आजकाल, ट्रॅफिक पोलिसांचे अधिकार आणि 2025 वाहतूक नियम समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तुमच्या गाडीवर चालान, दंड, आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी योग्य माहिती घेणं आवश्यक आहे. या लेखात, आपण 2025 वाहतूक नियम आणि ट्रॅफिक पोलिसांचे अधिकार सखोलपणे समजून घेणार आहोत.
आजच्या पोस्टमध्ये आपण जाणून घेऊया ट्रॅफिक पोलिसांचे अधिकार आणि तुमचे हक्क.

2025 वाहतूक नियम आणि ट्रॅफिक पोलिसांचे अधिकार
पोलीस गाडी थांबवू शकतात का?
होय, ट्रॅफिक पोलिसांना वाहन थांबवण्याचा अधिकार आहे, परंतु केवळ ठराविक परिस्थितींमध्ये:
- विना हेल्मेट दुचाकी चालवणे
- सीटबेल्ट न लावणे
- लायसन्स किंवा परमिटशिवाय वाहन चालवणे
- मद्यपान किंवा अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालवणे
- PUC किंवा इन्शुरन्स नसणे
- वेगमर्यादा उल्लंघन किंवा सिग्नल मोडणे
जर तुम्ही या पैकी कोणताही नियम मोडला, तर पोलीस तुम्हाला थांबवून विचारणा करू शकतात.
2025 वाहतूक नियम – ट्रॅफिक पोलिसांचे अधिकार आणि त्यांचे कार्य
नव्या नियमांनुसार दंड आणि शिक्षा अधिक कठोर करण्यात आली आहे:
ड्रिंक अँड ड्राईव्ह:
- ₹10,000 दंड + 6 महिने तुरुंगवास
हेल्मेट/सीटबेल्ट नसणे: - ₹1,000 दंड + 3 महिने लायसन्स निलंबन
इन्शुरन्स नसणे: - प्रथम वेळेस ₹2,000, दुसऱ्यांदा ₹4,000 + 3 महिने तुरुंगवास
वेगमर्यादा उल्लंघन किंवा सिग्नल मोडणे: - ₹5,000 दंड
18 वर्षाखालील मुलाने वाहन चालवणे: - ₹25,000 दंड + 3 वर्ष तुरुंगवास + वाहन नोंदणी रद्द
तुमचे हक्क – वाहनचालक म्हणून काय अधिकार आहेत?
ट्रॅफिक पोलिसांनी तुम्हाला थांबवलं, तर तुमच्याकडेही काही अधिकार सुरक्षित आहेत:
1️⃣ पोलीसांची ओळख विचारण्याचा हक्क:
- तुम्हाला थांबवणाऱ्या पोलिसांची ओळख विचारण्याचा अधिकार आहे.
- बकल नंबर किंवा आयडेंटिटी कार्ड विचारू शकता.
2️⃣ फक्त लायसन्स दाखवण्याचा नियम:
- कलम 130 नुसार, पोलीस फक्त ड्रायव्हिंग लायसन्स दाखवण्याची मागणी करू शकतात.
- इतर डॉक्युमेंट्स दाखवायचे की नाही, हा तुमचा निर्णय आहे.
3️⃣ चावी काढण्याचा अधिकार नाही:
- भारतीय मोटार वाहन कायदा 1932 नुसार, ट्रॅफिक पोलिसांना तुमच्या गाडीची चावी काढण्याचा अधिकार नसतो.
- गाडी टो करण्याचा अधिकार फक्त रिकामी गाडी असेल, तेव्हाच मिळतो.
4️⃣ लायसन्स जप्त केल्यास वैध पावती द्यावी लागते:
- लायसन्स जप्त करताना पोलिसांनी वैध पावती देणे बंधनकारक आहे.
डिजीलॉकर – डिजिटल डॉक्युमेंट्स वैध आहेत का ?
होय !
तुमच्याकडे कागदपत्रे ओरिजिनल स्वरूपात नसली, तरीही डिजीलॉकर किंवा mParivahan ॲपमध्ये स्कॅन करून ठेवलेली कागदपत्रे ट्रॅफिक पोलिसांना वैध मान्य आहेत.
👉 डिजीलॉकरमध्ये कोणती डॉक्युमेंट्स अपलोड करावी?
- रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC)
- ड्रायव्हिंग लायसन्स
- PUC सर्टिफिकेट
- इन्शुरन्स पॉलिसी
- चालान (E-Challan) संबंधित नियम
चालान (E-Challan) संबंधित नियम
💡 चालान फाडण्यासाठी नियम:
- फक्त सरकारने मंजूर केलेले चालान बुक किंवा ई-चालान मशीन असल्यासच पोलिसांना चालान फाडण्याचा अधिकार आहे.
- उपनिरीक्षक किंवा त्याहून मोठ्या हुद्द्यावर कार्यरत अधिकाऱ्यालाच चालान फाडण्याचा अधिकार आहे.
❗️ जर कोणत्याही पावतीशिवाय तुमच्याकडून रक्कम घेतली गेली, तर ती लाच मानली जाते आणि तक्रार केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.
तुमचे अधिकार माहिती असतील, तर ट्रॅफिक पोलिसांशी होणाऱ्या अडचणी टाळता येतात. हा लेख उपयुक्त वाटला, तर तो शेअर करा आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या ब्लॉगला फॉलो करा! 🚗✨