झुबेदा मुजावर दगडी चाळीच्या Asha Gawli उर्फ मम्मी कशा झाल्या | Arun Gawli | Vishaych Bhari


मंडळी मुंबई अंडरवर्ल्डचा इतिहास काढला तर तुम्हांला एकापेक्षा एक सरस अशा रक्तरंजित कहाण्या ऐकायला मिळतील. चोऱ्यामाऱ्या, नशेबाजी, काळे धंदे, बदला, वर्चस्व टिकवण्यासाठी सुरु झालेलं gangwar या सगळ्यात अडकून पडलेले गुन्हेगार अन त्यांना संपवण्यासाठी मुंबई पोलिसांनी उचललेलं एनकाऊटरचं हत्यार सगळचं खतरनाक. पण या सगळ्या राड्यात सुद्धा कधीकाळी अंडरवर्ल्डमध्ये एक लव्हस्टोरी खतरनाक गाजलेली. अन ती म्हणजे दगडी चाळीचे Daddy अरुण गवळी आणि त्यांच्या पत्नी आशा गवळी यांची. मंडळी आता कदाचित तुम्हाला ह्ये माहित झालंच असेल की अरुण गवळी यांच्या पत्नीचं खर नाव आशा नसून झुबेदा मुजावर असं होतं. त्यांचा जन्म पुण्यातील एका मुस्लीम कुटुंबात झाला होता. पण मग प्रश्न हाचय की पुण्याच्या झुबेदा मुजावर दगडी चाळीत येऊन आशा गवळी उर्फ चाळीच्या मम्मी कशा झाल्या. सगळं प्रकरण नीट समजावून घेऊ.

Asha Gawli
Arun Gawli

(Asha Gawli| Arun Gawli | Vishaych Bhari)

८० – ९० च्या दशकातला काळ. मुंबईमध्ये gangwar पीक point ला आलं होतं. जिकडं तिकडं रक्ताचे पाठ वाहत होते. रोज कोणत्या ना कोणत्या तरी gang मधील माणसाच्या हत्येची किंवा Encounter ची बातमी समोर यायची. मुंबईतली लोक आपला जीव मुठीत घेऊन जगायची. तशातचं २० वर्षाचा अरुण गवळी नावाचा तरुण वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून मुंबईतल्या शक्ती मिलमध्ये काम करण्यासाठी आला होता. पण तिथ काम झालं नाही म्हणून तो कांजूरमार्ग इथल्या ग्रीव्हज् लिमिटेड या कंपनीत रुजू झाला. दरम्यान त्याचंकाळात त्याचा शाळेतला मित्र रमा नाईक हा गुंड म्हणून आजूबाजूच्या भागात नाव कमवत होता. अरुण गवळी व रमा नाईक एकत्र आले. त्यांना पुढं बाबू रेशीम नावाचा एक अट्टल गुन्हेगार देखील जॉईन झाला. तिघांनी मिळून छोट्या मोठ्या चोऱ्यामाऱ्या, हफ्तेवसुली करायला सुरुवात केली. पुढं जाऊन त्यांना त्यांच्या gang ला काहीतरी नाव असावं असं वाटलं. मग त्या तिघांनी मिळून बीआरए टोळी स्थापन केली अन भायखळा, लालबाग भागात त्या टोळीनं खूप दहशत माजवली. बीआरए टोळीचा एक मुख्य उद्देश होता मुंबईतल्या इतर मोठ्या gangs ना शार्प शुटर पोरं पुरवायची. स्वतः दाऊद सुद्धा बीआरए टोळीकडून पोरं मागून घ्यायचा. नंतरच्या काळात बीआरए गॅंगनं पारसनाथ पांडे या मटका किंगचा खून केला. मुंबईतला मटका व्यवसाय आपल्या हातात घेण्यासाठी त्यांनी पांडेला संपवलं होतं. त्यानंतरच अरुण गवळीला नॅशनल सिक्युरिटी ॲक्टखाली अटक करण्यात आली होती. पण पुढं एका महिन्यात त्याला सोडण्यात आलं. अन नेमकी त्याचं काळात अरुण गवळी यांची भेट झाली १७ वर्षाच्या झुबेदा मुजावर यांच्याशी. त्यांचं कुटुंब कामानिमित पुण्यातून मुंबईला शिफ्ट झालं होतं. पहिल्याचं नजरेत गवळी यांना झुबेदा मुजावर यांचा धाडशी आणि मनमिळाऊ स्वभाव आवडला. दोघांच्यात आंखो ही आंखो में प्रेम खुलू लागलं. त्यावेळी झुबेदा यांचं त्यांच्याचं धर्मातील एका मुलासोबत निकाह पक्का झाला होता. ती खबर गवळींना लागली मग जास्त वेळ न दवडता अरूण गवळींनी झुबेदाला थेट लग्नासाठी विचारलं. झुबेदा तयार झाली. गवळींनी त्यांचा निर्णय बाबू रेशीम आणि रमा नाईक यांच्या कानावर घातला.

(Asha Gawli| Arun Gawli | Vishaych Bhari)

त्यावेळी हिंदू मुलानं मुस्लीम मुलीशी लग्न करणं हा मोठा धाडशी निर्णय होता. मुस्लीम मुलीसोबत लग्न म्हणजे मुंबईतल्या संपुर्ण मुस्लीम गॅंगशी पंगा घेण्यासारखं होतं. बर त्यात गवळीचे साथीदार बाबू रेशीम आणि रमा नाईक ह्ये दोघे ही हिंदू. नाईक तर मराठी कुटूंबातच वाढलेला. मग ते दोघं झुबेदाशी कसं पटवून घेणारं असा सगळ्यांना प्रश्न पडला होता. पण तरीही अरुण गवळी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले व त्यांनी लग्नाचा निर्णय जाहीर करुन टाकला. दोघांच लग्न झालं आणि झुबेदा मुजावर सासरी आल्या. अरुण गवळींनी लग्न झाल्यावर झुबेदाला आशा ह्ये नवीन नाव दिलं आणि झुबेदा कायमच्या आशा गवळी झाल्या. हिंदू धर्मात बायका जसं कपाळावर भारदस्त कुंकू आणि गळ्यात मंगळसुत्र घालतात अगदी तसाच पेहराव करून आशा गवळी सगळीकड वावरू लागल्या. अगदी आज सुद्धा त्यांच्याकड पाहिलं तरी कोणाला विश्वास बसत नाही की त्या मुस्लीम कुटुंबातून आल्यात. सुरवातीच्या काळात इतर सामान्य बायकांसारखं नवरा आणि मुलं यांच्याभोवती आशा गवळी यांचं आयुष्य फिरत राहिलं. त्याकाळात त्यांना त्यांच्या नवऱ्याचे अनेक मारामारीचे आणि दहशतीचे किस्से ऐकायला मिळायचे. पण नवऱ्याच्या भाईगिरीला त्यांनी घरात शिरू दिलं नव्हतं. पण तो सुखी संसाराचा काळ आशा गवळी यांना फार कमी अनुभवता आला. कारण दरम्यानच्या काळात १९८७ साली बाबू रेशीमची त्याच्या विरोधकांकडून हत्या करण्यात आली आणि पुढच्या काळात लगेचचं रमा नाईक सुद्धा एका चकमकीत मारला गेला. त्यानंतर बीआरए टोळीचा एकचं म्होरक्या उरला अन ते म्हणजे अरुण गुलाब गवळी. पुढं दाऊदच्या टोळीनं अरुण गवळींच्या भावाची हत्या केली अन तेव्हापासून दाऊद आणि अरुण गवळी यांचे संबंध बिघडले.

Dawood
Arun Gawli

(Asha Gawli| Arun Gawli | Vishaych Bhari)

बाबू रेशीम आणि रमा नाईक यांना मारल्यानंतर काही काळ अरुण गवळी अंडरग्राऊंड झाले होते. त्यांना स्वतःच्या सुरक्षेची काळजी वाटत होती म्हणून त्यांनी नव्या पोरांची gang बनवायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पोरांना जमवायला आणि त्यांना चक्क महिन्याच्या महिन्याला पगार द्यायला सुरुवात केली. दगडी चाळीला गवळी gang चा अभेद्य किल्ला बनवला. त्यासाठी जवळपास तीनशे पोरं कामाला ठेवली होती. दरम्यान दाऊद आणि गवळी gang मधला संघर्ष टोकाला गेल्यानंतर त्यांच्यात सातत्यानं गोळीबार, चकमकी होवू लागल्या. मुंबईत दिवसाढवळ्या मुडदे पडू लागले. तो काळ मुंबईकरांसाठी खूप अस्वस्थ करणारा होता. अरुण गवळी म्हणतात, त्या दिवसापासून आशा गवळी माझ्या प्रत्येक अडचणीत खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. अगदी सावलीसारख्या. त्याबद्दल जेव्हा आशा गवळींना विचारलं जातं तेव्हा त्या म्हणतात, मला माहितेय की अरुण गुन्हेगारय पण तरिही मी त्याला साथ देते. कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. मलाही सर्वसामान्य जीवन जगावं वाटतं. पण तस घडणं कदापी शक्य नाही याची ही मला खात्री आहे. पण मी त्याच्यासाठी काय वाट्टेल ते करायला तयारय. त्या दोघांना एकूण पाच मुलं झाली. गीता, महेश, योगेश, योगीता आणि अस्मिता अशी त्यांची नाव. त्यांची मुलं दोघांना डॅडी आणि मम्मी म्हणायची. पुढं आख्खी दगडी चाळ अरुण गवळी यांना डॅडी तर आशा गवळी यांना मम्मी म्हणू लागली. अशा रितीनं भायखळ्याची झुबेदा चाळीतल्या लोकांसाठी मम्मी झाल्या. आशा जीवनात आल्यापासून अरुण गवळी यांच्या कामाचा सूर बदलला होता. दगडी चाळीतल्या लोकांचे प्रश्न मार्गी लावणे, अडल्यानडलेल्यांना पैशांची मदत करणे, शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेवून देणे अशा बारीकसारीक कामात अरुण गवळी आणि त्यांची बायको म्हणजे आशा गवळी पुढाकार घेत होते. कारण भविष्यात नवऱ्याच्या भूतकाळातील कामांचा त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला त्रास होवू शकतो याची आशा गवळी यांना जाणीव होती. गुन्हेगारांना पकडून जेलमध्ये टाकत असताना अरुण गवळींच्या दगडी चाळीत घुसण्याचा प्रयत्न अनेकदा पोलीसांनी केला. त्यातून वाचण्यासाठी फक्त राजकारणचं कामी येऊ शकतं याचा ही त्यांना अंदाज आला होता.

(Asha Gawli| Arun Gawli | Vishaych Bhari)

गवळींच्या शोधात पोलीसांनी अनेकदा दगडी चाळीत घुसून त्यांच्या घराची झडती घेतली. पण अरुण गवळी एकदा सुद्धा घरात सापडले नाहीत. कारण त्यावेळी आशा गवळी यांची नामी शक्कल कामी आली होती. पोलीसांच्या म्हणण्यानुसार आशा गवळी यांनी घरातच खड्डे खोदून ठेवले होते. एक खड्डा तर पोलीसांना चक्क गॅंस सिलेंडरच्या खाली खोदलेला मिळाला होता. पोलिसांची धाड पडली की त्या खड्यात आशा गवळी अरुण गवळी यांना लपवून ठेवायच्या. त्यामुळं अरुण गवळी चकमकीच्या काळात पोलीसांना कधीचं सापडू शकले नाहीत. पुढं १९९६ – ९७ च्या दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं अरुण गवळी यांनी त्यांच्या पत्नीला सेनेत एन्ट्री द्या अशी मागणी केली होती. पण एका गुन्हेगाराच्या नातेवाईकाला संधी दिली तर शिवसेनेला पुढं जावून प्रॉब्लेम येऊ शकतो याची बाळासाहेबाना भीती होती म्हणून त्यांनी त्या गोष्टीला नकार दिला अशा वावड्या त्यावेळी मुंबईत उठल्या होत्या. मग नाराज झालेल्या अरुण गवळी यांनी १९९७ साली अखिल भारतीय सेना नावानं स्वतःचा स्वतंत्र पक्ष उभा केला. डॅडीनी राजकारणात यावं हा सल्ला सुद्धा आशा गवळी यानीचं दिला होता. त्यांचं म्हणणं होतं की राजकारणाचा पाठिंबा राहिला तर अरुण गवळींना पोलीस कारवाईतून वाचवता येवू शकतं. त्यासाठी पक्षाची महिला शाखा देखील काढण्यात आली. आशा गवळी यांनी पुढाकार घेवून त्या महिला शाखेची सगळी जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर उचलली. पोलीस कारवाई करत असताना त्या महिला शाखेच्या महिलांनी कित्येक वेळा अरुण गवळी यांना संरक्षण दिलं होतं. महिला असल्यामुळं पोलीसांना कडक कारवाई करताना मर्यादा पाळावा लागायच्या आणि अरुण गवळी यांना त्याचा फायदा व्हायचा. आशा गवळी पहिल्यांदा पोलिसांच्या तावडीत सापडल्या त्या एका चिट्टीमुळे. अमरावतीच्या जेलमध्ये असताना अरुण गवळी यांनी आशा गवळी यांना एक चिट्टी लिहली होती. त्या चिट्ठीत लिहील होतं, आशा, राजाला सांगून बंड्याकडून मनीष शहाचं काम लवकर करुन घे. चिट्टीत सांगितलेल्या मनीष शहाचा खून झाल्यानंतर पोलीसांनी गवळी यांच्या घरावर धाड टाकली आणि तेव्हा ती चिट्ठी पोलिसांच्या हाती लागली. पण त्यांचा हत्येत संबंध असण्याऐवढे पुरेसे पुरावे पुढं पोलिसांना मिळाले नाहीत आणि आशा गवळी पोलिसांच्या निशाण्यावरून काहीकाळ बाजूला झाल्या. त्यानंतर आशा गवळी यांनी अरुण गवळी यांच्यासाठी राजकीय background सेट करायला सुरुवात केली. असं म्हणतात.आशा गवळी यांच्या परफेक्ट नियोजनामुळेच अरुण गवळी पुढे आमदार म्हणून निवडून येवू शकले.

Balasaheb thakre
Arun Gawli

(Asha Gawli| Arun Gawli | Vishaych Bhari)


त्यांनी नवरा जेलमध्ये असताना भागात लोकसंपर्क वाढवला होता. लोकांची कामं केली होती. असो ,पुढे नवऱ्याच्या पाठिंब्यावरच त्यांनी एक म्यूझिक सर्व्हिस कंपनीही सुरू केली. राजकारणात असल्यावर उत्पन्न दाखवावं लागतं. मग त्यासाठी आपला काहीतरी व्यवसाय पाहिजे अशी आयडिया आशा गवळी यांनी शोधून काढली होती. कंपनीचा सगळा कारभार आशा गवळी यांनी त्यांच्या हातात ठेवला आणि त्यातून वार्षिक दोन कोटींच उत्पन्न होत असल्याचं दाखवण्यात आलं. अशा पद्धतीनं आशा गवळी यांनी अरुण गवळी यांची राजकारणात एन्ट्री घडवून आणली. त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे नवऱ्याला प्रत्येक संकटातून वाचवलं. अगदी पक्ष उभा करण्यापासून ते प्रचार करण्यापर्यन्त त्या नवऱ्याच्यामागे भक्कमपणे उभ्या राहिल्या. नवऱ्याच्या अनेक काळ्या कृत्यांमध्ये देखील त्यांचा सहभाग होता असं पोलीस वारंवार सांगत राहिले पण त्या दरवेळी पुराव्याअभावी सहीसलामत सुटल्या. मुंबईच्या अंडरवर्ल्डमधले भले भले माफीया संपले पण अरुण गवळी मात्र सगळ्यांना पुरून उरले. त्याचं बहुतेक श्रेय आजही आशा गवळी यांना म्हणजेचं दगडी चाळीच्या मम्मीना दिलं जातं. म्हणून तर अरुण गवळी यांनी जेलमध्ये जायच्या आधीपासून झुबेदा उर्फ आशा गवळी यांना त्यांची उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. २०२०-२१ च्या कोरोनाकाळात आशा गवळी यांनी त्यांच्या भागात भयाण काम केलं होतं आणि अजूनही मोठ्या भक्कमपणे त्या दगडी चाळीचा कारभार सांभाळतायत. तर अशी होती अरुण गवळी आणि आशा गवळी ही अंडरवर्ल्डमधली जास्त चर्चेत आलेली लव्हस्टोरी. धर्मापासून स्वभावापर्यत पूर्ण वेगळ्या टोकाची दोन मनं एकमेकांत गुंतली काय आणि त्यांनी शेवटपर्यंत एकमेकांची साथ दिली काय सगळचं अविश्वसनीय होतं . बाकी दगडी चाळीच्या या फेमस लव्हस्टोरीबद्दल तुमचं मत नेमकं काय त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

झुबेदा मुजावर दगडी चाळीच्या Asha Gawli उर्फ मम्मी कशा झाल्या | Arun Gawli | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *