद्दिष्टं होती. पहिलं उद्दिष्टं म्हणजे इस्रायलविरोधात शस्त्र हाती घेणं. त्यांच्या इज्जदीन अल-कसाम ब्रिगेडवर ही जबाबदारी होती. त्याशिवाय त्या संघटनेचं दुसरं उद्दिष्टं समाजकल्याणाची कामं करणं हे होतं. मात्र, 2005 नंतर इस्रायलनं गाझातून आपलं सैन्य आणि वस्त्या मागे घेतल्या

Israel vs Hamas War

(Israel vs Hamas War 2023 News | israel vs hamas war reason)

. तेव्हापासून हमासने पॅलेस्टाईनच्या राजकीय प्रक्रियेत सहभागी व्हायला सुरुवात केली. 2006 साली हमासनं पॅलेस्टाईन अंतर्गत येणाऱ्या भागातून निवडणुकीत विजय मिळवला आणि पुढल्याच वर्षी गाझाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्या ‘फतह’ या प्रतिस्पर्धी गटाला बाजूला सारत तिथली सत्ता काबिज केली. तेव्हापासून गाझाच्या त्या कट्टरवाद्यांनी इस्रायलसोबत तीन युद्ध केली आहेत. हमासला एकट पाडून त्यांच्यावर हल्ले बंद करण्याचा दबाव यावा यासाठी इस्रायलनं इजिप्तच्या सहकार्यानं गाझापट्टीची नाकाबंदी केली आहे. हमास किंवा किमान त्यांच्या सैन्य गटाला इस्रायलसह अमेरिका, युरोपीय महासंघ, ब्रिटन आणि इतर अनेक राष्ट्र एक अतिरेकी संघटना मानतात. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, हमासच्या दहशतवाद्यांकडून एका जर्मन महिलेची नग्न धिंड काढून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडलीय. त्यामुळं आता इस्रायली सैन्याकडून हमासच्या तावडीत असलेल्या त्यांच्या इस्रायली नागरिकांना सोडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडं स्थानिक पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी सांगितलं की इस्रायलनं जो प्रतीहल्ला केला त्या हल्ल्यात त्यांच्या 198 पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला असून एक हजार लोक जखमी झाले आहेत आणि अजूनही मोठ्या प्रमाणात विध्वंस सुरु आहे. दरम्यान त्या संपूर्ण मृत्यू तांडवानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू म्हणाले की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्याशी चर्चा करून इस्रायलच्या आत्मसंरक्षणाला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे असं सांगितलय. तर इस्रायलमधील भारताच्या दुतावासानं सुद्धा एक निवेदन जारी केलंय. ते असं की इस्रायलची सध्याची तणावपूर्ण परिस्थिती पाहता इस्रायलमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांना विनंती आहे की त्यांनी सतर्क रहावं आणि स्थानिक प्रशासनानं दिलेल्या आदेशांचं पालन करावं. बरेच भारतीय लोक तिथं अडकल्याची माहिती आहे. त्यामध्ये भारतीय अभिनेत्री नुसरत बारूचा हिचादेखील समावेश होता पण सध्या ती सुखरूप मुबंईत पोहोचल्याची बातमी मिळालीये. त्या संपूर्ण हल्ल्याची निंदा करताना अमेरिकेने म्हटलं की, कट्टरतावाद हा कोणत्याच अर्थानं न्यायसंगत नाही. पुढं अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी काऊंसिलच्या प्रवक्त्या एड्रियन वॉट्सन म्हणाल्या, “ आम्ही इस्रायल सरकार आणि लोकांबरोबर ठामपणे उभे आहोत. त्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांप्रती आम्ही शोकसंवेदना व्यक्त करतो

(Israel vs Hamas War 2023 News | israel vs hamas war reason)


तर रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू म्हणाले, आम्ही सध्या युद्धात असून आम्हीच जिंकू. आमच्या शत्रूला कळणारही नाही इतकी त्याची किंमत मोजावी लागेल. एवढचं नाही तर इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी लष्करातील राखीव सैनिकांनाही तयार राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसच हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहूंनी लष्करी अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावलीय. दरम्यान तो संघर्ष आणखी काही दिवस चालू शकतो, असं आंतराष्ट्रीय विश्लेषकांचं म्हणणंय तर दोन्ही देशातील तो संघर्ष म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर नाही ना अशीही अनेकांना भीती वाटतेय. त्या एकूणच परिस्थितीबद्दल जागतिक स्तरावर नेत्यांनी ही चिंता व्यक्त केलीय. अमेरिकेनं त्या हिंसाचाराचा निषेध केलाय. ‘दोन्ही बाजूंनी ती हिंसा तातडीनं थांबवावी असा सूर सगळीकडून उमटू लागलाय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने खूप धक्का बसला. आमच्या प्रार्थना निष्पाप पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण प्रसंगी आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत. तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुअल मॅक्रॉन यांनी त्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले की मी ‘मृत्यू झालेल्या कुटुंबियासोबत माझी संवेदना व्यक्त करतो. जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सामान्य नागरिकांवरील हे रॉकेट हल्ले ताबडतोब थांबेले पाहिजेत असं म्हटलंय तर हा सर्वात घृणास्पद दहशतवाद असल्याचं युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयन यांनी म्हटलंय. दरम्यान आम्ही नेहमी संयम ठेवण्याचे आवाहन करत आलो आहे असं रशियानं मत व्यक्त केलंय.

Israel vs Hamas War

(Israel vs Hamas War 2023 News | israel vs hamas war reason)

हे पण विषय भारी वाच भाऊ

करोडोंच्या गोष्टी सांगणाऱ्या Chain Marketing चा फ्रॉड कसा चालतो | MLM OR Network Marketing Reality

Manipur नंतर आता Hariyana मध्ये उफाळली दंगल | Hariyana Violence News Update | Vishaych Bhari

अंडरटेकर, जॉन सीना यांना बदडणाऱ्या सुप्रसिद्ध WWE रेसलर ब्रे वायटचं अकाली निधन | Bray Wyatt Death Reason | Vishaych Bhari

पण इराणनं मात्र हमासच्या या कारवायांना पाठींबा दर्शवल्याच समजतय. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या सल्लागारांनी इस्रायलवरील पॅलेस्टिनी हल्ल्याचे समर्थन केल्याचं सांगितलं जातय. ते म्हणाले, जोवर पॅलेस्टाइन आणि जेरुसलेम स्वतंत्र होत नाही तोवर आम्ही या संघर्षाला पाठिंबा देत आहे. तर आता इंग्लंडमध्येही काही भागात इस्रायलवरील हल्ल्याचा आनंद व्यक्त केला जातोय अशा बातम्या येत आहेत त्यामुळं तिथली परिस्थिती अधिक बिघडू नये यासाठी इंग्लंडच्या काही भागात पोलीस प्रोटेक्शन वाढवण्यात आलंय. तर एकूण असा सगळा इस्रायल आणि हमासच्या वादाचा इतिहास आहे. रशिया युक्रेन नंतर आता त्यांच्यातला वादाला पेव फुटलंय. तालिबान्यांनी अफगाणिस्तानची काय हालत केली ह्ये देखील तुम्ही पाहिलंच. म्हणजे जिथं कट्टरतावाद हावी होतो तिथ शंभर टक्के रक्तपात घडतो, सध्या आपल्या देशाची अंतर्गत स्थिती अशीचं धगधगती आहे त्याचाही पुढे असा उद्रेक होऊ नये म्हणजे मिळवलं .बाकी तुम्हाला काय वाटतय, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे का, कट्टरतावादी शक्तींचा उदय जगाला विनाशाकड नेतोय का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Israel vs Palestine च्या संघर्षामुळं जगावर तिसऱ्या महायुद्धाचं संकट | Israel vs Hamas War 2023 News

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *