मुंबई आता खरंच गुजराथ्यांची झालीय का | हे आहेत ३ पुरावे Gujrathi | Mumbaikar | Marathi Manus | Vishaych Bhari


कालपरवा मुंबईमधील मुलुंड मध्ये एका मराठी महिलेला ती मराठी आहे या एका कारणावरूनकाही गुजराती लोकांनी घर देण नाकारलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या प्रकरणाची दखल खुद्द राज ठाकरे यांनी घेतली आणि जिथे अन्याय दिसेल तिथे लाथा घाला असा आदेशाच त्यांनी मनसेसैनिकांना दिला. आता यावर त्या संबंधित गुजराती लोकांनी माफी मागीतली आहे. या प्रकरणानंतर या घटनेतील पीडित मराठी महिला तृप्ती एकबोटे यांनी शिवतीर्थावार शर्मिला ठाकरे यांची तसेच राज ठाकरे यांचीही भेट घेतली आहे. पण आता अगदी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ही त्यांना मराठी असल्यामुळे कसं घर नाकारण्यात आलं होतं , हे सांगितलंय.तेव्हा आता या निमित्तानेच सतत होणारी एक चर्चा मात्र पुन्हा पुन्हा होऊ लागली आहे. कि खरंच मुंबईतला मराठी माणूस संपत चाललाय का? गुजराती माणूस मुंबईत मराठी माणसाला dominate करतोय का ? त्याचेच 3 पुरावे सांगणारा हा आढावा.

Mumbai 
Gujrat

(Gujrathi | Mumbaikar | Marathi Manus | Vishaych Bhari)

याबाबतीतला सगळ्यात पहिला पुरावा म्हणजे,

मुंबई मार्केटवरचा गुजरात्यांचा ताबा

.मंडळी मुंबई मराठी कि गुजरात्यांची हा वाद काही आजचा नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून मुंबईवर या गुजराती नेत्यांनी क्लेम केलंय. अध्येमध्ये मुंबई केंद्र शासित प्रदेश करायचा डाव आहे, असेही आरोप लगावण्यात आलेत. आता मराठीच्या मुद्यावर अनेक सरकारच्या उलथापालथी झाल्या . पण या सगळ्यात सामान्य मराठी माणूस नेहमीच पिछाडीवर राहिला. आधी सर्वसामान्य मिल कामगार आणि नंतर सामान्य चाकरमानी अशीच विशेषणं त्याच्याशी जोडली गेली. पण या सगळ्यात गुजराती आणि मारवाडी समाजानं मात्र मुंबईच मार्केट काबीज केलं .तो कापड मार्केट आणि डायमंड मार्केट मध्ये स्थिरस्थावर झाला. त्यामुळे गुजराती आणि मारवाड्यांची आर्थिक स्थिती सुधारली. त्यांची क्रय शक्ती म्हणजेच PURCHASING POWR PARITY वाढली. त्यामुळे खानपानापासून ते अगदी कपडा लत्ता आणि घरापासून ते राहणीमानापर्यंत गुजराती माणसानं मराठी माणसाला मागे टाकलं.पण यात मराठी माणूस आर्थिक दृष्ट्या खिळखीळा होत गेल्यानं चर्चगेट ते बोरिवली आणि सीएसटी ते ठाण्यापर्यंत स्वतःच्या मालकीच घर घेण त्याला परवडेना झालय. आणि त्यामुळेच तो कल्याण डोंबिवली, वसई विरारच्या पुढे फेकला गेला, गिरणी कामगारांच्या अनेक पिढ्यांनी तर मुंबईच सोडली. ज्यांची भायखळा, लालबाग, परळ, गिरगाव, दक्षिण मुंबई इथ वाडीलोपार्जित घर होती, त्यांना मुंबईत राहण परवडनास झाल, त्यांना मग जास्त पैशाचे आमिष दाखवून ती घर गुजराती, मारवाडी लोकांनी ताब्यात घेतली, आणि मराठी माणूस मुंबईतून बाहेर फेकला गेला. आजही अनेक मराठी कलाकार त्यांना अनेक गुजराती कॉलनीत घर नाकरल्याची ओरड करतात. मागे एक नाट्यनिर्माते कैलासवासी गोविंद चव्हाण यांनाही गुजराती तसेच इतर लोकांनी घरात अंडी बनवली , मासे तळले म्हणून शिवीगाळ केली होती, पण त्यानंतरही तात्पुरत हे प्रकरण तापलं आणि मग पुन्हा सगळं जैसे थे झालं. आज मराठी माणसाला खरच मुंबईत वाली उरला नाही आशी मराठी माणसाची आवस्था झाली आहे. आजचा मुंबईचा व्यापार बहुतांश प्रमाणात गुजराती माणसाच्या हातात आहे. बाहेर मराठी माणसाने कितीही गुजराती लोकांना शिव्या दिल्या तरी मराठी माणूस त्यांच्याच हाताखाली काम करतोय.

(Gujrathi | Mumbaikar | Marathi Manus | Vishaych Bhari)

नंबर 2 आहे
सरकारचं गुजरात धार्जिनं धोरण

मुंबईत मराठी माणूस टिकलाय ते फक्त शिवसेनेमुळे असं एक वाक्य तुम्ही तुमच्या वाडवडिलांकडून ऐकलं असेलच. पण शिवसेनेनही बऱ्याच वेळा यात बोटचेपी भूमिका घेतली, असे काहीजण आरोप करतात. त्यांच्याकडून मराठी माणसाला बऱ्याच अपेक्षा आहेत. पण खरंतर आजही अनेकांना शिवसेनेचा आधार वाटतो. आणि त्याचा शिवसेनेन गांभीर्यन विचार करण गरजेच आहे. असो.. तर गेल्या काही काळातलंकेंद्र सरकारचं धोरण बघितलं तर लक्षात येईल की मुंबईतील बरेच उद्योग हे गुजरातला शिफ्ट होतायत. म्हणजे महाराष्ट्रात होणारं पोलीस संचालनालय गुजरातला गेलं . International finance Service centre म्हणजेच IFSC चं office गुजरातला गेलं. मध्यंतरी अगदी सेमीकंडक्टर बनवणारी फाॅक्सकाॅन कंपनीही गुजरातला गेली. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याचे प्रोजेक्ट गुजराती पळवतात असा आरोप झाला. अगदी मुंबईतून गुजरातला जाणारी बुलेट ट्रेनसुद्धा गुजरातच्या व्यापाराच्या भल्यासाठी केली जातेय असा आरोप अनेक नेत्यांनी केला.‌ आता या सगळ्याला गुजरात सरकारचं उद्योग प्रो धोरण सोबतच महाराष्ट्र सरकारची उदासीनता तर कारणीभूत आहेच पण यातून केंद्र सरकारची गुजरातला झुकतं माप देण्याची मानसिकताही दिसून येते. आता या सगळ्यामुळं झालंय काय तर गुजराती माणूस अजून जास्त कमवता झालाय तर मराठी माणूस अधिकच गमावता झालाय.

Narendra Modi

(Gujrathi | Mumbaikar | Marathi Manus | Vishaych Bhari)


आता तिसरा मुद्दा आहे
मुंबईतील वाढते गुजराती मतदार
.‌

मुंबईतील मराठी माणसाला परवडत नाही, या एका निकषावर तो मुंबईच्या मुख्य भागापासून बाहेर अगदी अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवलीकडे शिफ्ट झाला. आता खरंतर यामुळे मूळ मुंबईतला मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला. पण त्याचवेळेस खिशात मुबलक पैसा असल्याने गुजराती माणूस मुंबईत टिकला. आता मागच्या काही वर्षांचा अंदाज घेतला तर लक्षात येईल की मुंबईतील गुजराती मतदार कसा वाढलाय ते . आता मुंबईतील बहुतांश गुजराती समाज हा natural bjp voter मानण्यात येतो. . आणि त्याचा मुंबईतील वाढता टक्का गेल्या काही वर्षांपासून मुंबईत जाणवून आलाय . आता त्याचाच परिणाम म्हणून २०१७ सालच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं इथून ८२ तर शिवसेनेनं ८४ जागा जिंकल्या होत्या. एकूणच मुंबई हा जरी महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असला तरी आर्थिक पातळीवर मराठी माणसाचा कणा मोडलेला दिसून येतोय. त्यामुळेच मुंबईत मराठी माणूस संपत चाललाय. जो आहे त्यांचं उत्पन्न प्रचंड घटलंय आणि म्हणूनच नोकरशाहीतल्या मराठी माणसाला उद्योग,व्यापारात गेल्या काही काळात टाॅपला गेलेला गुजराती माणूस मराठी माणसाला डाॅमिनेट करतोय. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय खरंच मुंबईतला मराठी माणूस आता संपत चाललाय का? मुंबई हळूहळू गुजरात्यांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलीय का ? या सगळ्याला जबाबदार नेमकं कोणंय? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा

मुंबई आता खरंच गुजराथ्यांची झालीय का | हे आहेत ३ पुरावे | Mumbaikar | Marathi Manus | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *