डीन कडून Toilet साफ करून घेतलेल्या Hemant Patil यांना अटक होणार का ? | Nanded latest News |Hingoli


मंडळी काल परवाच नांदेड मधल्या शासकीय रुग्णालयात सगळ्यात मोठं मृत्युकांड घडलं आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले. त्या मृत्यूकांडाच्या घटनेनंतर लगेचच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडच्या शासकीय रूग्णालयात धाव घेत गंभीर असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. तसेच रूग्णालयातील अधिकारी, डॉक्टरांकडून सध्याच्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर रूग्णालयातल्या स्वच्छतागृहांची पाहणी करत असताना  त्यांना तिथं घाण आढळून आली. मग त्यांनी तिथल्या अधिष्ठाता अन् अधिकाऱ्यांना ते घाण टॉयलेटस साफ करायला लावल. पण या घटनेनंतर मात्र राज्यभरातल्या डॉक्टरांनी संताप व्यक्त केलाय. हेमंत पाटील सध्या शिंदे गटाचे हिंगोलीचे खासदार आहेत. त्यामुळ आता, याप्रकरणी खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध atrocityचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय आहे ? या प्रकरणामुळे खासदार हेमंत पाटील यांना अटक होणार का ? सगळंच व्यवस्थित समजाऊन घेऊयात.

 Hemant Patil

(Hemant Patil | Nanded latest News | dean | Hingoli)


मंडळी नांदेडच्या डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सोमवारपासून आजपर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी एकाच दिवशी २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये १२ बालकांचा सुद्धा समावेश होता. ही घटना समोर येताच राज्यभरासोबतचं संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी रुग्णालयाच्या या दुरावस्थेवरुन राज्य सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काल तातडीनं रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या विरुद्ध संतप्त प्रतिक्रिया दिल्यात. याशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील या घटनेवरून प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच काल शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयात दाखल होत पाहणी केली. हेमंत पाटील यावेळी आक्रमक झाले होते. पाहणी करत असताना अनेक वार्डातील स्वच्छतागृह बंद होती. तर अनेक ठिकाणी स्वच्छतागृहातल्या वस्तूंची नासधूस, तोडफोड झाल्याच दिसून आल होतं. त्यानंतर संतप्त झालेल्या खासदार हेमंत पाटील यांनी हातात पाण्याचा पाईप घेऊन तिथल्या वैद्यकीय अधिष्ठाता एस. आर. वाकोडे यांच्या कडून बाथरूम स्वच्छ करून घेतलं. वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे असलेल्या कार्यालयीन रजिस्टरची सुद्धा त्यांनी तपासणी केली आणि विष्णुपुरी रुग्णालयातल्या आणि इतर परिसरातल्या अस्वच्छतेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. स्वच्छता निरीक्षक यांना सुद्धा त्यांनी धारेवर धरलं. पण आता या प्रकरणाचे वैद्यकीय अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र तीव्र पडसाद उमटलेत. राजकारण राजकारणाच्या जागी करा, स्टंटबाजीला आमचा विरोध आहे, अस म्हणत या विद्यार्थ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिलायं. याप्रकरणी आता खासदार पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Hemant Patil | Nanded latest News | dean | Hingoli)


त्यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात हेमंत पाटील आणि अन्य १० ते १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांडारवाड यांनी ही माहिती दिली. आता या प्रकरणामुळे सेंन्ट्रल मार्ड संघटना आक्रमक झाली आहे. खासदार हेमंत पाटील यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागावी, अन्यथा डाॅक्टर्स मंडळींनी  महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे. घडलेल्या प्रकारामुळे फक्त अधिष्ठाता यांचंच मानसिक खच्चीकरण झालेल नाही तर संपूर्ण डॉक्टरांसाठी ही अपमानास्पद गोष्ट आहे. असं मत त्यांच्याकडून नोंदवण्यात आलं आहे. हेमंत पाटील यांनी माफी न मागितल्यास आंदोलनाचा इशारा मार्डकडून देण्यात आलाय. सोबतच राज्यातली आरोग्य व्यवस्था कोलमडली तर त्याला सरकार जबाबदार राहणार, अशी भूमिका सुद्धा सेंट्र्ल मार्डनं घेतली आहे. त्याचबरोबर रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही प्रशासनाच्या अपयशासाठी डॉक्टर व वैद्यकीय शिक्षकांना जबाबदार धरण्यात येतयं. तसच त्यांना हिन वागणूक देऊन त्यांचा अपमान करण्यात येत असल्यामुळ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक निराश झाले आहेत. तसच घटनेनंतर समस्त डॉक्टरही हताश झाले आहेत. प्रशासनाच्या अपयशासाठी डॉक्टरांना बळीचा बकरा बनवण्याऐवजी राज्यभरातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जीवरक्षक औषधे, संसाधने आणि मनुष्यबळाची कमतरता दूर करण्याची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, अशी विनंती ‘मार्ड’कडून करण्यात आली आहे.

 Hemant Patil 
Andolan

(Hemant Patil | Nanded latest News | dean | Hingoli)


मंडळी तर बघा जिल्हा नियोजन समितीकडून नांदेडच्या रुग्णालयासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यापैकी १ कोटी रुपये साधनसामग्री, एक कोटींची औषध खरेदी, एक कोटी रु. शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य आणि उर्वरित १ कोटी ऑक्सिजन प्लाण्टसाठी मंजूर झाले होते; पण या प्रस्तावाला अद्याप तांत्रिक मान्यता मिळाली नाही. शिवाय कोरोना काळात स्थानिक पातळीवर औषध खरेदीचे अधिकार देण्यात आले होते. त्यावेळी २ कोटी १६ लाख रुपयांची औषध खरेदी केली होती. पण तीन वर्षानंतरही त्याची देयक अद्याप दिली गेली नाहीये. त्यामुळ त्यांनीही औषध पुरवठा थांबवला आहे आता घडलेल्या या प्रकारानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा चांगलेच ताशेरे ओढलेत. सरकारने त्या खात्याच्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीये. तर रुग्णालयाच्या अनास्थेपोटी असं कृत्य केल्याची प्रतिक्रिया हेमंत पाटलांनी दिलीय. हेमंत पाटील म्हणाले कीं रुग्णालयात 260 कर्मचारी स्वच्छतेसाठी आहेत. 36 रुग्ण दगावल्यानंतरही अधिकारी स्वतः चेंबरमधून बाहेर येत नाहीत आणि यामुळे प्रचंड अनास्था या रुग्णालयात पाहायला मिळत आहे.  रुग्णालयातील अनास्थेच्या चिडीपोटी मी हे कृत्य केल आणि त्यांनीच नाहीतर मी स्वतः सुद्धा सफाई केलीय. मंडळी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या या घटनेची शासनान सुद्धा आता गंभीर दखल घेतली असून, चौकशी करून त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल’, अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सांगितल. रुग्णालयात औषधांची कमतरता नव्हती. तिथे पुरेसे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता आहे. यानंतरही अशा प्रकारची घटना घडल्यान ही गंभीर बाब आहे. राज्य सरकारन ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच मंत्री, सचिव आणि अधिकाऱ्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे’, असेही पुढं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल. पण नांदेडच्या या घटनेनंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना स्वच्छतागृहाची साफसफाई करायला लावणाऱ्या हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी आदिवासी युवक कल्याण संघानं केलीय. जिल्हा प्रशासनाकडे त्यांनी तस रीतसर निवेदन सुद्धा दिलेलयं. या संदर्भात माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, आदिवासी युवक कल्याण संघाचे पदाधिकारी तथा माजीजिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सतीश पाचपुते, बबन डुकरे, शिवाजी इंगळे, रंगराव रिठे, सतीश चिभडे, वैभव इंगळे, कामाजी भिसे, कृष्णा नाईक, किशन हनवते, सतीश नाईक यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केल आहे.

(Hemant Patil | Nanded latest News | dean | Hingoli)

नांदेडच्या आखाडा बाळापूर इथही आदिवासी बांधवांनी खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात निवेदन दिलंय. दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्यान आता हेमंत पाटील यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. मंडळी हेमंत श्रीराम पाटील हे हिंगोलीचे 17 व्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. याअगोदर ते नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि 2014 साली नांदेड दक्षिणचे आमदार होते. ते अगोदर उद्धव ठाकरेंचे निकटवरतीय समजले जायचे. पण नंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मंडळी लोकप्रतिनिधींनी शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा वाईट वागणुक देण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा वागणुकीचे व्हीडिओ सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हायरल झाले आहेत. जुलै महिन्यात खासदार हेमंत पाटील यांनीच माहूरच्या तहसीलदारांना झापल्याचा व्हिडिओ तेव्हा समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला होता. “इंग्लिशमध्ये सांगू की वेगळ्या पद्धतीने सांगू, एका मिनिटात तुमच्या अंगातील मस्ती उतरवीन,” अशा शब्दात खासदार हेमंत पाटलांनी तहसीलदार किशोर यादव यांना तेव्हा धारेवर धरलं होतं. हेमंत पाटील आणि तहसीलदार यादव यांच्यात तेव्हा शाब्दिक चकमक झाली होती. “तहसीलदार आमचे फोन घेत नाहीत, आमच्या अडचणी जाणून घेत नाहीत,” अशा तक्रारी हेमंत पाटलांकडे आल्या होत्या. यावरून खासदारांनी तेंव्हा तहसीलदारांना वाईट शब्दात सुनावलं होतं. पण मंडळी भारतीय दंड संहितेच्या कलम 353 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची तरतूद आहे. या कलमाच्या तरतुदींनुसार, जर एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल आणि तो कर्मचारी आपलं कर्तव्य पार पाडत असेल. अशा वेळी जर त्याला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्याच्या किंवा धमकावण्याच्या उद्देशानं बळाचा वापर किंवा हल्ला करण शिक्षेस पात्र आहे. सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीला कायद्याच्या दृष्टीने अपराधी मानलं जातं आणि त्या व्यक्तीला भारतीय दंड संहितेच्या कलम 353 च्या तरतुदींनुसार शिक्षा होऊ शकते. या कलमाअंतर्गत 2 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. तसच आर्थिक दंडाची सुद्धा तरतूद आहे. बाकी न्यायालय आवश्यकतेनुसार शिक्षा वाढवू शकते. त्याचबरोबर ऍट्रॉसिटी कायदा 1989 हा भारतीय संसदेने संमत केला होता. या कायद्यानुसार अनुसुचित जाती जमातींना संरक्षण दिलं जातं

 Hemant Patil

(Hemant Patil | Nanded latest News | dean | Hingoli)

.याशिवाय सार्वजनिक ठिकाणी अपमान करण, ही गोष्ट सुद्धा या कायद्यानुसार गुन्हा मानला गेला आहे. त्यामुळे आता खासदार हेमंत पाटील यांच्यावर कारवाई होणार का ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. यात अजून एक अपडेट म्हणजे वैद्यकीय अनास्था प्रकरणाची उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली असून न्यायालयानं राज्य सरकारला संबंधित प्रकरणावर मत मांडायला सांगितलं आहे. बाकी यामुळे हाॅस्पिटल प्रशासनाला त्यांच्या जबाबदारीतून हात झटकता येणार नाहीत शिवाय राज्य सरकारलाही रूग्णालय प्रशासनाला आपलं soft target बनवून political विषयांतर करणं शोभणारं नाही. कारण या दोन्ही लोकांच्या हलगर्जीपणामुळे आज काही निष्पाप लोकांचे बळी गेलेत. अजून जाऊ नयेत ही माफक अपेक्षा. बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ? खासदार हेमंत पाटील यांची ही वागणूक बरोबर होती का? त्यांना अटक व्हायला हवी का ? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Dean कडून Toilet साफ करून घेतलेल्या Hemant Patil यांना अटक होणार का ? | Nanded latest News | Hingoli

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *